भारतातील युवकांना सशक्त करण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे – Skills on Wheels
केंद्रीय सरकारने भारतातील तरुण पिढी ला सशक्त बनवण्यासाठी चालू केला “स्किल ऑन व्हील” – a customized bus to promote ‘Skill India Mission’ under the ‘Skills on Wheels’ initiative.
प्रोग्राम -आपल्या भारताला अजून सशक्त बनवण्यासाठी आपले भारत सरकार सतत नवनवीन योजना घेऊन येत असते ,आणि या योजनांचे एकच मुख्य उदेश्य असते की ,आपला भारत देश प्रबळ बनावा आणि भारतातील नागरिक आपले पुढचे आयुष्यात आनंदाने जगावेत
आपल्या भारतातील खास करून ग्रामीण भागातील युवकांना ,जास्त करून महिलांना या प्रोग्राम चा फायदा होऊन ,त्या प्रबळ बनाव्यात आणि ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगार वाढावा किंवा ग्रामीण भागातील युवकांना नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यक स्किल्स ची माहिती व्हावी,त्यांना आवश्यक ते स्किल सहजरीत्या शिकता यावेत ,यासाठी भारत सरकारने हा “स्किल ऑन व्हील” प्रोग्राम चालू केला आहे.
हा प्रोग्राम भारताच्या मंत्रिमंडळात कार्यरत असणारे शैक्षणिक आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भारताचे लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी लाँच केला.या प्रोग्राम चे प्रमुख उदेश्य हे की ,”भारतातील जास्तीत जास्त युवकांना नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक स्किल शिकता यावेत “.हा प्रोग्राम NSDC आणि इंडसइंड बँक या दोघांच्या मदतीने कार्यरत झाला आहे.
सरकारने लाँच केलेल्या “स्किल्स ऑन व्हील” प्रोग्राम चे विशेषतः काय आहेत ? Skills on Wheels
१) देशातील ६०,००० युवकांना रोजगार मिळण्यासाठी सशक्त बनवणे –
भारत सरकारने देशातील जास्त करून ग्रामीण भागातील युवकांना सशक्त बनवण्यासाठी हा प्रोग्राम लाँच केला आहे ,या प्रोग्राम द्वारे ग्रामीण भागातील युवकांना नोकरी मिळण्यासाठी महत्वाची असणारी स्किल्स शिकवले जातील ,सरकारच्या मते पुढच्या ५ वर्षा मध्ये ६०,००० पेक्षा जास्त युवकांना या “स्किल ऑन व्हील ” प्रोग्राम चा फायदा होईल.
२) डिजिटल स्किल वरती जास्त ध्यान देणे –
देशातील ग्रामीण भागातील युवकांना नोकरी साठी प्रबळ करणे हे या “स्किल ऑन व्हील” प्रोग्राम चे प्रमुख उद्देश्य आहे,याचसोबत देशातील ग्रामीण भागातील महिलांना डिजिटल स्किल शिकवणे ,हे देखील या प्रोग्राम चे उद्देश्य आहे;कारण आजकाल डिजिटल चे युग आहे ,त्यामुळे आजकालच्या स्पर्धा असणाऱ्या युगात जर युवकांना टिकायचे असेल तर ,त्यांना डिजिटल स्किल शिकणे गरजेचे आहे.
३) NSDC आणि इंडस इंड बँक ने एक साथ मिळून हा प्रोग्राम लाँच केला आहे.
४) भारताच्या काना कोपऱ्यात पोहोचण्यासाठी भारत सरकारने या “भारत स्किल मिशन ” साठी एक अत्याधुनिक आणि टेक्नॉलॉजी चा वापर करून एक बस तयार केली आहे आणि त्या बस ला “स्किल ऑन व्हील” असे नाव दिले आहे.
५) या “स्किल ऑन व्हील” प्रोग्राम चे अजून एक उदेश्य असे की ,भारतातील जास्तीत जास्त भागापर्यंत पोहचणे ,खेड्या पाड्यात पोहचणे आणि तेथील युवकांना नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किल मोफत शिकवणे ,ज्या स्किल शिकून त्या युवकांना नोकरी मिळण्यामध्ये मदत होईल.
६) देशातील युवकांना त्यांचे शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना योग्य स्किल सेट चा पाठ्य क्रम शिकवणे ,जेणेकरून युवकांना त्याचा फायदा होईल.
७) “स्किल ऑन व्हील” प्रोग्राम चे एक उदेश्य असे की ,देशातील लोकांना नोकरी संबंधी तचे स्किल शिकवण्या सोबत त्यांना उद्योग करण्यासाठी लागणारे आवश्यक स्किल शिकवणे ,हे देखील आहे.
८) देशातील युवकांना त्यांच्या बौद्धिकक्षमते नुसार त्यांना योग्य ते नोकरी मिळवण्यासाठी किंवा उद्योग टाकण्यासाठी योग्य ते स्किल शिकवणे ,हे भारत सरकारच्या ” स्किल ऑन व्हील ” प्रोग्राम चे एक उदेश्य आहे.