१५ दिवसात युपीएससी पास होणारया अक्षतची स्टोरी – UPSC success story by Akshat Kaushalya in Marathi

१५ दिवसात युपीएससी पास होणारया अक्षतची स्टोरी – UPSC success story by Akshat Kaushalya in Marathi

मित्रांनो हिंदी मध्ये एक प्रसिदध म्हण आहे.कश्तिया उनकी ही पार होती है जो लहरो की परवाह किया नही करते

ज्या व्यक्तीला खुप उंचावरून पडल्यानंतर देखील स्वताला सावरता आले तसेच त्याने भुतकाळात केलेल्या चुकांपासुन काहीतरी चांगली शिकवण घेता येते.तो व्यक्ती जीवनात एक ना एक दिवस नक्की आपल्या ध्येयापर्यत पोहचत असतो.

आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विदयार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल असेच एक प्रेरणादायी उदाहरण बघणार आहोत.

हे उदाहरण आहे युपीएससीची परीक्षा अवघ्या १५ दिवसात अभ्यास करून उत्तीर्ण होणारया अक्षत कौशल्यचे.

आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की १५ दिवसात युपीएससीची तयारी करणे कसे शक्य आहे?इथे आम्हाला आतापर्यत दोन तीन वर्ष लागुन गेले.तरी आम्ही क्लीअर झालो नही मग हा कसा क्लीअर झाला.

पण हे खर आहे मित्रांनो अक्षत कौशल हा केवळ १५ दिवस युपीएससीची तयारी करून आयपीएस अधिकारी बनला आहे.

युपीएससी परीक्षेची तयारी अवघ्या १५ दिवसांत पुर्ण करणे हे खरेतर खुप अवघड आहे.पण अक्षत कौशल ने हे करून दाखवले आहे.

याला कारणीभुत अक्षतने अनेक वर्षे घेतलेली मेहनत अणि त्याने आपल्या चुकांमधुन बोध घेत घेतलेली शिकवण आहे.

अक्षतने चार ते पाच वर्षे युपीएससीची तयारी केली ज्यात त्याने चार ते पाच वेळा अपयशाचा सामना देखील केला.

एकवेळ अशी आली की अक्षत सतत येणारया अपयशाने अक्षरश खचुन गेला अणि पुन्हा युपीएससी परीक्षा द्यायची नही असे त्याने ठरवून टाकले.

See also  २ एप्रिल रोजी घेण्यात येणार असलेली पोलिस भरती लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता?

पण अशा खचलेल्या अवस्थेत त्याला त्याच्या मित्रांनी धीर दिला त्याच्यात पुन्हा परीक्षा देण्यासाठी आत्मविश्वास निर्माण केला ज्यामुळे अक्षतने पुन्हा एकदा परीक्षा द्यायचे ठरवले.ज्यात तो उत्तीर्ण देखील झाला.

 

अक्षत कौशल्य सक्सेस स्टोरी –

अक्षत कौशल हा एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा युपीएससी स्टुडंट होता जो आज युपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनलेला आहे.

अक्षत कौशल्यने २०१२ पासुन युपीएससीची तयारी करायला सुरूवात केली होती.ज्यात त्याने कोचिंग क्लासेस लावले पण तरीसुदधा तो पहिल्या वर्षी पुर्वपरीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नही.

यानंतर त्याने पुन्हा सलग तीन वेळेस परीक्षा दिली पण तिन्ही वेळा तो परीक्षेत नापास झाला.असे एकुण चार वर्ष सतत अपयश बघुन अक्षत हा पुर्णपणे खचुन गेला होता.अणि पुन्हा कधी परीक्षाच द्यायची नाही असे त्याने ठरवून टाकले.

पण परीक्षेला थोडेच दिवस बाकी असताना घरच्यांनी अणि मित्रांनी त्याला समजावून सांगत पुन्हा प्रेरित केल्यामुळे त्याने पुन्हा परीक्षेस बसायचे ठरवले.

अक्षतने आता पुन्हा नव्याने परीक्षेला बसताना आपल्या जुन्या चुका पुन्हा रिपीट होणार नही याची विशेष काळजी घेतली.

आपल्या जुन्या चुकांपासुन त्याने बोध घेतला ज्यामुळे त्याने फक्त अवघ्या १५ दिवसात परीक्षेची तयारी करून युपीएससी परीक्षा पास केली.

अक्षत पासुन तरूणांना काय शिकवण मिळते –

आपण आपल्या जुन्या चुकांपासुन शिकवण घेत पुढे जायला हवे ही शिकवण आपल्याला अक्षत कौशलच्या सक्सेस स्टोरी मधुन मिळते.

अपयशाचा सामना जीवनात प्रत्येकाला करावा लागतो.पण आपण अपयश येईल ह्या भीतीने आपला मार्ग बदलु नये.उलट आपण याआधी कोणती चुक केली ज्यामुळे आपण अपयशी झालो हे लक्षात घ्यायला हवे अणि पुढे जायला हवे.

अक्षत कौशल इतर तरूणांना काय संदेश देतात?

आपण यूपीएससी परीक्षेची तयारी करताना आधी मुख्य परीक्षा पुर्व परीक्षा यांचे स्वरूप नीट समजुन घ्यायला हवे.अणि मग त्यानुसार तयारी करायला हवी.

See also  Football world cup 2022 matches TV channel number in India - फुटबाँलच्या वल्ड कप मँचेस कोणत्या चँनलवर?

आपण अंधारात बाण मारत बसण्यापेक्षा आपल्या चुकांचे निरीक्षण करायला हवे.

आपण याआधी केलेल्या चुका पुन्हा आपल्याकडुन रीपीट होणार नही याची काळजी घ्यायला हवी.