बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती तालुक्यातील ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे दहावीची परीक्षा देणार होते.
बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा यांनी विचार केला की आपली परिस्थिती सर्व कुटुंबाला तालुक्याला घेऊन जाण्यासारखी नाहीये म्हणून रामजी बाबा यांनी बाकी कुटुंबाला घरीच ठेवले.
यानंतर बाबासाहेब अणि रामजी बाबा हे तालुक्याच्या ठिकाणी एक भाड्याची खोली विकत घेऊन आंबेडकर यांची परीक्षा होईपर्यंत राहु लागले.
बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे वडील रामजी बाबा स्वता स्वयंपाक बनवून खाऊ घालत होते.बाबासाहेब आंबेडकर हे सकाळी अकरा वाजता पेपर देण्यासाठी जात होते.अणि पेपर संपल्यावर तीन वाजेच्या सुमारास खोलीवर परत यायचे.
रोज बाबासाहेब पेपर देऊन येईपर्यंत त्यांचे वडील रामजी बाबा त्यांच्यासाठी स्वयंपाक तयार करून ठेवायचे.मग पेपर देऊन आल्यावर भिमराव जेवण करायचे.
एकेदिवशी भिमराव पेपर देऊन आले अणि जेवायला बसले त्यांनी वडिलांना विचारले बाबा तुम्ही नाही जेवत का यावर रामजी बाबा म्हटले आधी तु जेवून घे मग मी जेवण करेन.
असे रोज होऊ लागले बाबासाहेब पेपर देऊन यायचे रामजी बाबा यांना जेवणासाठी विचारायचे रामजी बाबा तुझे जेऊन झाले की मी जेवेन असे सांगायचे.
एकेदिवशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात ही गोष्ट आली की बाबासाहेब आंबेडकर यांचे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच उरत नव्हत्या त्यांचे वडील त्यांना परीक्षा काळात रोज पोटभर जेवू घालून स्वता उपाशीपोटी झोपत होते.
ही गोष्ट लक्षात आल्यावर बाबासाहेब यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माझे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही मग माझे वडील काय खातात.
एकेदिवशी बाबासाहेब आंबेडकर रामजी बाबा यांना विचारतात बाबा माझे जेवण झाल्यावर टोपली मध्ये भाकरीच शिल्लक राहत नाही.
मग तुम्ही इतक्या दिवसांपासून काय खाता आहे.रोज तुम्ही उपाशी राहता आहे का तुम्हाला भूक नाही लागत का?
यावर रामजी बाबा बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले भिमराव ह्या भाकरीने माझी भूक भागणार नाही
जेव्हा तुम्ही खुप मोठे व्हाल अणि तुमच्या कडे बघताना मला मान वर करुन बघावे लागेल सर्व जग तुमचा जयजयकार करेल हे जेव्हा मी माझ्या डोळयांनी बघेल तेव्हा माझी भुक भागेल तोपर्यंत माझी भुक भागणार नाही.
अणि भविष्यात बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पित्याचे हे स्वप्न पूर्ण करून दाखवले.परदेशातुन उच्च शिक्षण प्राप्त केले बॅरिस्टर झाले.स्वताही शिकले अणि आपल्या समाजाला देखील शिकण्यासाठी प्रेरित केले.
अणि आज तोच भीमराव भारताच्या संविधानाचा कायदयाचा जनक म्हणून जगभरात ओळखला जातो.
ह्या प्रसंगातून आपणास काय शिकवण मिळते?
ह्या प्रसंगातून आपणास प्रत्येक आईबापाच्या मनात निर्माण होत असलेली आपल्या मुला विषयीची प्रचंड तळमळ दिसून येते की माझ्या मुलाने भरपुर शिकावे खुप मोठे व्हावे.
अणि याचसाठी प्रत्येक आईबाप स्वता उपाशी राहतात पण आपल्या मुलांना पोटभर जेवू घालतात,स्वता फाटेल तसेच जुने कपडे घालतात पण आपल्या मुलांसाठी दरवर्षी चांगले कपडे खरेदी करत असतात.
स्वता हालाखीत दिवस काढतात स्वता जुना मोबाईल वापरतात पण आपल्या मुलांना नवीन अॅड्राॅईड मोबाईल घेऊन देतात.
भलेही एखादी गोष्ट आपल्याला कमी पडली चालेल पण आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये हीच तळमळ प्रत्येक आई बापाच्या मनात असते अणि हीच तळमळ आपणास ह्या प्रसंगातून पाहायला मिळते.
अणि आपण देखील बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन त्यांच्या प्रमाणे आपल्या आईबापाचे आपल्याला खुप मोठे होताना बघण्याचे हे स्वप्र पुर्ण करायला हवे हीच एक शिकवण ह्या प्रसंगातून आपणास मिळते.
जे लोक कुठलीही गोष्ट न करण्यासाठी परिस्थिती नाही आपल्याजवळ पुरेशी संसाधने उपलब्ध नाही अशी कारणे देतात त्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हे एक मोठे उदाहरण आहे.
ज्यांनी प्रसंगी अर्धपोटी उपाशी राहून ज्ञान प्राप्त केले.अठरा अठरा तास अभ्यास केला.
वाचनाची प्रचंड आवड होती.पण पुस्तक खरेदी करायला देखील खिशात पैसे नसायचे अशा परिस्थितीत देखील ज्ञान प्राप्तीची इच्छा बाबासाहेबांनी कधीच सोडली नाही.
एकदा पुस्तक हातात आल्यावर वाचुन झाल्यावर ते त्यांना कुठला मजकुर कोणत्या पानावर आहे हे तोंडपाठ असायचे इतके चाणाक्ष बुदधीचे बाबासाहेब आंबेडकर होते.
अणि बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या घरातील आर्थिक परिस्थितीची जाण होती म्हणून एकदा हातात आलेले पुस्तक आपण पुन्हा विकत घेऊ शकत नाही याकरीता बाबासाहेब एकदाच ते पुस्तक अशा पद्धतीने वाचुन काढायचे की पुन्हा त्यांना ते पुस्तक वाचण्यासाठी पुन्हा खरेदी करण्याची आवश्यकता पडायची नाही.
यावरून आपणास दिसुन येते वाचनाची किती प्रचंड गोडी किती प्रचंड तळमळ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात होती.
स्वताही उच्च शिक्षित झाले अणि त्यांनी अज्ञानाच्या अंधारात खितपत पडेल असलेल्या आपल्या समाजाला देखील ज्ञानाच्या प्रकाशाकडे त्यांनी नेले.
आपल्याला मोठे होताना कुठलीही परिस्थिती
रोखु शकत नाही फक्त आपल्या मनातील निर्धार पक्का असायला हवा हे देखील ह्या प्रसंगातून आपणास शिकायला मिळते.