भारतातील आय.आय.एम महाविद्यालयांची महिती- IIM Collages Marathi information
आज मॅनेजमेंट पदवीला इंजिनिअरिंग किंवा इतर उच्च पदवी समान स्थान आहे.मॅनेजमेंट अभ्यासक्रम घेवू इच्छीणारे विद्यार्थी बाकी मॅनेजमेंट कॉलेजच्या तुलनेने जास्त preference व महत्व आय.आय.एमला देतात. आय.आय.एम म्हणजे ‛इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’. आय.आय.एम हे 1961 साली शिक्षण खात्याने निर्माण केले होते. आय.आय.एमची एकूण 20 भारतात महाविद्यालये आहेत.
आय.आय.एम कॉलेजमध्ये कोणकोणते कोर्स शिकवले जातात ?
आय.आय.एममध्ये तसे पदवी पर्यंतचे आणि मास्टर पर्यंतचे कोर्स शिकवले जातात.बऱ्यापैकी सर्व आय.आय.एमकॉलेजमध्ये सारखाच अभ्यासक्रम असतो. आय.आय.एमकॉलेजमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स असतो,ज्याला PGDM म्हणतात.PGDM हे MBA समान असते.
आय.आय.एम कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची प्रक्रिया ?
सर्वात प्रथम ,जर उमेदवाराला आय.आय.एमकॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेन तर उमेदवाराला CET परीक्षा पास असायला हवं.त्यानंतर उमेदवारांना लिखित एक्साम साठी आणि मुलाखतीसाठी बोलवले जाते आणि त्यामधील निवडलेल्या उमेदवारांना आय.आय.एमकॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते .
आय.आय.एममध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी किती मार्क्स लागतात ?
अतिशय स्पर्धात्मक अश्या आय.आय.एम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी क्वालिफाय मार्क्स प्रवर्गावर्ती आधारित असतात.जनरल प्रवर्गासाठी 99-100 मध्ये कट ऑफ लागतो, तर बाकीच्या प्रवर्गासाठी 97-98 कट ऑफ लागतो.
आय.आय.एम कॉलेजची फिज किती असते ?- IIM Collages Marathi information
आय.आय.एम कॉलेजची फी त्या कॉलेजवर्ती आधारित असते. आय.आय.एमकॉलेजची फी 12 लाखापासून ते 23 लाखपर्यंत असते.जुने आय.आय.एम कॉलेज जसे की, आय.आय.एम अहमदाबाद, आय.आय.एम कलकत्ता, आय.आय.एम बंगळुरू या कॉलेजची फिज 23 लाख इतकी आहे आणि नवीन तयार केलेली आय.आय.एमकॉलेजेस,जसे की आय.आय.एम बोध गया , आय.आय.एमरांची यांची फिज 12 लाख इतकी आहे.
आय.आय.एम कॉलेजची नावे आणि त्यांची थोडक्यात माहिती-Indian Institutes of Management
- आय.आय.एम अहमदाबाद- NIRF च्या सर्व्हे नुसार आय.आय.एमअहमदाबाद हे पहिल्या नंबरचे कॉलेज आहे. आय.आय.एम कॉलेजची स्थापना गुजरातमध्ये 11 डिसेंबर 1961 साली झाली होती.हे भारतातील दुसरे आय.आय.एमकॉलेज आहे. आय.आय.एमअहमदाबाद चे चेअरमन कुमार मांगलम बिरला आणि डायरेक्टर एरोल डिसुझा आहेत.
- आय.आय.एम बंगळुरू- NIRF च्या सर्व्हे नुसार आय.आय.एमबंगळुरू हे भारतातील दुसऱ्या नंबरचे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना वर्ष 19723 साली झाली.हे भारतातील मॅनेजमेंट चे तिसरे कॉलेज आहे. आय.आय.एम बंगळुरू इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर टी.कृष्णन आहेत.
- आय.आय.एम कलकत्ता- NIRF च्या सर्व्हे नुसार आय.आय.एमकलकत्ता हे तिसऱ्या नंबर चे कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 28 नोव्हेंबर 1961 साली कोलकता येथे झाली होती आणि हे भारताचे पहिले मॅनेजमेंट चे कॉलेज आहे. आय.आय.एमकलकत्ता कॉलेजचे डायरेक्टर उत्तम कुमार सरकार आहेत.
- आय.आय.एम लखनौ- NIRF च्या सर्व्हे नुसार आय.आय.एमलखनौ हे चोथ्या क्रमांकाचे कॉलेज आहे.ह्या कॉलेची स्थापना साल 1984 साली झाली आणि हे भारताचे चोथे मेजेजमेंट चे कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट च्या डायरेक्टर अर्चना शुक्ला ह्या आहेत.
- आय.आय.एम कोझिकोडे – NIRF च्या सर्व्हे नुसार आय.आय.एमकोझिकोडे हे सहाव्या नंबरचे कॉलेज होते..ह्या कॉलेजची स्थापना 1996 मध्ये केरळमध्ये झाली आणि हे भारताचे पाचवे मॅनेजमेंट चे कॉलेज आहे.प्रोफेसर डेबांशीस चॅटर्जी हे ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर आहेत.
- आय.आय.एम इंदोर- NIRF च्या सर्व्हे नुसार हे भारतातील सातव्या नंबरचे कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 1996 साली मध्यप्रदेश मध्ये झाली आणि हे भारतातील सातवे आय.आय.एमचे कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर हिमांशू राय आहेत.
- आय.आय.एमत्रिची- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 15 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2011 साली तमिळनाडू मध्ये झाली आणि हे भारताचे 11 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर पवन कुमार सिंग आहेत.
- आय.आय.एम उदयपूर- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 17 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2011 साली उदयपूर,राजस्थान मध्ये झाली आणि हे भारताचे 13 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर जन्नत शाह आहेत.
- आय.आय.एम रायपूर- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 19 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2010 साली रायपूर छत्तीसगड मध्ये झाली आणि हे भारताचे 10 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर भारत भास्कर आहेत.
- आय.आय.एम रांची- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 20 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2009 साली रांची,झारखंड मध्ये झाली आणि हे भारताचे 9 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर शैलेंद्र सिंग आहेत.
- आय.आय.एम रोहटक- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 21 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2009-10 रोहटक, हरियाणा मध्ये झाली आणि हे भारताचे 8 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर धीरज शर्मा आहेत.
- आय.आय.एम शिलॉंग- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 30 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2007 साली शिलॉंग,मेघालय मध्ये झाली आणि हे भारताचे 7 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या कॉलेजचे आधीचे नाव ‛राजीव गांधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’असे होते.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डी.पी.गोयल आहेत.
- आय.आय.एम काशीपुर- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 33 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2011 साली काशीपुर, उत्तराखंड मध्ये झाली आणि हे भारताचे 12 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर कुलभूषण बलुनी आहेत.
- आय.आय.एम नागपूर- NIRF च्या सर्व्ह नुसार हे भारतातील 40 वे मॅनेजमेंट कॉलेज आहे.ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली नागपूर,महाराष्ट्र मध्ये झाली आणि हे भारताचे 14 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉक्टर भीमराया मैत्री आहेत.
- आय.आय.एम अमरीतसर- ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली अमृतसर पंजाब मध्ये झाली आणि हे भारताचे 15 वे आय.आय.एम कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉक्टर नागर्जन रामुर्थी आहेत.
- आय.आय.एम बोधगया- ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली बोध गया,बिहार मध्ये झाली आणि हे भारताचे 16 वे आय.आय.एम कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर डॉक्टर विनिता सहाय आहेत.
- आय.आय.एम सिरमुर- ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली सिरमुर,हिमाचल प्रदेश मध्ये झाली आणि हे भारताचे 17 वे आय.आय.एम कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर निलु रोहमपूरा आहेत.
- आय.आय.एमविशाखा पटनम- ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली विशाखा पटनम, आंध्र प्रदेश मध्ये झाली आणि हे भारताचे 18 वे आय.आय.एमकॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर चंद्रशेखर एम आहेत.
- आय.आय.एम संबलपूर- ह्या कॉलेजची स्थापना 2015 साली संबलपूर,ओडिशा मध्ये झाली आणि हे भारताचे 19 वे आय.आय.एम कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर म्हाडियो जयस्वाल आहेत.
- आय.आय.जम्मू – ह्या कॉलेजची स्थापना 2016 साली जम्मू,जम्मू आणि काश्मीर मध्ये झाली आणि हे भारताचे 20 वे आय.आय.एम कॉलेज आहे.ह्या इन्स्टिट्यूट चे डायरेक्टर प्रोफेसर बि.एस सहाय आहेत.