आपल्या मुलांसाठी गुंतवणुक कशी करावी? – Investment plans for family welfare Marathi

Investment plans for family welfare Marathi

आपल्या मुलांसाठी गुंतवणुक

प्रत्येक नवविवाहीत जोडप्याला गृहप्रवेश केल्यानंतर , आई वडील म्हणून जबाबदारी आल्यानंतर मुलगा तसेच मुलगी होताच सर्वात आधी चिंता लागत असते आपल्या मुला मुलीच्या उज्वल भविष्याची.म्हणुन ते आपल्या मुला मुलीचा जन्म होताच त्यांच्या भविष्यासाठी म्हणजेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी,लग्नासाठी पैशांची बचत तसेच गुंतवणुक करणे सुरू करत असतात॰

पण हे सर्व आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याकडे एक फायनँन्शिअल प्लँनिंग असते, आर्थिक नियोजन डोळ्यासमोर असते .ज्यात आपण

 • आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी,
 • लग्नासाठी किती पैशांची बचत करायची?
 • त्यांच्या उत्तम भविष्यासाठी तसेच आरोग्यासाठी कोणती इंशुरन्स पाँलिसी काढायची?

कुठे पैसे गुंतवायचे याचे सुव्यवस्थितपणे नियोजन केलेले असते.

आपल्या लहान तसेच मोठया मुलामुलींसाठी पैशांची गुंतवणुक केव्हा करायला हवी?

गुंतवणुक म्हणजे थेंब थेंब पाणी साचविणे मग त्याच साचवलेल्या पाण्याचा भविष्यात काही वर्षांनी एक विशाल समुद्र तयार होत असतो.

म्हणुन लग्न झाल्यानंतरच प्रत्येक पालकांनी ह्या जगात येत असलेल्या तसेच भविष्यात येणार असलेल्या आपल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी,लग्नासाठी गुंतवणुक करणे सुरु करायला हवे.याने आपल्या अंगावर अचानक जो खर्चाचा भार येणार असतो तो येत नसतो कारण आपण आपला लहान मुलगा तसेच मुलगी महाविद्यालयात जाण्यापर्यत आपण त्यांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच भविष्यातील त्यांच्या लग्नासाठी तसेच उज्वल भविष्यासाठी एक चांगली रक्कम जमवून ठेवलेली असते.

आपण आपल्या लहान तसेच मोठया मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणुक कुठे आणि कशी करावी?

1)दीर्घकाळासाठी गुंतवणुक करावी :अनेक फायनान्शिअल सल्लागारांचे असे मत आहे की आपण आपल्या लहान मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी दिर्घकालीन गुंतवणुक करायला हवी याने आपल्याला रिस्क पण कमी घ्यावी लागत असते.आणि भविष्यात आपल्याला रिटर्न पण चांगला मिळत असतो.

See also  कार इन्शुरन्स म्हणजे काय ? वाहन विमा संपूर्ण माहिती - Car Insurance Marathi information

2)चाईल्ड प्लँन मध्ये पैशांची गुंतवणुक करावी:जरआपण पालक आहात आणि आपल्याला आपल्या लहान मुलामुलीचे भविष्य नेहमी सुरक्षित राहावे असे वाटत असेल तर आपण आपल्या पैशांची गुंतवणुक आपल्या लहान मुलामुलीच्या चाइल्स प्लँनसाठी करू शकतो.आणि आज बाजारात असे खुप लहान मुलामुलींसाठी चाईल्ड प्लँन उपलब्ध आहेत ज्यात आपण आपले पैसे गुंतवू शकतो.

3) नियोजनबदध गूंतवणुक करावी: जर आपल्या मुलीचे वय ५ वर्ष आहे आणि समजा आपल्याला भविष्यात त्याच्या उच्च शिक्षणासाठी म्हणजेच इंजिनिअरींग तसेच एम बीए साठी १० ते २० लाख तसेच लग्नासाठी 10 ते 20 लाख लागणार असेल तर आपण आत्तापासुन तशी नियोजनबदध बचत तसेच गुंतवणुक करायला हवी जेणेकरून आपला मुलगा मुलगी 17 ते 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी,लग्नासाठी तोपर्यत आपल्याकडे चांगली रक्कम जमा झालेली असेल.

4)कुठे आणि किती पैशांची गुंतवणुक करावी : – Investment plans for family welfare Marathi

पैशांची गुंतवणुक कुठे आणि कशी करावी याविषयी आपण सांगावयास गेले तर आपला मुलगा तसेच मुलगी जर दोन किंवा तीन वर्षाची असेल आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला म्युचुअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असेल आणि आपल्याला त्यातुन 12 टक्के प्रमाणे भविष्यात रिटर्न प्राप्त होणार असेल तर त्यासाठी आपल्याला दर महिन्याला पाच हजार सत्तर रूपयांची गुंतवणुक करावी लागेल.

म्हणुन आपण मुला मुलीच्या जन्माअगोदर किंवा जन्मानंतरच लगेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक योजना तयार केली पाहिजे.असे केल्याने आपण आपल्या मुलामुलीला असे जीवण देऊ शकाल ज्यात त्यांना कुठली कसलीही कमतरता भासणार नाही.कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना त्यांना तसेच तुम्हालाही भविष्यात करावा लागणार नाही.आणि आपल्या मुलामुलींना आपण एक उत्तम आरोग्यदायी जीवण,उत्तम दर्जाचे शिक्षण देऊ शकाल.

अशा पदधतीने आपण आपल्या एका चतुराईने केलेल्या पैशांच्या बचतीमुळे तसेच गुंतवणुकीमुळे आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करू शकता.आणि ही अशी पैशांची गुंतवणुक करून आपण आपल्या पाल्याच्या चैनचंगळीत पैसे खर्च न करता त्याच्या उज्वल भविष्यासाठी पैसे गुंतवुन त्याला आर्थिक सुरक्षेचे कवच प्रदान करत असता जो त्याचा मुलभुत हक्क आहे. आणि तो त्याला मिळवुन देणे हे प्रत्येक जबाबदार पालकांचे कर्तव्य आहे.

See also  Bond म्हणजे काय?what is bond in finance

List of  Investment plans for family welfare Marathi

म्युचल फंड-गेल्या 2 वर्षात सर्वात लोकप्रिय गुंतवणूक समोर आलीय ती म्हणजे म्युचल फंड – स्वतः चांगले फंडस निवडून किंवा फायन्सन सल्लागार कडून माहिती घेऊन आपण यात मुलां करता गुंतवणूक करू शकता.

PPF – पब्लीक प्रॉव्हिडंट फंड- साधारण 6-8% दरम्यान परतावा देणार ये एक उत्तम  आर्थिक मार्ग आहे.  साधारण 15 वर्ष यात लॉक पिरियड असला तरी गरजेनुसार ,काही सबळ कारण असल्यास आपण पैसे काढू शकता तसेच पैसे ठेवण्याची मुदत वाढवू  साधारण 5 वर्ष पुन्हा शकता

सोने– यात आपण दुकानात जाऊन सोन न घेता गोल्ड बॉण्ड्स किंवा गोल्ड ETF द्वारे  गुंतवणूक करू शकता

मुलांचे विमा योजना– पुढील शिक्षण लग्न ताजविक करता आपण LIC च्या मनी बॅक पॉलिसी , जीवन तरुण किंवा जीवन लाभ सारख्या योजनांत गुंतवणूक  करू शकता

सुकन्या समृद्धी– 8-9% वार्षिक परतावा देणारी मुलींकरता एक अतिउत्तम योजना असून आपण साधारण 250 रुपयांपासून सुद्धा यात गुंतवणूक सुरू करू शकता

मुलांनासाठी गुंतवणुकी करता काही पर्याय

 • Aditya Birla Sun Life Vision Star
 • Bajaj Allianz Young Assurance
 • Bharti AXA Life Child Advantage Plan
 • HDFC SL Youngster Super Premium Child Plan
 • ICICI Smart Kid’s
 • Kotak Head start Child Assure Plan
 • LIC  New Children’s Money Back
 • SBI Life – Smart Champ Insurance Plan
 • SBI Life – Smart Scholar

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE