ग्लोबल शेअर बाजार चे निर्देशांक कोणकोणते आहेत? Major world share market Indices in Marathi

ग्लोबल शेअर बाजार चे निर्देशांक- Major world share market Indices in Marathi  

 आपण नेहमी ऐकत असतो की डाऊ मध्ये आज 10 ते 15 अंकांनी वाढ झाली.तसेच नास डँकचा निर्देशांकात 40 अंकानी घसरण झाली.याचा नेमका अर्थ काय होतो निर्देशांक कशाला म्हणतात?हेच आपल्याला माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण शेअर बाजारचा निर्देशांक म्हणजे काय?आणि जगातील टॉप चे शेअर बाजार चे निर्देशांक – Major world share market Indices in Marathi   कोणकोणते आहेत? हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

शेअर बाजारचा निर्देशांक म्हणजे काय?

  • बाजार कोणत्या दिशेने चालले आहे हे बघण्यासाठी आपण ज्याचा आधार घेत असतो त्याला निर्देशांक असे म्हटले जात असते.निर्देशांक हे आपल्याला बाजाराच्या वर्तन तसेच हालचालीचा आढावा घेण्यास आपल्याला मदत करत असतात.
  • आज भारतीय बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे शेअर बाजाराशी निगडीत अत्यंत प्रसिदध निर्देशांक असलेले आपणास दिसुन येतात.
  • जेव्हा काही समभागांच्या किंमतीमध्ये वाढ होत असते किंवा काही किंमतीत घसरण होत असते तेव्हा अशा परिस्थितीत निर्देशांक आपल्याला हे दर्शवत असतो की
  • शेअर बाजार किती वर गेला आहे किंवा त्याच्या किमती किती खाली आलेल्या आहेत.

स्टाँक मार्केट निर्देशांकाचे मुल्य मोजण्याचे कार्य रेटिंग तसेच स्टाँक एक्सचेंज एजन्सीचे असते.

आपण शेअर मार्केट निर्देशांकाचे  (Global share market Indices) वर्गीकरण कोणकोणत्या मार्गाने करू शकतो?

 इंडेक्स इंडस्ट्री असोसिएशनने दिलेल्या आपल्या अहवालात असे स्पष्टपणे नमुद केले आहे की संपुर्ण जगात एकुण 5 दशलक्षपेक्षा अधिक स्टाँक निर्देशांक अस्तित्वात आहेत.

स्टाँक निर्देशांकाचे वर्गीकरण हे पुढील पदधतीने आपण करू शकतो : Global share market Indices

1)भौगोलिक पदधतीनुसार : यात आपल्याला एखाद्या विशिष्ट देशाचे,युरोपातील संघटनेसारख्या विविध देशांमधील गटाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची सुची पाहायला मिळते.

2) संख्येनुसार :निर्देशांकामध्ये समाविष्ट केलेली कंपन्यांची जी संख्या दिसुन येते त्यानुसार देखील स्टाँक निर्देशांकाचे वर्गीकरण केले जाते.

3) मुल्याची गणना करण्याच्या पदधतीनुसार:निर्देशांकाच्या मुल्याची गणना करण्यासाठीच्या पदधतीचा वापर करून देखील स्टाँक निर्देशांकाचे वर्गीकरण करता येत असते.

4) उद्योग व्यवसायाद्वारे :व्यवसाय उद्योगाद्वारे देखील आपल्याला स्टाँक निर्देशांकाचे वर्गीकरण करता येत असते.कारण विविध उद्योगांमध्ये आज आपल्याला आघाडीच्या प्रसिदध कंपन्यांचा समावेश असलेला दिसुन येत असतो.ज्यात उत्पादन,वाहतुक,गँस,वीजपुरवठा इत्यादीं व्यवसाय केले जातात.

Sgx Nifty म्हणजे काय ? – नक्की वाचा

जगातील टॉप चे शेअर बाजार चे निर्देशांक कोणकोणते आहेत? – Major world share market Indices in Marathi

 आज जगामध्ये अनेक टाँप शेअर बाजाराचे निर्देशांक पाहावयास आपणास दिसुन येतात.

जगातील टाँप दहा महत्वाचे शेअर बाजाराचे निर्देशांक पुढीलप्रमाणे आहेत : निफ्टी व्यतिरिक्त

1)NASDAQ:

2) S & P 500 :

3) HANG SENG :

4) FTSE 100 :

5) DOW JONES :

6) DAX 30 :

7) RUSSEL 2000 :

8) CAC 40 :

9) EURO STOXX 50 :

 

1)NASDAQ :

NASDAQ चा फुल फाँर्म होतो (NATIONAL ASSOCIATION OF SECURITY DEALERS AUTOMATED QUOTATION.

नास डँक हे जगातील सर्वात मोठया युएस निर्देशाकांपैकी एक मानले जाते.नास डँक हा जगातील सर्वात जास्त वेगाने विकसित होणारा निर्देशांक म्हणुन ओळखला जातो.कारण हा ज्या स्टाँकची किंमत मार्केटमध्ये वाढणार आहे त्याचे भांडवल प्रतिबिंबित करण्याचे काम करतो.

2) S & P 500 :

S& P चा फुल फाँर्म आहे (STANDARD AND POOR COMPOSITE 500 INDEX) असा आहे.

S& P मध्ये होत असलेले चढ उतार इतर देशांच्या शेअर निर्देशांकावर देखील परिणामकारक ठरत असतात.म्हणुनच एस अँण्ड पी 500 ला जगातील प्रमुख स्टाँक निर्देशकांपैकीच एक मानले जाते.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे युएस ए मधील सगळयात मोठया आणि दिग्दज 500 कंपन्यांचे शेअर्स यात आहेत.

3) HANG SENG :

हँग सेंग हा हाँगकाँग स्टाँक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक म्हणुन आपणा सर्वास परिचित आहे.एवढेच नही तर दक्षिणपुर्व आशिया भागात जेवढे स्टाँक एक्सचेंज आहेत त्या सर्व स्टाँक एक्सचेंमधील सर्वात शक्तीशाली निर्देशांक म्हणुन ओळखला जातो.

येथे गणना करणे सुलभ व्हावे यासाठी 4 उपनिर्देशांक देखील दिले आहेत.

4) FTSE 100 :

FTSE चा फुल फाँर्म (FINANCIAL TIME STOCK EXCHANGE) असा आहे.

यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात अशा शंभर शेअर्सचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो ज्यांत लंडन स्टाँक एक्सचेंजवर सर्वात जास्त भांडवल आहे.

FTSE मध्ये अशा कंपन्यांचा देखील समावेश आहे ज्या जगात 150 पेक्षा अधिक ठिकाणी कार्यरत असलेल्या आपणास दिसुन येतात.

5) DOW JONES :

डाऊ हा निर्देशांक 1884 मध्ये सुरू करण्यात आला होता.स्ट्रीट जर्नल यांनी हा निर्देशांक सुरू केला होता.

सर्वप्रथम डाऊ जोन्स हा निर्देशांक 11 रेल्वे कंपनींच्या शेअर्सवर आधारीत असलेला आपणास दिसुन येतो.

मग जेव्हा पहिला डाऊ जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज इंडेक्स एकत्र केला गेला तेव्हा तेव्हा बारा कंपनींनी आपले शेअर्स यात समाविष्ट केले होते.

आज पाहावयास गेले तर डाऊ जोन्स निर्देशांक हा युनायटेड स्टेट (US) मधील औद्योगिक क्षेत्रात जी दिवसेंदिवस गती वाढते आहे त्याचा सुचक म्हणून ओळखला जातो.

6) DAX 30 :

DAX 30 चा फुल फाँर्म (DEUTSHER AKTIEN INDEX) असा आहे.

DAX मध्ये आपल्याला जर्मनमधील 30 अशा सर्वात मोठया कंपन्यांचा समावेश असलेला दिसुन येतो.ज्यामध्ये फ्रँफ फर्ट स्टाँक एक्सचेंजवर ट्रेडिंग केली जात असताना आपणास आढळुन येते.

जर्मन ही युरोप मधील एक सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणुन ओळखले जाते.याचमुळे डी ए एक्स येथील एक प्रभावशाली निर्देशांक म्हणून परिचित आहे ज्यावर नजर ठेवणे खुप गरजेचे मानले जाते.

7) RUSSEL 2000 :

हा निर्देशांक अशा काही यूएस मधील कंपन्यांच्या गतिशीलतेचा मागोवा घेण्याचे काम करतो ज्या खुप लहान कंपन्या आहेत.

अमेरिकन शेअर बाजारातील एकूण स्माँल कँप कंपन्यांमध्ये याचा 90 टक्के वाटा असलेला आपणास दिसुन येतो.

रसेल 2000 हे बाजाराचे अधिक सखोलपणे विश्लेषण करून दर्शवत असते.म्हणुन हा निर्देशांक तयार करत असलेल्या खुप मोजक्याच कंपन्यांची नावे आपणास ऐकायला मिळतात.

8) CAC 40 :

 CAC 40 ची स्थापणा अशा काही आघाडीवर असलेल्या कंपन्यांनी केली आहे ज्यांचा घरगुती वस्तु,आरोग्य विषयक सेवा,तेल,वायु इत्यादी उद्योगांशी फार घनिष्ठ संबंध असलेला आपणास दिसुन येतो.

2020 मध्ये CAC 40 चे मार्केट कँप एकुण ट्रिलीयनपेक्षा अधिक झालेले आपणास आढळुन आले होते.

9) EURO STOXX 50 :

ह्या निर्देशांकात अशा कंपन्याचा समावेश आहे ज्यांचा सहभाग 19 आर्थिक क्षेत्रातील पन्नास मोठया युरोझोन कंपन्यांमध्ये होतो.

याचसोबत EURO STOXX 50 ह्या निर्देशांकाचा समावेश युरो,युएस,कँनेडियन डाँलर्स,ब्रिटीश पाऊंड,जपानचे येन अशा पाच अत्यंत महत्वाच्या EU चलनांमध्ये केला जातो.

EURO STOXX 50 मध्ये DUSH POST,DUSH BANK,AXA,BMW SIEMEN अशा प्रसिदध कंपन्यांचा देखील समावेश असलेला आपणास दिसुन येतो.

10) BOVESPA INDEX (INDICE BOVESPA) :

BOVESPA STOCK INDEX ला IBOVESPA असे देखील म्हणतात.हा अमेरिकेतील प्रमुख लँटिन निर्देशकांपैकी एक मानला जातो.

जगातील अन्य  महत्वाचे शेअर बाजाराचे निर्देशांक पुढीलप्रमाणे आहेत :

Country Index
Australia S&P/ASX 200
Belgium BEL 20
Brazil Bovespa
Canada S&P/TSX
Canada TR Canada 50
Chile IPSA
China Shanghai SE Composite
China SZSE Component
Denmark OMXC20
Europe Euro Stoxx 50
Finland OMXH25
France CAC 40
Germany DAX
Greece Athex 20
Hong Kong Hang Seng
India Nifty 50
India BSE Sensex
Indonesia LQ45
Israel TA 35
Italy FTSE MIB
Malaysia FBM KLCI
Netherlands AEX
New Zealand NZX 50
Norway OBX Index
Pakistan Karachi 100
Philippines PSEi Composite
Russia MOEX
Saudi Arabia Tadawul
Singapore STI
South Africa JSE
South Korea KOSPI
Spain IBEX 35
Spain IGBM
Sweden OMXS30
Switzerland SMI
Taiwan TAIEX
Thailand SET
Tokyo Nikkei 225
Turkey BIST 100
United Kingdom FTSE 100
USA Dow Jones Industrial Average
USA S&P 500
USA Nasdaq

2 thoughts on “ग्लोबल शेअर बाजार चे निर्देशांक कोणकोणते आहेत? Major world share market Indices in Marathi”

Leave a Comment