Sgx Nifty म्हणजे काय ? SGX Nifty Marathi Mahiti

Sgx Nifty म्हणजे काय ?

 जेव्हाही आपण शेअर बाजारात ट्रेडिंग करत असतो तेव्हा ट्रेडिंग करत असताना एसजीएक्स निफ्टी हा शब्द आपणास नेहमी विविध शेअर बाजाराविषयी माहीती देत असलेल्या न्युज चँनलवर ऐकायला तसेच वर्तमानपत्रात वाचायला देखील मिळत असतो.

आज लाखो ट्रेडर्स आपल्याला बाजारात व्यवहार करून नफा प्राप्त करताना आपणास दिसुन येतात.पण यासाठी देखील बाजारात तेजी चालू आहे का मंदी हे ट्रेडर्सला आधी बघावे लागते.

यासाठी ट्रेडर्सला विविध फायनान्शिअल न्युज दाखवत असलेले टिव्ही चँनल्स,ग्लोबल मार्केट वर लक्ष ठेवावे लागत असते.

आणि ग्लोबल मार्केट म्हटले तर US Market तसेच SGX Nifty सारख्या जगातील महत्वाच्या मार्केटवर ट्रेडर्सला लक्ष देणे खुप गरजेचे असते.

म्हणून आजच्या लेखात आपण Sgx Nifty विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

SGX Nifty म्हणजे काय? – SGX Nifty Marathi Mahiti

  • SGX चा फुल फाँर्म आहे (Singapore Stock Exchange) आणि Nifty चा फुल फाँर्म आहे (National Stock Exchange) आणि जेव्हा हे दोघे एकत्र येत असतात तेव्हा त्याला SGX Nifty असे संबोधिले जात असते.
  • Sgx चा अर्थ होतो सिंगापुर स्टाँक एक्सचेंज.आणि निफ्टी चा अर्थ आपल्याला माहीतच आहे की निफ्टी हे भारतात असलेल्या 10 ते 12 वेगवेगळया क्षेत्रातील टाँपमध्ये गणल्या जात असलेल्या 50 कंपनींचे बेंचमार्क निर्देशांक म्हणुन ओळखले जाते.
  • आणि या दोघांना एकत्र मिळवून आपण Sgx Nifty किंवा Singapore Nifty असे म्हणत असतो.
  • ज्या पदधतीने भारतामध्ये दररोज निफ्टी आणि निफ्टी बँकेची ट्रेडिंग केली जात असते त्याचपदधतीने विदेशी लोक Sgx Nifty मध्ये ट्रेडिंग करत असतात.
  • आणि रोज आपण जेव्हा सकाळी बातम्या ऐकतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला न्युजवर हेच सांगितले जाते की आज निफ्टी वर जाणार की खाली.

Sgx Nifty मध्ये ट्रेडिंगचा वेळ काय असतो?

Sgx Nifty ही सकाळी 6.30 ला चालु होत असते आणि रात्री 11.30 पर्यत चालत असते.म्हणजेच तब्बल सोळा तास हे चालू राहत असते.

See also  युपीआय पिन म्हणजे काय? UPI pin meaning in Marathi

सिंगापुर आणि भारत येथील वेळेत फरक असल्याने भारतातील मार्केट सुरू होण्याच्या आधीच हे मार्केट अडीच तास अगोदर ओपन झालेले आपणास दिसुन येत असते.आणि रात्री उशिरापर्यत म्हणजेच 11.30 पर्यत हे सुरू असते.

Sgx Nifty मध्ये कोण ट्रेडिंग करू शकते?

Sgx Nifty मध्ये फक्त फक्त विदेशातील लोकांनाच ट्रेडिंग करता येत असते.विदेशातील लोकच येथे शेअर्सची खरेदी विक्री करू शकतात.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे असे आपल्याला स्पष्टपणे दिसुन येते की भारतातील शेअर मार्केटमध्ये जे विदेशातील लोक ट्रेडिंग करत असतात.ते निफ्टी पेक्षा एसजीएक्स निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणे अधिक पसंद करतात.

Sgx Nifty चा Live Data आपण कुठुन बघु शकतो?

Sgx Nifty चा Live Data बघण्यासाठी आपण Sgx Nifty च्या आँफिशिअल वेबसाईटला भेट देऊ शकतो.

किंवा Trading View तसेच Moneycontrol.Com Investing.Com ह्या साईटवर जाऊन देखील आपण आपला Sgx Nifty चा Live Data चेक करू शकतो.

याचबरोबर आपण मार्केट रोज कोणत्या लेव्हलवर ओपन होणार आहे हे जाणुन घेण्यासाठी Dow किंवा Nesdeq यांचा देखील वापर करू शकतो.

शेअर मार्केट बद्दल माहिती देणार्‍य 10 वेबसाईट्स ची यादी

भारतीय ट्रेडर्ससाठी Sgx Nifty हे का महत्वाचे आहे?

आपल्या सगळयांना प्रश्न पडत असतो की भारतीय ट्रेडर्ससाठी Sgx Nifty महत्वाचे आहे का नाही?आणि महत्वाचे आहे तर का आहे?

  1. Sgx Nifty म्हणजेच सिंगापुर निफ्टी हे सकाळी भारतातील मार्केट सुरू होण्याच्या आधी ओपन होत असते.यामुळे सिंगापुर निफ्टीचा अंदाजा घेऊन आपल्याला म्हणजेच भारतीय ट्रेडर्सला याचा अंदाज बांधता येतो तसेच माहीती होत असते की भारतातील मार्केट आज कसे ओपन होणार आहे.
  2. याचसाठी जेव्हा Sgx Nifty जास्त गँप अप तसेच गँप डाऊनमध्ये जाताना दिसते तेव्हा भारतीय ट्रेडर्सला थोडा अंदाज येतो की आज भारतीय मार्केट कसे ओपन होणार आहे आणि यात त्यांना काय करावे लागणार आहे.
  3. याने भारतीय ट्रेडर्सला मार्केट सुरू होण्याअगोदर आपले प्लँनिंग आखायला आणि त्याची पुर्वतयारी करायला पुरेसा वेळ मिळुन जात असतो.
  4. म्हणुन भारतीय ट्रेडर्ससाठी Sgx Nifty म्हणजेच सिंगापुर निफ्टी हे ट्रेडिंगच्या पुर्वतयारीचे साधन आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही इतके हे महत्वाचे मानले जाते.
See also  सोशल मीडिया मार्केटिंग - Social media marketing information in Marathi

SGX Nifty Live SGX Nifty Futures

Sgx Nifty ला कसे Calculate करतात?

  • आपल्याला ही एक गोष्ट तर चांगलीच माहीत आहे की कोणत्याही स्टाँकची किंमत ही त्याच्या मागणी आणि पुरवठयावरून निश्चित केली जात असते.
  • आणि ह्याच पदधतीचा वापर करून आपण एसजीएस निफ्टीचे प्राईज देखील त्याच्या मागणी आणि पुरवठयावरून ठरवू शकत असतो यात आपल्याला कोणत्याही प्रकारचे कँलक्युलेशन करण्याची अजिबात गरज पडत नसते.
  • म्हणजेच जेव्हा एखाद्या कान्ट्ँक्टची मागणी खुप जास्त असलेली आपणास दिसुन येत असते.अशा परिस्थितीत एसजीएस निफ्टीचे प्राईज जास्त असलेले आपल्या निदर्शनास येत असते.
  • आणि समजा मागणी खुप कमी आहे आणि पुरवठा खुप जास्त प्रमाणात असेल तेव्हा अशा परिस्थितीत प्राईज कमी होताना आपल्याला दिसुन येते.

Sgx Nifty चा भारतीय मार्केटवर काय प्रभाव पडतो आणि कसा प्रभाव पडत असतो?

  • Sgx Nifty चा भारतीय मार्केटवर देखील थोडा प्रभाव पडताना आपणास दिसुन येतो याला कारण दोघीकडे निफ्टीचे सारखेच डेरिव्हिटिव्ह प्रोडक्ट वापरले जाणे हे आहे.
  • म्हणुनच जेव्हा भारतातील मार्केट ओपन होत असते तेव्हा त्याच्यावर Sgx Nifty चा देखील प्रभाव पडत असतो.भारताच्या अर्थव्यवस्थेत होणारे प्रमुख बदल,
  • स्टाँक मार्केटमध्ये चालत असलेले नवीन ट्रेंड इत्यादींचा प्रभाव दोन स्टाँक मार्केटवर प्रामुख्याने पडत असतो.
  • आणि याचाच प्रभाव सिंपापुर निफ्टी म्हणजेच एसजीएक्स निफ्टी वर देखील काही प्रमाणात का होईना पडताना दिसुन येतो.
  • म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या भारतीय ट्रेडर्स सिंगापुर निफ्टीचे स्टेटस आधी चेक करत असतात.कारण एसजीएक्स निफ्टी म्हणजेच सिंगापुर निफ्टी जर निगेटिव्ह मध्ये जाताना दिसुन येत असेल तर आपल्याला अंदाज येऊन जातो की भारतीय मार्केट देखील आता डाऊनमध्ये जाणार आहे.

अशा पदधतीने Sgx Nifty चा भारतीय मार्केटवर प्रभाव पडत असतो.

Sgx Nifty चे फायदे कोणकोणते असतात?

  • Sgx Nifty द्वारे भारतीय ट्रेडर्सला भारतीय मार्केट आज कसे जाणार आहे म्हणजेच मार्केट खाली जाणार आहे की वर जाणार आहे याचा अंदाजा मिळत असतो.थोडक्यात Sgx Nifty द्वारे आपण मार्केटची दिशा आणि हालचाल लक्षात घेऊ शकतो.
See also  Investment Banking म्हणजे काय ? कार्य व प्रकार - Investment Banking Information In Marathi

Sgx Nifty चा सगळयात जास्त फायदा कोणाला होत असतो?

Sgx Nifty चा सगळयात जास्त फायदा विदेशातील गुंतवणुकदारांना म्हणजेच विदेशातील ट्रेडर्सला होत असतो.कारण Sgx Nifty द्वारे त्यांना निफ्टीच्या 50 स्टाँकमध्ये इन्वहेस्टमेंट करता येत असते.आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ही इन्वहेस्टमेंट त्यांना अत्यंत सहजपणे करता येत असते.