Sensex म्हणजे काय ? – What is Sensex and List of BSE Sensex 30 Companies

सेंसेक्स विषयी माहीती  –  BSE Sensex – What is Sensex –

आपल्याला नेहमी वर्तमानपत्रात वाचायला मिळते तसेच टिव्हीवर न्युजमध्ये ऐकायला मिळते की सेंसेक्स इतक्या अंकांनी खाली घसरला किंवा इतक्या अकांनी आज वर गेलेला पाहावयास मिळाला आहे.

पण जरी आपल्याला हे शब्द रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतात तसेच टीव्हीवर न्युज चँनलवर रोज ऐकायला मिळतात.पण आपल्यापैकी बहुतेक जणांना सेंसेक्स म्हणजे नेमकी काय असते?हे माहीतच नसते.

ज्यामुळे आपल्या मनात हे जाणुन घेण्याची उत्कंठा निर्माण होत असते की सेंसेक्स हे नेमके असते तरी काय?

म्हणुन आजच्या लेखात आपण सेंसेक्सविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात सेसेंक्सविषयी जाणुन घेण्याची जी उत्सुकता आणि कुतुहल निर्माण झाले आहे ते पुर्ण होण्यास नक्कीच मदत होईल.

 

माहिती घ्या

Sgx Nifty म्हणजे काय ? SGX Nifty Marathi Mahiti

सेंसेक्स म्हणजे काय? — What is Sensex

सेंसेक्स हा एक शेअर बाजार निर्देशांक असतो.ज्याला भारतातील शेअर मार्केटचा बेंचमार्क इंडेक्स म्हणुन ओळखले जाते.

  • सेंसेक्स हा बाँम्बे स्टाँक एक्सचेंजचा शेअर बाजार निर्देशांक आहे.
  • सेंसेक्सचे प्रमुख काम हे ज्या कंपन्यांचा बाँम्बे स्टाँक एक्सचेंजमध्ये समावेश होतो त्या तेजीमध्ये आहे की मंदीमध्ये आहे हे दर्शवणे असते.
  • सेन्सेक्समध्ये कुठल्या कंपनीचे शेअर वर चालले आहे तसेच कुठल्या कंपनीचे शेअर खाली येत आहे
  • कोणती कंपनी नफ्यात चालली आहे कुठली कंपनी तोटयात चालली आहे ह्या सर्व बाबींचे चित्र सेंसेक्स मध्ये दर्शविले जाते.
See also  क्रेडिट लाईन अणि लाईन आँफ क्रेडिट म्हणजे काय? - Credit line and Line of credit meaning in Marathi

सेंसेक्सची सुरूवात कधी झाली होती?

  • सेंसेक्सची सुरूवात ही दिपक मोहोनी यांनी केली होती ज्याची एक जानेवारी 1986 मध्ये सुरूवात झाली होती.तेव्हापासुन सेंसेक्समध्ये भारतातील तीस प्रमुख कंपनींचा यात समावेश केला जाऊ लागला.

सेंसेक्स नेहमी वर तसेच खाली का जात असतो?

  • सेंसेक्स मध्ये भारतातील तीस मुख्य कंपन्यांचे शेअर्स असतात.त्यामुळे ह्या तीस कंपनींपैकी काही कंपनीचे शेअर्स मध्ये वाढ झाल्यावर सेंसेक्स वर जाताना आपणास दिसुन येतो.
  • पण याच ठिकाणी ह्या तीस कंपन्यांमधील एकाही कंपनीच्या शेअर्सचे भाव कमी झाले तर सेंसेक्स आपल्याला खाली येताना दिसुन येत असतो.

सेंसेक्समध्ये भारतातील कोणत्या प्रमुख तीस कंपन्यांचा समावेश होत असतो?

  • सेंसेक्समध्ये भारतातील तीस प्रमुख अशा कंपन्यांचा समावेश होत असतो.
  • पण समजा भविष्यात ह्या कंपनींमधील एखाद्या कंपनीच्या आर्थिक स्थितीत बिघाड झाल्यास त्या कंपनीचे नाव सेंसेक्समधुन काढुन त्याठिकाणी नवीन कंपनीचे नाव अँड केले जात असते.

बाँम्बे स्टाँक एक्सचेंजमधील सेन्सेक्समध्ये भारतातील पुढील तीस प्रमुख कंपन्यांचा समावेश होत असतो:

NOScrip CodeCOMPANYकंपनी नावISIN No.
1500820Asian Paints Ltdएशियन पेंटसINE021A01026
2532215Axis Bank Ltdअँक्सिस बँकINE238A01034
3500034Bajaj Finance Ltdबजाज फायनान्सINE296A01024
4532978Bajaj Finserv Ltdबजाज फिन्सर्वINE918I01018
5532454Bharti Airtel Ltdभारती एअरटेलINE397D01024
6500124Dr Reddy’s Laboratories Ltdडों रेड्डी लॅबINE089A01023
7532281HCL Technologies Ltdएचसीएल टेकINE860A01027
8500180HDFC Bank Ltdएचडी एफ सीINE040A01034
9500696Hindustan Unilever Ltdहिंदुस्थान युनिलिव्हरINE030A01027
10500010Housing Development Finance Corpएचडी एफ सी FININE001A01036
11532174ICICI Bank Ltdआयसी आयसी आय बँकINE090A01021
12532187IndusInd Bank Ltdइंदुस लँड बँकINE095A01012
13500209Infosys Ltdइन्फोसीसINE009A01021
14500875ITC LtdआयटीसीINE154A01025
15500247Kotak Mahindra Bank Ltdकोटक महींद्रा बँकINE237A01028
16500510Larsen & Toubro Ltdलार्सन टर्बोINE018A01030
17500520Mahindra & Mahindra Ltdमहिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीINE101A01026
18532500Maruti Suzuki India Ltdमारूती सुझूकीINE585B01010
19500790Nestle India LtdनेसलेINE239A01016
20532555NTPC LtdएनटीपीसीINE733E01010
21532898Power Grid Corp of India Ltdपाँवर ग्रिड काँपर्रेशनINE752E01010
22500325Reliance Industries Ltdरिलायन्स इंडस्ट्रीINE002A01018
23500112State Bank of Indiaएस बी आयINE062A01020
24524715Sun Pharmaceutical Industries Ltdसन फार्माINE044A01036
25532540Tata Consultancy Services LtdटीसीएसINE467B01029
26500470Tata Steel Ltdटाटा स्टीलINE081A01012
27532755Tech Mahindra Ltdटेक महिंद्राINE669C01036
28500114Titan Co LtdटायटनINE280A01028
29532538UltraTech Cement Ltdअल्ट्राटेक सिमेंटINE481G01011
30507685Wipro LtdINE075A01022
See also  झोमॅटोच्या शेअर्सने बनवले नवीन रेकाॅर्ड फक्त दोन महिन्यांत शेअर्समध्ये ५३ टक्के इतकी तेजी - Zomato shares moving high to the IPO price of Rs 76

सेंसेक्सचे कोणकोणते उपयोग असतात? सेसेंक्सचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे होत असतात.

 

  • सेंसेक्सद्वारे आपण एका नजरेत बीएस ई म्हणजे बाँब्बे स्टाँक एक्सचेंज आणि त्यात समाविष्ट कंपन्या कशा पदधतीने कार्य करीत आहे,त्यांच्यात कोणती कंपनी नफ्यात चालली आहे कोणती कंपनी तोटयात चालली आहे हे जाणुन घेऊ शकतो.
  • शेअर बाजारात तेजी चालु आहे का मंदी याविषयी आपल्याला माहीती प्राप्त होत असते.
  • देशाची अर्थव्यवस्था कशापदधतीने कार्य करीत आहे हे कळत असते.
What is Sensex
What is Sensex Marathi information

 

सेंसेक्सच्या कँल्क्युलेशनमध्ये फक्त भारतातील तीस प्रमुख कंपन्यांचाच समावेश का केला जातो?

  • सेंसेक्सच्या कँलक्युलेशनमध्ये भारतातील तीस प्रमुख कंपन्यांचाच समावेश केला जात असतो कारण भारतातील ह्या तीस प्रमुख कंपन्याच्या शेअर्सची शेअर बाजारात खरेदी विक्री अधिक प्रमाणात होत असते.
  • ह्या तीसही कंपन्यांचा भारतातील सगळयात मोठया कंपनींमध्ये समावेश केला जातो.
  • या तीसही कंपन्यांचे मार्केट कँप खुप अधिक प्रमाणात आहे.
  • ह्या तीसही कंपन्या आपापल्या क्षेत्रात नावाजलेल्या कंपन्या आहेत.

सेंसेक्समध्ये समाविष्ट होत असलेल्या तीस कंपन्यांची निवड कोण करते?

  • सेंसेक्समध्ये समाविष्ट असलेल्या तीस प्रमुख कंपन्याची बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटीद्वारे केली जाते.या कमिटीत सरकार,बँक,अर्थतज्ञांचा देखील समावेश असतो.

 

बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटी तीस कंपन्यांची निवड कोणत्या आधारावर करत असते?

  • बाँम्बे स्टाँक एक्सचेंज कमिटी अशा कंपनीची निवड करते ज्या कंपनीचे शेअर्स बाँम्बे स्टाँक एक्सचेंजवर किमान एक किंवा एकापेक्षा अधिक वेळेस लिस्टेड असतील.
  • ज्या कंपनीचे शेअर मागील वर्षात रोज खरेदी तसेच विक्री केले गेले असेल अशाच कंपनीची निवड बीएसई कमिटी करत असते.
  • ज्या कंपन्या दैनंदिन सरासरी व्यापार व्यवसायाच्या संख्येनुसार तसेच मुल्यानुसार पहिल्या दीडशे कंपनींमध्ये समाविष्ट असतील अशाच कंपनींची निवड बीएस ई कमिटी द्वारे केली जात असते
  • ज्या तीस कंपन्या 13 विविध उद्योग क्षेत्रातील आहेत अशाच कंपन्याची निवड बीएस ई कमिटी द्वारे केली जात असते.
See also  एसबीआय बॅक खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!! - SBI KYC updates

सेंसेक्सचे कँलक्युलेशन कसे केले जाते?

सेंसेक्समध्ये ज्या तीस कंपन्या समाविष्ट असतात त्यांच्या बाजार भांडवलाची आधी मोजणी केली जात असते.

  • यासाठी कंपनीने जे शेअर्स इशू केले आहेत त्या शेअर्सच्या संख्येला शेअर्सच्या दराने गुणायचे असते.मग यातुन जो आकडा आपल्याला मिळत असतो त्याला बाजार भांडवल असे म्हटले जाते.
  • मग यानंतर त्या सर्व कंपन्यांचा फ्री फ्लोट स्ट्रक्चर काढला जात असतो.म्हणजे कंपनीने जे शेअर इशु केले आहेत आणि जे बाजारात ट्रेंडिंग करण्यासाठी उपलब्ध असतात त्यांची टक्केवारी काढली जाते.
  • सेंसेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व तीस प्रमुख कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कँपिटलाईझेशन जोडुन झाल्यावर त्याला बेस व्हँल्युने भागायचे असते म्हणजेच त्यांचा भागाकार करायचा असतो आणि बेस इंडेक्स व्हँल्युने गुणावे देखील लागते.म्हणजेच त्याचा गुणाकार देखील करायचा असतो.
  • सेंसेक्समध्ये शंभरची बेस इंडेक्स व्हँल्युह वापरली जात असते.

1 thought on “Sensex म्हणजे काय ? – What is Sensex and List of BSE Sensex 30 Companies”

Comments are closed.