कमी वेळात जास्त काम – कार्यक्षमता कशी वाढवावी ? – List of Tips for Effective Time Management
आपल्याला जर आयुष्यात कुठल्याही कामात यश संपादन जर करायचे असेल तर आपण यासाठी योग्य प्लँनिंग करणे खुप गरजेचे आहे.
याचसोबत प्लँनिंग करण्यासोबत सातत्याने योग्य ती अँक्शन घेणे देखील खुप महत्वाचे असते.
कारण आपण जर कामाची टाळाटाळ न करता योग्य ती अँक्शन वेळेतच घेतली तर आपण आपली बरीच कामे खुप कमी वेळात पार पाडु शकतो.
फक्त त्यासाठी आपल्याला काही महत्वाची पाऊले आहे जी उचलणे फार आवश्यक आहे.ही पाऊले जर आपण उचलली तर आपण आपली अवघड कामे देखील एकदम सहज आणि सोप्या पदधतीने पार पाडु शकतो.तेही एकदम कमी वेळात.
चला तर मग जाणुन घेऊया कमी वेळात जास्त काम करण्यासाठी आपण काय करायला हवे.
कमी वेळात जास्त काम करण्यासाठी काय करायला हवे?
आपल्या प्रत्येकाची अशी एक तक्रार असते की माझ्याकडे वेळ खुप कमी आहे आणि काम खुप जास्त आहेत त्यामुळे माझी बरीच कामे रखडुन पडली आहेत.
आणि वेळेच्या अभावामुळे मला माझी कामे पुर्ण करता येतच नाहीये.
तुम्हाला देखील अशी तक्रार असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आले आहात कारण आज आपण कमी वेळात जास्त काम करण्यासाठी काय उपाय करायला हवे? हे आजच्या लेखात जाणुन घेणार आहोत.
माहिती -हेनरी फायोल यांची व्यवस्थापनाची 14 तत्वे – Henri Fayol 14 Principles of Management
कमी वेळात जास्त काम करण्यासाठी करावयाचे उपाय: Simple Ways to Be More Productive Every Day
1) गोल सेटिंग : GOAL
- आपल्याला जर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामे पार पाडायची असतील तर यासाठी आपण आपले एक स्पष्ट गोल सेट करायला हवे की मला इतक्या वेळात एवढे काम कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करायचे आहे.आणि यासाठी मी ह्या स्टेप फाँलो करणार आहे.
- याने आपल्याला ठरवलेल्या एका निर्धारीत वेळात काम करण्याची सवय लागेल आणि आपल्यात कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्याची सवय लागेल.
2) एक दिवस आधी कामाची प्लँनिंग करणे:PLANNING
- उद्या सकाळी झोपेतुन उठल्यावर आणि अंघोळ तसेच चहा पाणी वगैरे झाल्यावर मला काय काम करायचे आहे याची आपण एक दिवस आधीच प्लँनिंग करून घ्यायला हवी.
- एखादे मोठे काम असेल तर त्याचे दोन तुकडयात विभाजन करायला हवे आणि ठरवलेल्या प्लँनिंगचे प्राँपर पदधतीने एक्झिक्युशन देखील आपण करायला हवे.
3) 80 आणि 20 रूल फाँलो करायला हवा: 80/20 RULE
- असे म्हटले जाते की आपल्या आयुष्यात दोन टाईपची कामे असतात ज्यात रोज आँफिसात जाणे किंवा घरातच लँपटाँपवर कंप्युटरवर महत्वाची कामे करणे,ही अशी कामे आपल्या 80 परसेंटमध्ये येत असतात.ज्याने आपल्याला फायदा मिळत असतो आपली प्रगती होत असते.
- आणि टिव्ही बघणे,गेम खेळणे,मोबाईलवर तासनतास चँटींग करणे ही आपल्या आयुष्यातील अशी कामे असतात जी 20 परसेंटमध्ये येत असतात.कारण अशा कामांमधून आपल्याला कुठलाही फायदाही होत नसतो.आणि आपली प्रगती देखील होत नसते.फक्त आपला वेळ वाया जात असतो.
- म्हणुन आपण आपला सकाळचा फ्रेश टाईम आपल्या 80 परसेंट महत्वाच्या वर्कसाठी द्यायला हवा ज्याने आपली प्रगती होणार असते.कारण असे म्हणतात की सकाळी आपला माईंड खुप फ्रेश असतो त्यामुळे आपण आपली अत्यंत महत्वाची कामे सकाळीच करायला हवी.
- आणि मोबाईलवर चँटिंग करणे,टिव्ही बघणे ही बिनमहत्वाची निव्वळ मनोरंजनाची कामे आपण आपली महत्वाची कामे करून झाल्यावर करायला हवी.
- असे केल्याने दिवसभरात आपण जास्तीत जास्त महत्वाची कामे पार पाडु शकतो.आणि खुप कमी वेळातच जास्तीत जास्त यश संपादित करू शकतो.
4) कामाची टाळाटाळ करणे सोडायला हवे: STOP Procrastination
- आपल्यापैकी खुप जणांना आजचे काम उद्यावर ढकलून कामाची टाळाटाळ करण्याची सवय असते.कारण आपण नको असलेली बिन महत्वाची कामे आधी करत असतो.
- आणि मग महत्वाची कामे करायला आपल्या अंगात अजिबात उर्जा राहिलेली नसल्यामुळे आपण आजचे महत्वाचे काम उद्यावर ढकलत असतो.
- म्हणुन जी कामे आपल्या ध्येयापर्यत घेऊन जात नसतील अशी कामे आधी न करता जी कामे आपल्याला आपल्या ठरवलेल्या ध्येयापर्यत घेऊन जातील अशी कामे सर्वप्रथम आपण पुर्ण करायला हवीत.
- उदा: जर आपण सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर टिव्ही पाहायला बसत असणार किंवा मोबाईल चँटिंग करण्यात टाईमपास करत असणार तर आपण अशी कामे टाळायला हवी आणि जे काम केल्याने आपले भविष्य उज्वल होईल आपले ध्येय साध्य होणार आहे असे काम दिवसाच्या सुरूवातीला कुठलीही टाळाटाळ न करता आपण आधी करायला हवे.
याने आपली सकाळची मेन फ्रेश एनर्जी ही आपल्या महत्वाच्या कामात इन्व्हेस्ट होईल टिव्ही बघण्यात तसेच मोबाईलवर चँटिंग करण्यात वाया जाणार नाही.
5) कामाचा एबी सीडीई फाँम्युला : ABCDE FORMULA
- आपल्या आयुष्यात चार प्रकारची कामे असतात ए कँटँगरी मध्ये अशी कामे येतात जी करणे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी खुप महत्वाचे असते.
- बी मध्ये अशी कामे येतात जी आपण करणे गरजेचे आहे पण नाही केली तरी आपल्या ध्येयावर त्याचा जास्त फरक पडत नाही.
- सी कँटँगरी मध्ये अशी कामे येतात जी केली तरी ठिक असते आणि नाही केली तरी ठिकच असते.
- आणि डी कँटँगरी मध्ये अशी कामे येतात जी आपण स्वता करण्यात वेळ न घालविता कोणा दुसरयाकडून आऊटसोर्स करून घेऊ शकतो.
- आणि ई कँटँगरी मध्ये अशी कामे येतात जी कोणत्याही महत्वाची नसतात ती करणे आपण टाळले पाहिजे.
- असे केल्याने आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारी महत्वाची कामे रोज सकाळी आधी करण्याची सवय लागेल ज्याचा मोठा फायदा आपल्याला भविष्यात प्राप्त होईल.
6)एकावेळी एकच काम करावे: ONE TASK AT A TIME
- जेव्हा आपण एकावेळी एकच काम करत असतो तेव्हा आपली एकाग्रता एकाच कामात शंभर टक्के जात असते ज्याने ते काम आपण अधिक प्रभावीपणे आणि यशस्वीरीत्या कमी वेळात पार पाडत असतो.
- पण याच ठिकाण आपण मल्टीटास्किंग केल्यावर आपली उर्जा दोन ठिकाणी विभाजली गेल्याने आपले कोणतेच काम पुर्ण होत नसते.
- म्हणून आपण आपली शंभर टक्के उर्जा एकावेळी आपले एकच महत्वाचे काम पुर्ण करण्यासाठी खर्च करायला हवी.
7) सेल्फ मोटिव्हेशन आणि सेल्फ डिसीप्लीन पाळायला हवे : DISCIPLINE AND MOTIVATION
- इतरांनी आपल्याला प्रेरित करण्याची वाट न बघता आपण सेल्फ मोटीव्हेशनची सवय लावायला हवी.कारण सेल्फ मोटिव्हेशने आपण कितीही मोठे ध्येय कमीत कमी वेळात सहज गाठु शकतो.
- याचसोबत आपण स्वयंशिस्तीचे पालन करायला हवे ज्यात रोज सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर आपण आपली महत्वाची कामे करण्यास जोमाने लागायला हवे.
- आणि जोपर्यत आपले दिवसभराचे ठरवलेले टारगेट हातात घेतलेले काम पुर्ण होत नाही तोपर्यत काम करत राहायचे अशी स्वयंशिस्त स्वताला लावायला हवी.येणे रोजचे काम रोज केल्याने आपण लवकरात लवकर आणि कमीत कमी वेळात आपले ध्येय गाठु शकतो.