शमीच्या वृक्षाचे तसेच शमीपत्राचे महत्व तसेच फायदे कोणते आहेत? -Importance Prosopis Cineraria Shami Plant

शमीच्या वृक्षाचे तसेच शमीपत्राचे महत्व तसेच फायदे कोणकोणते आहेत?

शमी ह्या झाडाचे शास्त्रीय नाव राॅसोपिस स्पायसीगेरा राॅसोपिस स्पेसिगेरा असे आहे.शमी ही भारतात उगवणारी एक अत्यंत महत्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे.शमीच्या झाडाचे पान गणपतीला वाहले जात असते.

आपल्या हिंदू संस्कृती मध्ये शमी वृक्षास अत्यंत पुजनीय मानले जाते.म्हणुन लंकेवर विजय प्राप्त केल्यानंतर प्रभु श्रीराम चंद्र यांनी देखील ह्या झाडाचे पुजन केले होते.

अज्ञातवासात जाण्याआधी सर्व पाच पांडवांनी आपली सर्व शस्त्रे एका कपड्यात गुंडाळली होती अणि ही सर्व शस्त्रे शमी वृक्षावर लपवुन ठेवली होती.

अशी अनेक उदाहरणे आहेत जी आपणास ह्या शमी वृक्षाचे पटवून देतात.

शमी वृक्षाची निर्मिती बाबत एक पौराणिक कथा सांगितली गेली आहे ज्यात असे सांगितले आहे की मालव देशामध्ये ओरव नावाचे एक अत्यंत महाज्ञानी अणि तपोनिष्ठ त्रषी वास्तव्यास होते.

आपल्या ह्या योग शक्तीमुळे हे त्रषी त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकत होते.हया त्रषींना एक कन्या देखील होती जिचे नाव क्षमी असे होते.

शौनक त्रषींचा पुत्र मंदार याच्याशी हिचा विवाह होतो.एकेदिवशी शौनक त्रषींच्या भेटीसाठी जात असताना वाटेमध्ये ह्या दांपत्यास एका महात्रषी मुनी यांचे आश्रम दिसुन येते.

ह्या महात्रषी मुनींच्या भालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढलेली होती.ही सोंड पाहुन हे दोघे जोडपे हसले.

म्हणुन क्रोधित होऊन हे महा त्रषी मुनी हा जोडप्याला एक शाप देतात.शापित झाल्यावर ह्या दोघांचे वृक्षामध्ये रूपांतरण झाले.

पुढे ह्या दांपत्याची अवस्था लक्षात आल्यावर क्षमीचे वडील औरव त्रषी अणि शौनक त्रषी हे घोर तपश्चर्या करतात.अणि गणपतीला प्रसन्न करतात.

See also  बँकेकडुन पर्सनल लोन कसे घ्यावे ? How to get a personal loan from the bank in Marathi

गणपती प्रसन्न झाल्यावर हे दोघे त्रषी क्षमी अणि मंदार या दोघांना मनुष्य देह प्रदान करण्यात यावा अशी मागणी गणपती जवळ करतात.

पण क्षमी अणि मंदार यांना शाप दिलेला त्रषी मुनी हा देखील गणपतीचाच परमभक्त होता त्यामुळे गणरायाने त्यांचे मन दुखावले जाऊ नये त्यांच्या शापाचा अपमान होऊ नये म्हणून क्षमी अणि मंदार यांना शापमुक्त न करता एक दुसरे वरदान देतात.

हे वरदान देताना गणपती बाप्पा शमी मंदार या दोघांची किर्ती गाजणार यांचे लोक त्या दोघांची पुजा करतील असा आशिर्वाद क्षमी अणि मंदार ह्या जोडप्याला देतात.

गणपतीने दिलेल्या ह्या वरदानावर शौनक त्रषी यांना संतोष प्राप्त झाला पण ओरव त्रषी यांचे मन ह्या आशिर्वादात संतुष्ट नव्हते म्हणून त्यांनी शमीवृक्षात प्रवेश केला अणि त्यात अग्नी रूपाने वास्तव्य करू लागतात.

म्हणुन ह्या वृक्षाला अगनीगर्भाक्षमी असे संबोधिले जाते.शमीच्या समीधा होम अग्नीसाठी आवश्यक असतात.यांच्यात घर्षणामुळे अग्नीची निर्मिती होत असल्याचे म्हटले जाते.

शमीपत्राचे महत्व – Importance Prosopis Cineraria Shami Plant

Importance Prosopis Cineraria Shami Plant

शमीपत्र गणपती बाप्पा यांना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते.म्हणुन गणपतीची पूजा करत असताना पुजेच्या ताटात शमीपत्र असायला हवे असे सांगितले जाते.

शमी हा राजस्थान येथील राज्यवृक्ष म्हणून ओळखला जातो.राजस्थान येथील ब्रिष्णोई समाजात याला कल्पवृक्ष असा दर्जा दिला जातो.राजस्थान मधील ब्रिष्णोई समाजातील लोक यास खेचडी असे देखील म्हणतात.

संस्कृत तसेच अनेक शास्त्रीय ग्रंथांमध्ये देखील ह्या वृक्षाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.शमीचे विविध औषधी गुणधर्म देखील असल्याचे आयुवेर्दात सांगितले जाते.

शमीचे आयुवैर्दातील औषधी गुणधर्म –

शमी वनस्पतीचा वापर व्रण जखम भरून काढण्यासाठी हे उपयुक्त ठरते तसेच यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारते.
दाह आग शमविण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

शमीची फुले गर्भपात अवरोधक असल्याचे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रात सांगितलेले शमीच्या वृक्षाचे महत्व –

ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की शनिदोष निवारण्यासाठी देखील शमीच्या वृक्षाचा उपयोग होतो.ज्यांना शनिदोष निवारण करायचे आहे त्यांनी शनिवारी शनिदेवाला शमीची पाने फुले वाहावी याने शनिदेव प्रसन्न होऊन आपली सर्व संकटे दुर होण्यास मदत होते.

See also  आज आंतरराष्ट्रीय महिला दिन.. "महिला पोहोचू शकत नाहीत अशी कोणतीही उंची नाही".. गुगलने विशेष डूडल प्रकाशित केले!

घराच्या दारासमोर शमी वृक्षाची लागवड केल्यास वास्तुदोष समस्या निर्माण होत नाही असे देखील सांगितले जाते.यासाठी हे झाड एखाद्या शुभ दिनी घराच्या उत्तर पुर्व दिशेला लावायचे असते.

अणि रोज याची पुजा करावी असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे.