बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले? तसेच आंबेडकरांच्या संपुर्ण वंशावळ अणि तिचा इतिहास काय आहे? – Ambedkar surname History

बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले? – Ambedkar surname History

डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव मेजर रामजी मालोजी सकपाळ असे होते.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ आडनाव सकपाळ असे होते.

बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे हे होते.मेजर रामजी सकपाळ हे सैन्यामध्ये सुभेदार पदावर कार्यरत होते.

मेजर रामजी सकपाळ यांचा विवाह सातारा येथील सुभेदार मेजर धर्मा रामनाथ मुरबाडकर यांच्या कन्येशी झाला होता ह्या कन्येचे नाव भीमाबाई असे होते.

Ambedkar surname History
Ambedkar surname History

रामजी अणि भीमाबाई यांना एकूण चौदा अपत्य होती त्यापैकी सात अपत्य जन्मताच अल्पवयात दगावली होती.

ह्या अपत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -रामजी भीमाबाई यांच्या आठव्या अपत्याचे नाव बाळाराम असे होते.

नवव्या अपत्याचे नाव होते गंगुबाई असे होते तर दहाव्या अपत्याचे नाव रमाबाई असे होते.अकराव्या अपत्याचे नाव आनंदराव बाराव्या अपत्याचे नाव मंजुळाबाई असे होते.तेराव्या अपत्याचे नाव होते तुळसाबाई.

अणि रामजी सकपाळ भीमाबाई सकपाळ यांच्या चौदाव्या अणि सर्वात धाकट्या अपत्याचे नाव भिमराव रामजी सकपाळ असे होते.म्हणजेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर.

बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव सकपाळ वरून आंबेडकर कसे पडले?

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महु ह्या गावात झाला होता.या काळात रामजी सकपाळ यांची नियुक्ती मध्य प्रदेशातील महु ह्या गावी करण्यात आली होती.

यानंतर पुढे रामजी सकपाळ सातारा इथे आले.७ नोव्हेंबर १९०० साली बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत दाखल करण्यात आले होते त्याकाळात गावाच्या नावावरून आडनाव लावले जाण्याची प्रथा कार्यरत होती.

कृष्णाजी केशव ह्या शिक्षकांचा सर्वात आवडता अणि लाडका विद्यार्थी भीमराव सकपाळ होते म्हणजेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर होते.

कृष्णाजी केशव यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थी भीमराव सकपाळ याचे आडनाव आपल्या आडनावावरून जोडुन टाकले होते.असे सांगितले जाते.

See also  TATA IPL 2023 - A complete schedule of TATA IPL 2023 - टाटा आयपीएल 2023 वेळापत्रक

असे देखील म्हटले जाते की बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव आंबावडे असल्याने आंबावडेकर यावरून त्यांचे नाव आंबेडकर असे पडले होते.आंबेडकरांनी हेच आडनाव आपल्या नावापुढे ठेवले.

इथुनच सकपाळ घराण्यातील लोक आंबेडकर घराण्यातील लोक म्हणून ओळखले जाऊ लागले.

बैसाखी च्या खास शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक स्टेटस 

बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज –

पुढे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न रमाई यांच्याशी झाले.बाबासाहेब आंबेडकर अणि रमाई यांना एकुण पाच अपत्य होती.

यातील चार अपत्यांचा मृत्यृ हा अल्पवयातच झाला यांचे नाव रमेश, गंगाधर, राजरत्न अणि इंदु असे होते.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाचव्या अपत्याचे नाव यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर असे होते.

यशवंत यांच्या पत्नीचे नाव मीराबाई असे होते.यशवंत अणि मीराबाई यांना पुढे चार अपत्ये झाली यात तीन मुले अणि एक मुलगी होती.

यातले पहिले प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे आहे.दुसरे अपत्य रमाबाई आंबेडकर होत्या.तिसरे अपत्य होते भीमराव आंबेडकर अणि चौथे होते आनंदराज आंबेडकर.

आज हीच पिढी बाबासाहेब आंबेडकर यांची तिसरी पिढी म्हणुन देखील ओळखली जाते.बाबासाहेब आंबेडकर या चौघांचे आजोबा होते.

बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंत याने बाबासाहेब यांचे विचार पुढे नेले यशवंत हेच बौदध चळवळीचे कार्यकर्ते तसेच विचारवंत म्हणुन ओळखले जात.याचसोबत यशवंत हे भारतीय बौदध महासभेचे अध्यक्ष चैत्य भुमीचे जनक देखील ते होते.यशवंत हे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य देखील होते.

यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांचे १९७७ सालीच निधन झाले त्यांच्या पत्नी मीराबाई देखील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्वांना परिचित आहेत.

यशवंत यांचे चिरंजीव प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर अणि मुलगी रमाबाई आंबेडकर होत्या.

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना सक्रिय राजकीय कार्यकर्ते म्हणुन ओळखले जाते.बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राज्यसभेत लोकसभेत देखील त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव अंजली मायदेव सुधाकर मायदेव यांच्या त्या कन्या.

See also  ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi

अंजली मायदेव ह्या प्राध्यापक आहेत.पण आज त्यांची ओळख सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्त्यां म्हणून केली जाते.

प्रकाश आंबेडकर अणि अंजली मायदेव यांचा एकूलता एक मुलगा ज्याचे नाव आहे सुजात आंबेडकर असे आहे.बाबा साहेब आंबेडकर यांची ही चौथी पिढी आहे.

सुजात आंबेडकर यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पाॅलिटीकल सायन्स मध्ये पदवी प्राप्त केली.तसेच सुजात यांनी चेन्नई येथील एशियन जनर्लिझम का्ॅलेज मधुन पत्रकारिता देखील केली असल्याचे सांगितले जात.

सुजात आंबेडकर हे लंडन येथील राॅयल हाॅलवे युनिव्हर्सिटी मधुन इलेक्शन कॅमपेन आॅफ डेमोक्रेसी मास्टर होते.सुजात यांची देखील आपल्या पित्याप्रमाणे त्यांची राजकीय ओळख निर्माण केली आहे.

यशवंत यांचे दुसरे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे भारतीय बौदध महासभेचे राष्ट्रीय कार्य अधयक्ष होते.याचसोबत ते समता सैनिक दलाचे देखील राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

भीमराव आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव दर्शना आंबेडकर असे आहे.भीमराव अणि दर्शना यांना एकच मुलगी आहे जिचे नाव कृतिका ह्या मुंबई मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करत आहे असे सांगितले जाते.

यशवंत आंबेडकर यांच्या तिसरा मुलगा आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत.यांची देखील एक राजकीय ओळख आहे.

आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव मनिषा असे आहे आनंदराज अणि मनिषा यांना दोन अपत्ये आहेत.यांची नावे साहील अणि अमन असे आहे.

यशवंतराव आंबेडकर यांच्या कन्या रमाबाई आंबेडकर ह्या लग्नानंतर रमाबाई तेलदुमडे लेखक विचारवंत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या आनंद तेलदुमडे यांच्या पत्नी आहेत.

रमाबाई तेलदुमडे देखील लेखक विचारवंत म्हणुन ओळखल्या जातात.रमाबाई तेलदुमडे अणि आनंद तेलदुमडे यांना दोन अपत्ये आहेत प्राची अणि रश्मी यातील एक प्राची तेलदुमडे जी एक आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा चिरंजीव सुजात,रमाबाई आंबेडकर यांची मुलगी प्राची रश्मी, भीमराव आंबेडकर यांची मुलगी कृतिका तसेच आनंदराव आंबेडकर यांचे मुले साहील अमन बाबासाहेब आंबेडकर यांची चौथी पिढी म्हणुन ओळखले जातात.

See also  बकेट लिस्ट म्हणजे काय? - What is Bucket List Marathi information

बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधु मुकुंदराज यांची देखील एक स्वतंत्र पिढी आहे.मुकुंदराज आंबेडकर यांना अशोक दिलीप विद्याताई सुजाताबाई अशी चार अपत्ये आहेत.

यात अशोक आंबेडकर यांच्या मुलाचे नाव राजरत्न अणि संदेश असे आहे.