बकेट लिस्ट – आपल्या जीवनातली ? – What is Bucket List Marathi information
जीवनात आपल्या सर्वांची वैशिष्ट्येपूर्ण अशी ध्येय असतात, काही मनात इच्छा आकांक्षा असतात. कुठं तरी आवडलेल्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरयाल जायचं असते, जुन्या शाळेतील मैत्री मैत्रिणी भेटून मनसोक्तपणे गप्पा मारायच्या असतात किंवा आयुष्यात करियर ,व्यवसाय बाबत काही स्वप्न असतात.
कागदावर वर जरी आपण ही लिस्ट ,यादी लिहलेले नसली तरी मनात मात्र कुठं तरी ती खोल दडलेली असते आणि वेळोवेळी आपल्या आठवण करून देत असते.
बकेट लिस्ट म्हणजे काय? What is Bucket List
bucket list म्हणजे अश्या बाबींची, गोष्टींची यादी असते ज्यांना तुमी ट्राय करू इच्छिता , काही ध्येय, उद्दीष्टे असतात जी गाठायची असतात, जीवनात एकदा तरी हवेहवेसे असणारे काही अनुभव घ्यायचे असतात.
जीवनातील लक्ष्यां ची यादी म्हणजे च bucket list जी आपण जीवन संपायच्या आधी पूर्ण करायची ठरवतो.
- Bucket list मागची संकल्पना हीच की सतत आपल्या ध्येयाप्रती जागृत राहणे, उद्धिष्टचां उद्दिष्टांचा सतत मागोवा घेणे, आणि आपलं जीवन शक्य तितक्या संस्मरणीय अनुभवांनी समृद्ध करणे.
- ही यादी निव्वळ यादी नसून ही आपल्याला मानसिक संकट, जीवनाल्या भीती यावर मात करण्यास मदत करते च त्यांचा मागोवा घेत राहिल्याने एक उच्च कर्तृत्वाची भावना ही अनुभवयास मिळते, रोज रोजच्या त्याच रुटीन जीवनातला आलेला कंटाळा निघून जातो.
नोकरी, ऑफिस व्यवसाय, मुलं , शाळा , फॅमिली , दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्यानि आपण इतकं व्यस्त आणि मग्न असतो की जीवनात काही नवीन काही करायला वेळच मिळत नाही.आपल्या काही छंद जोपासता येत नाही.
पण एकादी bucket list तयार करणे च नहि तर लिहून काढणे याला खूप महत्व आहे. लिहून काढल्याने तुमाला तुमच्या आवडीवर थोडं लक्ष देता येईल, आवर्जून वेळ काढायला उद्युक्त करेल.एकाद स्वप्न, ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करीत राहील.
काही आपल्या ला हव्याश्या वाटणाऱ्या बकेट लीस्ट यादी – My Bucket List
- आपल्या जन्मगावच्या विकासात मोठं योगदान करणे
- आई वडिलांना विमान प्रवास करवणे
- कॉलेज ,शालेय जीवनातल्या मित्रां सोबत एक GT कार्यक्रम घेणे
- लॉंग रोड ट्रिप वर जाणे
- क्युबा ड्राइव्ह मारणे
- स्वित्झर्लंड सारख्या नयनरम्य ठिकाणी परदेशी ट्रॅव्हल करणे.
- एतिहासिक ठिकाण, पावन खिंड, हल्दी घाट सारख्या ठिकाणीभेट देण.
ध्येय , उद्दीष्ट असण्याचा म्हहत्वचा पैलू म्हणजे ते गाठण्यासाठी आपण सुरू करणारा एक प्रवास आणि ते ध्येय पूर्ण केल्यानंतर मिळणारी पुर्णत्वाची भावना ही निराळीच.
सर्वांनी तयार करावी अशी ही bucket List