जीवनाविषयी सुविचार -101 Life Quotes In Marathi

जीवनाविषयी सुविचार -101 Life Quotes In Marathi

 1. कोणी सोबत असो किंवा नसो पण आपले गुरू अणि कुटुंब आपल्यासोबत असेल तर अशक्य देखील शक्य होऊन जाते.
 2. जीवना त खुप यशस्वी व्हायचे असेल तर रोज स्वताला एक गोष्ट सांगा मला पुढे जाण्यापासुन जगातील कुठलीही शक्ती थांबवू शकत नाही.
 3. लोक तुम्हाला जास्तीत जास्त एकदा हरवू शकतात पण पण तुम्ही त्यावेळी धीर सोडला तर तुम्हीच स्वताला वारंवार हारवाल
 4. आपला रिकामा खिसा आपल्याला खुप काही शिकवत असतो अणि भरलेला खिसा खुप काही दाखवत असतो.
 5. स्वतावर इतका विश्वास ठेवा की अविश्वास ह्या शब्दाला देखील तुमच्यावर विश्वास व्हायला लागेल
 6. सुचना देणे अणि ज्ञान देणे ह्यात एकच फरक असतो सुचना दिल्याने बंधन दर्शवले जाते अणि ज्ञान मिळवल्याने अणि ते इतरांना दिल्याने बंधनातुन मुक्तता होत असते.
 7. मनुष्य हा कोणतेही कार्य अत्यंत सहजपणे पार पाडु शकतो जर त्याने दृढ विश्वासाने हव्या असलेल्या ध्येयाचे चिंतन केले अणि त्यावर सातत्याने कार्य केले तर
 8. आपण नशीबापासून जेवढया जास्त प्रमाणात अपेक्षा करू तेवढ्या अपेक्षा भंग होत राहणार अणि जेवढे कर्म करू त्याच्यापेक्षा अधिकतम फळ आपल्याला मिळतच राहणार
 9. जे आपल्याला सोडुन जात असतात ते सोडुन जाण्याबरोबरच एक शिकवण देखील देऊन जात असतात ती आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी.
 10. एक नाते तुटने म्हणजे सर्व काही संपणे नसते कारण जेव्हा एक नात तुटते जेव्हा दुसरे नाते निर्माण देखील होत असते.
 11. आपल्याला आपल्या आयुष्याची किंमत वाढवायची असेल आपणास आपल्या आयुष्याचे महत्व देखील कळणे गरजेचे आहे.
 12. आयुष्यात मिळणारी अपमानास्पद वागणुक,आपल्यासोबत केले जाणारे घृणास्पद वर्तन हे आपल्याला कसे कसे जगायचे ते शिकवत असतात.
 13. जर परिस्थितीवर तुमचे नियंत्रण मजबुत आहे तर विष ओकणारे कितीही विष ओकतील तरी तुमचे काहीच बिघडवू शकत नाही.
 14. आयुष्यात आपण केलेल्या छोटछोटया चुका मोठमोठे धडे शिकवून जातात.
 15. नोकरी तुम्हाला उपाशी मरू देत नसते पण एका सीमेच्या बाहेर जाऊन दुसरे काही वेगळ करू देखील देत नसते.
 16. हक्क हा मागितल्याने मिळत नसतो त्यासाठी कठोर संघर्ष हा करावाच लागतो
 17. आपण जेव्हा नशिबापेक्षा आपल्या कर्मावर जास्त विश्वास ठेवू तेव्हा नक्कीच आपल्या वाईट दिवसांचा शेवट होणार
 18. वरवर जे दिसते आहे त्याचे आतिल सत्य काय आहे हे जाणुन घेणे म्हणजे अध्यात्म असते.
 19. जसा आपण विचार करतो तसे आपण बनत जातो आपण स्वताला बलवान समजले तर बनवान बनत जातो अणि दुर्बळ समजले तर दुर्बळ बनत जातो.
 20. इतरांवर विजय मिळविण्यापेक्षा स्वतावर ज्याला मिळविता आला त्याला कोणीच पराभूत करु शकत नसते.
 21. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे आपल्या माणसांमध्ये आपली माणसे कोण हे शोधणे असते.
 22. माणसाची सगळयात मोठी शक्ती त्याच्या अंतरमनात दडलेली असते.
 23. जेवढे मोठे आपले ध्येय असते तेवढाच मोठा आपला प्रवास असतो.
 24. जेव्हा आपल्याला आपल्या जीवणात घडत असलेल्या प्रत्येक घटना प्रसंगातुन काहीतरी बोध घेण्याची सवय होईल तेव्हा आपल्याला त्याचा शोध घेण्याची देखील सवय होईल.
 25. प्रमाणापेक्षा जास्त चांगले असणे सुदधा चांगले नसते
 26. मैत्री करायचीच असेल तर आपल्या एकटेपणाशी करा कारण एकटेपणा खूप काही शिकवून जात असतो
 27. कोणाही विषयी वाईट विचार करत बसण्यापेक्षा आपल्या स्वताविषयी चांगले विचार करत राहणे कधीही चांगले
 28. आपल्यावर झालेले संस्कार हेच आपल्याला कोणताही गुन्हा करत असताना आपल्याला थांबवु शकतात कोणतेही शासन किंवा प्रशासन नाही
 29. जोपर्यत आपल्या आयुष्यात वाईट काळ येत नाही तोपर्यत आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळत नाही
 30. संघर्ष कोणताही असो अणि त्याचा परिणामही काहीही असो पण लढणारा आपले काहीतरी नक्कीच त्यात गमावत असतो.
 31. इथे आपल्याकडुन चुकही होणार अणि आपल्याला चूकीचेही ठरवले जाणार कारण हे आयुष्य आहे इथे जेवढी स्तुती केली जाणार तेवढीच निंदा देखील होणार हे निश्चित च असते.
 32. माणुस समजुतदार तेव्हा होत नसतो जेव्हा तो मोठमोठया गोष्टी बोलु लागतो खरे तर तो तेव्हा मोठा होत असतोजेव्हा तो छोटछोटया गोष्टीदेखील समजु लागत असतो.
 33. कधीकधी ध्येयापेक्षा ते प्राप्त करण्यासाठी केला गेलेला प्रवासच जास्त सुंदर ठरत असतो.
 34. काहीतरी खूप चांगले करण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत राहा
 35. विश्वास ठेवा काहीतरी चांगलेच होणार. व काही शब्दांचे अर्थ हे ते अनुभवल्यानेच कळत असतात
 36. आयुष्यातील प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवण देऊन जात असतो.
 37. जो व्यक्ती त्याच्या कमजोरीलाच त्याचे सामर्थ्यस्थळ बनवत असतो तो व्यक्ती जीवणात यशस्वी होतोच
 38. जो व्यक्ती बाहेरची व्यर्थ बडबड ऐकत असतो तो उदधवस्त होऊन जात असतो अणि जो व्यक्ती आतला आवाज ऐकतो तो अजुन समृदध होऊन जात असतो.
 39. तुमची कृती तुमची निवड तुमचा निर्णय जगाला सांगत असतो की तुम्ही कोण आहात.
 40. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमचे प्राधान्य बदलायला हवे.
 41.  स्वतामध्ये ते बदल घडवून आणा जे तुम्हाला इतरांमध्ये पाहायचे आहेत.
 42. पाण्यात डुबल्यावर मरण निश्चितच आहे अणि आपले कर्म करण्यात डुबल्यावर मुक्ती मिळणे हे निश्चितच आहे
 43.  प्रत्येक समस्येत एक संधी दडलेली असते.फक्त ती आपल्याला शोधता आली पाहिजे.
 44.  आयुष्य एक क्षणाच कधीच बदलत नाही पण एका क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे नक्कीच बदलू शकते.
 45.  जोपर्यत तुम्ही मालक बनण्यासाठीच जन्माला आले आहात याची जाणीव तुम्हाला होत नाही तोपर्यत तुम्हाला इतरांची गुलामी करतच जगावे लागणार
 46.  मन शांत असेल तर प्रत्येक गोष्टीत सुख आहे अणि मन शांत नसेल तर प्रत्येक गोष्टीत दुख आहे
 47.  माणसे इतरांना आपल्या कर्मांनी हानी पोहचवतात अणि स्वताला आपल्या नकारात्मक विचारांनी
 48.  दिवसेंदिवस वाढत जाणारा समजुतदारपणा आपल्याला मौन पाळायला शिकवत असतो
 49.  जीवणात यशस्वी होण्यासाठी आपण नेहमी स्वताच्या चुकांबरोबरच इतरांनी केलेल्या चुकांतुनही बोध घेऊन काहीतरी शिकत राहायला हवे.
 50.  आपला संघर्ष हा इतर कोणाशीही नसुन आपल्या स्वताशी असायला हवा
 51.  आयुष्यात आपल्या समोर तर रोज एक मोठी समस्या निर्माण होत असते पण तिच्यावर मात करुन जो जिंकतो तोच खरा मोठा बनतो.कारण त्याचे विचार मोठे असतात.
 52.  अपयश हे आपल्याला आपण भुतकाळात केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची अणि स्वताला अधिक सामर्थ्यशील बनण्याची ताकद देत असते.
 53.  मोठेपणा तो गुण आहे जो पदामुळे नाही तर आपल्या संस्कारांमुळे आपल्याला प्राप्त होत असतो.
 54.  जर आपल्या मनात शिकण्याची आवड असेल तर आपण कोणतीही गोष्ट केव्हाही शिकु शकतो.
 55.  प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आपणच शोधत बसु नये काही प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी वेळेवर पण सोडून द्यावी
 56.  ज्याच्या आयुष्यात संकटे अडचणी येत नाही त्याला आपल्या सामर्थ्यांची जाणीवच होत नाही.
 57.  आदर अणि प्रशंसा हे मागितले जात नसते ते कमवायचे असते आपल्या मेहनतीच्या बळावर.
 58.  जे सहजासहजी मिळते ते जास्त दिवस टिकत नसते अणि जे सहजासहजी मिळत नाही ते जास्त काळापर्यत टिकत असते.
 59.  जेव्हा आपला आपल्या स्वतावरचा विश्वास वाढायला लागतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप काही चांगले घडण्याची सुरूवात होत असते.
 60.  नेहमी कष्टाच्या चावीनेच यशाचे कुलूप उघडत असते
 61.  इतरांची सेवा करत असताना आपल्याला जर आनंद प्राप्त होत असेल तर समजून जा की तीच खरी सेवा आहे बाकी सर्व देखावा आहे.
 62.  आ़ँक्सिजन असो किंवा व्यक्तीचे विचार ते खालच्या पातळीला गेले की धोका वाढायला लागतो.
 63.  स्वताची चूक मान्य करणे अणि पुढे चालू लागणे ही एक महान व्यक्तीची लक्षणे आहेत.
 64.  आपली कोणत्याही कामात दिवसेंदिवस होत जाणारी प्रगतीच आपली चिंता दुर करत असते
 65.  आयुष्य हे एक खुप मोठे पुस्तक आहे ज्याची फक्त काहीच पाने आत्तापर्यत आपल्याला वाचायला मिळाली आहेत अजुन पुढची पाने वाचणे तर अजुन बाकी आहे
 66.   कधीच इतरांच्या आनंदासाठी स्वताचे वेगळेपण जपणे सोडु नकाकारण तुमचा वेगळेपणा हीच खरी तुमची ओळख असते.
 67.  जोपर्यत तुम्हाला तुमची खरी किंमत कळत नाही तोपर्यत जगालाही तुमची खरी किंमत कळणार नाही
 68.  स्वताला इतके सक्षम बनवा की ज्यांना तुम्हाला बघायला कंटाळा केला होता तेच तुमची एक झलक बघायला देखील तरसुन जातील.
 69.  जोपर्यत तुम्ही तुमची मदत करत नाही तोपर्यत ह्या जगात कोणीच तुमची मदत करू शकत नाही.
 70.  आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर कधीही मोठी स्वप्रे बघा
 71.  जोपर्यत तुम्ही इतरांपेक्षा वेगळ काही करून दाखवत नाही तोपर्यत तुम्ही गर्दीतील एक व्यक्ती म्हणुनच ओळखले जाल.
 72.  जोपर्यत तुम्ही तुमची महत्वाकांक्षा मोठी ठेवत नाही तोपर्यत तुम्ही सामान्य व्यक्तीचेच आयुष्य जगणार.
 73.  जेव्हा तुमच्या पैसा असतो तेव्हा जग तुम्हाला सांगत असते की तुम्ही कोण आहात अणि जेव्हा तुमचा खिसा रिकामा असतो तेव्हा जग तुम्हाला सांगते की ते कसे आहात?
 74.  जोपर्यत तुमची स्वप्रे बघण्याची उंची मोठी होत नाही तोपर्यत तुमच्या यशाची उंचीही मोठी होणार नाही.
 75.  आपल्याला स्वताच करावा लागतो आपल्या आयुष्याचा संघर्ष कारण सल्ले तर खुप जण देतात पण साथ ह्या जगात कोणीच देत नाही
 76.  जगातील सर्वात अनमोल ठेव म्हणजे अनुभव
 77. अणि जगातील सर्वात अनमोल रत्न म्हणजे कष्ट
 78.  आपल्या कतृत्वावर विश्वास असणारी लोक आपल्या नशिबाच्या भरोशावर कधीच बसुन राहत नाही.
 79.  जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा आपला तिरस्कार करणारे सुदधा आपल्यावर प्रेम करायला लागतात अणि
 80. जेव्हा आपली वेळ खराब असते तेव्हा आपल्यावर प्रेम करणारे सुदधा आपला तिरस्कार करू लागतात.
 81.  आपले काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ह्या जगात कोणीच कोणात राहात नसते कारण विना स्वार्थ तर मेल्यावर आपले कुटुंब पण आपले देह त्यांच्या जवळ ठेवत नाही
 82.  धर्म तुमचा कोणताही असो फक्त तुमचे कर्म चांगले असु द्या कारण शेवटी हिशोब तुम्ही केलेल्या कर्माचाच केला जातो तुम्ही जपलेल्या धर्माचा नाही.
 83.  जेव्हा आयुष्य तुम्हाला पुन्हा एक संधी देत असते तेव्हा याआधी केलेल्या चुका पुन्हा करत बसु नये
 84.  बाहेर शोधल्यावर सगळया गोष्टी सापडत असतात पण एक गोष्ट अशी आहे आहे जी आपल्याला आपल्या आतच शोधावी लागते ती म्हणजे आपली चुक
 85.  नेहमी एकटे राहण्याची सवय ठेवा याने न तुम्हाला तुमच्या आयुष्यातुन कोणी आल्यावर फरक पडतो ना ना कोणी आयुष्यातुन निघुन गेल्यावर
 86.  जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी सांगण्याची गरज पडत नाही ती अनुभवता येत असते ती म्हणजे आपल्या भावना
 87.  आयुष्यात नेहमी आनंदी राहायचे असेल कधीही आपली तुलना इतरांशी करू नका
 88.  शरीरावर केलेला वार एकवेळ विसरता येतो पण हदयावर केलेला वार कधीच लवकर विसरता येत नाही
 89.  तुम्ही कोणासाठी काय केले हे कधीच बोलुन दाखवू नका कारण याने तुम्ही जे केले आहे त्याची किंमत राहत नाही
 90.  आयुष्य हे एक नाटकाचे रंगमंच आहे अणि आपण त्यातील आपापली भुमिका पार पाडणारे नाटककार ज्याला एकेदिवशी आपली नाटकातील भुमिका संपल्यावर हे नाटक सोडुन जायचेच आहे.
 91.  परिस्थिती ही एक अशी गोष्ट आहे जी नाजुक व्यक्तीलाही एकदम कणखर बनवुन टाकत असते.
 92.  नेहमी आधी स्वताचा विचार करा कारण इतरांसाठी आपण कितीही केले तरी कुठेतरी ते कमीच राहुन जाते.
 93.  संकटांशी लढायला कधीच घाबरू नका कारण संकटे ही येतच असतात आपल्यातील क्षमता अणि सामर्थ्य विकसित करण्यासाठी
 94.  जिथे ईच्छा असते तिथे मार्ग शोधत बसावे लागत नाही ,मार्ग आपोआप भेटतो
 95.  प्रत्येक चांगल्या विचारांवर आधी लोक मस्करी करतात त्यावर हसतात त्याचा विरोध करतात मग त्याचा स्वीकार देखील करत असतात.
 96.  समस्यांचा विचार केल्याने कारणे भेटत जातात अणि उपायांचा विचार केल्याने मार्ग भेटत जातात. रोज सकाळी अशी आशा मनात ठेवून उठा की आजचा दिवस कालपेक्षा चांगला जाणार
 97.  प्रत्येक मोठया यशाच्या प्रवासाची सुरूवात मी हे करू शकतो ह्या एका शब्दानेच होत असते.
 98.  जशी आपली दृष्टी तसा आपला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बनत जात असतो
 99.  यशाचे दरवाजे नशिबाने नाही तर मेहनतीने उघडत असतात
 100.  ज्याची स्पर्धा नेहमी स्वताशी असते त्याला ह्या जगात कोणीच हरवु शकत नसते.
 101.  यश आपल्याला तेव्हा प्राप्त होते जेव्हा ते यश मिळविणे आपल्यासाठी आपल्या श्वासाइतकेच गरजेचे होऊन जाते व आपली आजची मेहनत उद्याचे मिळणारे गोड फळ असते.
See also  डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर निबंध - Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

पुस्तके – जीवन विकास व रहस्य

1 thought on “जीवनाविषयी सुविचार -101 Life Quotes In Marathi”

Comments are closed.