दुधाचे विविध प्रकार – Types of milk in Marathi

दुधाचे विविध प्रकार – Types of milk in Marathi

दुधाचे विविध प्रकार –

विविध प्रक्रिया करून दुग्ध पदार्थ निर्मितीद्वारे दुधाचा साठवणूक कालावधी वाढविला जातो. जेणेकरून दुग्ध घटक मूलद्रव्ये यांचा साठवणूक कालावधी वाढवून ते पिण्यास तसेच वाहतूक  इ. साठी उपयुक्त ठरेल. व्यावसायिक आर्थिक उद्देशातून देखील  विविध प्रक्रियांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दुधांचे उत्पादन करून प्रक्रियेनुसार नावे देऊन बाजारात विकल्या जात आहेत. उदा. टोन्ड मिल्क, डबल टोन्ड मिल्क, पाश्चराईज्ड (निर्जंतुक) मिल्क इ.

व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक आर्थिक लाभ मिळण्यासाठी खासगी व्यावसायिक दुधामधील घटकांच्या प्रमाणात बदल करून प्रक्रियायुक्त दूध निर्मिती करतात. त्यांची माहिती सर्वसामान्यांना होणे आवश्यक आहे.

१. गाईचे किंवा म्हशीचे संपूर्ण दूध (whole milk ) : गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर निरोगी स्तनांतून जे दूध/चीकविरहित स्राव प्राप्त होतो. त्यामधील घटक जसेच्या तसेच ठेवून ते दूध पिण्यासाठी उपयोगात आणले जाते. या दुधास संपूर्ण दूध whole milk असे म्हणतात.

२. निर्जंतुक दूध sterilized milk  : दूध व दुधाच्या प्रत्येक घटकास तापवून त्यामध्ये असलेले अपायकारक जिवाणू नष्ट करून ते दूध ७ दिवसापर्यंत मानवास पिण्यायोग्य राहील, अशा दृष्टीने बाटलीमध्ये भरून भरलेल्या बाटलीसह १०८ अंश सें.ग्रे. ते १११ अंश सें.ग्रे. तापमानाच्या पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे ठेवून दूध बाटलीसह निर्जंतुक करतात. त्यास स्टरीलाईज्ड मिल्क/दूध असे म्हणतात.

३. एकजीव दूध (Homogenized milk) : दुधाला विशिष्ट प्रक्रिया देऊन दुधामधील स्निग्धांश कणांची (फॅट ग्लोबुल्स) समप्रमाणात लहानात लहान विभागणी २ मायक्रो मि.ली. मीटर करून हवेच्या दाबाने सूक्ष्म चाळणीतून अशा प्रकारे चाळले जाते की दुधामधील स्निग्धांश कण समप्रमाणात एकजीव करण्यात येऊन दूध स्थिर हवाविरहित स्थळी ४८ तासापर्यंत ठेवल्यानंतर ही त्यावरती स्निग्धांशाच्या/मलईचा थर जमा न होता दूध मूळ स्थितीतच राहील यासाठी दुधाची गाळणी करून व दूध ६० अंश सें.ग्रे. तापमानावर तापविल्यानंतर होमोजीनाईझर या सयंत्रामधून २५०० चौ. इंच पी.एस.आय. च्या दाबाने २ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या व्यासाच्या छिद्रातून प्रवाहित केले जाते. असे दूध पिण्यास अधिक पचनीय तसेच दुग्ध पदार्थ तयार करण्यास एकजीव असते.

See also  प्रदीप पटवर्धन विषयी माहीती – Veteran Marathi actor Pradeep Patwardhan famous actor in Marathi

४. सुगंधी दूध (Flavored milk ) : Types of milk in Marathi विविध प्रकारचे पाचक सुगंधी पदार्थ दुधामध्ये योग्य प्रक्रियेने योग्य प्रमाणात मिसळवून तयार केलेल्या दुधास त्या सुगंधी पदार्थांच्या नावाने सुगंधित दूध पेय म्हणून विकले जाते. अशा दुधामध्ये साधारणत: १ ते २ टक्के स्निग्धांशाचे प्रमाण असते. असे दूध सुवासामुळे रूचीपुर्ण व पाचक असते.

५. जीवनसत्त्वयुक्त दूध (vitaminised milk) : व्यावसायिकदृष्ट्या (आरोग्य हिताच्या मागणीनुसार आवश्यक त्या जीवनसत्त्वांची तयार केलेल्या दुधास जीवनसत्त्वयुक्त दूध असे म्हणतात. असे द्धबाजारात जास्त भावाने विकल्या जाते. या दुधामुळे आपल्या शरीरास आवश्यक त्या जीवनसत्त्वांचा पुरवठा होऊन त्यांच्या उपलब्धतेच्या अभावी होणारे रोग टाळले जाऊ शकतात. उदा. जीवनसत्वाअभावी होणारा रातआंधळेपणा

६. शीत/गोठविलेले दूध (Frozen milk) : दुधाला जिवाणू निर्जंतुकीकरणीय प्रक्रिया दिल्यानंतर ते उष्ण किंवा अति थंड तापमानावर शीतगृहात गोठविले जाते, त्यास फ्रोझन/कॉन्सन्टेटेड मिल्क असे म्हणतात. यामुळे दुधाचा साठवणूक कालावधी वाढतो. तसेच वाहतूक करण्यास सोईचे होते.

७. किण्वीत दूध (Fermented milk ) : विशिष्ट प्रक्रियेट्रारे आरोग्यास उपयुक्त अशा आवश्यक जिवाणूंची उदा. स्टेप्टोकोकस लॅक्‍टीस/डायअसिडोलॅक्टीस, लॅक्‍टोबॅसीलस अँसीडोफिलस, इ. निवड करून ते योग्य प्रमाणात दुधात मिश्रित करून तयार झालेल्या दुधास किण्वित दूध असे म्हणतात. उदा. दही, ताक, योगर्ट, केफीर,  कुमास इ. यामध्ये दुधाला विशिष्ट अवस्था प्राप्त होऊन त्याची चव व सेवनाची आवड वृद्धिंगत होते व पोषणविषयक मुल्यांक वाढतात. दुधातील घटकांमध्ये जैविक रासायनिक प्रक्रियेद्वारे बदल घडवून सेवनानंतर पचनशक्‍ती वाढते.

८. प्रमाणित दूध (standardized milk : विशिष्ट प्रक्रियेद्रारे दुधामधील स्निग्धांश व स्निग्धांश विरहीत घन घटकांचे प्रमाण प्रमाणबद्ध केले जाते. पी.एफ.ए. नियमानुसार प्रमाणित दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण एस.एन.एफ. ४.५ टक्के तर स्निंधाश विरहीत घन घटकांचे प्रमाण एस.एन.एफ. ८.५ टक्के इतके ठेवणे आवश्यक आहे. यालाच प्रमाणित दूध असे म्हणतात.

९. टोन्ड/ डबल टोन्ड/ स्किम मिल्क : पी.एफ.ए. नियमानुसार ज्या दुधामध्ये स्निग्धांश ३.० टक्के तर स्निग्धांश विरहीत घटक ८.५ टक्के या प्रमाणात तर ज्या दुधामध्ये स्निग्धांश १.५ टक्के व स्निग्धांश विरहीत घटकांचे प्रमाण ९.० टक्केच्या वर स्थिर ठेवले जाते. त्यास अनुक्रमे टोण्ह व डबल टोण्ड मिल्क म्हणतात. तर स्निग्धांश विरहीत दुधास स्किम मिल्क असे म्हणतात.

See also  शिक्षक दिन निबंध भाषण -Teacher Day Essay And Speech In Marathi

१०. सिंथेटिक मिल्क (अनैसर्गिक/कृत्रिम दूध) : हे संपूर्ण कृत्रिम स्वरूपाचे दूध असून व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक आर्थिक लाभापोटी अशा अपायकारक दुधाची निर्मिती होऊन ते बाजारात विकले जाते. अशा दुधाच्या सेवनाने आरोग्य बिघडते त्यामुळे त्याचे सेवन करू नये. या दुधात पाणी, डिटर्जण्ट पावडर, साबण पूड, कुड ऑईल, शेंगदाणा पूड यांच्या योग्य प्रमाणबद्ध मिश्रणातून विशिष्ट प्रक्रियेट्रारे ते होमोजनाईज्ड करून संपूर्णपणे किंवा नैसर्गिक दुधामध्ये भेसळ करून गैरमार्गाने विकले जाते. असे दूध खरेदी करू नये. त्यासाठी खात्रीच्या दूध विक्रेत्याकहून दूध खरेदी करावे.

Source – Krishi


Amazon-24 Mantra Organic Sonamasuri Brown Rice, 5kg

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग