ब्राऊन राईस म्हणजे काय ? Brown Rice चे म्हत्व

ब्राऊन राईस म्हणजे काय

ब्राऊन राईस म्हणजे काय

सध्या सर्व दूर  ब्राउन राइसची जाहिरात दिसून येते. काही ठिकाणी फार महाग दरात सुद्धा केली जाते. काही ग्राहक खरेदी तर करतातपरंतु भात शिजवताना चूक झाल्यामुळे त्याबद्दल गैरसमज होतात. बऱ्याच जणांना ब्राउन राइस

खायला, दिसायला, व चवीला पॉलिश केलेल्या पांढऱ्या शुभ्र तांदळासारखा असावा असे वाटते. ब्राउन राइस दिसायला ब्राउन रंगाचा असल्यामुळेहा कमी प्रतीचा तांदूळ असल्याची काही लोकांची धारणा आहे. ब्राउन राइस म्हणजे काहीतरी वेगळा धान असावा असेही वाटते.

पूर्व विदर्भात या तांदुळाला बगाड तांदुळ’ तर कोकणामध्ये वेणी तांदूळ’ असे संबोधतात. हा तांदूळ तांबूस किंवा फिकट तपकिरी रंगाचा असतो. धानाच्या दाण्याचे वरील टरफल/कोंडा काढून त्याला  अजिबात पॉलिश केलेलं नसते अशा तांदुळास “ब्राउन राइस’ असे म्हणतात, पॉलिश न केलेल्या तांदुळासच ब्राउन राइस” म्हणतात.

भाताच्या प्रत्येक दाण्यामध्ये टरफल काढल्यावर तांदुळाच्या पृष्ठभागावर अनेक पौष्टिक पदार्थांचे थर असतात. भात गिरणीत धान भरडून पॉलिश केल्यानंतर हे पौष्टिक पदार्थाचे थर नष्ट होऊन पांढरा स्वच्छ तांदूळ बाहेर पडतो. यामुळे तांदुळाच्या पृष्ठभागावरील शरीरास आवश्यक अशी जीवनसत्त्वे तांदुळामध्ये न राहता ती तुसामध्ये निघून जातात. यामुळे भात खाणाऱ्या व्यक्‍तींनी पॉलिश केलेला पांढरा तांदूळ न खाता बगड तांदूळ खाल्ल्यास सुमारे १६ पौष्टिक. पदार्थ शरीराच्या वाढीस मिळतात.

ब्राऊन राइस चे मानवी शरीरास लाभदायक असणारे महत्त्वाचे फायदे

 • राइस ब्रॅन ऑईल हे फक्त ब्राऊन राइसमध्येच असतात. यामुळे हे रक्‍तातील एलडीएल कोलेस्टोरॉल आणि ट्रायग्लीसराइडस्‌ कमी करते.
 • प्रकार दुसरा (टाइप २) मधुमेह प्रकारासाठी अतिशय उपयुक्‍तआहे. या रोगाची तीव्रता कमी करते. स्वादुर्पिडाचा कर्कराग (कॅन्सर)होण्यास प्रतिबंध होतो.
 • उच्च स्क्तदाबातील ताण कमी करण्यास मदत होते.
 • ब्राऊन राइस मधील उत्तम तंतुमय भागामुळे कॅन्सरला प्रतिबंध करण्यासाठी मदत होते.
 • एक कप ब्राउन राइसमध्ये २६ मि. ग्रॅम सेलेनीयम आणि इ-जीवनसत्त्व असल्याने हृदयरोग आणि संधिवात नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
 • ब्राऊन राइसमध्ये न विरघळणारे उत्तम तंतुमय पदार्थ असल्याने मुतखडा (किडनी स्टोन) होण्यास प्रतिबंध होतो. सर्वांच्या पचनसंस्थेस फ्चनासाठी मदत होऊन शौचास साफ होते व आतड्यांच्या रोगास प्रतिकार करते.
 • यातील मॅग्निज मुळे, प्रथिने व कबोंदके पचंनासाठि ऊर्जाशक्‍ती मिळते.
 • मॅप्रेशियममुळे दमा कमी होण्यास मदत होते.
 • ब्राऊन राइस मधील थायमीन मुळे चयापचय शक्‍ती सुधारते. थायमीन या जीवनसत्वा मुळे मेंदू आणि शरीरातील मज्ञासंस्थांची क्षमता वाढते.
 • लठ्ठपणा व शरीरातील चरबी कमी होण्यासाठी मदत होते.
 • गरोदर स्त्रियांना उपयुक्त असतो.
See also  फ्रेडरिक टेलर- शास्त्रीय व्यवस्थापन- Frederick Taylor's 5 Principles of Scientific Management

 ब्राउन राइस भात खाण्याची सवय आणि आवड निर्माण होण्यासाठी  काही उपाययोजना

बहुतेक भात खाणाऱ्या व्यक्‍तींना कित्येक वर्षापासून पॉलिशचा पांढरा  तांदळाचा भात खाण्याची सवय झालेली आहे, ब्राउन राइसचे महत्त्व जाणून तो खाण्यासाठी सुरुवात केली तर त्यांचे गैरसमज दूर होतील व ते दूर करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करता येईल.

१) ब्राउन राइस शिजविण्याची पद्धत विषयी माहिती देणे गरजेचे आहे. ब्राउन राइस शिजवण्यासाठी पांढर्‍या तांदळापेक्षा थोडे जास्त पाणी वापरून, ब्राउन राइस कमी गॅसवर, कुकरमध्ये अधिक वेळ शिजवावा. छान शिजतो व खाताना मऊ वाटतो.

२) ब्राउन राइसचा भात खाल्ल्यास मानवी शरीरास अनेक फायदे होतात. अनेक मानवी रोगांना हा तांदूळ दूर ठेवतो व पौष्टिकता या अत्यंत महत्त्वाच्या बाबी वारंवार सांगणे गरजेचे आहे.

३) प्रथम सवय होईपर्यंत दिवसातून एक वेळ ब्राउन राइसचा भात खावा. दिवसातून एक वेळ दररोज हा भात खाल्ल्यास त्यामध्ये जो अधिक प्रमाणात तंतुमय भाग असतो, त्यापासून पचन संस्था सुधारण्यासमोठ्या प्रमाणावर मदत होते.

४) ब्राउन राइसची आवड निर्माण होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला आवडतील असे मसाल्याचे पदार्थ घाल्मवेत म्हणजे भाताला चांगली धणे पावडर म्हणज मसाल्याचे मश्रण थातल्यास पुलावसारखा भात चवदार होतो.

५) ब्राउन राइसमध्ये पिष्टमय पदार्थ पांढऱ्या तांदुळापेक्षा कमी असतात.हा भात खाताना पांढऱ्या तांदुळापेक्षा अधिक वेळ चावावा लागतो. चावून अगदी बारीक झाला की मग खाल्ल्यावर त्याचे फ्चन चांगले होते. हा भात हळूहळू व अधिक चावून खाण्याने पोटावर व शरीरावर ताण येत नाही व पोट खूश राहते. प्राथमिक अवस्थेत हा भात पोट गच्च भरेल या प्रमाणात खाऊ नये.

६) पहिले एक ते दोन आठवडे ब्राउन राइस खाल्ल्यावर दररोज आपले वजन करावे. काही आठवड्यानंतर व्यक्तीचे वजन कमी झाल्याचे आढळून येईल. लब्ठुपणा कमी करण्यास याचा खूप उपयोग होतो.

ब्राउन राइस शिजविण्याची पद्धत- ब्राऊन राईस म्हणजे काय

ब्राउन राइस कुकरमध्ये शिजवावा. ब्राउन राइस शिजवण्यासाठी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. कुकरचा डबा किंवा भांड्यात ब्राउन राइस व २.५ ते ३ पट पाणी घालावे. भांड्यावर झाकण ठेवावे व कुकरची

See also  ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi

एक शिट्टी होऊ द्यावी व त्यानंतर गॅस कमी करावा. मंद आचेवर कुकर १५ मिनिटे शिजू द्यावा व नंतर बंद करावा. कुकर थंड होऊ द्यावा व नंतरच उघडावा. कुकर उघडण्याची घाई करू नये. ब्राउन राइस कमी गॅसवर कुकरमध्ये अधिक वेळ शिजवावा. छान शिजतो व खाताना मऊ वाटतो.

मर्यादा

१) सध्या ब्राउन राइस खाणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ब्राउन राइस तयार केल्यास विक्रीची समस्या निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ब्राउन राइस उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

२) ब्राउन राइस एकाच वेळेस तयार न करता मागणीनुसार टप्प्या टप्प्याने तयार करावा लागतो. ब्राउन राइस दिसायला ब्राउन रंगाचा असल्यामुळे हा कमी प्रतीचा तांदूळ असल्याची काही लोकांची धारणा आहे.

३) बारीक भात खाणाऱ्या ग्राहकांना ब्राउन राइस खाण्याची सक्‍यनसल्यामुळे सुरुवातीला ब्राउन राइसचा भात चिकट व जाड/ठोकळ वाटतो. ब्राउन राइस खाताना चव वेगळी लागते. प्रथम काही दिवस तो भात खावासा वाटत नाही. तो कित्येकांना न आवडण्याची शक्‍यता आहे.

४) ब्राउन राईस शिजवण्यासाठी पांढरा तांदुळापेक्षा जास्त पाणी लागते. तसेच तो शिजवण्यास अधिक वेळ ल्मगतो.

५) सध्या तरी ब्राउन राइसला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत निरनिराळे धानाचे वाण विकसीत केलेले असून त्यापासून ब्राउन राईस तयार करता येऊ शकेल. कृषी संशोधन केंद्र, साकोली येथून २०१९ मध्ये लाल तांदुळाचे वाण एसकेएल आरआर- १ विकसित करून पूर्व प्रसारित केलेले आहे. या लाल तांदुळाच्या वाणाच्या पॉलिश न केलेल्या लाल तांदुळामध्ये झिंक व लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणसुद्धा अधिक आहे.


Amazon-24 Mantra Organic Sonamasuri Brown Rice, 5kg

Best Discount Coupons

पुस्तके – फिशिंग

1 thought on “ब्राऊन राईस म्हणजे काय ? Brown Rice चे म्हत्व”

Comments are closed.