झुकिनी ची माहिती – Zucchini information in Marathi


Zucchini information in Marathi

झुकिनी ची माहिती –

अमेरिका उगमस्थान असलेले झुकीनी पीक हे समर व विंटर स्क्वाश म्हणहून ओळखले जाते.  झुडपं सारखी दिसणारी व काकडी आणि दुधी भोपळा सारखी चव असणार हे पीक इटली देशात खूप प्रसिध्द असून कालांतराने याचा सर्व देशात प्रसार होत गेला.

कुकुरबीटा मोझिमा व पेपो अशी याची जीवशास्त्रीय नाव असून या पिकात नर व मादी अशी दोन्ही फुल,फळ येतात.  फळ ही हिरव्या व पिवळ्या रंगाची 25-35 सेंटीमीटर लांबीची असतात.,हेक्टरी उत्पपन्न साधारण 16 टन येत असते.

  • लागवड – झुकिनी पिकाचा कालावधी फारच कमी असतो.तुम्ही जर पावसाळ्यात झुकिनी  पिकांवर लागवड टाकला तर ते झुकिनी  पिकासाठी फायद्याचे ठरते.हिवाळ्यामध्ये या पिकांवर लागवड टाकला तर पिकाचे उत्पादन हवामानामुळे 10-15 दिवस पुढे जाते.
  • हवामान – उष्ण हवामानामध्ये लागवड योग्य रित्या यशस्वी होते.रात्रीचे तापमान 18 अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान 30 अंश सेल्सिअस असले,तर झुकिनी चे उत्पादन चांगले मिळते.
  • जमीन – झुकिनी च्या चांगल्या उत्पादनासाठी निचरा होणारी जमीन चांगली असते.तुम्ही उभी-आडवी नांगरणी करून जमीन भुसभुशीत करा.जमिनीचा सायु (पी एच) 6.5 ते 7 .0 दरम्यान असावा.

झुकिनी  मध्ये प्रोटीन,कार्बोहायड्रेट,फायबर कॅल्शियम,झिंक,पोटॅशियम,व्हिटॅमिन सी यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो.आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या जेवनामध्ये भाज्यांचा समावेश केला पाहिजे. सलाड चा वापर सर्वजण आपल्या आहारामध्ये करत असतात ,तुम्ही झुकिनी  चा वापर सलाड मध्ये करू शकता.झुकिनी  सलाड पेक्षा झुकिनी  भाजीचा वापर जास्त लोक करतात. सकाळ,दुपार की संध्याकाळच्या जेवनामध्ये झुकिनी  भाजीचा समावेश करू शकतात

भाज्यां आपल्याला मानसिक आणि शारीरिक फिट राहण्यासाठी मदत करतात.अशीच झुकिनी  ही एक प्रकारची भाजी आहे. झुकिनी  भाजी ही खाण्यासाठी चविष्ट आणि तितकीच आरोग्यासाठी पौष्टिक असते.

उन्हाळ्याच्या दिवसात मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या झुकिनी  भाजीला आपण आपल्या आहारामध्ये सामाविष्ट केले पाहिजे.

भाजीचे वैज्ञानिक नाव क्यूकरबिटा पेपो आहे.ह्या भाजीला आपण कोर्ट गेट नावावरून देखील ओळखतो.ह्या भाजीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, पोटेशियम, फाइबर  यांचा समावेश असतो.

See also  Occupation म्हणजे काय? Occupation Meaning In Marathi

झुकिनी  भाजीचे फायदे – Zucchini information in Marathi

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे – ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते त्यांना संक्रमण होण्याचा धोका कमी असतो.झुकिनी भाजीतील पोषक तत्व तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
  • हाय ब्लड प्रेशर ला कमी करणे – तुमचा जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर झुकिनी ची भाजी तुमचा ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी तुमची मदत करेल.जास्त ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तीला खूप साऱ्या आजारांना सामोरे जावे लागते;तुमचा जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर तुम्ही तुमचा ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी जेवनामध्ये झुकिनी  भाजीचा वापर करू शकता..
  • पचनक्रिया सुरळीत होणे – झुकिनी मध्ये असणाऱ्या फायबर आणि अन्य पौष्टिक घटक आपल्या शरीरातील अन्न पचायला मदत करतात.तुम्हाला जर पचनासंबंधी विकार असतील तर झुकिनी  ची भाजी तुमच्यासाठी फायद्याची ठरते.
  • कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करणे – झुकिनी मध्ये असणाऱ्या फायबर आणि अन्य पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रणाम कमी होते.शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढले तर आपल्याला हृदयासंबंधी विकार होऊ शकतात,त्यामुळे तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करण्यासाठी झुकिनी  भाजीचा वापर करा.
  • हाडे मजबूत बनवणे – झुकिनी भाजीमध्ये एंटीऑक्सीडेंट्स, मैग्नीशियम आणि विटामिन यांचा समावेश असतो.मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनवतात आणि मॅग्नेशियम आणि एंटीऑक्सीडेंट्स आपल्या शरीरातील मांसपेशी मजबूत बनवतात.त्यामुळे तुम्ही आहारामध्ये झुकिनी  भाजीचा समावेश केला पाहिजे.
  • कॅन्सर साठी औषध – झुकिनी ची भाजी कॅन्सर पासून वाचण्यासाठी मदत करते.झुकिनी  मध्ये असलेले ल्युटीन घटक आपल्या शरीरामध्ये एंटीऑक्सीडेंट्स चे काम करते.हे घटक आपल्या शरीरातील कॅन्सर कोशिकाना विकसित करतात.महिलांमध्ये होणाऱ्या स्तन कॅन्सर पासून वाचण्यासाठी झुकिनी  हा एक चांगला पर्याय आहे.तुम्ही जर आहारामध्ये नियमित झुकिनी  भाजीचा वापर करत असाल तर तुम्हाला पोटाचा कॅन्सर होत नाही.
  • डोळे निरोगी ठेवणे – वाढत्या वयाबरोबर डोळ्यांची रोशनी कमी होते.जुकिणीमध्ये असणारे ल्युटीन आणि जेक्सैथीन घटक डोळ्यांची रोशनी वाढवण्यासाठी मदत करतात.तसेच वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराला कमी करण्यासाठी झुकिनी चा वापर केला जातो.
  • पोटाची समस्या दूर होणे – पोटाची समस्या दूर करण्यासाठी फायबरयुक्त अन्नाची आवश्यकता असते. झुकिनी मध्ये असणाऱ्या फायबर युक्त घटकांमुळे आपली पोटाची समस्या दूर होते.
  • अस्थमा आजाराच्या लोकांसाठी फायदेशीर – आपल्या आहारामध्ये झुकिनी चा नियमित वापर आपल्याला अस्थमा आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतो.झुकिनी  मध्ये व्हिटॅमिन सी भरपुर प्रमाणात असते,जे की एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट असते.
  • संधीरोग कमी करण्यासाठी – जेव्हा आपल्याला संधीरोग होतो तेव्हा शरीरातील रक्तामध्ये युरिक ऍसिड बनते.ज्यामुळे आपल्याला वेदना होतात.डॉक्टरांच्या मते संधीरोग असणाऱ्या पेशंट नी आपल्या डाएट मध्ये झुकिनी भाजीचा वापर केला पाहिजे.
See also  14 विद्या आणि 64 कला - 14 Vidya list in Marathi