क्रिमिनोलॉजी करिअर संधी
जर तुमचे स्वप्न दररोज काहीतरी नवीन करायचे असेल , आव्हानात्मक काम आवडत असतील , नवीन आधुनिक तंत्रचा उपयोग कारावायास आवडत असेल,म्हणजे दररोज नवीन टास्क करायला आवडणे ,असे जर तुमचे स्वप्न असेल,तर क्रिमिनोलॉजी तुमच्यासाठी चांगला करिअर ऑप्शन आहे.आपण या लेखामध्ये क्रिमिनोलॉजी कोर्स बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
या लेखात पाहिले जाणारे महत्वाचे मुद्दे –
1) क्रिमिनोलॉजिस्ट कोणती कामे करतात ?
2) क्रिमिनोलॉजी कोर्स मध्ये काय काय असते ?
3) क्रिमिनोलॉजिस्ट याना किती पगार असतो ?
4) क्रिमिनोलॉजी कोर्स मध्ये कोणकोणते विषय शिकवले जातात आणि तुम्ही कोणकोणत्या युनिव्हर्सिटी मधून क्रिमिनोलॉजी कोर्स करू शकता ?
क्रिमिनोलॉजिस्ट कोणती कामे करतात ?
कितीही हुशार चोर किंवा गुन्हेगार असुदेत,त्या गुन्हेगाराकडून गुन्हा केल्यानंतर गुन्हा केलेल्या ठिकाणी काहीतरी अशी गोष्ट राहते काही तरी पुरावा , चिन्ह किंवा संकेत (lead, mark, sign, track) नकळत पणे मागे ठेवून जात असतो ,ज्याने की तो गुन्हेगार पकडला जाऊ शकतो.अशाच गोष्टींच अभ्यास करून गुन्हेगारांना पकडण्यास शाश्रोक्त अभ्यास म्हणजे क्रिमिनोलॉजी,
त्या गोष्टींवरून क्रिमिनोलॉजिस्ट त्या गुन्हेगाराची मानसिकता,क्राईम सिन याचा शोध लावून गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत करतात.ह्या राहिलेल्या गोष्टींमध्ये रक्त,हाताचे निशाण,केस यांसारख्या गोष्टीपासून ते हत्यार यांसारख्या गोष्टीवरून ते अपराध्याचा शोध लावतात.काही प्रोफेशनल क्रिमिनोलॉजिस्ट खूप छोट्या गोष्टीवरून गुन्हेगाराचा शोध लावतात.
क्रिमिनोलॉजिस्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात.भारतीय सरकारच्या अधीन असलेल्या एजन्सी ,तसेच प्रायव्हेट सेक्टर मधील डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये क्रिमिनोलॉजिस्ट काम करतात.
क्रिमिनोलॉजी कोर्स हा क्रिमिनोलॉजिस्ट बनण्यासाठी आवश्यक आहे.या व्यतिरिक्त तुम्ही क्रिमिनोलॉजी कोर्स करून फॉरेन्सिक सायन्स,सायंटिस्ट, रिसर्च असिस्टंट,इन्व्हेस्टगर च्या पदावर्ती काम करू शकता.हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पोलीस विभाग, रिसर्च एजन्सीज ,सीबीआय,क्रिम लॅबोरेटरी,एफबीआय,इत्यादी ह्या ठिकाणीही काम करू शकता.तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रातील लोकांना शिकवण्यासाठी शिक्षक बनू शकता.
क्रिमिनोलॉजिस्ट याना किती पगार असतो ? – Criminology is a career Marathi
तुम्ही जर क्रिमिनोलॉजी कोर्स पूर्ण करून क्रिमिनोलॉजिस्ट म्हणून जॉबला लागला असेल तर तुम्हाला सुरवातीला पगार 25 ते 30 हजार दर महिन्याला इतका मिळतो .तुमचा अनुभव आणि तुमच्या काम करण्यावर तुमचा पगार वाढतो.तुम्हाला जर आपल्या देशात जॉब करण्यापेक्षा बाहेरच्या देशात जॉब करायचा असेल तर क्रिमिनोलॉजिस्ट चा जॉब तुमच्यासाठी चांगला आहे;कारण क्रिमिनोलॉजिस्ट ला आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशात खूप जास्त स्कोप आहे.
क्रिमिनोलॉजी कोर्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात ? आणि कोणकोणत्या चांगल्या युनिव्हर्सिटी मधून आपण क्रिमिनोलॉजी कोर्स करू शकतो ?
ह्या कोर्समध्ये पोलीस प्रशासन आणि मानवी व्यवहार यांचे प्रॅक्टिकल नॉलेज दिले जाते.घटनास्थळी घडलेल्या घटनेचे विश्लेषण करणे,तेथील पक्के पुरावे एकजूट कसे करावे आणि गुन्हेगाराचे मनोविज्ञान ओळखणे हे क्रिमिनोलॉजी कोर्स मध्ये शिकवले जाते.
वर्तमानात आधुनिक टेक्निक खूप आलेत त्यामुळे प्रशासन गुन्हेगारांना पकडण्यासाठी आधुनिक तकनिकी चा वापर जास्त करत आहे.वाढत्या टेक्निक बरोबर सायबर क्राईम चे प्रमाण देखील वाढले आहे.म्हणून क्रिमिनोलॉजी कोर्समध्ये गुन्हेगारांचे नेटवर्क आणि सायबर क्राईम बद्दल माहिती देणे चालू केले आहे.
क्रिमिनोलॉजी कोर्स कुठून करणे फायद्याचे ठरेल ? – Criminology is a career Marathi
- लोकनायक जण प्रकाश नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनोलॉजी अँड फोरेन्सिक सायन्स ,दिल्ली. -क्रिमिनोलॉजी मध्ये एम .ए
- गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी दिल्ली – क्रिमिनोलॉजी मध्ये MSc आणि क्रिमिनोलॉजी आणि पोलीस अडमिनिस्ट्रेशन मध्ये एम ए
- युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास – क्रिमिनोलॉजी MSc मध्ये
- युनिव्हर्सिटी ऑफ लखनौ – पीजी डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी
- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस -एम ए इन क्रिमिनोलॉजी अँड जस्टीस
- इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड क्रिमिनोलॉजी पंजाब युनिव्हर्सिटी – फॉरेन्सिक आणि क्रिमिनोलॉजी सायन्स मध्ये डिप्लोमा
- युनिव्हर्सिटी ऑफ जम्मू – पीजी डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी अँड पोलीस सायन्स
- युनिव्हर्सिटी ऑफ पुणे – पीजी डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी
- जयपूर स्कुल ऑफ law – पीजी डिप्लोमा इन क्रिमिनोलॉजी अँड क्राईम ऍक्ट
- बिट्स,पिलानी
- बी एच यु ,वाराणसी
- इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स,महाराष्ट्र
- फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास,तमिळनाडू
- बुंदेलखंड युनिव्हर्सिटी, उत्तरप्रदेश
- डॉक्टर हरिसिंग गोर युनिव्हर्सिटी,मध्य प्रदेश
- नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनोलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स ,नवी दिल्ली
- लखनौ विश्वविद्यालय ,लखनौ
अजून बरेचसे क्रिमिनोलॉजी कोर्स शिकवणारे इन्स्टिट्यूट भारतात आणि भारताबाहेर आहेत.तुम्ही त्या इन्स्टिट्यूट मधून क्रिमिनोलॉजी कोर्स करून आपल्या जीवनाला चांगले वळण देऊ शकता.