मराठी पत्रलेखन कसे  करावे – समर्पक, मुद्देसूद व प्रभावी – Effective Marathi Patra Lekhan Types and tips

Table of Contents

मराठी पत्रलेखन च आजच्या जीवनातल स्थान – State Of Marathi Patra Lekhan In Digital Communication

नमस्कार वाचकांनो , मी अनिल पाटील , शिक्षक मराठी विषय  पंकज विद्यालय.

आज प्रभावी मराठी पत्रलेखन कले बद्दल आपण माहिती घेणार आहोत. मूळ विषयावर लिहण्या आधी थोड पत्र लेखना बद्दल अवांतर विचार

आज पत्र लिखाणा बद्दल लिहतना मनात येतय की या इंटरनेटच्या युगात पत्रलेखनाची स्थान आहे काय आहे? लिहिण्याच्या कौशल्याला आज ही आहे तितकाच महत्व आहे का  ?

मुद्देसूद स्पष्ट, संक्षिप्त पत्रे ही तितकीच  महत्त्वाची आहेत का ?

तर माझ उत्तर हो आहे , इंटेरनेट नक्कीच संवाद साधण्यात क्रांति आणली आहे , आपला संदेश सहज , जलद व सोप्या रीतीने लोकापर्यंत पोहचात आहेत पण प्रभावी पत्र लेखनाच महत्व मात्र आज ही अबाधित आहे   !

पत्र लेखन साधी व्याख्या

पत्र लेखन म्हणजे एक लेखी संदेश असतो जो कागदावर हाताने लिहून किंवा छापला जाऊ शकतो.  आणि समोरच्याला तो आपण लिफाफ्यात टपाल द्वारे किंवा मेलद्वारे समोरच्याला पाठवतो म्हणजेच  टपाल द्वारे किंवा मेलद्वारे , दोन पक्षांमधील लेखी संभाषण आपण पत्रलेखण म्हणू शकतो

सुसंगतता हा नेहमीच पत्र लेखनात अतिशया मौल्यवान कौशल्य आहे  आणि ते मिळवण्या करता आपल्याकडे मुबलक शब्दसंग्रह हवा . शब्दांच  महत्व हे अगाध आहे ,

आम्हा घरी धन शब्दांचिच रत्ने। शब्दांचिच शस्त्रे यत्नेकरू ।।१।।

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वाटू धन जनलोका ।।२।।

तुका म्हणे पहा शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव पूजा करू ।।३।।

 

वरील अभंगात श्री  तुकाराम महाराज शब्दाचं सामर्थ्य, त्याचा व्याप्ती लोकांच्या ध्यानी आणून देतात.

शब्द हे रत्ने असतात संपत्ती, धन तर आहेतच  पण गरज पडली तर व वेळ आलीच प्रयत्नाने शब्दांचीच शस्त्रे ही करता येतात . शब्द हेच  जीवन आणि शब्द हेच प्राण आहे. शब्द च महात्म्य ईतक की शब्द म्हणजे देव आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात .

आपण देवाला देव म्हटले आणि देव देव झाला. शब्द इतकी धारदार असतात की  समोरच्याला संपवू ही शकतात पण शब्द पुढच्या कित्येक पिढ्याही उध्वस्त करू करतात इतक अमाप हे शब्दाचं सामर्थ्य आहे.

सर्वात प्रभावी कोणत शस्त्र असेल तर ते प्रभावी शब्द

मराठी पत्रलेखन —  Effective Marathi Patra Lekhan Types and tips

पत्र लिखाणात शब्दांचा सुयोग्य वापर आणि माझ्या अनुभवावर आधारित  खालील काही टिप्स आपल्याला दर्जेदार पत्र लेखणास नक्की मदत करतील – Letter Writing Basics And Important Tips

  1. एक प्रभावी पत्र परिस्थिति पूर्ण बदल घडवून आणू शकत , नोकरी मिळवंन, सेल्स मिळवण किंवा शिष्यवृत्ती मिळवण.
  2. आपण पत्र लेखन करत असताना , पुन्हा पुन्हा तपासा , स्वतःला विचारा, जे मला सांगायच आहे ते यातून सांगितलं जातय का ? प्रतिबिंबीत होतय का ? प्रत्येक वाक्य लिहल की स्वत: ला हा प्रश्न विचारा,
  3. ज्यांना पत्र लिहतोय त्यांच्या बद्दल विचार करा. समोरची व्यक्ति कोण आहे ? कार्यालयीन पत्र लिहत असाल तर आपण जास्त Informal शब्द वापरण योग्य नाही , कोणत्याही शब्दांचा समावेश आपण करू शकत नाहीत . आपल्या वाचकाबद्दल विचार केला आणि त्यांची आपल्या शब्दांवर काय प्रतिक्रिया येईल याची जाणीव ठेवली तर आपल्या लिखाणाच Relevance वाढेल, प्रासंगिकता वाढेल, लवकर Connect होता येईल
  4. वर आपण शब्दांच माहात्म्य जाणलेले आहेच त्यामुळे आपण लिहिलेल्या प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा दोनदा , तीनदा विचार करा. आपण स्वत: ला विचारू शकता,मी लिहालय त्या शब्दाचा खरा , योग्य अर्थ  मला खरोखरच  माहित आहे काय?
  5. माझ्या लिखाणात मी तो शब्द चपखल पणे , हवा तिथ , नेमका  वापरत आहे का ?मी देऊ पाहत असेलेला संदेश वाचनार्‍याला सहज व सोप्या रीतीने समजतो काय ? सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते समोरच्याला समजतय का
  6. वाक्य व शब्द मोठी असतील तर पुन्हा पुन्हा वाचा आणि योग्य बदल करा  
  7. गरज असेल वा नसेल शब्दकोश नक्की वापरा. त्या शब्दाचा अर्थ काय आहे ते पहा ? आपल्याला हवा तोच अर्थ आहे की नाही हे पहा.आवश्यकता असेल तर योग्य , प्रभावी दूसरा समर्पक शब्द वापरा.
  8. मराठी व्याकरणा बद्दल काही दर्जेदार पुस्तक उपलबद्ध आहेत ती पुस्तके वाचा. आपण आपल्या लिखाणात Improvement करू पाहत असाल , सुधारणा हवी असेल तर मराठी व्याकरणा  आपल्या संपूर्ण लिखाणात आमुलाग्र बदल आणू शकतो   आपल्या व्याकरण, वापर आणि लिखित शब्दाच्या संपूर्ण ज्ञानात भर घालेल.
  9. वाचन – श्कय तितक वाचत रहा,पुस्तके , कादंबरी , ब्लॉग , मासिके याने आपला शब्द संग्रह वाढेल – A Reader Lives A Thousand Lives Before He Dies .The Man Who Never Reads Lives Only One. ” –
  10. सुसंगतता हा नेहमीच लेखनात सर्वात मोठ कौशल्य आहे त्यावर भर द्या -साधी वाक्ये उत्तम काम करतात.
  11. संक्षिप्त लिहा
  12. भावना , संदेश देण्यासाठी व्यक्त करण्यासाठी लिहा, समोरच्या वर प्रभाव आपोआप पडेल
  13. सतत लिहाण्याचा सराव करा .
See also  आपल्या नावात बदल कसा करता येतो ? How to change your name legally Marathi information

 आपल्याला  खालील पत्र लेखन लेख आवडल्यास आवर्जून कॉमेंट बॉक्स मध्ये आपला अभिप्राय कळवा

मराठी पत्रलेखन – गरज व महत्व  – Importance Of Marathi Patra Lekhan  

जेव्हा आपल्याला आपल्या मनातील भावना तसेच विचार एखाद्या व्यक्तीसमोर मांडायच्या असतात,व्यक्त करायच्या असतात तेव्हा आपण त्याला पत्र लिहित असतो.

 

  • एवढेच नव्हे तर जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी जाँबसाठी अँप्लाय करायचा असतो,किंवा एखादा विनंती अर्ज करायचा असतो तेव्हा देखील आपण पत्रलेखणाचाच आधार घेत असतो.

 

  • पण आता जसजसे जग डिजीटल क्रांतीच्या दिशेने वळत चालले आहे.तसतसा पत्रलेखणाशी असलेला आपला संबंध कुठेतरी तुटत चालला आहे ही एक मोठी खेदजनक बाब आहे.

 

  • आधीचे दिवसच खुप वेगळे होते लोक एकमेकाजवळ आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांस प्रेमाने,आदराने पत्र लिहायचे,एकमेकांच्या पत्राच्या येण्याची आतुरतेने वाट देखील बघायचे.

 

  • आज पत्राची जागा मोबाईलच्या मँसेजने,चँटिंगने घेतली आहे.पण पत्र लेखनच महत्व अबाधित असून आपल्याला शाळा काँलेजात अजूनही पत्रलेखन हा विषय अभ्यासक्रमात शिकविला जातो.त्यामुळे पत्रलेखणाशी असलेला जुना संबंध अजुनही तुटलेला नाहीये.

 

  • आपल्या दैनंदिन जीवना त व्यवहारासाठी पत्रलेखणाला खुप अनन्यसाधारण महत्व आहे.

 

  • साध बँकेत तसेच एखाद्या सरकारी कार्यालयात काही कामा साठी आपण गेलो तरी देखील आपल्याला तिथे कोणतीही सोय सुविधा प्राप्त करण्यासाठी तसेच तक्रार विनंती करण्यासाठी लिखित अर्ज करावा लागतो.

म्हणुन आज आपण पत्रलेखन त्याचे स्वरुप तसेच इतर बाबींविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या दैनंदिन जीवणात पत्रलेखणाशी संबंधित कुठलीही अडचण आपणास येणार नाही.

पत्रलेखन मराठी  काय असते? What Is  Marathi  Marathi Patra Lekhan  

 पत्रलेखन हा एक कलेचाच एक विशिष्ट प्रकार आहे, ज्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीपासुन दुर अंतरावर असून देखील पत्राच्या माध्यमाने त्याच्याशी संवाद साधत असतो , संदेश देत असतो वा हितगुज करत असतो तसेच संपर्क साधत असतो.

आपल्या मनातल्या भावना तसेच विचार,आपले मत,आपली समस्या समोरच्या व्यक्तीजवळ आपण पत्राद्वारे व्यक्त करत असतो.

मोबाईल इंटरनेटची सुविधा येण्यापुर्वी जेव्हा एखादा प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांपासुन शारीरीकदृष्टया दुर अंतरावर असायचे तेव्हा पत्राच्याच माध्यमाने एकमेकांशी संपर्क साधत असायचे..

पत्र हे  आई -मुलाला,बहिण-भावाला आजी आजोबा, पत्नी , पती, प्रेयसी ल बाबा  आपल्या नातुला नोकरदार व्यक्ती-आपल्या बाँसला व्यावसायिक आपल्या बिझनेस पार्टनरला,इत्यादी कौटुंबिक तसेच व्यावहारीक,व्यावसायिक कारणासाठी कोणीही कोणाला पत्र लिहु शकते.

पत्रलेखणाची मुख्य वैशिष्टये कोणकोणती आहेत?characteristic Of  Mararthi  Patra Lekhan

  • पत्रलेखणाची अनेक वैशिष्टये असलेली आपणास पाहायला मिळते जसे की एखादी धनाढय व्यक्ती असो किंवा खुप गरीब व्यक्ती असो पत्र हे कोणीही कोणाला अगदी स्वस्तात म्हणजेच आपल्याला परवडेल अशा दरात सहज पाठवू शकतो.यात गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो.

 

  • पत्र पाठविण्यासाठी आपल्याला खुप कमी पैशांची गरज पडत असते.आणि यात आपण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाची तगमग,काहीली बैचेनी इत्यादी सर्व भावना तपशीलवारपणे व्यक्त करू शकतो.

 

  • जे लोक एकमेकांपासुन खुप दुर अंतरावर वास्तव्यास आहेत ते आपल्या कौटुंबिक नात्यातील,व्यवहारीक,व्यावसायिक संबंधातील गोडवा पत्रलेखणाच्या द्वारे सहज टिकवून ठेवू शकतात.

 

  • पत्रलेखणाद्वारे आपण आपल्या मनातील सर्व भावना व्यक्त करू शकतो ज्यात प्रेम,राग,खंत,अभिमान,विनंती,तक्रार इत्यादी.

 

  • पत्रलेखन हे वैयक्तिक तसेच व्यावहारीक,व्यावसायिक माहीती प्राप्त करण्याचे एक उत्तम साधन आहे.

 

  • व्यावसायिक क्षेत्रात ग्राहकांच समाधान करण्यासाठी,आपल्या उद्योग व्यवसायाच्या प्रतिष्ठेत वाढ तसेच अधिक विकास होण्यासाठी पत्रव्यवहार खुप महत्वाचा आहे.

 

  • पत्रात जो संदेश आपण पाठवत असतो तो आपल्याशिवाय ज्याला पत्र लिहिले आहे त्याच्याशिवाय इतर कोणीही वाचू शकत नसते.म्हणजेच पत्रव्यवहारात एक गोपनीयता असते.

 

  • सोशल मिडिया,मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातुन देखील आपण कोणालाही क्षणार्धात संदेश पाठवू शकतो पण पत्राची वाट पाहणे,आणि एखाद्याला आपुलकीने जिव्हाळयाने पत्र लिहुन त्यात आपल्या भावना व्यक्त करण्याचे एकच प्रभावी साधन आहे ते म्हणजे पत्रलेखन.

पत्रलेखणासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात?Constituents Of  Good  Marathi Patra Lekahn

 पत्रलेखन करताना अनेक महत्वाच्या बाबी तसेच घटक असतात ज्याकडे लक्ष देणे महत्वाचे मानले जाते.कारण ह्याच प्रमुख घटकांमुळे आपण लिहिलेले पत्र हे प्रभावी ठरत असते.

पत्रलेखणासाठी आवश्यक महत्वाचे घटक :

See also  घरच्या घरी गर्भसंस्कार कसे करावे? महत्व व गरज - How to do garbh sanskar at home in Marathi

1)पत्र लेखनाची भाषा :

2) पत्रलेखणाचा क्रम – सिक्वेन्स :

3) पत्राचा सार :

4) पत्रलेखणाची स्पष्टता

5) रूचिपुर्णता :

6) पत्राचे उद्दिष्ट:

1)पत्र लेखनाची भाषा :

पत्र लेखनाची भाषा सहज आणि सोपी स्पष्ट असायला हवी.पत्रात आपण आपल्या भावना आणि विचार हे अत्यंत मोजक्या शब्दांत मुददेसुदपणे व्यक्त करायचे असतात.पत्रामध्ये अनावश्यक म्हणजेच नको असलेला तपशील समाविष्ट करू नये.

पत्रामध्ये आपण आपल्या भावना तसेच विचार हे मृदु भाषेत आणि नम्रतेने मांडायला हवेत.कारण नम्रतेची भावना ही प्रत्येकाला अधिक जास्त आवडते.आणि कृपया आपला आभारी आहे अशा शब्दाने वाचक  प्रभावित देखील होत असतो.कारण असे विनम्रतेचे शब्द समोरच्याला हदयाला जिंकुन घेत असतात.

2) पत्रलेखणाचा सिक्वेन्स :

पत्र लेखणात सिक्वेन्स खुप महत्वाचा असतो कोणता शब्द तसेच मजकुर पत्रात आधी सुरूवातीला वापरायचा आणि कोणता शेवटी वापरायचा,तसेच कोणता शब्द कुठे वापरायचा याचा एक क्रम आपल्याला माहीत असायला हवा.

3) पत्राचा सार :

लांबलचक आणि विस्तृतपणे लिहिलेले पत्र वाचायला आणि लिहायला देखील आजच्या ह्या धावपळीच्या जीवणात कोणालाच वेळ नसतो.म्हणून पत्र लिहिताना कधीही मोजक्या शब्दांत विषयाला अनुसरून आणि मुददेसुदपणे त्यात कुठलाही मजकुर मांडायला हवा तसेच लिहिणे गरजेचे असते.

4) पत्रलेखणाची स्पष्टता :

पत्र लिहिताना आपण कोणतेही अक्षर हे नीट व्यवस्थित समजुन घेऊन स्पष्टपणे वाचकाला समजेल अशा भाषेत लिहायला हवे.कारण अस्पष्ट भाषेत लिहिलेले पत्रातील शब्द समजायला वाचकाला खुप अडचण होते.

5) रूचिपुर्णता :

पत्रात रसनिर्मिती करणे खुप महत्वाचे असते.म्हणून पत्र हे कधीही मनोरंजक असायला हवे कारण त्याशिवाय पत्र वाचताना वाचकाला मज्जा तसेच वाचण्यात रूची देखील येत नसते.

म्हणुन पत्रात नेहमी माननीय,आदरनीय अशा आदरार्थी शब्दांचा देखील आपण प्रयोग करायला हवा.

6) पत्राचे उददिष्ट :

पत्र लिहित असताना ज्या उददिष्टाच्या पुर्तीसाठी आपण पत्र लिहितो आहे त्याविषयी स्पष्टपणे आपण पत्रात नमुद करायला हवे.

कारण पत्र आपण ज्या कारणासाठी लिहिलेले आहे त्याचे कारण वाचकाला कळणे पत्रव्यवहार साध्य होणे फार गरजेचे असते.

पत्रप्रेक्षक तसेच पत्रप्राप्त कर्ता कोणाला म्हणतात?

जो व्यक्ती पत्र लिहुन समोरच्याला पाठवत असतो त्याला पत्रप्रेक्षक असे म्हटले जाते.आणि ज्या व्यक्तीला पत्र प्राप्त होत असते तो पत्र प्राप्त कर्ता असतो.

पत्रलेखणाचे प्रमुख प्रकार कोणकोणते आहेत? - Types Of  Marathi Patra Lekhan

पत्रलेखणाचे दोन प्रमुख प्रकार पडतात :

  1. औपचारीक पत्रलेखन : Formal Letter
  2. अनौपचारीक पत्रलेखन : Informal Letter

 

1)औपचारीक पत्रलेखन :  Definition Formal Letter

 एखादे कार्यालयीन तसेच व्यावसायिक कामकाजाच्या निमित्ताने जे पत्र लिहिले जात असते.त्याला औपचारीक पत्र असे म्हटले जाते.

औपचारीक पत्रलेखणात आपण एखाद्या संस्थेला,कार्यालयाला,बँकेला,प्रशासकीय अधिकारीला लिखित स्वरूपात पत्र लिहित असतो तसेच अर्ज करत असतो.

औपचारीक पत्रलेखणाचे प्रकार : Types Of Formal Letter

 1)कार्यालयीन कामकाजासाठी लिहिले जाणारे पत्र :

2)व्यावसायिक कामकाजासाठी लिहिलेले पत्र :

3) नोकरी मिळण्यासाठी केला जाणारा अर्ज :

4) एखाद्या घटना प्रसंग तसेच सोयी सुविधेबाबद तक्रार करण्यासाठी केलेला अर्ज :

5) विनंती तसेच प्रार्थना करण्यासाठी केला जाणारा अर्ज :

6) निमंत्रण पत्र :

7) तपास तसेच चौकशीसाठी लिहिलेले पत्र :

कार्यालयीन कामासाठी लिहिले जाणारे पत्रांची नावे : Official Formal Letters

कार्यालयीन कामात लिहल्या जात असलेल्या पत्रात

  • शासकीय पत्र,अर्धशासकीय,ज्ञापन,
  • पृष्ठांकन,शासनाचा निर्णय,
  • शीघ्रपत्र,प्रसिदधी पत्र,
  • सरकारी तसेच कार्यालयीन आदेश,
  • अधिसुचना,परिपत्र इत्यादींचा समावेश होत असतो.

औपचारीक पत्रलेखणाचे स्वरुप कसे असते?How To Write Formal Letter

 औपचारीक पत्रलेखणाचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे असते.

  • जेव्हा आपण पत्र लिहित असतो तेव्हा उजव्या बाजुला कोपरयात आपले नाव,पत्ता,आपण राहत असलेल्या एरियाचा पिनकोड लिहायचा असतो.याचसोबत आपण जेव्हा पत्र लिहिले त्या दिवसाची तारीख देखील खाली द्यायची असते.
  • त्यानंतर मग खाली डाव्या बाजुला ‘प्रती’ असे लिहायचे असते.आणि ज्याला आपण पत्र लिहितो आहे त्याचे नाव,पद,पत्ता तसेच पिनकोड देखील लिहायचा असतो.
  • आणि मग त्याच्या खाली एक ओळ सोडुन ज्यासाठी पत्र लिहितो आहे तो विषय लिहायचा असतो.
  • ज्याला आपण पत्र लिहितो आहे त्याला आदराने संबोधण्यासाठी माननीय,आदरनीय असे आदरार्थी शब्दांचा वापर करावा.
  • आणि मग खाली थोडे अजुन अंतर सोडायचे आणि आपल्या पत्रातील मुळ मजकुर लिहायचा असतो.
  • शेवटी पत्रातील मुळ मजकुर लिहुन झाल्यावर आपलाच विश्वासु तसेच कृपाभिलाषी असे लिहुन पत्राचा शेवट करायचा असतो.याचसोबत खाली आपले नाव लिहुन सही देखील करायची असते.

औपचारीक पत्र लिहिताना आपण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? Take Acre While Writing Formal Letter

  औपचारीक पत्र लिहिताना आपण पुढील काळजी घेणे खुप आवश्यक असते.

  • औपचारीक पत्रलेखन करताना आपण उजव्या बाजुला आपले पुर्ण नाव(पत्र लिहित असलेल्या व्यक्तीचे नाव) पत्ता,ज्या दिवशी आपण ते पत्र लिहितो आहे त्याच दिवसाची तारीख लिहिणे खुप गरजेचे असते.
  • पत्रामध्ये पत्र लिहित असलेल्या व्यक्तीचा नाव पत्ता पत्र लेखणाचा दिवस तारीख लिहुन झाल्यावर त्याच्या खाली उजव्या साईडला प्रती असे लिहायचे असते.
  • तसेच आपण ज्याला पत्र लिहितो आहे त्याचे पुर्ण नाव,पत्ता तो ज्या हुदद्यावर पदावर आहे त्या पदाचे नाव देखील लिहायला हवे.
  • यानंतर आपल्याला पत्राचा जो मुळ विषय आहे तो लिहायचा असतो.त्यानंतर पत्रातील मुळ मजकुर लिहुन शेवटी आपला विश्वासु कृपाभिलाषी,असे लिहुन आपली स्वताची म्हणजे पत्र लिहित असलेल्या व्यक्तीची सही करायची असते.
  • पत्रामध्ये आपण ज्या मजकुराची मांडणी करतो आहे तो विषयाला अनुरूप असणेच गरजेचे आहे.मजकुराचा विषय बदलता कामा नये.
  • पत्र लिहित असताना पत्रलेखणाची भाषा वाचकाला समजेल अशी आणि औपचारीकता व्यक्त करणारी असायला हवी.
  • औपचारीक पत्रात आपण निरर्थक इकड तिकडच्या गप्पा गोष्टी करणे टाळायला हवे.फक्त व्यवहाराचेच बोलायला हवे.
  • पत्राची भाषा सहज सोपी समजेल अशी असण्याबरोबरच थोडी वजनदार गांभिर्यपुर्वक असायला हवी ज्याने पत्र वाचत असलेल्या व्यक्तीला पत्राची गंभीरता लक्षात येते.
See also  ई-श्रम कार्डचे फायदे- E Shram Card Benefits In Marathi

2)अनौपचारीक पत्रलेखन : Definition  Informal Letter

 आपण जे आपल्या आईवडिल,बहिण,भाऊ आजी-आजोबा इत्यादी कौटुंबिक सदस्य,नातेवाईकांना पत्र लिहित असतो.त्याला अनौपचारीक पत्र असे म्हणतात.

कारण अशा पत्रात एखाद्या संस्थेला कार्यालयाला अधिकारीला पत्र लिहिताना जशा औपचारीक भाषेची गरज असते तशा औपचारीकतेच्या भाषेची आवश्यकता येथे बिलकुल नसते.

अनौपचारीक पत्रात आपण आपल्या जिव्हाळयाच्या व्यक्तीजवळ आपल्या मनातील भावना जसे की प्रेम,आपुलकी,सुख दूख इत्यादी व्यक्त करत असतो.

अनौपचारीक पत्रलेखणात कोणकोणत्या पत्रांचा समावेश होत असतो? Types Of Definition

  अनौपचारीक पत्रलेखणात पुढील काही पत्रांचा समावेश होतो:

1)वैयक्तिक तसेच कौटुंबिक सदस्याला लिहिलेले पत्र :

2) सामाजिक पत्र :

अनौपचारीक पत्रलेखणाचे स्वरूप काय असते? Format Of  Informal Letter

  अनौपचारीक पत्रात आपल्याला औपचारीक पत्रात जसे उजव्या बाजुला पत्र लिहित असलेल्या व्यक्तीचे नाव,पत्ता,पिनकोड,पत्रलेखणाची तारीख हे सर्व द्यावे लागते तसेच इथे देखील हे सर्व देणे गरजेचे आहे.

  • मग आपण ज्याला पत्र लिहितो आहे त्या व्यक्तीशी आपला असलेला संबंधानुसार आपण प्रिय,आदरणीय माननीय अशा शब्दांचा वापर करायचा असतो(घरातील मोठया आदरार्थी व्यक्तीस जसे की आजी आजोबा काका इत्यादी यांना संबोधताना आपण आदरनीय माननीय अशा शब्दांचा वापर करत असतो.तर दादा,भाऊ ताई इत्यादींना संबोधताना प्रिय हा शब्द वापरत असतो)
  • आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहितो आहे ती व्यक्ती जर वयस्कर तसेच घरातील वडिलधारी व्यक्ती असेल तर त्यांना पत्र लिहिताना आपण आदरनीय,माननीय असे शब्द वापरायला हवे.पण याच ठिकाणी आपण ज्याला पत्र लिहितो आहे ती व्यक्ती आपल्याच वयाची असेल तर आपण त्याला,तिला प्रिय असे संबोधू शकतो.
  • मग यानंतर आपण पत्राच्या आतील मुळ मजकुर(मायना) लिहायचा असतो.
  • मग शेवटी ज्याला आपण पत्र लिहिले होते त्या व्यक्तीच्या वयानूसार म्हणजेच समवयीन असेल तर तुझा किंवा तुझी लिहावे तसेच वयस्कर आदरार्थी वडिलधारी व्यक्ती असल्यास आपण आपला आज्ञार्थी,आज्ञाधारक असे लिहायला हवे.आणि पत्राचा शेवट करायला हवे.

अनौपचारीक पत्रलेखन करताना आपण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे? Take Acre While Writing Formal Letter

 सर्वप्रथम आधी पत्राचा आरंभ करताना उजव्या बाजुला आपण नाव,पत्ता पिनकोड आणि पत्रलेखणाची तारीख लिहायला हवी.

  • अनौपचारीक स्वरुपाचे पत्र लिहिताना आपण आपल्या नावाचा उल्लेख केला नही तरी देखील चालते.
  • पत्राच्या मध्ये आपण जो मजकुर लिहितो आहे तो विषयाला धरूनच असावा मजकुराचा विषय बदलता कामा नये.
  • अनौपचारीक स्वरुपाच्या पत्राची भाषा ही कधीही प्रेमाची आपुलकीची आणि जिव्हाळयाची असायला हवी.त्यात कुठलीही औपचारीकता असु नये.
  • जेव्हा आपण मोठया वडिलधारक व्यक्तींना पत्र लिहित असतो तेव्हा आपल्या मनात जो आदर आणि सम्मानाची,नम्रतेची भावना आहे ती आपल्या पत्रातुन व्यक्त होणे गरजेचे असते.

औपचारीक आणि अनौपचारीक पत्रलेखणात कोणता मुख्य फरक असतो? Difference Between  Formal And Informal Letter

  •   औपचारीक पत्र हे आपण एखाद्या संस्था,कार्यायल,बँक,प्रशासकीय अधिकारी यांना लिहित असतो.यात एखाद्या औपचारीक माहीती तसेच संदेशाचा प्रसार केला जात असतो.
  • अनौपचारीक पत्र हे आपण आपल्या कुटुंबातील सदस्य भाऊ,बहिण,आई वडिल तसेच इतर नातलगांना लिहित असतो.
  • औपचारीक पत्रलेखणात औपचारीक म्हणजेच शिष्टाचारयुक्त आणि मोहक भाषेचा वापर केला जातो.
  • अनौपचारीक पत्रलेखणात प्रेमळ,सहानुभुतीयुक्त,आपुलकीच्या भावनेने भरलेल्या भाषेचा वापर केला जातो.
  • औपचारीक पत्रलेखणाचा वापर हा आपण आपल्या व्यावसायिक,व्यावहारीक जीवणात व्यवहारपुर्तीसाठी करत असतो.
  • अनौपचारीक पत्रलेखणाचा वापर वैयक्तिक तसेच कौटुंबिक पत्र व्यवहारासाठी केला जातो.
  • औपचारीक पत्राचे लेखण करण्यासाठी आपल्याकडे एखादा औपचारीक हेतु असावा लागतो.तरच आपण पत्र लिहु शकतो.
  • अनौपचारीक पत्र लेखणासाठी काही विशेष हेतुची आवश्यकता असते इथे आपण आपल्या कुटुंबातील सदस्याला त्याची खुशहाली जाणुन घेण्यासाठी देखील पत्र लिहु शकतो.
  • औपचारीक पत्रलेखणात मुख्य विषयाची विभागणी एकुण तीन परिच्छेदांत केली जाते.
  • अनौपचारीक पत्रलेखणात मुख्य विषयाची विभागणी ही कमाल दोन परिच्छेदांत केली जात असते.

मराठी पत्र पत्रलेखणा चे नमुने – Formats and samples of Marathi Patra Lekhan

राठी पत्र पत्रलेखणा चे नमुने - Formats and samples of Marathi Patra Lekhan

 

औपचारीक पत्रलेखन नमूना :

औपचारीक पत्रलेखन

 

औपचारीक पत्रलेखन : नमूना

 

पत्रलेखन : Informal Letter

 

तक्रार अर्ज मराठी पत्र लेखन नमूना

Effective Marathi Patra Lekhan Types and tips

 

चोकशी पत्र  नमूना

  चौकशी पत्र

  संगणक अभ्यास क्रमाबददल चौकशी करण्यासाठी पत्र लिहा.

 

                           दिनांक -7/82021

                             कल्पणा पवार

                            सार्थक विद्यालय औरंगाबाद

                              431001

माननीय व्यवस्थापक,

विपुल संगणक संस्था धुळे

424002

 

विषय – संगणक अभ्यासक्रमाविषयी चौकशी करणेबाबत

महोदय,

मी कल्पणा पवार 2021 मध्ये दहावीची परिक्षा देऊन झाल्यावर रिकाम्या वेळात संगणकाचा एखादा छोटासा कोर्स करू इच्छित आहे.माझ्यासोबत माझ्या दोन मैत्रीणी सुदधा आहेत जे हा कोर्स करू इच्छित आहे.

 

जर आपल्या संस्थेत असा एखादा छोटासा तीन चार महिन्यांचा कोर्स उपलब्ध असेल तर आपल्या संस्थेत कोर्सची फी काय आहे?कोर्सचा टाईमिंग काय असतो?आणि किती महिन्यांचा कोर्स आपल्या संस्थेत आहे हे आपण आम्हास आमच्या शाळेच्या पत्यावर सविस्तर कळवावे.जेणेकरून आम्हा जास्तीत जास्त विदयार्थीनींना ह्या कोर्सचा लाभ घेता येईल .

 

आपली कृपाभिलाषी

कल्पणा पवार

 

आभार पत्र – नमूना

आभार पत्र

 

एस टी बस डेपो व्यवस्थापकाने आपणास बस उपलब्ध करून दिली त्याबददल त्यांचे आभार व्यक्त करणारे पत्र लिहा.

 

दिनांक 25 नोव्हेंबर

 

प्रति,

माननीय बुक डेपो व्यवस्थापक,

 

विषय- सहलीसाठी एस टी बस उपलब्ध करून दिली त्याचे आभार व्यक्त करणारे पत्र

 

माननीय महोदय,

मी केबीएच विद्यालय मालेगाव ह्या शाळेचा विदयार्थी प्रतिनिधी ह्या नात्याने आपणास हे पत्र लिहितो आहे.

 

आपण आमच्या केबी एच विद्यालय शाळेला सहलीसाठी बस उपलब्ध करून दिली जावी असे पत्र मी आपणास काही दिवसांपुर्वी लिहिले होते.आमची सहल ठरलेल्या तारखेला,ठरलेल्या कालावधीत प्राणी संग्रहालय,राष्टीय उद्यान अशा विविध ठिकाणी गेली आणि आमची ही सहल खुप चांगल्या पदधतीने पार देखील पडली.

 

आपण एवढया कमी वेळात आम्हास बस  सेवा उपलब्ध करून दिली आणि आपण बससाठी दिलेला चालक देखील खुपच कुशल होता.आपण बससाठी दिलेल्या ड्रायव्हरने आमच्या सर्व विदयार्थ्यांची खुप चांगल्या पदधतीने काळजी घेतली.त्यामुळे आमची पुर्ण सहल सुखदायी,आनंदी आणि सुरक्षितपणे पार पडली.

 

याचसाठी मी आमच्या सर्व विदयालयातर्फे आपल्या ह्या सेवेसाठी विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने आपले खुप मनापासुन आभार व्यक्त करतो.

 

आपला कृपाभिलाषी

हर्षल साळवे

(विदयार्थी प्रतिनिधी)

केबी-एच विद्यालय मालेगाव,

 

 

अधिक माहिती

कंटेट मार्केटिंग म्हणजे काय? What is content marketing in Marathi

 

लेखक – योगेश सोनवणे

मार्गदर्शन – अनिल पाटील सर,पंकज महाविद्यालय. जळगाव , चोपडा.