सोशल मीडियावरील Influencer –
आज प्रत्येक सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर जसे की युटयुब,इंस्टाग्राम फेसबुक इत्यादी अशा सामाजिक प्रसारमाध्यमांवर आपल्याला एक शब्द नेहमी आवर्जुन ऐकायला मिळत असतो.तो शब्द म्हणजे इन्फ्लुएन्सर.
एखाद्या युटयुब चँनलवर जेव्हा आपण इंफ्युएन्सर तसेच इंफ्युएन्सर मार्केटिंग हा शब्द ऐकत असतो तेव्हा आपल्या मनात विविध प्रश्न निर्माण होत असतात जसे की हे इंफ्युएन्सर म्हणजे नेमकी काय असते? इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कशाला म्हटले जाते?
आपल्या मनात घोळत असलेल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Influencer meaning in Marathi
इंफ्ल्युएन्स ह्या शब्दाचा मराठी मध्ये प्रभाव असा अर्थ होत असतो.आणि इन्फ्लुएन्सर ह्या शब्दाचा अर्थ लोकांवर प्रभाव टाकणारा असा होत असतो.
Influencers किंवा प्रभावकार हे सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असतात जे त्यांच्या फॉलोअर्स सोबत प्रेरणा देणार, मनोरंजन करणार वा उत्पादनं व सेवा बाबत उपयोगी व म्हत्वाची माहिती देवून , शेअर करून आर्थिक कमाई करत असतात.
सोशल मेडियावरील संवाद साधण्याच्या सुलबतेमुळे influencers आपल्या फॉलोअर्स सोबत सहज व सरळ संवाद साधत सामाजिक संवाद घडून आणू शकतात , फॉलोअर्स चा एकाद्या कृतीत सहभाग वाढवू शकतात आणि आपल्या प्रभावाचा योग्य वापर करत एकाद नवीन उत्पादन , सेवा ची प्रभावी मार्केटिंग करू शकतात तसेच नवीन ट्रेंड सेट करू शकतात
इंफ्लूएन्सरचे प्रकार – Types of social media influencers
या सर्व सोशल मीडिया इन्फ्युइंसार कडे सोशल मीडियावर आपले स्वतःचे अकाऊंट किंवा चॅनेल असतात त्याद्वारे ते आपलं कंटेंट, साहित्य किंवा कौशल्य आपल्या फॉलोअर्स ला शेअर करत असतात,संवाद साधतात .
हे कंटेंट फॉलोअर्स द्वारा वेगवेगळयासोशल मीडियावर पुन्हा शेअर केलं जातं. परंतु एका मीडिया वर असलेला प्रभाव दुसऱ्या मीडियावर वर पडेल असे नसते .
कारण प्रत्येक सोशल मीडियावर माध्यम वेगळी असतात जसे की युट्युब वर विडिओ, इन्स्टग्राम वर रिल्स तर फेसबुक वर पोस्ट ,ट्विटर वर ट्विट्स
त्यामुळे त्यांचा आपल्या प्रभुत्व असलेल्या मीडिया नुसार त्यांना खालील प्रकारे संभोधलं जाते.
- इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर
- यूटुब इन्फ्लुएन्सर
- फेसबुक इन्फ्लुएन्सर
- ट्विच इन्फ्लुएन्सर
- सोशलमिडिया इंफ्लूएन्सर,
- सेलिब्रिटी इंफ्लुएन्सर
- इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर
इन्स्टाग्रामर्स म्हणून ओळखले जाणारे या प्रकारात सहसा व्हिज्युअल कंटेंट वर भर असतो आणि लहान लहान कप्शन त्यावर दिल्या जातात किंवा इंस्टा स्टोरीज आणि रिल्स च ही प्रभावी वापर केला जातो , यात जीवनशैली, तंदुरुस्ती, सौंदर्य आणि ट्रॅवल या क्षेत्रात हे इन्फ्ल्यून्सर उत्कृष्ट प्रभाव पडताना दिसततात कारण ते स्वतः या विषयावर प्रेरणादायक संदेश आणि माहिती देतात
- Youtube इन्फ्लुएन्सर
YouTube’s यांना YouTube Creators म्हणून ओळखत असतो यात थोडे मोठ्या कालावधीचे विडिओ कंटेंट वर भर दिला जातो
मुख्यत-
- प्रेरणा दायी विडियो
- कथा – स्टोरीज
- कसे व काय करावे गाईड – How to
- सेवा व उत्पादनं – product review
- लाईफ स्टाइल
- रेसिपी – फूड – कुकिंग – प्रवास
- वेब डिझाईन
- शेअर मार्केट
- फायनान्स
या विषयावर विडियो बनवून मोठ्या संख्येत फॉलोअर्स सोबत संवाद साधत असतात
सोशल मीडिया इनफ्लुएनसर च्या श्रेणी प्रकार – Categories of influencers based on number of followers
इनफ्लुएनसर मुख्य श्रेणी – Influencers main categories
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सामान्यत: दोन मुख्य प्रकारात वर्गीकृत केले जातात जसे की
मायक्रो- आणि मॅक्रो-इन्फ्लूएन्सर.
- मायक्रो-इन्फ्लूएन्सर – यात फलोवर्स सख्या 10,000 ते 50,000 दरम्यान असते तर
- मॅक्रो-इन्फ्लूएन्सर यात फलोवर्स संख्या 500,000 ते 1 दशलक्ष दरम्यान असते
इनफ्लुएनसर अतिरिक्त श्रेणी – Influencers additional categories
परंतु आज सोशल मीडिया च प्रचंड वापर आणि कोट्यवधी वापर कर्ते पाहता हे प्रकार अजून ही जास्त श्रेणीत वर्गीकृत केले जावू शकतात
अत्यंत लहान – नॅनो-इन्फ्लुएन्सर –
| फॉलोअर्स संख्या 1,000-10,000 ज्यात एकाद्या विशिष्ट विषयाशी निगडीत असतात |
लहान – मायक्रो-इन्फ्लुएन्सर –
| फॉलोअर्स संख्या 10,000-50,000 , मोठ्या प्रमानवर अनुयायी आणि मोठा प्रभाव आपल्या फॉलोअर्स असतो |
मध्यम – मिड-टायर इन्फ्लुएन्सर –
| फॉलोअर्स संख्या 50,000-500,000 असते , मोठ्या प्रमाणावर प्रभाव फॉलोअर्स च्या मनात मोठ स्थान मिळवलेले असते |
मोठे – मॅक्रो-इन्फ्लुएन्सर –
| फॉलोअर्स संख्या 5,00,000-10,00,000 अग्रगण्य , उच्च व म्हत्वाचे म्हणून दर्जा मिळवलेले असतात |
अत्यंत प्रसिद्ध आणि यशस्वी – मेगा-इन्फ्लुएन्सर –
| 1,000,000-5,000,000 फॉलोअर्स संख्या, इतक्या जास्त संख्येत फॉलोअर्स असल्याने हे एकाद्या हीरो किंवा हेरोईन पेक्षा कमी नसतात , यांना ही सेलिब्रिटीं सारखच गणल जाते |
कीर्तिमान व सुप्रसिद्ध – सेलिब्रिटी – सुप्रसिद्ध व्यक्ती ज्यांची कीर्ती
| फॉलोअर्स संख्या 5,000,000 पेक्षा जास्त – सोशल मेडिया क्षेत्रात मोठ नाव आणि वैभव मिळवलेला , अत्यंत प्रतिष्ठित असा इन्फ्लुएन्सर च प्रकार आहे |
Influencer मार्केटिंग म्हणजे काय ?What are the Key Components of Influencer Marketing?
- इंफ्लुएन्सर हा एक असा व्यक्ती असतो जो एखाद्या प्रोडक्ट सर्विसचे गुण तसेच दोष सांगत असतो.तसेचआपली वस्तु,प्रोडक्ट तसेच सर्विस विकत घेण्यासाठी लोकांना प्रभावित करण्याचे काम करत असतो.
- विविध सोशल मिडिया प्लँट फाँर्मवर तो आपल्या प्रोडक्ट सर्विसची डिजीटल स्वरूपात मार्केटिंग करत असतो.
- मोठमोठया कंपनी तसेच ब्ँड हे इंफ्लुएन्सरला त्याच्या विविध सोशल मिडिया फ्लँटफाँर्मवरून आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट तसेच सर्विसची जाहीरात करायला सांगत असतात.
- जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर त्यांच्या प्रोडक्ट सर्विसकडे आर्कर्षिले जातील
- कस्टमरचा त्यांच्या प्रोडक्ट सर्विसवर विश्वास वाढेल आणि ते त्याची अधिक खरेदी देखील करतील.
- इंफ्लुएन्सर हे कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटिंग करण्यासाठी फेसबुक,इंस्टाग्राम तसेच युटयुब ह्या सामाजिक प्रसारमाध्यमांचा म्हणजेच सोशल मिडिया प्लँटफाँर्मचा अधिक वापर करत असतात.ज्यामुळे त्यांना सोशल मिडिया इंफ्लुएन्सर म्हणुन ओळखले जाते.
सोशल मिडिया इंफ्लुएन्सर बनण्यासाठी आपल्याला काय करावे लागते? How to Get Started to be Influencer
- सोशल मिडिया इंफ्लुएन्सर बनण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला युटयुब,इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या विविध सोशल मिडियावर आपले एक अकाऊंट तयार करून प्रोफाईल तयार करावे लागते.
- त्यावर सतत अँक्टिव्ह राहुन डेली एक फिक्स नीश सिलेक्ट करून त्यावर आधारीत वेगवेगळया प्रकारचे कंटेट टाकुन लोकांना प्रभावित करावे लागते.
- आपल्या फाँलोवर्सची संख्या वाढवावी लागते.लोकांना आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त एंगेज करणारे कंटेट टाकावे लागतात.
- आपल्या पोस्टला जास्तीत जास्त लाईक,कमेंट आणि शेअर्स प्राप्त कसे होईल हे देखील बघावे लागत असते.
- मग जेव्हा आपल्या फाँलोवर्सची संख्या लाखोपर्यत वाढते तेव्हा मोठमोठया कंपनी,जाहीरातदार स्वताहुन आपल्याला त्यांच्या प्रोडक्ट सर्विसची मार्केटिंग करण्यासाठी अँपरोच करत असतात म्हणजेच विचारत असतात.किंवा आपण स्वता देखील डायरेक्ट विचारू शकतो.
- ज्या नीशवर कंटेट टाकुन आपण आपल्या सोशल मिडिया प्लँटफाँर्मवरून लोकांना इंफ्लुएन्स करत असतो त्याच नीश वर आधारीत एखाद्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसची आपण ब्रँडिंग करू शकतो.आणि लोकांचा आपल्यावर चांगला ट्रस्ट बसलेला असलेल्यामुळे लोक म्हणजेच आपले आँडियन्स आपल्या सांगण्यावरून आपण सजेस्ट केलेले ते सर्व प्रोडक्ट सर्विस खरेदी देखील करत असतात.
- आणि मग याच बदले ती कंपनी आपल्याला प्रोडक्टची सर्विसची जेवढी किंमत असेल त्यानुसार मार्केटिंग ब्रँडिंग करण्याचे चार्ज देखील पे करीत असते.
- फक्त एवढे आहे सुरुवातीचे एक दोन वर्ष आपल्याला आपले फाँलोवर्स तयार करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागत असते.डेली सातत्याने कंटेट टाकुन आँडियन्सला एंगेज करून ठेवावे लागत असते.
- आणि मग एकदा आपले भरपुर लाखोच्या संख्येत फाँलोवर्स वाढल्यावर मोठमोठया कंपनी आपल्याला आपल्या सोशल मिडिया द्वारे त्यांच्या कंपनीच्या प्रोडक्ट सर्विसचे प्रमोशन करायला सांगत असतात.ज्याचे आपल्याला चांगले पैसे देखील त्या कंपनीकडुन मिळत असतात.
सोशल मिडिया इंफ्लूएन्सर बनण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
- सोशल मिडिया इंफ्लूएन्सर बनण्यासाठी आपल्याला फेसबुक, इंस्टाग्राम,युटयुब सारख्या सोशल मिडियावर आपले एक अकाऊंट तयार करावे लागते.प्रोफाईल तयार करावे लागते.
- मग एक नीश निवडुन त्यावर डेली सातत्याने यूनिक आणि काँलिटी कंटेट टाकुन आँडियन्सला एंगेज करत राहावे लागत असते.
- आणि मग आपले फा़ँलोवर्स वाढल्यावर आपोआप आपल्या नीशशी रिलेटेड प्रोडक्ट सर्विस विकत असलेल्या कंपनी आपल्याला त्यांच्या प्रोडक्ट सर्विसची ब्रँडिंग करण्यासाठी विचारत असतात.
कीर्तिमान व सुप्रसिद्ध – सेलिब्रिटी – इन्फ्लुएन्सर – List of famous influencer in world
क्रमांक | नाव | श्रेणी | एकूण फॉलोअर्स | मीडिया नावे |
1 | क्रिस्टियानो रोनाल्डो | खेळ | 517M | इंस्टाग्राम |
2 | जस्टीन बीबर | संगीत | 455M | इंस्टाग्राम |
3 | अरियाना ग्रांडे | संगीत | 429M | इंस्टाग्राम |
4 | सेलेना गोमेझ | संगीत | 425M | इंस्टाग्राम |
5 | रिहान | संगीत | 332M | ट्विटर |
6 | किम कर्दाशियन | इतर | 319M | इंस्टाग्राम |
7 | लिओनेल मेसी | खेळ | 298M | इंस्टाग्राम |
8 | निमार | खेळ | 283M | इंस्टाग्राम |
9 | शकीरा | संगीत | 282M | फेसबुक |
10 | जेनिफर लोपेझ | संगीत | 277M | इंस्टाग्राम |
11 | बियोंस | संगीत | 267M | इंस्टाग्राम |
12 | बराक ओबामा | राजकारण | 221M | ट्विटर |
13 | विल स्मिथ | चित्रपट आणि टीव्ही | 217M | फेसबुक |
भारतीय – इन्फ्लुएन्सर – List of Indian Influnecer
फॅशन Instagram influencers in India | ||
दिलीप बुलर कोसला @diipakhosla | फॅशन | (1.6m followers) |
संतोषी शेटटी @santoshishetty | फॅशन | (756k followers) |
कोमल पांडे @komal pandeyofficial | फॅशन | (1.5m followers) |
भारतातील ट्रेवल instagram influencer : | ||
सेवी आणि व्हीआयडी @bruisedpassports | ट्रेवल | (1.2m followers) |
मोहिना कुमारी सिंग @mohenakumari | ट्रेवल | (1.1m followers) |
स्कारलेट रोज @scarlettmrose | ट्रेवल | (909k followers) |
भारतातील फूड instagram influencer: | ||
दिलसे फुडी @dilseफूडie | फूड | (954k followers) |
रिंचा हिंगळे@vegnaricha | फूड | (334k followers) |
सारांशा गोईला @saranshgoila | फूड | (559k followers) |
भारतातील सोशल मीडिया influencer : | ||
कानन गिल @kanangill | सोशल मीडिया | (351k followers) |
कुशा कपिला @kushakapila | सोशल मीडिया | (2.1m followers) |
केनी सबास्टीन @kennethseb | सोशल मीडिया | (1m followers) |
सलोनी चोप्रा @salonichopraofficial | सोशल मीडिया | (454k followers) |
रोहन जोशी @mojorojo | सोशल मीडिया | (470k followers) |
मिथिला पालकर @mipalkarofficial | सोशल मीडिया | (3.3m followers) |
भारतातील हेल्थ instagram influencer : | ||
रणवीर अलानबादीया @beerbiceps | हेल्थ | (1.7m followers) |
नम्रता पूरोहित @namratapurohit | हेल्थ | (372k followers) |
मृणाल जैन @mrunaljainofficial | हेल्थ | (643k followers) |
Entrepreneurship म्हणजे काय? Entrepreneur Meaning In Marathi