बंजी जंपींग – एक साहसी अनुभवाविषयी  माहीती- What Is Bungee Jumping

बंजी जंपींग विषयी माहीती What Is Bungee Jumping

 बंजी जंपिंग विषयी आपल्यातील खुप कमी जणांना माहीत आहे.कारण हे एक खुप खतरनाक म्हणजे साहसी अँडव्हेंचर आहे.

जे विविध देशात खुप प्रचलित आहे.भारतामध्ये देखील विविध ठिकाणी हे साहसी अँडव्हेंचरचे खेळ पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी तसेच त्यांना आपल्याकडे आकर्षुन घेण्यासाठी राबवले जातात.

आपल्यापैकी काही जणांना असे वाटत असते की आयुष्यात काहीतरी नवीन साहसी कृत्य करावे,काहीतरी धाडसी असे कार्य करावे.

म्हणुन आपण आपले रोजचे डेली लाईफ मध्ये चेंज करण्यासाठी एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाणे असलेल्या पर्यटनस्थळी जात असतो.

आणि तिथे काहीतरी धाडसी कृत्य करावे तसेच लाईफमध्ये रोमांच निर्माण व्हावा यासाठी बंजीप जंपिंग सारख्या साहसी स्पोर्टस गेममध्ये भाग घेत असतो.

आजच्या लेखात आपण भारतातील अनेक पर्यटकांची मुख्य आवड बनलेल्या बंजिंग जंपिग ह्या साहसी स्पोर्टस अँडव्हेंचर विषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

बंजी जंपिंग म्हणजे काय? What Is Bungee Jumping

 बंजी जम्पिंग हा एक साहसी खेळ आहे ज्यात भाग घेणारे एका उंच ठिकाणाहून  खाली उडी मारतात, उच ठिकाण जसे की पुल, धरण एकाद् उंच टॉवर  किंवा कुठलंही उंच ठिकाण.

यात  व्यक्ती ला संरक्षण म्हणून हारनेस (Harness) नावच एक ,पट्ट्यांच साधन शरीरावर बांधव लागतं  आणि एका वर उडी मारण्याच्या ठिकानावर असलेल्या बंजी कॉर्ड शी त्या  व्यक्तीचे पाय जोडलेले असतात.

 बंजिग जंपिंग हा एक साहसी स्पोर्टस गेम असतो.ज्यात आपल्याला बंजिग जंपिंग केल्या जात असलेल्या केंद्रावर जावे लागते.

यानंतर बंजिग जंपिंग विषयी आपल्याला काही महत्वाची माहीती दिली जाते.तसेच ट्रेनरकडुन बंजिग जंपिंग करण्यापुर्वी काय खाल्ले आहे काय नाही अशी देखील विचारपुस केली जात असते.मगच आपल्याला ट्रेनरकडुन बंजिप जंपिग करायला सांगितले जाते.

See also  PHP चा फुल फॉर्म काय आहे ? What is the full form of PHP in Marathi?

यात एका बेल्टच्या साहाय्याने ट्रेनरकडुन आपले पाय आणि पोटाचा भाग हा पक्का बांधला जात असतो.जेणे आपला तोल खाली जाऊन आपण पडणार नाही.मग हळुच आपल्याला उंच ठिकाण असलेल्या टाँवरच्या ठिकाणी नेऊन खाली ढकलून देण्यात येते.

आणि मग आपण वरून खाली मग खालुन वर असे उडया मारत वरच्यावर हवेत तरंगत असतो.आणि आपल्याला दोरीने पँक बांधले गेलेले असल्याने आपण खाली पडत देखील नसतो.

एकदम हवेत वरच्या वर तरंगल्यासारखे आपल्याला ह्या स्पोटर्स अँडव्हेंचरमध्ये वाटत असते.आणि यात जेव्हा आपण दोरीच्या साहाय्याने उलटे फेकले जातो तेव्हा खुप रोमांच निर्माण होत असतो.

हा एक खुप खतरनाक आणि साहसी स्पोर्टस गेम असल्याने कमजोर हदयाच्या व्यक्तीने,जास्त उंचावरून खाली बघायची भीती वाटत असलेल्या व्यक्तींनी शक्यतो हे करणे टाळायला हवे.

 

भारतातील 12 प्रेक्षणीय स्थळ – 12 Best Places to Visit in India in 2022

 

 

आपण भारतामध्ये बंजिंग जंपिंग कुठे कुठे करू शकतो?

आपण भारतात अनेक ठिकाणी बंजिग जंपिंग करू शकतो.कारण बंजिग जंपिंगसाठी भारतात अनेक स्थळे खुप प्रसिदध आहेत.

ज्यात महाराष्टातील लोणावळा घाटात आपण बंजिंग जंपिग करू शकतो.

याचसोबत त्रषीकेश,बँगलोर,गोवा,दिल्ली,हैदराबाद,पुणे अशा विविध ठिकांणी हे बंजिग जंपिंगची सुविधा आहे.आणि ही ठिकाणी भारतात बंजिंग जंपिंगसाठी खुप प्रसिदध सुदधा आहेत.

भारतात बंजिग जंपिंगसाठी अत्यंत प्रसिदध असलेली ठिकाणी:

1)लोणावळा महाराष्ट :

 2)त्रषीकेश :

3) गोवा :

4) बँगलोर :

 5) दिल्ली :

 1)लोणावळा महाराष्ट :

आपण जर आपल्या कुटुंबासमवेत लोणावळयाला फिरायला जात असाल तर आपण लोणावळयातील डेला अँडव्हेंचर या ठिकाणी जाऊन बंजिग जंपिंग करण्याचा आनंद लुटु शकतात.

इथे बंजिग करण्यासाठी हाईट म्हणजेच उंची फक्त 50 मीटर एवढी ठेवलेली असते.

इथे बंजिग जंपिग करण्यासाठी आपल्याला दोन हजार ते तीन हजार एवढा खर्च लागत असतो.

See also  ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi

फक्त इथे लहान मुलांना तसेच वयोवृदध लोकांनी बंजिंग जंपिग करू दिली जात नसते.

2) त्रषीकेश :

त्रषीकेश हे ठिकाण येथील साहसी खेळ आणि निसर्गरम्य वातावरण तसेच निसर्गाच्या सौदर्यामुळे भारतात खुप प्रसिदध आहे.

जे पर्यटक त्रषीकेश येथे फिरायला जात आहेत.त्यांनी त्रषीकेश मधील जंपींग हाईट मोहनचुटटी ह्या गावाला नक्कीच भेट द्यायला हवी.

इथे जी बंजिग जंपिंग केली जाते त्याचा एक फिक्स प्लँटफाँर्म देखील असतो.म्हणजेच एक फिक्स ठिकाण असते.

येथे बंजिंग जंपिंगचे केंद्र हे 83 मीटर इतक्या उंचीवर ठेवण्यात आले आहे.इथे बारा वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच बंजिग जंपिग करू दिली जाते.

इथे बंजिंग जंपिंग करण्यासाठी आपल्याला दीड हजार ते दोन हजार इतका खर्च लागत असतो.इथे बंजिग जंपिंगची वेळ सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यत असते.

3) गोवा : जे पर्यटक गोवा येथे फिरायला जायचा प्लँन करत आहेत.तर आपण येथे विविध साहसी खेळ स्पोर्टसचा आनंद उठवू शकतो.

गोवा येथे अंजुना बीच जवळील ग्रँविटी झोन येथे किंवा Amthane Dam, गोवा आपण बंजिंग जंपिगचा आनंद लुटु शकतो.

इथे बंजिग जंपिंग करण्याचे अंतर हे 27 मीटर इतक्याच उंचीवरचे असते.इथे चौदा वर्षाच्या पुढील व्यक्तींनाच बंजिग जंपिग करू दिली जाते.

पण येथे बंजिग जंपिंग करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2500 ते 6000 हजार एवढा खर्च करावा लागु शकतो.इथे बंजिंग जंपिगची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहा अशी असते.

4) बँगलोर :जे पर्यटक बँगलोर येथे फिरायला जाण्याच्या प्लँनची आखणी करत आहे ते येथील ओझोन अँडव्हेंचर ह्या ठिकाणी बंजिंग जंपिंगसाठी भेट देऊ शकतात.

इथे बंजिग जंपिंगची हाईट म्हणजेच उंची 80 फूट इतकी ठेवली जात असते.

इथे बंजिंग जंपिंग करण्यासाठी क्रेनचा उपयोग केला जातो.

इथे 15 वर्षावरील आणि 55 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनाच बंजिंग जंपिग केले जाऊ दिले जाते.इथे बंजिंग जंपिगची वेळ सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहा अशी असते.

See also  निबंध मराठी - माझा आवडता खेळ - Maza Avadata Khel

5) दिल्ली :

जे पर्यटक दिल्ली ह्या ठिकाणी पर्यटनासाठी जात आहेत त्यांनी दिल्ली येथील वंडरलस्ट ह्या ठिकाणी बंजिग जंपिगसाठी जायला हवे.

इथे बंजिंग जंपिंग करण्याचे अंतर म्हणजेच हाईट 130 फुट इतक्या उंचावर असते.इथे देखील बंजिग जंपिंगसाठी क्रेनचा उपयोग केला जातो.

इथे फक्त 12 वर्षाच्या वर 55 वर्षाच्या खालील व्यक्तींनाच बंजिग जंपिंग करता येते.

इथे बंजिग जंपिग केल्यावर आपल्याला टी शर्ट तसेच कँप बक्षिस म्हणुन दिली जाते.