भारतातील 12 प्रेक्षणीय स्थळ – 12 Best Places to Visit in India in 2022

भारतातील 12 प्रेक्षणीय स्थळ – 12 Best Places to Visit in India in 2022

आज आपल्याला प्रत्येकाला वाटते की फँमिलीसोबत तसेच मित्र मैत्रीणींसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जावे.

पण परदेशात बाहेर फिरायला जाण विविध कारणामुळे शक्य नसते .त्यामुळे आपण आपला फिरायला जाण्याचाच बेत रद्द करत असतो.

परदेशात फिरायला जाणे आता इतक कठीण नसले आणि भारतात अनेक प्रेक्षणीय स्थळ असली तरी कुठे फिरायला जावे कुठे नाही जावे हे देखील आपल्याला तितकस  माहीत नसते.

आपला भारत हा एक असा देश आहे जिथे परदेशातील लोक सुदधा मोठया आवडीने फिरायला येत असतात.कारण भारतात सुदधा अशी काही पाहण्यासारखी तसेच लक्षणीय पर्यटनस्थळे आहेत जी पाहुन आपण मंत्रमुग्ध होऊन जाऊ.

आज आपण 2022मधील भारतातीलच अशा काही लक्षणीय पाहण्यासारख्या 12 उत्तम स्थळांविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत जिथे देशातीलच नव्हे तर परदेशातील टुरिस्ट सुदधा मोठया आवडीने तसेच हौशीने फिरायला येताना आपणास दिसुन येतात.

2022मधील भारतातील व्हिझिट देण्यासारखी 12 उत्तम स्थळे कोणकोणती आहेत?

2022मधील भारतातील भेट देण्यासारखी 12 उत्तम स्थळे पुढीलप्रमाणे आहेत :

1)गोवा

2) लेह

3) अंदमान आईसलँड

4) वाराणसी

5) आग्रा

6) थरचे वाळवंट

7) त्रषीकेश

8) मखलोडगंज

9) कुर्ग

10) जिम काँर्बेट नँशनल पार्क

11) कच्छचे रण

12)हंपी

1)गोवा : ज्यांचे अजुन लग्न झालेले नाहीये आणि त्यांनी आपल्या ईच्छा अपेक्षांची एक मोठी यादी तयार करून ठेवली आहे.त्यांना आपल्या यादीतील निम्या बाबी येथे साकार करता येतील.

इथे आपल्याला 30 प्रकारचे विविध समुद्रकिनारे दिसुन येतात.विविध चर्च,इंटरेस्टिंग नंँचरल अँडव्हेंचर अँक्टीव्हीटीज पाहायला मिळतात.आणि कधीही न संपणारे असे गोवाचे नाईटलाईफ येथे आपल्याला पाहायला मिळते.

गोव्यात भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे :

येथे आपण कलंगुट बिच,बागा बीच,दूधसारगर धबधबा,ग्रँण्ड आयलँड,चापोरा किल्ला,मंगेशी मंदीर,अपोरा नाईट मार्केट इत्यादी आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकतो.

गोव्यात आपण काय काय करू शकतो?

गोव्यात आपण खूप काही करू शकतो ज्यात बनाना बोट राईडिंग,गोव्यातील नाईटलाईफचा आनंद घेऊ शकतो.विविध समुद्र किनारे बघु शकतो.याचसोबत आपण स्कुबा डायव्हिंग,जेट स्कींग देखील करू शकतो.

गोव्यात जाण्याची उत्तम वेळ :

डिसेंबर महिन्यात गोव्यामध्ये सन बर्न फेस्टिव्हल साजरा केला जातो.याचसोबत गोवा काँर्निव्हल साजरा केला जातो.याचसोबत अनेक जत्रा तसेच उत्सव देखील साजरे केले जातात.अशावेळी आपण गोव्यात ह्या उत्सवात सहभागी व्हायला जाऊ शकतो.

 

12 Best Places to Visit in India in 2022
गोवा आणि अंडमान समुद किनारे

2) लेह :लेह शहर बहतेक पर्यटकांना येथील आकर्षक मठ,बाजार आणि पर्टनस्थळांमुळे अधिक भावते.याचसोबत हे सतत पडणारा अविरत बर्फ आणि साहसी अँडव्हेंचर अँक्टिव्हीटीसाठी देखील प्रसिदध आहे.

लेह येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे :

लेह येथे आपण जामा मशिद,लेह पँलेस,संगम व्हँली,हेमिस मठ,स्पिटुक मठ,पँगाँक लेक,नुब्रा व्हँली अशा अनेक आकर्षक ठिकाणी भेट देऊ शकतो.

लेहमध्ये आपण काय काय करू शकतो?

नुब्रा येथे असलेले बौदध मठ पाहु शकतो.जीप सफारी करू शकतो.लेह येथे साजरा केल्या जात असलेल्या यात्रा तसेच उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकतो.लेहच्या बाजारपेठेमध्ये जाऊन भरपुर खरेदी करू शकतो.याचसोबत कँमल सफारीचा देखील आनंद घेऊ शकतो.

लेह येथे जाण्याची उत्तम वेळ :

See also  जागतिक रक्तदान दिनासाठी घोषवाक्ये - Slogans for Blood Donation day in Marathi

लेह येथे आपण उन्हाळयात जाणे अधिक उत्तम ठरेल कारण एप्रिल जूलै महिन्यात आपण लेह येथील साहसी अँडव्हेंचर अँक्टीव्हीटीमध्ये भाग घेऊ शकतो.सोबतच जिप सफारी तसेच कँमल सफारीचा,तसेच मोटार रायडिंगचा आनंद प्राप्त करू शकतो.

3) अंदमान आईसलँड :

अंदमान हे ठिकाण लहान बेटांचा समुह म्हणुन ओळखले जाते.अंदमान हे अनेक वाँटर एक्टिव्हीटींसाठी देखील प्रसिदध आहे.बोटिंग करण्यापासुन ते स्कुबा डायव्हिंगपर्यत अनेक वाँटर अँक्टिव्हीची आपण येथे आनंद प्राप्त करू शकतो.

अंदमान येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

अंदमानला आपण महात्मा गांधी मरीन नँशनल पार्क,नाँर्थ बे बीच,राधानगरी बीच,सेल्युलर जेल नँशनल मेमोरियल,रास आणि स्मिथ बीच,काँरेस्ट म्युझियम अशा अनेक आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकतो.

अंदमान येथे आपण काय काय करू शकतो?

अंदमानच्या सर्व प्रसिदध समुद्रकिनारयांना भेट देऊन तेथील स्कुबा डायव्हिंग तसेच सी वाँकचा आनंद घेऊ शकतो.एवढेच नाहीतर मायाबंदर येथे बोटरायडिंगचा आनंद लुटु शकतो.चिडिया तपु येथे पक्षी निरीक्षणाला जाऊ शकतो.हेलिकाँप्टरचा फेरफटका मारू शकतो.

अंदमान येथे जाण्याची उत्तम वेळ :

अंदमान बेटाला भेट द्यायची असेल तर यासाठी आँक्टोंबर ते मे महिना ही उत्तम वेळ आहे.

4) वाराणसी :

वाराणसी येथे अनेक गल्यांमध्ये भरपुर मंदिरे आहेत.गंगा नदीच्या दोन्ही बाजु 88 विविध घाटांनी भरलेल्या आपणास दिसुन येतात.वाराणसी हे बौदध तीर्थक्षेत्र असलेल्या सारनाथ मंदिरापर्यत पोहचण्याचे प्रवेशदवार म्हणुन देखील ओळखले जाते.

वाराणसी येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

वाराणसी येथे आपण रामनगर किल्ला,तुलसीमानस मंदीर ,मणिकर्णिका घाट,चुनार किल्ला,सारनाथ,मान मंदीर,काशी विश्वनाथाचे मंदीर इत्यादी आकर्षक स्थळांना भेट देऊ शकतो.

वाराणसी येथे आपण काय काय करू शकतो?

वाराणसी येथे आपल्याला बोट राईडिंगचा आनंद घेता येतो.वाराणसीच्या घाटावर सुर्यास्त पाहु शकतो.वाराणसीच्या बाजारपेठेत खरेदीचा आनंद घेऊ शकतो.संध्याकाळी गंगा आरतीत सहभागी होऊ शकतो.

वाराणसी येथे जाण्याची उत्तम वेळ :

आपल्याला जर वाराणसीचे सौंदर्य बघायचे असेल तर आपण इथे हिवाळयात जायला हवे.नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान इथले हवामान एकदम आल्हाददायक असते.

 

12 Best Places to Visit in India in 2022
काशी विश्वनाथ

 

5) आग्रा :

आग्रा येथील ताजमहाल तर जगातील सातवे जागतिक आश्चर्य म्हणुन फेमस आहेच सोबत आग्रा हे मुघल राजवटीचा एक उर्वरीत भाग म्हणुन देखील ओळखले जाते.

आग्रा येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

आग्रा येथे आपण ताजमहल,आग्राचा किल्ला,फतेहपुर सिक्री,जामा मशिद,राम बाग गार्डन,इतिमाद उद दौलाची कबर तसेच अकबर बादशहाची कबर अशा अनेक आकर्षक स्थळांना भेट देऊ शकतो.

आग्रा येथे आपण काय काय करू शकतो?

आग्रा येथे आपण यमुना नदीच्या सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो.आग्राच्या पेठयाचा आनंद लुटु शकतात.मुघल हेरिटेज वाँक येथे बघु शकतो.किनारी बाजार येथे खरेदीचा आनंद मिळवू शकतो.संध्याकाळी होणारा डान्स ड्रामा शो देखील बघू शकतो.

आग्रा येथे जाण्याची उत्तम वेळ :

आग्राला भेट देण्यासाठी मार्च ते आँक्टोंबर हा चांगला कालावधी आहे.

6) थरचे वाळवंट :

थर हे राजस्थान येथे असलेले एक मोठे वाळवंट आहे.थरचे वाळवंट हे लक्झरी कँपिंग,ऊंटाची सैर,इतर अँडव्हेन्चरल अँक्टीव्हीटी साठी देखील हे अधिक प्रसिदध आहे.

थरचे वाळवंट येथे आपण काय काय करू शकतो?

येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असतात त्याचा आपण आनंद घेऊ शकतो.तसेच येथील उबदार वाळुवर रोमँटिक मुन लाईट डिनरचा आनंद आपण लुटु शकतो.

See also  श्रीगणेशाचे आगमन,शुभ मुहुर्त,स्थापणा अणि पुजा विधी याविषयी संपुर्ण माहीती -Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhuart And Rituals

उंटावर बसुन ऊंटाची सवारी करू शकतो.विविध कल्चरल तसेच अँडव्हेनचरल अँक्टिव्हिटीजचा आनंद प्राप्त करू शकतो.

 

12 Best Places to Visit in India in 2022
लेह लदाख आणि थर वाळवंट

 

7) त्रषीकेश :

त्रषीकेश हे गंगा नंदीच्या सीमेवर वसलेले एक आध्यातमिक ठिकाण आहे.जे भारतात भेट देण्यासाठी एक सगळयात उत्तम स्थान आहे.

त्रषीकेश येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

त्रषीकेश येथे आपण लक्ष्मण झुला,नीळकंठ महादेव मंदीर,कुंजापुरी मंदिर,त्रषी कुंड,गीता भवन,वशिष्ट गुफा,नीर गड धबधबा,राजाजी राष्टीय उद्यान इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतो.

त्रषीकेश येथे आपण काय काय करू शकतो?

त्रषीकेश येथे आपण ट्रँकिंगला जाऊ शकतो.बंजी जंपिंग,पँराग्लायडिंग,माऊंटन बाईकिंग अशा अनेक साहसी खेळांचा आनंद लुटु शकतो.गंगा घाटावर आरतीचा लाभ घेऊ शकतो.बाँडी मसाज तसेच स्पाचा रिव्हर राफ्टींग कँम्पिंगचा आनंद उठवू शकतो.

त्रषीकेश येथे जाण्याची उत्तम वेळ :

आपण वर्षभरात कधीही त्रषीकेशला व्हिझिट करू शकतो.पण जास्तीत जास्त पर्यटकांची गर्दी येथे उन्हाळयातच राहत असते कारण उन्हाळयात येथे रिव्हर रापटिंग कँम्पिंगचा आनंद आपण घेऊ शकतो.

आणि पावसाळयामध्ये सावन हा सण साजरा केला जात असतो.पावसाळयात गेल्यावर आपण ह्या सणामध्ये सहभागी होऊ शकतो.

याचसोबत जर आपल्याला येथील नँचरल ब्युटी तसेच अँडव्हेंचरल अँक्टीव्हीटीचा विशेषत राँक क्लाईबिंगचा लाभ घ्यायचा असेल तर आपण येथे हिवाळयात जाणे अधिक उत्तम ठरते.

8) मखलोडगंज :

पर्यटनाच्या बाबतीत हे भारतातील एक छुपे रत्न मानले जाते.तिबेट संस्कृती आणि बौदध धर्माने भरलेले हे ठिकाण आहे.ह्यामुळे हे खुप शांत ठिकाण आहे.मठ आणि ट्रँकिंग ट्रेल्ससाठी हे खुप प्रसिदध आहे.ज्यांना शांतताप्रिय वातावरण हवे आहे त्यांनी इथे नक्कीच जायला हवे.

मखलोडगंज येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

येथे आपण तिबेट संग्रहायल,सन सेंट पाँईंट,धरमकोट,मसरूड मंदीर,गुणादेवी मंदीर,सेंट जाँन चर्च,विपश्यना ध्यान केंद्र,नेचूंग मठ,भागसु फाँल्स इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतो.

मखलोडगंज येथे आपण काय काय करू शकतो?

दल सरोवरामध्ये बोटीने प्रवासाचा आनंद लुटु शकतो.तिबेट नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकतो.ट्ँकिंगचा लाभ उठवू शकतो.स्थानिक बाजारात खरेदीचा आनंद घेता येईल.

मखलोडगंज येथे जाण्याची उत्तम वेळ :

मखलोडगंजला उन्हाळयात भेट द्यायला मार्च ते जुन आणि हिवाळयात आँक्टोंबर ते फेब्रुवारी हा एक उत्तम काळ आहे.

9) कुर्ग :

कुर्ग हे पर्वतीय सौदर्यासाठी एक महत्वाचे ठिकाण म्हणुन ओळखले जाते.हे ठिकाण आकर्षणातील साधेपणा आणि उच्च पातळीवर असलेल्या मादक अँक्टीव्हीटी साठी प्रसिदध असलेले हे ठिकाण आहे म्हणुन यास पुर्वेचे स्काँटलंड म्हणुन देखील संबोधिले जाते.

येथील वृक्षारोपन आणि ताज्या वनस्पती आपल्याला नवचैतन्य देत असतात.

कुर्ग येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

कुर्ग येथे आपण ब्रम्हगिरी शिखर,अँबे फाँल,चेतल्ली,राजाचे सीट,बारापोल नदी,नागरहोल नँशनल पार्क,इरूप्पु फाँल,दुबरे एलिफंट कँपस नायड्रोलिंग मठ इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतो.

कुर्ग येथे आपण काय काय करू शकतो?

कुर्ग येथे आपण ब्रम्हगिरी हिल ट्रिक,पुष्पगिरी ट्रेक येथे ट्रँकिंगचा लाभ उठवू शकतो.भारतातील सर्वोतम काँफीचा आस्वाद घेऊ शकतो.मडिकेरी किल्लयाला भेट देऊ शकतो.तसेच बारापोल नदीवर रिव्हर राफ्टिंग इत्यादी गोष्टी आपण इथे करू शकतो.

See also  भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी - Indian Nobel Prize Winner List In Marathi

कुर्गला येथे जाण्याची उत्तम वेळ :

आपण वर्षभरात कधीही कुर्ग येथे व्हिझिटला जाऊ शकतो.पण कुर्गला व्हिझीट करण्यासाठी आँक्टोंबर ते एप्रिल हा एक उत्तम काळ मानला जातो.

10) जिम काँरबेट नँशनल पार्क :

जिम काँरबेट नँशनल पार्क हे एक आंतरराष्टीय पार्क आहे.हे राष्टीय उद्यान वाघ,सिंह,अस्वल,हरिण यांसारख्या प्राण्यांसाठी खुप फेमस आहे.

जिम काँरबेट नँशनल पार्क येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

जिम काँरबेट नँशनल पार्क येथे आपण काँरबेट संग्रहालयाला भेट देऊ शकतो.रामनगर,कोसी नदी,सीता बानी,गर्जिया मंदीर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतो.

जिम काँरबेट नँशनल पार्क येथे आपण काय काय करू शकतो?

हत्तीची सवारी,पंगोट येथे पक्षी निरीक्षण,कँम्पिंग,कोसी नदी मध्ये राफ्टींगची मज्जा लुटु शकतो.रात्रीच्या मुक्कामासाठी आपण ढिकाला फाँरेस्ट हाऊस येथे करू शकतो.वन्यजीवणाचा आनंद घेऊ शकतो.आणि सीताबनी येथे ट्रँकिंग देखील करता येईल.

जिम काँरबेट नँशनल पार्क येथे जाण्याची उत्तम वेळ :

जिम काँरबेट पार्कला आपण हिवाळयात भेट द्यायला हवी आणि आँक्टोंबर ते जुन येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे.

12 Best Places to Visit in India in 2022
ताजमहाल -आगरा

11) कच्छचे रण :

कच्छला आपल्या देशाचे मीठाचे वाळवंट म्हणुन ओळखले जाते.कच्छ हे लँण्डस्केपसाठी खुप प्रसिदध आहे.

येथील कँम्पिंग,ऊंट सवारी आणि इतर भरपुर उपक्रम प्रसिदध आहे.रण उत्सवाच्या वेळी इथे लोक भेट देत असतात.हे एक असे मनोरंजक स्थळ आहे जिथे भारताच्या नकाशात आपण एकदा भेट द्यायलाच हवी.

 कच्छ येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

कच्छ येथे आपण भुज,कच्छ म्युझियम,रोहा किल्ला,मांडवी बीच,विजय विलास पँलेस,आयना महाल,धोलावीरा भद्रेश्वर जैन मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतो.

कच्छ येथे आपण काय काय करू शकतो?

रणोत्सवाचा आनंद लुटु शकतो.पांढरया वाळवंटामध्ये सुंदर सुर्यास्ताचा अनुभव घ्यायला इथे मिळतो,कालो डुंगरला भेट देऊ शकतो तसेच धोर्डोच्या टेंट सिटीमध्ये मुक्काम देखील करू शकतो.व्हाईट डेझराट येथे उंट सवारीचा आनंद घेऊ शकतो.

कच्छ येथे जाण्याची उत्तम वेळ :

कच्छला भेट देण्यासाठी आपण हिवाळयात जायला हवे.येथील हवामान हे आँक्टोंबर ते फेब्रूवारी ह्या काळात आनंददायी आणि पर्यटनयोग्य मानले जाते.

12) हंपी :

असे म्हटले जाते की हंपी शहरात प्रवेश केल्याने आपण इतिहासाच्या साम्राज्यामध्ये प्रवेश करत असतो कारण कारण हे शहर विजयनगर राज्याची प्राचीन राजधानी आहे.

येथे आपल्याला अनेक मंदिर,राजवाडे तसेच भुतकाळातील अनेक अवशेष सापडत असतात.

हंपी येथे भेट देण्यासारखी काही आकर्षक ठिकाणे:

हंपी येथे आपण विजया विठठल मंदीर,मातंगा टेकडी,हेमाकुटा टेकडी मंदीर,लक्ष्मी नृसिंह मंदीर,जुने संग्हालय,नदीकिनारी पडलेल्या अवशेष पाहायला मिळतात.

हंपी येथे आपण काय काय करू शकतो?

हिप्पी बेटावर झोपडीत राहण्याचा आनंद घेऊ शकतो.अंजनीया टेकडीला भेट देऊ शकतो.भाडयाने बाईक काढुन बाईक रायडिंगचा आनंद लुटु शकतो.

हंपी बाजारात खरेदी करू शकतो.माकड मंदीरात सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो.सानापुर तलावाच्या किनारी जाऊन आराम करू शकतो.क्लीफ जंपिंग देखील करू शकतो.

हंपी येथे जाण्याची उत्तम वेळ :

हंपी येथे जाण्याची उत्तम वेळ आँक्टोंबर ते फेब्रूवारी महिना आहे.

अशा पदधतीने आज आपण भारतातील अशा काही उत्तम ठिकाणांविषयी जाणुन घेतले आहे जिथे आपण व्हिझिटला जाऊ शकतो आणि भरपुर नैसर्गिक सौंदर्याची मज्जा लुटु शकतो आणि येथील विविध अँक्टीव्हीटीचा देखील भरपुर आनंद घेऊ शकतो.

1 thought on “भारतातील 12 प्रेक्षणीय स्थळ – 12 Best Places to Visit in India in 2022”

Comments are closed.