डिफरेंस बिटवीन अपडेट आणि अपग्रेड – Differences Between an Upgrade and an Update

अपडेट आणि अपग्रेड  मधील फरक – Differences Between an Upgrade and an Update

आज आपल्यापैकी सर्वच जणांकडे आपापला स्मार्टफोन,अँड्राईड मोबाईल आहे.आपल्यापैकी प्रत्येक जण दर महिन्याला आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या अँप्सचे नवीन व्हरझन युझ करण्यासाठी त्या अँप अपडेट करत असतो.

याचसोबत आपल्या मोबाईलमध्ये नेहमी सिस्टम अपडेट करण्याचे नोटिफिकेशन येत असते.जे करणे आपल्या मोबाईलच्या लाईफसाठी खुप महत्वाचे देखील असते.

पण याचसोबत अजुन एक महत्वाचा शब्द आहे जो आपल्या सारख्या अँड्राईड मोबाईल,लँपटाँप,कंप्युटर वापर करत असलेल्या युझरला नेहमी ऐकायला मिळत असतो आणि तो शब्द म्हणजे अपग्रेड.

अशा परिस्थितीत आपल्या मनात एक कन्प्युझन निर्माण होत असते की अपडेट आणि अपग्रेड हे दोघे एकच असतात का?का अलग अलग असतात?आणि जर हे दोन अलग फंक्शन आहेत तर मग या दोघांमध्ये कोणता फरक आहे?

असे विविध प्रश्न ह्या दोघांविषयी आपल्या मनात निर्माण होत असतात.आपल्या मनातील हेच प्रश्न कायमचे दुर करण्यासाठी आज आपण अपडेट आणि अपग्रेड या दोघांमध्ये काय फरक असतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

अपडेट म्हणजे काय? What is Update

 आपल्या मोबाईलमध्ये जेवढया अँप्स डाऊनलोड केलेल्या आहेत त्यांच्या व्हरझनमध्ये दर महिन्याने चेंज होत असतो.म्हणजेच त्या अँपमध्ये अजुन काही नवीन फिचर्स अँड केले जात असतात.ज्यांचा लाभ घेण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील डाऊनलोड केलेली अँप अपडेट करणे फार गरजेचे असते.

युझर्सला चांगला एक्सपिरीयंस देण्यासाठी साँफ्टवेअर कंपनी नेहमी आपल्या साँफ्टवेअरमध्ये नवनवीन चेंजेस करत असतात.त्यात नवीन फिचर्स देखील अँड करत असतात.

See also  महिलांनी उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची? - Summer Skin Care for women

इथे फक्त साँफ्टवेअरचे व्हरझन चेंज केले जात असते पुर्ण आँपरेटींग सिस्टम नाही.

अपडेट करण्याचे फायदे

 साँफ्टवेअर तसेच मोबाईल अँप्स अपडेट करून आपण इंस्टाँल केलेल्या अँपमध्ये अँड करण्यात आलेल्या नवीन फिचर्सचा वापर करू शकतो.लाभ घेऊ शकतो.

अपग्रेड म्हणजे काय?What is upgrade

 अपग्रेड म्हणजे नवीन श्रेणी प्रदान करणे असा याचा अर्थ होतो.

अपग्रेड मध्ये आपण एखाद्या मोबाईल,कंप्युटर,लँपटाँप मधील जुनी आँपरेटिंग सिस्टिम अन इंस्टाँल करून त्याजागी नवीन आँपरेटिंग सिस्टम इंस्टाँल करत असतो.

म्हणजेच समजा आपल्या लँपटाँपमध्ये windows 7 ही आँपरेटिंग सिस्टिम इंस्टाँल असेल तर आपण ती अन इंस्टा़ल करून त्याजागी windows 11 ही नवीन आँपरेटिंग सिस्टम इंस्टाँल करू शकतो.

अपग्रेडमध्ये आपल्या सिस्टमची पुर्ण आँपरेटिंग सिस्टिम चेंज होत असते.

अपग्रेड हे दोन प्रकारचे असतात

1) साँफ्टवेअर अपग्रेड :

2) हार्डवेअर अपग्रेड :

 

1) साँफ्टवेअर अपग्रेड :

यात आपण साँफ्टवेअरचे एक व्हरझन चेंज करून त्याजागी दुसरे लेटेस्ट व्हरझन घेत असतो.

उदा.windows 7 ह्या व्हरझनच्या ठिकाणी आपण windows 10हे नवीन व्हरझन इंस्टाँल करत असतो यालाच साँफ्टवेअर अपग्रेड असे म्हटले जाते.

2)हार्डवेअर अपग्रेड :

हार्डवेअर अपग्रेडमध्ये आपण आपल्या लँपटाँप तसेच कँप्युटरच्या गती तसेच कार्य क्षमतेत वाढ होण्यासाठी त्याच्यामधील जूने हार्डवेअर पार्टस काढुन त्याजागी नवीन हार्डवेअर पार्टस बसवत असतो.यालाच हार्डवेअर अपग्रेड असे म्हटले जाते.

अपग्रेड करण्याचे फायदे :

  • अपग्रेडमुळे आपण आपल्या कंप्युटर,लँपटाँप मधील जुनी आँपरेटिंग सिस्टिम अन इंस्टाँल करून त्याजागी नवीन आँपरेटिंग सिस्टम इंस्टाँल करू शकतो.ज्याने आपल्या लँपटाँप कंप्युटरच्या गती तसेच कार्यक्षमतेत,डेटा स्टोरेज कँपिसिटीमध्ये देखील वाढ होते.

Update आणि upgrade यादोघांमध्ये कोणता फरक आहे? – डिफरेंस बिटवीन अपडेट आणि अपग्रेड

  • अपडेट ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला एखादे साँफ्टवेअर तसेच मोबाईल अँपचे जुने व्हरझन काढुन टाकुन नवीन फिचर्स अँड असलेले लेटेस्ट व्हरझन डाऊनलोड करता येते.म्हणजेच यात फक्त अँप्लीकेशनचे व्हरझन चेंज होते.
See also  २०२३ मधील मणिपूर नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे NEET exam date 2023 postponed in Marathi

अपग्रेड मध्ये आपण आपल्या मोबाईल लँपटाँप तसेच कंप्युटरची जुनी आँपरेटिंग सिस्टिम तसेच हार्ड वेअर पार्ट काढुन टाकत असतो.आणि त्याजागी नवीन आँपरेटिंग सिस्टम तसेच हार्ड वेअर पार्ट इंस्टाँल करत असतो.आणि यात पुर्ण सिस्टम मध्ये चेंज केला जातो.

  • मोबाईलमधील डाऊनलोड केलेल्या अँप्स अपडेट करण्यासाठी आपल्याला कुठलेही पैसे द्यावे लागत नसतात.
  • पण लँपटाँप,कंप्युटरमधील ओल्ड आँपरेटिंग सिस्टम तसेच इतर जुने हार्डवेअर पार्ट काढुन त्याजागी नवीन आँपरेटिंग सिस्टीम इंस्टाँल करण्यासाठी तसेच नवीन हार्डवेअर पार्टस बसवण्यासाठी आपल्याला कंप्युटर हार्डवेअर वाल्याला पैसे द्यावे लागत असतात.म्हणजेच समजा आपल्या लँपटाँपमध्ये विंडोज सेव्हन असेल तर त्याजागी नवीन आँपरेटिंग सिस्टम म्हणजेच विंडोज टेन बसवण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत असतात.
  • जेव्हा आपण आपल्या मोबाईलमधील अँप्स अपडेट करत असतो तेव्हा आपल्या मोबाईलमधील आँपरेटिंग सिस्टीम तसेच सिस्टम साँफ्टवेअरवर इतर अँप्सवर याचा कोणताही परिणाम होत नसतो.

 

  • पण जेव्हा आपण आपल्या लँपटाँपमधील आँपरेटिंग सिस्टम चेंज करत असतो तेव्हा आपल्या लँपटाँपमध्ये इंस्टाँल असलेले सर्व जुने अँप्लीकेशन देखील आपोआप अन इंस्टाँल होऊन जात असतात.

 

  • मोबाईलच्या अँप अपडेट करणे हे कोणालाही सर्वसामान्य व्यक्तीला करता येत असते.

 

  • पण लँपटाँप कंप्युटरमधील सिस्टम अपग्रेड हे फक्त ज्यांना साँफ्टवेअर हार्डवेअरचे पुर्ण नाँलेज आहे तेच करू शकतात.

 

  • मोबाईलमधील अँप्स अपडेट करायला आपल्याला जास्तीत जास्त एक मिनिट एवढा कालावधी लागत असतो.

 

  • पण लँपटाँप कंप्युटरमधील पुर्ण आँपरेटिंग सिस्टम अपग्रेड करायला जास्त वेळ लागत असतो

 

[rpwe]