आपला मोबाईल गरम होण्याचे कारण काय? – Why does my phone get hot Marathi information

आपला मोबाईल गरम होण्याचे कारण काय?Why does my phone get hot marathi information

 मित्रांनो स्मार्टफोन हा आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनलेला आहे.कारण आज आपण साधा काँल करण्यापासुन ते आँनलाईन पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करत असतो.

म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवणातील प्रत्येक कार्यासाठी आज आपण स्मार्टफोनवर अवलंबुन आहे.

अशातच आपल्या स्मार्ट फोनला अचानक ओव्हरहिटिंग वगैरेचा काही प्राँब्लेम आल्यास आपली सर्व महत्वाची कामे रखडुन जात असतात.

अशा समस्येचा सामना आपल्याला देखील रोज करावा लागत असेल आणि आपणास यावर उपाय हवा असेल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आले आहात.

आजच्या लेखात आपण मोबाईल गरम होण्याची कारणे

कोणकोणती आहेत हे जाणुन घेऊन त्यावर काय उपाययोजना आपण करायला हव्यात हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

 

आपला मोबाईल गरम पडण्याची कारणे कोणकोणती आहेत?Why does my phone get hot marathi information

मोबाईलच नव्हे तर ह्या जगात जेवढे इलेक्ट्रानिक डिव्हाईस आहेत मग तो टिव्ही,फँन तसेच फ्रिज असो इत्यादी सर्व इलेक्ट्राँनिक डिव्हाईसेस गरम पडत असतात.

 खुप वेळा असे होत असते की आपला मोबाईल खुप अधिक प्रमाणात गरम पडत असतो.ज्याने आपला मोबाईल डँमेज होण्याची देखील अधिक संभावना असते.

कारण मोबाईल सतत गरम पडल्याने त्याचा परफाँर्म्स कमी होत असतो.तसेच आपला स्मार्टफोन फुटुन एखादी मोठी दुर्घटना होण्याची देखील भीती असते.

म्हणुन आपण आपला मोबाईल गरम का पडतो आहे याचे कारण जाणुन घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाय योजना करणे फार गरजेचे असते.

मोबाईल गरम पडण्याची कारणे पुढीलप्रमाणे असतात:

 

1)इंटरनेटचा स्लो स्पीड :

2) गेम्स अँप :

3) मोबाईलमधील बँकग्राऊंड अँप्लीकेशन :

4) मोबाईलचा अधिक ब्राईटनेस :

5) उन्हामध्ये तसेच अधिक उष्णतेत मोबाईलचा वापर करणे :

6) मोबाईल एखाद्या कव्हर केसमध्ये ठेवणे :

See also  पीएम किसान निधी योजनेचा १३ वा हप्ता झाला रिलीज - PM KISAN 13TH INSTALLMENT RELEASED IN MARATHI

7) रात्रभर मोबाईल चार्जिगला लावुन ठेवणे :

8) वेळेवर साँफ्टवेअर अपडेट न करणे :

9) मोबाईलमध्ये व्हायरस घुसुन येणे :

10) मोबाईलचे इंटरनल स्टोरेज फुल असणे :

11) प्रमाणापेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर करणे :

 

वाचा –मोबाइलफोन स्टोरेज स्पेस कमी झाला ? How to Clean mobile Marathi

1)इंटरनेटचा स्लो स्पीड :

आपला स्मार्टफोन गरम पडण्याचे पहिले कारण आहे आपल्या मोबाईल मधील इंटरनेट.

आता तुम्ही म्हणाल की मोबाईल गरम पडण्यास इंटरनेट कसे कारणीभुत ठरते.जेव्हा आपण मोबाईलचे इंटरनेट आँन करतो आणि इंटरनेट फार मंदगतीने कार्य करत असते.तेव्हा अशा परिस्थितीत देखील स्लो इंटरनेट मुळे आपला मोबाईल गरम पडत असतो.

 

2) गेम्स अँप : जेव्हा आपण मोबाईलमध्ये खुप अधिक प्रमाणात गेम खेळत असतो.तेव्हा आपल्या मोबाईलची रँण्डम अँक्सेस मेमरी(रँम) ही खुप फास्ट वर्क करत असते.

याचसोबत आपल्या मोबाईलमधील ग्राफिक कार्ड,प्रोसेसर आणि इंटरनेट हे तिघे देखील खुप फास्ट वर्क करत असतात.ज्याने आपला मोबाईल लवकर गरम पडत असतो. 

 

3) मोबाईलमधील बँकग्राऊंड अँप्लीकेशन :

मल्टीटास्किंग हे आपला मोबाईल गरम पडण्याचे सगळयात प्रमुख कारण आहे.मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळी अनेक कामे करणे.

जेव्हा आपण मोबाईलवर एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन युझ करत असतो.अशावेळी आपल्या मोबाईलवर एक अँप्लीकेशन ओपन असताना त्याच्या मागे इतर अँप्लीकेशन देखील बँक ग्राऊंडला रण होत असतात.जे खुप हेव्ही अँप्लीकेशन असतात.ज्याने आपल्या मोबाईलची चार्जिग डाऊन होत जाते.

याचसोबत जेव्हा आपल्या मोबाईलच्या बँकग्राऊंडला मल्टीपल अँप रण होत असतात.तेव्हा त्या अँप आपल्या मोबाईल मधील इंटरनेट कनेक्शन देखील युझ करत असते.ज्याने आपला मोबाईल अधिक इंटरनेटचा वापर केल्याने गरम पडत असतो.

 

4) मोबाईलचा अधिक ब्राईटनेस :

मोबाईलचा हाय ब्राईटनेस हे देखील एक प्रमुख कारण आहे मोबाईल ओव्हहिट होण्याचे.खूपदा असे होते की आपण आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस खुप अधिक प्रमाणात वाढवून घेत असतो.

See also  काही लोकांना खडू किंवा माती खाण्याची इच्छा का वाटते?

याने आपल्या मोबाईलमधील बँटरी अधिक जास्त प्रमाणात युझ होत असते.ज्याने आपला मोबाईल गरम पडत असतो.

 

5) उन्हामध्ये तसेच अधिक उष्णतेत मोबाईलचा वापर करणे :

अनेकवेळा असे होत असते की आपण उन्हात देखील आपल्या मोबाईलचा अधिक जास्त प्रमाणात वापर करत असतो.ज्याचे परिणाम स्वरूप सुर्याच्या प्रखर उष्णतेमुळे आपला मोबाईल गरम पडत असतो.

 

6) मोबाईल एखाद्या कव्हर केसमध्ये ठेवणे :

जेव्हा आपण आपला मोबाईल एखाद्या कव्हर केसमध्ये ठेवत असतो.तेव्हा त्याच्यातील उष्णता बाहेर पडण्यास कुठलीही जागा राहत नसते.आणि मोबाईलची उष्णता दाबली गेल्याने ती बाहेर पडण्यास कुठलीही जागा नसल्याने आपला मोबाईल गरम पडत असतो.

 

7) रात्रभर मोबाईल चार्जिगला लावुन ठेवणे :

जेव्हा आपण आपल्या मोबाईलची बँटरी खूप लो असते.तेव्हा रात्रभर ती चार्जिग करत ठेवत असतो.आणि वेळेवर मोबाईल चार्जिगवरून काढत देखील नसतो.

मग रात्रभर मोबाईल चार्जिगला लावल्याने आपल्या मोबाईलची बँटरी फुगत असते किंवा आपला मोबाईल प्रमाणापेक्षा अधिक चार्जिग केल्याने गरम पडत असतो.

 

8) वेळेवर साँफ्टवेअर अपडेट करणे :

खुप वेळा आपण आपल्या मोबाईलचे साँफ्टवेअर अपडेट करणे विसरून जातो किंवा टाळत असतो ज्याने आपला मोबाईल वारंवार हँग होतो.तसेच तो गरम देखील पडत असतो.

 

9) मोबाईलमध्ये एखादा व्हायरस घुसुन येणे :

आपल्या मोबाईलमध्ये जेव्हा एखादा व्हायरस घुसुन येत असतो तेव्हा देखील आपला मोबाईल गरम पडत असतो.

 

10) मोबाईलचे इंटरनल स्टोरेज फुल असणे :

जेव्हा आपल्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज फुल झालेले असते आणि त्यात नवीन डेटा स्टोअर करण्यासाठी अजिबात जागा राहत नाही अशा वेळी देखील मोबाईल ओव्हरहिटिंगचा प्राँब्लेम येत असतो.

 

11) प्रमाणापेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर करणे :

जेव्हा आपण प्रमाणापेक्षा अधिक मोबाईलचा वापर करत असतो.तेव्हा मोबाईलचा अधिक जास्त वापर केल्याने देखील मोबाईल गरम पडत असतो.

 

मोबाईल गरम पडु नये म्हणुन आपण काय करायला हवे?

आपला मोबाईल गरम पडु नये म्हणुन आपण पुढील उपाय करायला हवेत :

 • इंटरनेट फार मंद गतीने कार्य करत असल्याने आपला मोबाईल गरम पडत असतो म्हणुन आपण हाय स्पीड इंटरनेटचा वापर करायला हवा.
 • मोबाईलमध्ये असलेल्या जेवढया हेव्ही अँप्स आहेत जसे की गेमिंग अँप,ज्याने आपल्या मोबाईलची चार्जिग अधिक डाऊन होते आपण ते तत्काळ आवश्यकता नसल्यास मोबाईलमधुन डिलीट करायला हवेत.
 • मोबाईलवर एकाच वेळी मल्टीपल अँप्लीकेशन रण करणे बंद करायला हवे.
 • मोबाईलचा ब्राईटनेस प्रमाणापेक्षा जास्त ठेवू नये.
 • उन्हामध्ये मोबाईलचा वापर करू नये.
 • मोबाईल सतत कव्हर केसमध्ये पँक करून ठेवू नये.
 • रात्रभर आपला मोबाईल चार्जिगला लावून ठेवू नये.
 • मोबाईलमधील साँफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहणे.
 • मोबाईलमधुन व्हायरस काढुन टाकण्यासाठी अँण्टीव्हायरस डाऊनलोड करावे.आणि व्हायरस स्कँन करत राहायला हवे.
 • आपल्या मोबाईलमधील इंटरनल स्टोरेज फुल झाले असेल आणि नवीन डेटा स्टोअर करण्यास त्यात अजिबात जागा नसेल तर मोबाईलमधील नको असलेला जुना विनाकामाचा डेटा डिलीट करायला हवा.
 • आपण कामापुरताच मोबाईलचा वापर करायला हवा प्रमाणापेक्षा अधिक वेळ मोबाईलचा वापर करू नये.
See also  बी एस डब्लयु कोर्स, पात्रता, फि वेतन व नोकरीत संधी-?BSW full form in Marathi