किसान क्रेडिट कार्ड अर्ज पद्धत आता अगदी सोपी-KISAN CREDIT CARD SATURATION DRIVE

किसान क्रेडिट कार्ड -KISAN CREDIT CARD SATURATION DRIVE

आजच्या लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ,किसान क्रेडिट कार्ड काढण्याचे कोणकोणते फायदे आहेत ? आणि किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कशा पद्धतीने निवेदन करायचे ? याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.


आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या भारतातील बरीच लोकं, जास्त करून ग्रामीण भागातील लोक शेती करतात ,ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य शेतीवर आधारित असते .
क्रेडिट कार्ड हे देखील सध्याच्या जीवनशैली तील महत्वाचे घटक बनले आहे.त्यामुळे आपल्याजवळ क्रेडिट कार्ड असणे गरजेचे झाले आहे.

किसान क्रेडिट कार्ड – What is kisan credit card


भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही योजना चालू केली होती ,जेणेकरून देशातील शेतकरी या किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घेऊ शकतील आणि देशातील शेतकऱ्यांना या किसान क्रेडिट कार्ड चा फायदा आर्थिक लाभ साठी होईल.

मागच्या काही दिवसात भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठीची प्रोसेस डिजिटल केली आहे आणि आता शेतकरी घरी बसून किसान क्रेडिट कार्ड सहजरीत्या प्राप्त करू शकतील.


भारत देशाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यामध्ये देशातील शेतकऱ्यांचा खूप मोठा वाटा असतो ,परंतु शेतकऱ्यांना खूप वेळा तोट्याचा सामना करावा लागतो ,खूप वेळा त्यांनी शेतात लावलेल्या पिकाला चांगला दर भेटत नाही ,तर खूप वेळा अवकाळी पावसा मुळे शेतातील पिकांचे नुकसान होते ,अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो .

काही वेळा शेतकऱ्यांनी जेवढे पिका साठी खर्च केलेले असतात ,त्या बदल्यात त्यांना तेवढेही भेटत नाही.या समस्या वरती तोडगा म्हणून भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना ही योजना चालू केली आहे .

See also  आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स - AOC Fireman Tradesmen Admit Card 2023 In Marathi

जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना शेतीमध्ये लावलेल्या पिकामध्ये नुकसान होईल, तेव्हा त्यांना या किसान क्रेडिट कार्ड ची मदत होईल.भारत सरकारने चालू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करणे खूप सोपे झाले आहे आणि या किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन केल्यानंतर १४ दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या हातात त्याने काढलेले किसान क्रेडिट कार्ड येते.

चला पाहूया किसान क्रेडिट कार्ड चे फायदे आणि किसान क्रेडिट कार्ड साठी कशा पद्धतीने निवेदन करायचे ते –


किसान क्रेडिट कार्ड चे फायदे खालीलप्रमाणे आहेत :


१)या योजना अंतर्गत शेतकऱ्यांकडे जर किसान क्रेडिट कार्ड आहे ,तर त्याला ३ लाख पर्यंतचे लोन मिळू शकते आणि सरकारने या लोन साठी फक्त ४% इतका व्याजदर लावला आहे.


२) जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड द्वारे लोन काढले आहे ,आणि ते काढलेले लोन तुम्ही वेळे वरती भरले ,तर तुम्हाला सरकारकडून ३% पर्यंतची सबसिडी मिळू शकते.


३) किसान क्रेडिट कार्ड वरून देशातील शेतकरी १.६० लाख पर्यंतचे लोन सहजरीत्या काढू शकते आणि या बदल्यात देशातील शेतकऱ्यांना कोले्टेरॉल पण द्यावे लागत नाही.

किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन

करायचे असेल तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून किसान क्रेडिट कार्ड साठी यशस्वी रित्या निवेदन करू शकता :


१) काही महिन्यांपूर्वी तुम्हाला जर किसान क्रेडिट साठी निवेदन करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करायला लागत होते.परंतु आता भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे.सद्या सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत ,आणि किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्याची प्रोसेस देखील डिजिटल झाली आहे .

आता आपल्याला फक्त खाली दिली सर्व कागदपत्रे घेऊन आपल्या जवळ असलेल्या कोणत्या हि बँकेत जायचे आहे आणि अर्ज केल्या नंतर १४ दिवसात आपल्याला किसान क्रेडिट कार्ड मिळेल

See also  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेडिकल ऑफिसर पदाच्या २९७ जागांसाठी भरती सुरू - CAPF recruitment 2023 in Marathi

ह्या डिजिटल प्रोसेस ची सुरवात १ ऑक्टोंबर पासून होईल.शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी बँक ,ग्राम पंचायत आणि जिल्हा प्रशासन एकसोबत मिळून काम करणार आहेत ,जेणेकरून येत्या तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळू शकेल.

Carry all the necessary documents and visit your nearest bank branch to apply for Kisan Credit Card.

किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट :

किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती आवश्यक डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे :

किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट  :
किसान क्रेडिट कार्ड साठी निवेदन करण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट :


१) निवेदन पत्र
२) जमीनीची कागदपत्रे
३) पैन कार्ड
४) एड्रेस प्रूफ जसे की- आधार कार्ड, वोटर आईडी किंवा ड्राइविंग लाइसेंस ,इत्यादी.

Kisan Credit Card is provided by  Commercial Bank, Regional Rural Bank, Small Finance Bank & Cooperative bank. To get your KCC, visit your nearest bank branch.

आजच्या लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण माहिती पाहिली .किसान क्रेडिट कार्ड चे फायदे काय आहेत ? किसान क्रेडिट कार्ड साठी कशा पद्धतीने निवेदन करायचे आहे ? आणि किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती आवश्यक डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे ? याची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहिली.