इन्कम टँक्स कसा वाचवायचा? – How you can save income tax legally

इन्कम टँक्स कसा वाचवणार ?How you can save income tax  legally

 आज भारतातील प्रत्येक नोकरदार व्यक्ती आपला इन्कम टँक्स वाचवण्यासाठी टँक्स सेव्हिंगचे विविध आँप्शन शोधत असते.कारण आपले रोज रात्रंदिवस घाम गाळुन कमवलेले कष्टाचे पैसे कोणालाच सरकारला देऊ वाटत नसते.

पण आपल्यातील बहुतेक जणांकडे टँक्स सेव्हिंगचे आँप्शन नसल्यामुळे फार मोजक्याच व्यक्तींना आपले टँक्स सेव्हिंगचे प्लँनिंग करता येत असते.आज असे अनेक गूंतवणुकीचे पर्याय आपल्याकडे आहेत ज्याचा वापर करून आपण आपला टँक्स वाचवू शकतो.

म्हणुन आजच्या लेखात आपण भारतात इन्कम टँक्स कसा वाचवायचा आणि त्यासाठी आपण कुठे आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो.हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

भारतात इन्कम टँक्स वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो? -Tips to save income tax

आत्तापर्यत दोन आयकर स्लँब लागु करण्यात आले आहेत.जुन्या टँक्स स्लँबमुळे इन्कम टँक्स भरत असलेल्या व्यक्तीला टँक्स सेव्हिंग सोर्समध्ये गुंतवणुक करून आपले पैसे वाचवता येत असतात.

नवीन टँक्स स्लँब तर यापेक्षा अधिक सोपा आहे.इन्कम टँक्स भरत असलेल्या व्यक्तीला सरकारला कमी टँक्स भरण्यासाठी कोणतीही गुंतवणुक करण्याची गरज नसते.

न्यु टँक्स स्लँब हा अशा मध्यमवर्गीय वर्गासाठी खुप फायदेशीर आहे.जे टँक्स वाचवण्यासाठी आपल्या पैशांची गुंतवणुक करत नसतात.

1)कलम 80 C अंतर्गत 1.5 लाखापर्यत टँक्स सेव्हिंग :

आपल्याला आपली कलम 80 सी मर्यादा पुर्णपणे वापरण्याची गरज आहे.कलम 80 सी अंतर्गत आपण विविध टँक्स सेव्हिंग सोर्समध्ये इंन्व्हेस्टमेंट करून आपण 1.5 लाखापर्यत टँक्स बेनिफिट प्राप्त करू शकतो.

आपण खालील टँक्स सेव्हिंग इंस्ट्रूमेंटद्वारे आपले पैसे वाचवू शकतो.

  1)ELSS :इक्विटी लिंक सेव्हिंग सिस्टम हा एक विशिष्ट प्रकारचा म्युच्युअल फंड आहे.यात आपण एक रक्कमी तसेच एस आयपी पदधतीने गुंतवणुक करू शकतो.हे तीन वर्षाच्या लाँक इन पिरिअडसह येत असते.यात आपणास 10 टक्के भांडवली नफा लागु केला जातो.

See also  एव्हियन फ्लू - Avian Influenza or Bird Flu information in Marathi –

  2) टँक्स सेव्हिंग फिक्स डिपाँझिट :

  टँक्स सेव्हिंग फिक्स डिपाँझिट हे एक बेस्ट टँक्स सेव्हिंग सोर्स आहे.हे अशा गुंतवणुकदारांसाठी आहे ज्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये.टँक्स सेव्हिंग एफ डी तीन वर्षाच्या लाँक इन पिरीअडसह येत असते.

   3) PPF :पब्लिक प्रोव्हिडंड फंड ही सर्वात सिक्युअर इन्व्हेस्टमेंट आहे.पीपीएफ हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचे आँप्शन आहे.पीपीएफचा हा फायदा असतो की ते EEE कँटँगरीमध्ये येते.

पीपीएफमध्ये आपले पैसे इनव्हेस्टमेंट करून आपण प्रत्येक वर्षाला 1.5 लाखापर्यत क्लेम करू शकतो.

   4) लाईफ इंशुरन्स प्रिमियम :कलम 80 C अंतर्गत डिडक्शनसाठी स्वतासाठी आणि परिवारातील सदस्यांना जीवन विमा प्रिमियम पेमेंटसाठी परमिशन असते.

आणि हे सर्व प्रकारच्या लागु करण्यात आले आहे ज्यात टर्म प्लँन,युएल आयपी,ईंडोमेंट पाँलिसी इत्यादी.

   5) होम लोन :यात आपणास कलम 80 नुसार होम लोनच्या मुददल परतफेडीत म्हणजेच रिपेमेंट मध्ये बेनिफिट मिळत असतो.

मुददलासाठी अनुमत कमाल रक्कम ही 1.5 लाख per year असते.

   6) टयुशन फी :मुलांच्या शिक्षणासाठी शाळेत आपण जी फी भरत असतो त्यात आपण कलम 80 c नुसार क्लेम करू शकतो.

   7) सुकन्या समृदधी योजना :आपण सुकन्या समृदधी योजनेत देखील आपल्या पैशांची गुंतवणुक करू शकतो.आणि सुकन्या समृदधी योजनेत कंट्रिब्युशन दिलेल्या रक्कमेसाठी टँक्स बेनिफिट क्लेम करू शकतो.

   8) सिनिअर सिटीजन सेव्हिंग स्कीम : ही योजना सिनिअर सिटीजनसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे.सिनिअर सिटीजन SCSC वर जास्त इंटरेस्ट प्राप्त करू शकतात.

कारण SCSC मध्ये गुंतवणुक करून त्यांना टँक्स बेनिफिटसाठी क्लेम करता येतो.

   9) इम्पलाँई प्रोव्हिडंट फंड :इम्पलाँई प्रोव्हिडंट फंड मध्ये केलेल्या कोणत्याही काँट्रीब्युशनवर अँक्ट 80 c नुसार टँक्स बेनिफिटसाठी क्लेम करू शकतो.

2) NPS :

नँशनल पेंशन सिस्टम मध्ये गुंतवणूक करून आपण कलम 80CCD अंतर्गत 50000 च्या

See also  Sehri Mubarak २०२३ शुभेच्छा, संदेश, कोट्स | Ramadan Mubarak Wishes In Marathi

आँदर टँक्स बेनिफिटसाठी क्लेम करू शकतो.यासाठी आपल्याला एनपीएसमध्ये आपले अकाऊंट ओपन करावे लागत असते.

3) हेल्थ विमा प्रिमियम अँक्ट 80 D –

 स्वतासाठी आणि आपल्या कुटुंबातील सभासदांसाठी 25 हजारापर्यत भरलेला हेल्थ विमा प्रिमियम टँक्स बेनिफिटसाठी अनुमत आहे.

सिनिअर सिटीजनसाठी 50000 आणि स्वता सिनिअर सिटीजन पालकांसाठी जास्तीत जास्त मर्यादा 75000 आहे.

4) होम लोनवरील इंटरेस्टचे रिपेमेंट :

 आपण होम लोन वरील इंटरेस्टच्या रिपेमेंटसाठी टँक्स बेनिफिट देखील घेऊ शकतो.

 होम लोनच्या रिपेमेंटवर टँक्स बेनिफिटची कमाल पात्रता रक्कम दोन लाख असते.ही कँश अँक्ट 80C साठी इलिजिबल असलेल्या 1.5 लाख रक्कमेच्या वरची अतिरीक्त रक्कम आहे.

5) सेव्हिंग अकाऊंटमधून मिळणारा इंटरेस्ट :

सेव्हिंग अकाऊंटवर प्रत्येक वर्षाला 10000 पर्यतचे व्याज उत्पन्न कर कपातीसाठी सुट दिली जाते.हे कलम 80TTA नुसार आहे.

पण 80 TTB अंतर्गत सिनिअर सिटीजनसाठी लिमिटेशन जास्त आहे ते 50000 इतके आहे.

6) 80 G अंतर्गत डोनेशन : कलम 80 जी डोनेशनवर आपल्याला टँक्स बेनिफिटचा दावा करण्याची परमिशन देते.

कलम 80 जी अंतर्गत रिसिप्ट देत असलेल्या पाँलिटिकल तसेच धार्मिक संस्थेसोबत आपण कोणत्याही आँरगनाइझेशन मध्ये डोनेशन करता येते.

7) सेक्शन 80E अंतर्गत एज्यूकेशन लोनचे रिपेमेंट:

 शैक्षणिक कर्जासाठी दिलेल्या व्याज घटक कर कपातीस अनुमती आहे.

शैक्षणिक कर्जाच्या व्याज परतफेडीवर कोणतीही कमाल मर्यादा राहत नाही.