मृत्युपत्र, इच्छापत्र – Will म्हणजे काय? व ते कसे बनवतात ? – Will – testament information Marathi

मृत्युपत्रा विषयी इच्छापत्र माहीती   Will testament information Marathi

 आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपल्या मृत्यु पश्चात आपल्या कुटुंबातील काही विशिष्ठ व्यक्तींनाच आपली संपत्ती,मालमत्ता प्राप्त व्हावी म्हणुन आपण जिवंतपणे आपल्या संपत्तीविषयी आपली एक विल तयार करत असतो.ज्यास ईच्छापत्र तसेच मृत्युपत्र असे देखील म्हटले जाते.

यात आपण स्पष्टपणे आपली ईच्छा व्यक्त करत असतो की आपल्या मृत्युनंतर आपली संपत्ती,मालमत्ता आपल्या कुटुंबात कोणाला दिली जावी तसेच किती दिली जावी.

जेणेकरून आपल्या मृत्युनंतर आपल्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये,भावा भावांत,इस्टेटीच्या वाटणीवरून कुठलीही भांडण,तंटा तसेच घरातील व्यक्तींमध्ये वाद विवाद होत नाहीत.म्हणुन आपण पुढे अडचणी निर्माण होऊ नये यासाठी आधीपासुन प्रत्येकाने जिवंतपणे आपले मृत्युपत्र तयार करून ठेवणे खुप गरजेचे असते.

आजच्या लेखात आपण मृत्युपत्राविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.ज्यात आपण मृत्युपत्राबददल जाणुन घ्यावयाच्या सर्व महत्वाच्या बाबी समजुन घेणार आहोत.

 

मृत्युपत्र म्हणजे काय?

 मृत्युपत्र हे एक कायदेशीर विल तसेच कागदपत्र असते.ज्यात आपण आपल्या मृत्युनंतर आपल्या संपत्ती मालमत्तेचे काय केले जावे याबाबद आपली एक ईच्छा व्यक्त करत असतो.

थोडक्यात आपल्या मृत्युनंतर आपल्या सर्व इस्टेटीची वाटणी कशापदधतीने केली जावी यासंबंधीचे बनवलेले एक लिगल डाँक्युमेंट असते.

यात आपण आपल्या इस्टेटीतुन एखाद्या नातेसंबंधी तसेच कुटुंबातील व्यक्तीला बेदखल देखील करू शकतो.तसेच आपण कुटुंबातील एखाद्याला जास्त वाटा देणे इतरांना कमी वाटा देणे असे देखील करू शकतो.

बहुतेक जण आपली सर्व इस्टेट कुटुंबीय,तसेच नातेसंबंधी यांच्यात वितरीत न करता सरळ एखाद्या संस्थेला देखील दान करून देत असतात.

 

मृत्युपत्र कोण तयार करू शकते?

 ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन ठिक आहे आणि तो  सज्ञान देखील आहे अशी प्रत्येक व्यक्ती आपल्या मृत्यु नंतर आपल्या सर्व इस्टेटीचे काय केले जावे तसेच तिचे वितरण कोठे आणि कसे केले जावे याबाबद आपले एक मृत्युपत्र तयार करू शकते.

See also  भारतीय राज्यघटना (Indian Constitution In Marathi) - जाणून घ्या आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य

लहान मुल तसेच आपले मानसिक संतुलन ठिक नसलेली व्यक्ती आपले मृत्युपत्र तयार करू शकत नसते.

मृत्युपत्र तयार करणे का गरजेचे आहे?

 मृत्युपत्र तयार करणे हे कायद्याने प्रत्येकाला बंधनकारक नसते.पण आपल्या मृत्युनंतर आपल्या संपत्तीच्या वाटणीवरून घरातील सदस्यांमध्ये नातलगांमध्ये वाटा हिस्स्यावरून वादविवाद,भांडण,तंटा तसेच गैरसमज निर्माण होऊन त्यांचे आपापसातील संबंध खराब होऊ नये कधी कधी इस्टेटीच्या कमी जास्त झालेल्या वाटणीवरून सख्खे भाऊ बहिण देखील एकमेकाच्या जीवावर उठत असतात.

म्हणुन आपण आधीपासुन आपले कायदेशीर एक मृत्युपत्र तयार करणे फार गरजेचे असते.

आणि मृत्युपत्र तयार केल्याने आपल्या मृत्यु नंतर आपल्या कुटुंबियांना आपल्या संपत्तीची समान वाटणी करत बसण्यास तसेच कायदेशीर कारवाई करण्यात वेळ वाया घालवावा लागत नसतो म्हणजेच दिरंगाई होत नसते.

मृत्युपत्र तयार करण्यासंबंधी जाणुन घ्यावयाच्या काही महत्वाच्या बाबी

 

 • आपल्याला जी भाषा येत असेल त्या भाषेत आपण मृत्यूपत्र तयार करायला हवे.

 

 • मुत्युपत्रात आपण आपली विल स्व ईच्छेने बनवतो आहे कोणाच्या दबावात येऊन नाही असे देखील नमुद करावे.

 

 • आपल्या मृत्युपत्रात आपण काय लिहिले आहे हे आपल्या वारसदारांना सांगु नये अन्थया आपल्या जिवंतपणेच त्यांच्यात वाटा हिस्स्यावरून वादविवाद होऊ शकतात.

 

 • आपल्या मृत्युपत्राची कायदेशीर नोंदणी करून घेणे कधीही चांगले कारण समजा आपल्याकडुन एक प्रत हरवली तरी सरकारी कार्यालयातुन आपण दुसरी प्रत मिळवू शकतो.तसेच कायदेशीर नोंदणी केल्याने आपले मृत्युपत्र बनावट तसेच खोटे आहे असा दावा कोणी करू शकत नसते.

 

 • मुत्युपत्र तयार करत असताना तसेच त्यावर आपली स्वाक्षरी करत असताना दोन साक्षीदार समोर असायला हवेत.

 

 • ज्याने आपले मृत्युपत्र तयार केले आहे त्याच्या सही सोबत त्याच्या साक्षीदारांनी देखील सही करणे गरजेचे असते.

 

 • मृत्युपत्र तयार करण्यापुर्वी आपण आपल्या फँमिली डाँक्टरकडुन आपण मेंटली फिट असल्याचे सर्टिफिकिट देखील तयार करून घ्यायला हवे.जेणेकरून पुढे जाऊन आपण मृत्युपत्र तयार करत असताना मेंटली फिट नव्हतो असे सिदध होऊन आपले मृत्युपत्र आपल्या पश्चात अग्राह्य ठरवण्याचे प्राँब्लेम येत नसतात.
See also  जागतिक ग्राहक हक्क दिन २०२३ का साजरा केला जातो? । इतिहास । World Consumer Rights Day In Marathi

 

 • आपल्याला आपल्या मृत्युपत्राची कायदेशीर नोंदणी करायची नसेल तर आपण ते नोटराईज्ड करून घ्यायला हवे.

 

 • जेव्हा आपण आपले नवीन मृत्युपत्र तयार करत असतो तेव्हा आधीचे मृत्युपत्र आपण रदद केले आहे असे नमुद करायला हवे.

 

 • आपल्या मृत्युपत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्यापेक्षा कमी वय असलेल्या तसेच विश्वासु व्यक्तीची नेमणुक करायला हवी.

 

 • मृत्युपत्राची भाषा ही स्पष्ट आणि समजेल अशी असायला हवी.

मृत्युपत्र तयार करण्याचे कोणकोणते फायदे असतात?- Will – testament information Marathi

 

 •  मृत्युपत्र हे आपल्या पश्चात आपल्या संपत्तीचे काय केले जावे याबाबतची आपली ईच्छा असते ज्यात आपण कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जास्त तसेच कमी वाटा देऊ शकतो किंवा आपली ईच्छा असेल की आपल्या संपत्तीतुन त्याला काहीच प्राप्त होऊ नये तर आपण त्याला बेदखल देखील करू शकतो.म्हणजेच मृत्युपत्र तयार करून आपल्या मृत्युनंतर आपल्या संपत्तीची आपल्या मर्जीनुसार वाटणी केली जावी हे आपण सुनिश्चित करू शकतो.

 

 • आपण जर आधीपासुन आपले मृत्युपत्र तयार करून ठेवले तर आपल्या मृत्युनंतर आपली संपत्ती कोणाला जास्त प्राप्त होईल कोणाला कमी प्राप्त होईल यावरून घरात कुटुंबियांत नातलगांत भांडण होत नसते.

 

 • याचसोबत आपली जर ईच्छा असेल की आपल्या मृत्यु नंतर आपली पुर्ण संपत्ती एखाद्या गरीब अनाथ अपंग मुलांचा सांभाळ करत असलेल्या संस्थेला दिली जावी तर मृत्युपत्र तयार केल्याने आपल्या मृत्युनंतर आपली सर्व संपत्ती कुटुंब नातलगांतील कोणालाही वितरीत न करता सरळ त्या संस्थेला कायदेशीर पदधतीने दान केली जाते.

 

 • आपली जर ईच्छा असेल की आपल्या मृत्युनंतर आपले अवयव एखाद्या गरजूला दान करण्यात यावे तर आपण त्याबाबद देखील आपल्या मृत्युपत्रात तशी नोंद करू शकतो.याने आपल्या मृत्युनंतर आपले अवयव एखाद्या गरजुला दान केले जातात.

मृत्युपत्र कधी तयार करावे?

 खुप जण आपले जण मृत्युपत्र वृदधाल्पकाळात तयार करत असतात पण खरे सांगायला गेले तर जीवणाचा आज काहीच भरवसा राहिलेला नाहीये वेळ आणि काळ कधीही सांगुन येत नसतो.

See also  वाहन फिटनेस प्रमाणपत्र विषयी संपूर्ण माहिती - Vehicle fitness certificate information in Marathi

अशात कधीही आपला एखाद्या अपघातात तसेच शारीरीक आजाराने जसे की हार्ट अटँक मुळे मृत्यू होऊ शकतो.

म्हणुन आपण आधीपासुनच 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर आपले मृत्युपत्र तयार करून ठेवायलाच हवे.

 

मृत्युपत्राचे साक्षीदार असलेल्या व्यक्तींसाठी नियम

 कायद्यात असे दिले आहे की मृत्युपत्र तयार करत असलेल्या व्यक्तीने कोणत्याही दोन साक्षीदारांसमोर आपल्या मृत्युपत्रावर सही करायला हवी.

 • पण मृत्युपत्रात मृत्युपत्र तयार करत असलेल्या व्यक्तीने काय लिहिले आहे हे साक्षीदारांना जाणुन घ्यायची अजिबात आवश्यकता नसते.त्यांना फक्त हा पुरावा देण्यासाठी समोर ठेवले जाते की आपण आपल्या मृत्युपत्रावर त्यांच्या समोर सही केली आहे.जेणेकरून भविष्यात मृत्युपत्राविषयी काही समस्या उदभवली तर ते दोन साक्षीदार कोर्टात येऊन आपली साक्ष देऊ शकतात की ह्या मृत्युपत्रावर त्यांच्यासमोर सही करण्यात आली आहे.

 

मृत्युपत्रात वापरल्या जात असलेल्या प्रमुख संज्ञा

 1)टेस्टेटरहा तो तो व्यक्ती असतो जो आपले मृत्युपत्र तयार करत आहे.

2) बेनिफिशर :मुत्युपत्रात नोंद केलेली इस्टेटीची वारसदार व्यक्ती

3) एक्झिक्युटर :हा आपल्या मृत्युपत्राची अंमलबजावणी करणारा मृत्युपत्राचा एक कायदेशीर प्रतिनिधी असतो.जो आपल्या मृत्युपत्रात दिल्याप्रमाणे आपल्या मालमत्तेचे वितरण करत असतो.

4) कोडिसील :हे एक लिगल डाँक्युमेंट असते जे मृत्युपत्र अटँच करण्यासाठी किंवा त्यात थोडेफार बदल घडवून आणण्यासाठी वापरले जाते.

 

मृत्युपत्रातील महत्वाचे घटक

 1)पर्सनल डिटेल -यात मृत्युपत्र तयार करत असलेल्या व्यक्तीचे नाव,त्याचा पत्ता आणि जन्मतारीख दिलेली असते.

2) डिक्लेरेशन डेट :ही मुत्त्युपत्र तयार केले गेलेल्या दिवसाची तारीख असते.

3) व्हँलीडेट फ्री व्हील :यात मृत्युपत्र तयार करत असलेल्या व्यक्तीने असा खुलासा केलेला असतो की तो त्याच्या स्व इच्छेने हे मृत्युपत्र तयार करतो आहे त्याच्यावर कुठलाही दबाब आणला जात नाहीये.

4) अँसेट आणि बेनिफिशरी यांची डिटेल :यात आपण आपल्या सर्व मालमत्तेची म्हणजे विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तेची एक यादी तयार करत असतो आणि त्यातून कुठली मालमत्ता कोणाला किती दिली जावी हे सांगितलेले असते

उदा.बंँकेतील रक्कम,घर,शेती,जमीन इत्यादी

भाऊ,बहिण,मुलगा,मुलगी,पत्नी इत्यादी

5) सही :यात मृत्युपत्र तयार करत असलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी घेतली जाते.

6) साक्षीदारांची सही :यात मृत्यपत्रावर सही करत असताना किमान आपल्या समोर दोन साक्षीदार असावे लागतात ज्यांची ह्यासाठी सही घेतली जाते.की आपल्या मृत्युपत्रावर सही करत असताना ते आपल्या समोर पुरावा म्हणुन उपस्थित होते.