पीएम मित्रा योजना काय आहे? -PM MITRA scheme meaning in Marathi

पीएम मित्रा योजना काय आहे? -PM MITRA scheme meaning in Marathi

भारतीय अर्थव्यवस्था मध्ये सर्वात जुना उद्योग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापड उद्योग क्षेत्रासाठी एक खुप आनंदाची बातमी नुकतीच समोर आली आहे.

नुकतीच मेगा टेक्सटाइल पार्कला केंद्र सरकारच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी यांबाबत अधिकृत घोषणा केली आहे की पीएम मित्रा योजनेअंतर्गत लवकरच भारत देशातील एकुण 7 राज्यांमध्ये मेगा टेक्सटाइल पार्क हे उभारण्यात येणार आहे.

हे पार्क महाराष्ट्र,तेलंगणा, तामिळनाडू,गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अणि उत्तर प्रदेश अशा सात राज्यांत हे मेगा टेक्सटाइल पार्क उभारले जाणार आहे.यासाठी 4,445 करोड इतके मेगाबजेट देखील तयार करण्यात

आलेले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम मित्रा विषयी-

नरेंद्र मोदी यांनी याबाबद आपल्या आॅफिशिअल टविटर अकाऊंट वरून टविट करून देखील अधिक माहिती देताना सांगितले आहे की

पीएम मित्रा मेगा टेक्सटाइल मेगा टेक्सटाइल पार्क्स हे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील,तसेच कोट्यवधींची गुंतवणूक आकर्षित करतील आणि लाखो रोजगार देखील निर्माण करतील.अणि हे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’चे उत्तम उदाहरण असणार आहे.

पीएम मित्रा मेगा टेक्सटाईल पार्क्स 5F (फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन) ह्या मिशनच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्याचे काम हे करतील. 

ह्या फाईव्ह एफ मिशन मध्ये पहिले शेतातील कापुस पिक वगैरे यांना फायबर मध्ये रूपांतरीत केले जाईल मग यांना कारखान्यात आणले जाईल.मग त्याला फॅशन मध्ये रूपांतरीत केले जाणार आहे.मग शेवटी त्याची परदेशात निर्यात देखील केली जाणार आहे.

See also  श्रावण महिन्याच महात्म्य -Shravan month importance

अणि हे मेगा टेक्सटाईल पार्क तामिळनाडू,तेलंगणा, कर्नाटक,महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांत उभारले जातील हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे.

हया योजनेच्या माध्यमातून आपल्या भारत देशातील कापड उद्योग क्षेत्राला अधिक चालना प्राप्त होत होणार आहे.

काय आहे ही पीएम मित्रा योजना?कसे असणार याचे स्वरूप

पीएम मित्रा ही एक योजना आहे.जिच्या माध्यमातून भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्सटाइल पार्क उभारले जाणार आहेत.

इंटिग्रेटेड पार्क म्हणजे काय?

म्हणजे यात एका पार्कमध्ये आपणास इंक्युबेशन सेक्टर म्हणजेच उष्मायन क्षेत्र,काॅमन प्रोसेसिंग हाऊस,काॅमन इफलुएंट ट्रिटमेंट प्लांट इत्यादी गोष्टी पाहायला मिळणार आहे.

तसेच टेक्सटाइल इंडस्ट्रीजशी संबंधित जेवढ्याही इतर सोय  सुविधा आहेत ज्यांची मागणी केली जात असते जसे की डिझाइन सेंटर टेस्टिंग सेंटर ह्या सर्व सोयी सुविधा आपणास एकाच पार्कमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

म्हणजेच हे एक आॅल इन वन पार्क असणार आहे.ज्यात कताई,विणकाम, प्रक्रिया करणे रंगवणे, मुद्रण वस्त्र उत्पादन हया सर्व गोष्टी एकाच ठिकाणी केल्या जाणार आहे.

 कुठे कुठे उभारले जातील हे पार्क –

तामिळनाडु राज्यामध्ये व्रिदधुनगर, तेलंगणा मध्ये वरंगल, कर्नाटका मध्ये कालाबुरगी, महाराष्ट्र मध्ये अमरावती गुजरात मध्ये नवसारी मध्य प्रदेश मध्ये धार उत्तर प्रदेश मध्ये लखनौ ह्या ठिकाणी हे पार्क उभारले जाणार आहे.

पीएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क योजनामुळे होणारे फायदे –

  • भारतातील पुरवठा साखळी एकात्मिक होणार आहे टेक्सटाइल सेक्टर जे वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारलेले होते ते ह्यामुळे एका जागी येणार आहे म्हणजे एकात्मिक होताना दिसुन येतील.
  • टेक्सटाइल क्षेत्रातील रोजगाराच्या संधीमध्ये अधिक वाढ होणार आहे.साधारणत २० लाख बेरोजगारांना रोजगार प्राप्त होणार आहे.
  • भारत देशाला आपल्या देशातील टेक्सटाइल क्षेत्रातील मागणी सोबत इतर देशातील टेक्सटाइल क्षेत्रातील वाढत्या मागण्या देखील पुर्ण करता येणार आहे.
See also  ओटी म्हणजे काय?OT फुलफाँर्म काय होतो - OT full form in Marathi

पीएम मित्रचा फुलफाॅम काय होतो?

 पीएम मित्रचा फुलफाॅम प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाइल रीजन अॅड अॅपरल असा होतो.