गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशन आयडीया Ganesh chaturthi decoration idea at home

गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशन आयडीया Ganesh chaturthi decoration idea at home

मित्रांनो गणेश चतुर्थी मध्ये गणपतीसाठी मंडप बांधण्यापासुन तर फुलांची योग्यपणे सजावट करण्यापर्यत अशी सर्व कामे गणेशोत्सवात आपण करत असतो.

गणपती बाप्पा आपल्या घरी यायला आता दोनच दिवस उरलेले आहेत.यासाठी सगळीकडे बाप्पाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू आहे.

घरोघरी बाप्पाला घरी आणण्याआधी सजावट करायला सुरूवात झाली आहे.

पण काही जण असे देखील आहेत ज्यांच्याकडे गणपतीच्या सजावटीसाठी डेकोरेशन साठी अजुनही काही उत्तम विकल्प आयडीया नाहीये.

पण घाबरू नका मित्रांनो कारण आज आपण गणपती बाप्पाचे आगमन करण्यासाठी साजसजावटीच्या काही उत्तम आयडीया देणार आहोत.

गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशन आयडीया कोणकोणत्या आहेत?Ganesh chaturthi decoration idea at home

गणेश चतुर्थीसाठी घरगुती डेकोरेशनच्या काही उत्तम आयडीया पुढीलप्रमाणे आहेत-

● आपण गणपती बाप्पाची सजावट इको फ्रेंडली पदधतीने देखील करू शकतो.अणि आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे गरजेचे सुदधा झाले आहे.

गणपती बाप्पावर फुलांनी साजसजावट करणे हा डेकोरेशनचा एक उत्तम इको फ्रेंडली पर्याय आहे.याने बाप्पाच्या साजसजावटीला वेगळा लुक मिळेल.अणि तो सुंदर देखील दिसेल.अणि फुलांमध्ये अशी क्षमता आहे की ते कुठल्याही सेट अपला सुशोभित करू शकतात.गणपती बाप्पाच्या साजसजावटीस याने एक वेगळाच नैसर्गिक स्पर्श प्राप्त होत असतो.फुले ही शुदधतेचे अणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात.

किंवा आपण कागदाचे पंख बनवू शकतो.हे पंख आपण विविध आकार अणि रंगात बनवू शकतो.यांना आकर्षकपणा प्राप्त व्हावा यासाठी आपण त्यावर छोटासा आरसा चिकटवला तरी चालेल.कागदाच्या पंखावर चमकणारया रंगांचा वापर देखील करू शकतो.

● गणेश चतुर्थीला आपण रंगीबेरंगी कागदांनी देखील सजावट करू शकतो.फुल,कागदी पंख,हार,वाँल हँगिग्ज अशा साजसजावटीच्या वस्तू बनवायला आपण फ्लोरोसेंट निवडु शकतो.बाप्पाच्या मुर्तीच्या दोन्ही बाजुला कागदांची फुले ठेवू शकतो.किंवा आपण फुलपाखरू छत्री इत्यादी अशा डिझाईन देखील बनवू शकतो.

● फुग्यांचा वापर करून सुदधा आपण सजावट करू शकतो.घरात फुग्यांनी साजसजावट करण्याकरीता आपण बलून थीमचा वापर करू शकतो.एक फुगा बनवायला आपण अनेक फुग्यांना मिक्स देखील करू शकतो.नाहीतर पुर्ण भिंतच फुग्यांनी झाकली तरी छान दिसेल.

See also  युकेजी अणि एलकेजी चा फुलफाँर्म - UKG and LKG full form in marathi

● ज्यांच्याकडे खुप क्रिएटिव्ह सजावट करायला पुरेसा वेळ नाहीये किंवा त्यांना क्रिएटिव्ह साजसजावट जमत नही अशा व्यक्ती थर्माकाँल अणि फुलांपासुन तयार केलेले रेडिमेड मंडप,विविध आकारात प्राप्त होणारे गणपतीचे पंडाल घेतले तरी चालेल. अणि मुर्तीला आकर्षक पणा प्राप्त होण्याकरीता आपण स्ट्रिंग लाईट,स्पाँट लाईट,फँन्सी कंदील इत्यादी वस्तुंचा वापर देखील करू शकतो.

● गणपती बाप्पाची सजावट करायला जर आपणास ताजी कागदी फुले उपलब्ध होत नसतील तर आपण ओरिगामी पेपर्सचा वापर करून देखील साजसजावट करू शकतो.जर आपल्याकडे सजावट करायला खुप कमी कालावधी असेल तर साजसजावट करायला बाजारात जाऊन आपण रेडिमेड कागदी फुले आणु शकतो.

● घरातील खिडकी दरवाजाचे जुने पडदे साडी दुपटटा यापासुन देखील आपण गणपतीची सजावट करू शकतो.आपल्या प्रत्येकाच्या घरात ब्लिंगी पेस्टल अशा विविध प्रकारचे पडदे असतात दुपटटे असतात.

आपण चमकदार रंग असलेल्या दुपटटयापासुन घरातच एक सुंदर आकर्षक हँगिग स्टाईल पदधतीची सजावट आपण करू शकतो.ह्यांच पडद्यांचा वापर करून आपण बाप्पाच्या मुर्तीवर टांगलेली रचना तयार करू शकतो.अधिक सुशोभित पदधतीने साजसजावट करायला आपण पेस्टल रंग असलेले घरातील पडदे सुदधा वापरू शकतो.

● याचसोबत आपण गणपतीच्या बँक ग्राऊंडला चमकदार असे दिवे लावू शकतो.याने सजावटीला अजुन आकर्षकता प्राप्त होत असते.आपण लेयरच्या फाँर्ममध्ये दिवे लटकवू शकतो.अणि गणपती बाप्पाच्या मुर्तीवर एक फाँल इफेक्ट सुदधा तयार करू शकतो.