गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ताचा संपुर्ण अर्थ अणि साँग लिरिक्स – Sukhkarta Dukhharta Aarti meaning and song lyrics in Marathi

गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ताचा संपुर्ण अर्थ अणि साँग लिरिक्स – Sukhkarta Dukhharta Aarti meaning and song lyrics in Marathi

मित्रांनो लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होत आहे.गणपती बाप्पा घरात आले की सगळीकडे मांगल्य प्रसन्नतेचे वातावरण असते.

गणेशोत्सवात सगळीकडे गणपती बाप्पाची पुजा आरती केली जात असते.आज आपण गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ता चा संपुर्ण अर्थ जाणुन घेणार आहोत.

आरती म्हणजे काय?

आपण सर्व जण भक्ती भावनेने,श्रदधेने भावुकपणे,आर्त भावनेने,विरहाच्या दुखाने भरलेली,परमेश्वराची स्तुती गुणगान असणारी जी प्रार्थना म्हणत असतो.तिलाच आरती असे म्हणतात.

सुख कर्ता दुखकर्ता ही आरती कोणी लिहिली आहे?

सुखकर्ता दुखकर्ता ही गणपती बाप्पाची आरती साडे तीनशे वर्षापुर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली होती.

सुखकर्ता दूखकर्ता वार्ता विघ्नाची ही गणपती बाप्पाची आरती समर्थ रामदास यांनी मोरगाव येथील मोरेश्वर ह्या मंदिरात रचली असल्याचे म्हटले जाते.

गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ता साँग लिरिक्स मराठी ganpati aarti sukhkarta dukhharta song lyrics in Marathi

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वागी सुंदर उटी शेंदुराची
उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामनापुरती
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामनापुरती
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

See also  प्लँगँरिझम म्हणजे काय?- Meaning Of Plagiarism In Marathi

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुमकुम केशरा
चंदनाची उटी कूमकुम केशरा

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा
शोभतो बरा

रूणझुणती नुपुरे रूणझुनती नुपुरे
चरणी घागरीया
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

दर्शनमात्रे मन कामनापुरती
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

लंबोदर पितांबर फणीवर बंधना
फणिवर बंधना

सरळ सोंड वर्क्रतोंड त्रिनयना
सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना
वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
सुरवरवंदना

जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती
दर्शनमात्रे मन कामनापुरती
जय देव जय देव जय मंगलमुर्ती
ओ श्रीमंगलमुर्ती

घालीन लोटांगण वंदिन चरण
डोळयाने पाहीन रूप तुझे

प्रेमे अलिंगन आनंदे पुजिन
भावे ओवाळीन म्हणे नामा

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधु सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
त्वमेव सर्वम ममदेव देव

कायेन वाचा मनसेंद्रीये व्रा
बुद्धयात्मनावा वा प्रकृतीस्वभावा

करोमी यध्यत सकल परस्मे
नारायणायेती समर्पयामी

अच्युतम केशवम रामनारायण
कृष्णदामोदर वासुदेव हरीम

श्रीधरम माधवम गोपिका वल्लभ
जानकीनायकं रामचंद्रभजे

हरे राम हरे राम
राम राम हरे हरे

हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे

गणपती बाप्पाच्या आरतीचा अर्थ-ganpati bappa aarti meaning in Marathi

आज आपण गणपती बाप्पाच्या सुख कर्ता दुखहर्ता ह्या आरतीचा संपुर्ण अर्थ समजुन घेऊया.

गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ताचा फार सुंदर अर्थ होतो.पण आपल्यातील खुप जणांना गणपती बाप्पाची आरती म्हणता येते पण ह्या आरतीचा मुळ अर्थ काय होतो हेच माहीत नसते.

म्हणुन कधीकधी आपल्याकडुन ह्या आरती मधील काही शब्दांचे अनावधानाने चुकीचे उच्चारण केले जात असते.ज्यामुळे ह्या आरतीचा मुळ अर्थच बदलुन जात असतो.

See also  Trade mark म्हणजे काय? ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स - Trade mark complete information in Marathi

म्हणुन आज आपण गणपती बाप्पाच्या आरतीमधील प्रत्येक कडव्याचा अर्थ जाणुन घेणार आहे.

सुखकर्ता दुखहर्ता -सुख देणारा अणि दुखाचे हरण करणारा तु देव आहे.

वार्ता विघ्नाची नुरवी -आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी काही ना काही वार्ता आपल्यापर्यत पोहचत असते.आपल्या सभोवताली कायम सुख समाधान आणि आनंद नांदावे.दुखाचा लवलेशही आपल्या जीवनात नसावा.म्हणुन आपल्यापर्यत दुखाची विघ्नाची संकटाची कोणतीही बातमी येऊ नये.आपल्या सभोवताली संकट दुख हे राहुच नये.यात नुरवी म्हणजे न उरणे असा अर्थ होत असतो.

पुरवी प्रेम कृपा जयाची -बाप्पा तुझी आमच्यावर कृपा झाल्यावर आम्हा भक्तांना प्रेमवर्षावाचा लाभ प्राप्त होतो.

सर्वागी सुंदर उटी शेंदुराची -गणपती बाप्पा हे सर्वागाने सुंदर आहे.अणि त्यांनी शेंदुराची उटी देखील लावली आहे.

कंठी झळके माळ मुक्ताफळांची -बाप्पाच्या कंठात सुंदर अशी एक मोत्याची माळ झळाळत आहे.

जय देव जय देव जय मंगलमुर्ती,दर्शनमात्रे मन कामनापुर्ती -हे देवा तुझा जयजयकार असो.तु मंगलाची प्रत्यक्ष मुर्ती आहे.तुझ्या भक्त दर्शनानेच सर्व भक्तांच्या मनोकामना पुर्ण होऊन जातात.

रत्नखचित फरा तुजगौरी कुमरा -हे गौरीकुमार जडवलेला मुकुटाचा पुढील भाग हा तुझ्या कपाळी आहे.

चंदनाची उटी कुमकुम केशरा -कुंकु अणि केशर यांनी मिश्रित अशी चंदनाची उटी तु लावलेली आहेस.

हिरेजडीत मुकुट शोभतो बरा -हिरयांनी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकी शोभुन दिसत आहे.

रूणझुनती नुपुरे चरणी घागरीया -तुझ्या पायातील वाळयांतील घुंगरूचा रूणझुण असा मंजुळध्वनी होतो आहे.

लंबोदर पितांबर फणिवर बंधना

-बाप्पा तुझे उदर मोठे आहे अणि तु पितांबर धारण केले आहेस.व कमरेस नागाचे बंधन तसेच कडधोरा आहे असे तुझे रूप आहे.

सरळ सोंड वर्क्रतोंड त्रिनयना -सरळ सोंड अणि वक्र तोंड असलेला म्हणजे वाईट वाममार्गाने चालत असलेल्या बोलत असलेल्या व्यक्तीस शिक्षा करून सरळ मार्गाने आणणारा.

राम दासाचा वाट पाहे सदना-

हे गणपती बाप्पा मी रामाचा दास माझ्या घरी तुझी आतुरतेने वाट बघतो आहे.

See also  मोबाइल वाँलेट म्हणजे काय? ई वाँलेट,डिजीटल वाँलेट चा वापर ,प्रकार व फायदे - संपूर्ण माहीती - Mobile wallet information in Marathi

संकटी पावावे –

हे सुरवरवंदना सर्वश्रेष्ठ देवांकडून वंदिल्या जाणारया गजानना,सर्व संकट प्रसंगी तु माझ्यावर प्रसन्न हो माझा सांभाळ कर

निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना –

अखेरीच्या देहत्यागाच्या वेळी माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना

3 thoughts on “गणपती बाप्पाची आरती सुखकर्ता दुखहर्ताचा संपुर्ण अर्थ अणि साँग लिरिक्स – Sukhkarta Dukhharta Aarti meaning and song lyrics in Marathi”

  1. एक चांगला प्रयत्न भक्तासाठी आरती चा अर्थ कळताच अजून गांभीर्याने आरती करता येते..
    ह्या साठी आभार तुमचे….

  2. अर्थ स आरती ची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

Comments are closed.