जागतिक वारसा दिन का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? world heritage day in Marathi
आज १८ एप्रिल २०२३ म्हणजेच जागतिक वारसा दिन.हया विश्वातील सर्व निवडक वारसा स्थळांचा सुवर्ण इतिहास तसेच वारसा यांचे जतन करण्याचा महत्वपूर्ण दिवस आहे.
दरवर्षी हा दिवस सर्व लोकांना जागतिक पातळीवर आपल्या समृद्ध वारशांची जाणीव करून देण्यासाठी १८ एप्रिल रोजी साजरा केला जातो.
ज्यामुळे लोकांना आपल्या संस्कृती परंपरा नीट जाणुन घेण्यास मदत होते अणि आपणास तिचे जतन देखील करता येते.
आज संपूर्ण विश्वात अशी अनेक जागतिक वारसा स्थळे आहेत जी कालांतरानुसार जीर्ण होत चाललेली आहेत.हया अशा दिवसेंदिवस जीर्ण होत चाललेल्या जागतिक वारसा स्थळांचे बांधकाम करण्यात यावे यांचे जतन केले जावे यासाठी जागतिक वारसा दिन दरवर्षी जागतिक पातळीवर साजरा केला जातो.
जागतिक वारसा दिना निमित्त काही कोट्स
जागतिक वारसा दिनाचा मुख्य हेतु काय आहे?
संपुर्ण विश्वातील मानवी इतिहासाशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक नैसर्गिक वारसा स्थळांचे संवर्धन करणे त्याचे जतन करण्याचा प्रयत्न करणे हा आहे.
आपल्या देशातील संस्कृतीचे सौंदर्य तिचा आजपर्यंत जपण्यात आलेला ऐतिहासिक वारसा
जसे की देशातील महत्वाची स्मारके किल्ले दुर्ग,गड,देशातील प्रमुख पर्यटन स्थळ,देशातील प्रमुख धार्मिक मंदिरे स्थळे इत्यादी यांचे जतन करून आपल्या येणारया पिढीला या सर्वांचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस प्रत्येक देशासाठी खुप महत्वाचा असतो.
याचकरीता युनेसकोच्या वतीने दरवर्षी साधारणत जगातील २५ वारसा स्थळांचा वारसा स्थळांचे नाव आपल्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले जाते.
हे सर्व करण्यामागचा युनेसकोचा मुख्य हेतु हा जगभरातील जीर्ण होत चाललेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांचे बांधकाम करून त्यांचे जतन करणे हा आहे.
आधी हा दिवस जागतिक स्मृती दिन म्हणून साजरा केला जायचा यानंतर युनेस्कोने हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय घेतला होता.
वारसा म्हणजे काय?
पुर्वसुरींकडुन आपणास प्राप्त झालेल्या गोष्टी मग ती एखादी वास्तू असो वस्तु असो स्थावर स्वरूपातील मुर्त गोष्ट असो.
जागतिक वारसा स्थळाचा इतिहास –
१९६८ दरम्यान एका आंतरराष्ट्रीय संघटनेकडुन एक प्रस्तावाची मांडणी करण्यात आली होती.हा प्रस्ताव जगभरातील प्रसिद्ध इमारती अणि नैसर्गिक सौंदर्य स्थळांच्या संरक्षणाच्या उद्दिष्टाने मांडण्यात आला होता.
ह्या प्रस्तावाला स्टॅकहोम येथे भरवलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मंजुरी देखील देण्यात आली होती.मग यानंतर युनेस्कोने जागतिक वारसा केंद्राची देखील स्थापणा केली
युनेस्कोने जागतिक वारसा केंद्राची स्थापना केल्यानंतर प्रथमत हा दिवस १९७८ मध्ये जागतिक स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात आला होता.तेव्हा विश्वातील फक्त १२ स्थळे जागतिक स्मारक स्थळांच्या,ठिकाणांच्या यादीत होती.
यानंतर १९८२ मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक अणि स्थळ परिषदेने जागतिक वारसा दिवस म्हणून हा दिवस ट्युनिशिया येथे साजरा केला होता.यानंतर युनेस्कोने हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली होती.
जागतिक वारसा स्थळांचे महत्व –
प्रत्येक देशातील नैसर्गिक सौंदर्य स्थळे,जुनी ऐतिहासिक तसेच धार्मिक सांस्कृतिक स्थळे ही त्या देशाचा जुना धार्मिक सांस्कृतिक ऐतिहासिक इतिहास कला संस्कृती सांगत असतात तेथील रचल्या गेलेल्या इतिहासाचे गौरवगाथेचे साक्षीदार असतात.
त्या देशाच्या ऐतिहासिक पानावर रचल्या गेलेल्या पराक्रमाची इतिहासाची साक्ष हे जागतिक वारसा स्थळ देत असतात.
जसे आपल्या भारत देशातील शिवाजी महाराजांच्या रचलेल्या जुन्या इतिहासाची पराक्रमाची साक्ष येथील शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेले गड किल्ले दुर्ग देतात ऐतिहासिक वास्तू देतात.
भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ कोणते आहे?
भारतातील प्रथमत जागतिक वारसा स्थळ हे महाराष्ट्र राज्यातील एलोरा लेणी आहे.सध्या आपल्या भारत देशात ४० जागतिक वारसा स्थळे आहेत