आहारातील भुईमुगाचे चे फायदे – Health benefits of in Groundnut
तेलबिया पिकांपैकी भुईमूग प्रमुख पीक आहे. भुईमुगामध्ये कर्बोदके, प्रथिने व तेल हे तिन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. ग्राहकांची या तेलास पसंती व मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टीचा
विचार केल्यास भुईमुगातून चांगला नफा मिळू शकतो.
भुईमूग तेल – Groundnut oil
- भुईमुगामध्ये ४८ ते ५४ टक्के तेलाचे प्रमाण असते.
- तेलामध्ये ८० टक्के असंतृप्त मेदरहित आम्ल (unsaturated fatty acid) व
- २० टक्के संतृप्त मेदयुक्त आम्ल (saturated fatty acid ) असते.
- असंतृप्त मेदरहित आम्लमध्ये ओलेईक व लिनोलेईक हे प्रमुख घटक असतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या भुईमूग वाणामध्ये ओलेईक व लिनोलेईकचे प्रमाण (0/L रेशो कमी अधिक
असते. हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होते.
ओलेईकचे महत्त्व
- रक्तातील अपायकारक (low density lipoprotein ) कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त असते.
- रक्तातील उपयुक्त (low density lipoprotein कोलेस्टेरॉल योग्य प्रमाणात राखण्यास उपयुक्त असते.
- रक्तातील ट्रायग्लिसेरीड triglyceride कमी करण्यास उपयोग होतो. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
- शरीराचे वजन कमी करण्यास त्याचबरोबर कार्यशक्ती वाढविण्यास उपयुक्त असते.
- कॅन्सर व क्षयरोगास प्रतिकार क्षमता वाढते.
प्रथिने : Proteins in Groundnut
- भुईमूग दाण्यामध्ये सर्वसाधारण २४ ते २८ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
- अंडी, दुग्धजन्य पदार्थ, जनावराचे मांस, मासे यांपासून मिळणाऱ्या प्रधिनांपेक्षा भुईमूगातील प्रथिनाची गुणवत्ता अधिक असते.
- कर्बोदके : भुईमूग दाण्यामध्ये सर्वसाधारण १६ ते १८ टक्के कर्बोदकाचे प्रमाण असते. मनुष्याची शारीरिक वाढ त्याबरोबर प्राथमिक कार्यशक्ती निर्माण करण्यास कर्बोदकांचा उपयोग होतो.
भुईमुगाचे दाणे पचनास सुलभ असतात त्यामुळे मधुमेही रोग्यास उपयुक्त खाद्य आहे.
जीवनसत्त्वे : Nutrients in Groundnut
- मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी एकूण १३ जीवनसत्त्वांची गरज असते. यांपैकी नायसीन, फोलोसीन, रोबोफलोवीन, थायमीन, पायरीडॉक्सीन, ‘ई” व “ब’ असे ७ जीवनसत्त्वे भुईमुगात असतात.
खनिज मूलद्रव्ये : Minerals in Groundnut
- मनुष्याच्या शरीराची सुदृढता राखण्यासाठी एकूण २० खनिज मूलद्रव्यांची गरज असते. यांपैकी भुईमुगामध्ये कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅगेनीज, जस्त, लोह व तांबे अशी ६ खनिज मूलद्रव्येअसतात.
गुणवत्ता : Quality of Groundnut
- भुईमूग दाण्यामध्ये उच्च प्रतीचे भौतिक, रासायनिक, पौष्टिक व विशिष्ट गंध गुणवत्ता मूल्य असतात.
- भुईमूग दाण्यापासून विविध खाद्य पदार्थ बनविले जातात.
- प्रत्येक पदार्थासाठी विशिष्ट गुणवत्ता मूल्याची आवश्यकता असते.
- भुईमूग तेलामध्ये ओलीकचे प्रमाण अधिक व लिनोलेईकचे प्रमाण कमी म्हणजे ओलेईक/लिनोलेईकचे प्रमाण ) अधिक त्याबरोबर आयोडीन मूल्य Iodine value कमी प्रमाणात असल्यास खाद्य पदार्थाचा टिकाऊपणा वाढण्यास मदत होते.
वाचा – पुदिना (Mint) चे फायदे
1 thought on “आरोग्यासाठी भुईमूग – Health benefits of in Groundnut”
Comments are closed.