हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे कोणकोणते आहेत?
आपल्या हिंदु धर्मात हनुमान चालीसेला खुप अनन्यसाधारण महत्त्व आहे.
रोज नित्यनियमाने हनुमान चालीसा वाचल्याने श्री हनुमानाची आपल्यावर विशेष कृपा होते.ज्या व्यक्तीवर हनुमानाची कृपा होते त्याच्या वाट्याला कुठलेही संकट दुख येत नाही.
रोज हनुमान चालीसा वाचल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
रोज हनुमान चालीसा वाचल्याने आपल्या आत्मविश्वासात वाढ होत असते.खुप जण असतात ज्यांच्या मध्ये आत्मविश्वासाची कमतरता असल्याने त्यांना आपल्या कार्यात पाहीजे तसे यश प्राप्त होत नाही.
अशा लोकांनी रोज हनुमान चालीसा वाचल्याने त्यांच्या आत्मविश्वासात अधिक वाढ होते.
हनुमान चालीसा वाचल्याने आपण निडर बनतो आपल्याला मृत्यू तसेच कुठल्याही संकटाची,भुत पिशाचाची नकारात्मक शक्तीची कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही.
ज्यांच्या मनात कसली भीती आहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी हात पाय स्वच्छ धुवून हनुमान चालीसा वाचायला हवी.
रात्री अपरात्री आपण अंधारातुन जात असाल अणि आपणास भुतप्रेताची भीती वाटत असेल तर आपण अशा वेळी हनुमान चालीसा पठण करायला हवी.
जे लोक रोज नित्यनियमाने हनुमान चालीसा वाचतात त्यांच्या आर्थिक समस्या देखील लवकर दुर होतात.त्यांच्या कुठल्याही शुभ कार्यात विघ्न निर्माण होत नाही.
आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते.मनातील नकारात्मक विचार दुर होऊन नवीन सकारात्मकता जीवनात येण्यास सुरू होते.आपल्या शरीरात अणि मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
रोज हनुमान चालीसा वाचल्याने आपल्याला जडलेले प्रत्येक आजार रोगांपासून आपणास मुक्ती प्राप्त होते.याने मोठमोठ्या रोगांपासून देखील आपणास मुक्ती प्राप्त होते.
जो रोज हनुमान चालीसा वाचतो तो व्यक्ती हनुमान जींना अधिक प्रिय असतो अशा व्यक्तीचे रक्षण हनुमानजी स्वता करतात.अशा व्यक्तीवर कोणाची वाईट नजर पडत नाही.
अशा व्यक्तीला काहीच कमी पडत नाही.अशा व्यक्तीचे भाग्य बदलुन जाते.जी व्यक्ती हनुमान चालीसा रोज वाचते तिला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
सर्व देवी देवतांची अशा व्यक्तीवर विशेष कृपा दृष्टी होते.हनुमान जी अष्ट सिद्धी नवनिधीचे दाता असल्याने सर्व मनोकामना आपल्या पुर्ण होतील.धन संपत्ती प्राप्त होते.
जे विद्यार्थी रोज हनुमान चालीसा वाचतात त्यांना शालेय जीवनात अभ्यासात चांगले उत्तम यश प्राप्त होते.कारण हनुमानजींना बुदधीचे दैवत देखील म्हटले जाते.
म्हणुनच विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश प्राप्त व्हावे यासाठी चांगल्या अणि तेज बुदधीसाठी हनुमानाची उपासना करतात.
हनुमान चालीसाचे पठन करून आपण शनि देवाला खुश करून अणि आपल्यावरील साडेसाती कमी करू शकतो.
कारण एके दिवशी हनुमानजीने शनी देवाचे रक्षण केले होते तेव्हा खुश होऊन शनिदेवाने हनुमानाला वचन दिले होते की शनिदेव कुठल्याही हनुमान भक्तांचे नुकसान करणार नाही.
त्यांच्या भक्तांवर शनिची साडेसाती पडणार नाही.त्यांच्यावर शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार नाही.
म्हणून आपल्या वरील शनिची साडेसाती कमी करण्यासाठी आपण नियमित हनुमान चालीसा पठण करायला हवे.
नियमित नित्य नियमाने रोज हनुमान चालीसा वाचल्याने आपल्यावर राहुचा दुष्प्रभाव पडत नसतो.म्हणुन ज्यांच्या कुंडली मध्ये राहु आहे त्यांनी राहुच्या दुष्प्रभावापासुन आपला बचाव करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करायलाच हवे.
हनुमान चालीसा वाचल्याने आपल्या स्मरण शक्ती मध्ये वाढ होते सोबत आपल्या एकाग्रता क्षमतेत देखील वाढ होत असते.
हनुमान चालीसा वाचल्याने आपला शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर होऊन आपल्या मनाला मानसिक शांती प्राप्त होते.
हनुमान चालीसा पठण केल्याने शारीरिक बळात अणि क्षमतेत वाढ होते.हेच कारण आहे की मोठमोठ्या कुस्तीच्या आखाड्यात जिम मध्ये देखील हनुमानाचा फोटो आपणास लावलेला दिसुन येत असतो.