Asset आणि Liabilities विषयी माहीती-Assets and Liabilities information in Marathi

Asset आणि Liabilities चे महत्व -Assets and Liabilities information in Marathi.

Money management, saving तसेच finance management चा विषय जेव्हाही निघत असतो तेव्हा Asset आणि Liabilities हे दोन terms खुप महत्वाचे ठरत असतात.

कारण जेव्हा कधीही आपण saving तसेच financial budget तयार करण्याचा प्रयत्न करत असतो.

तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आपल्या Liabilities कोणकोणत्या आहेत?आणि Assets कोणकोणते आहेत हे आधी समजुन घ्यावे लागत असते.

कारण financial budget management आणि money management मध्ये हे दोन term खुपच महत्वाचे असतात जे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण Asset म्हणजे काय?Liabilities म्हणजे काय?आपल्या दैनंदिन जीवणात आपले Asset कोणकोणते असतात?आणि Liabilities कोणकोणत्या असतात हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

Asset म्हणजे काय?-Asset meaning and definition in Marathi.

Asset म्हणजे एखादी संपत्ती,मालमत्ता किंवा धन.ज्यात घर,कार,दागिने जमिन,कंपनी इत्यादीपैकी कशाचाही समावेश होऊ शकतो.

Asset म्हणजे एक अशी वस्तु किंवा गोष्ट जिच्यामुळे आपल्या खिशामध्ये पैसे येत असतात म्हणजेच पैशांची आवक होत असते.

See also  सर्टिफिकेट आॉफ डिपाझिट म्हणजे काय? Certificate of deposit meaning in Marathi

म्हणजे समजा आपल्याकडे दोन कार आहे आणि त्यातील आपण एकाचाच वापर करतो आहे.

आणि एक कार घरासमोर अशीच पडुन आहे अशात आपण ती पडलेली कार जर एखाद्याला भाडयाने चालवायला दिली तर ती कार आपल्यासाठी एक Asset बनत असते.कारण तिच्यामुळे आपल्या खिशात पैसे येत असतात.

Assets चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types of Assets in Marathi.

Assets चे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

1.Intangible Assets :

2.Tangible Asset :

3. Current Asset or not current Asset :

4. Fixed Asset :

1.intangible Assets :

Intangible Asset अमुर्त मालमत्ता.या non physical मालमत्ता तसेच संपत्ती असतात ज्यांना आपण प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही किंवा स्पर्श देखील करू शकत नाही.

परंतु त्या कंपनीसाठी खूप मोलाच्या असतात.म्हणजेच मूर्त मालमत्तांशिवाय कंपनीत,ज्या इतर मालमत्ता शिल्लक असतात,त्यांना आपण-intangible Assets. अमुर्त मालमत्ता असे म्हणत असतो.

Intangible Asset मध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो-

● Goodwill

● Brand recognition,

● Intellectual property जसे की patent,trademark,copyright,

● Prepaid expenses

● Account receivable

● Licenses

2. Tangible Asset :

Tangible Asset मुर्त मालमत्ता.या physical मालमत्ता तसेच संपत्ती-Asset. असतात ज्यांना आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतो किंवा स्पर्श देखील करू शकतो.

Tangible Asset मध्ये पुढील बाबींचा समावेश होत असतो-

● Cash

● Vehicle

● Inventory

● Equipment

● Building

● Investments

3. Current Asset or not current Asset :

Current Asset हे कंपनीच्या अशा सर्व मालमत्तेचे प्रतिनिधित्व करते.जे एका वर्षात standard business operation दवारे सोयीस्करपणे विकले जाणे,वापरणे,संपणे अपेक्षित असते.

Current Asset मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो –current Asset example in Marathi.

● Cash

● Cash equivalent

● Account receivable

● Marketable securities

● Prepaid Liabilities

● Liquid Assets

Not current Asset ला fixed Asset असे देखील म्हटले जाते.म्हणजे ही एक अशी संपत्ती तसेच मालमत्ता असते जिला विकुन तिच्यापासुन पैसे प्राप्त करायला आपणास किमान एक वर्ष लागत असतो.

See also  एका चांगल्या नेत्याचे गुण- Qualities Of Good Leader In Marathi

Not current Asset मध्ये पुढील काही बाबींचा समावेश होतो-

● Long term investment

● जमिनीचा दिर्घकाळाचा व्यवहार

● Building

4. Fixed Asset :

Fixed Asset हे long term tangible Assets चा तसेच equipment चा संदर्भ देत असते.

Fixed Asset म्हणजे अशी संपत्ती तसेच मालमत्ता ज्यातुन आपणास वर्तमानात नही तर भविष्यात नफा मिळत असतो.

म्हणजे अशी संपत्ती किंवा मालमत्ता जिचा वापर आपल्याला किमान एक वर्ष करता येत नसतो.

यालाच long term Asset किंवा not current Asset म्हणुन देखील ओळखले जाते.

Fixed Asset यात पुढील काही बाबींचा समावेश होतो-

● Patent

● Copyright

Trademark

● Leasehold equipment

● Furniture

● Building

● Computer equipment

● Software

● Machinery

Depreciating म्हणजे काय?- Depreciating means and definition in Marathi.

Assets ची monetary value use,झीज,अप्रचलित पणामुळे कालांतराने कमी कमी होत जात असते.आणि हीच घट घसारा म्हणून मोजली जात असते.

Asset management म्हणजे काय?- Asset management definition and means in marathi.

Asset management म्हणजे मूल्य वाढण्याची क्षमता असलेल्या investment चे संपादन करणे तिची देखभाल करणे आणि trading investment करून एकूण संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे होय.

Asset retirement obligation म्हणजे काय-Asset retirement obligation definition and meaning in Marathi.

Asset retirement obligation हे मूर्त-tangible.,दीर्घायुषी मालमत्तेच्या retirement शी संबंधित कायदेशीर दायित्वाचे वर्णन करते.

जेथे भविष्यातील काही तारखेला equipment काढून टाकणे किंवा dangerous material साफ करणे यास कंपनी जबाबदार असते.

Liabilities म्हणजे काय-Liabilities meaning and definition in Marathi.

Liabilities म्हणजे एखादी संपत्ती,मालमत्ता किंवा धन.ज्यात घर,कार,बाईक,दागिने जमिन,कंपनी,एखादे घेतलेले कर्ज,उधार पैसे इत्यादीपैकी कशाचाही समावेश होऊ शकतो.

Liabilities म्हणजे एक अशी वस्तु किंवा गोष्ट जिच्यामुळे आपल्या खिशामधून पैसे जात असतात म्हणजेच पैशांची जावक होत असते.

See also  पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी मधील फरक- Difference Between Police Custody And Judicial Custody In Marathi

म्हणजे समजा आपल्याकडे दोन कार आहे आणि त्यातील आपण एकाचाच वापर करतो आहे.

आणि एक कार घरासमोर अशीच पडुन आहे तिचा काहीच उपयोग होत नाहीये.अशात आपण ती पडलेली कार एखाद्याला भाडयाने देखील चालवायला देत नाहीये जेणेकरून तिच्यापासुन आपल्याला काही income generate होईल.

आणि दर महिन्याला त्या कारचा मेंटेनेंसचा पेट्रोल डिझेलचा खर्च देखील आपण करतो आहे तर ती कार आपल्यासाठी एक Liabilities बनत असते.कारण तिच्यामुळे आपल्या खिशातुन पैसे जात असतात.

Liabilities चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत- Types of Liabilities in Marathi.

Liabilities चे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत-

1.Contingent Liabilities :

2.Current and non current Liabilities :

1.contingent Liabilities :

Contingent Liabilities हे एक उत्तदायित्व तसेच संभाव्य नुकसान असते.जे future मधील घडणारया एखाद्या uncertain घटनेच्या परिणामावर अवलंबुन असू शकते.

Contingent Liabilities मध्ये पुढील बाबीचा समावेश होतो-

● Potential lawsuits

● Product warranty

● Pending inquiry/investigation

● Change in government policy

2.current and non current Liabilities :

Current Liabilities हे कंपनीचे अल्प-मुदतीचे आर्थिक दायित्वे असते जे एका वर्षाच्या आत किंवा सामान्य ऑपरेटिंग सायकलमध्ये देय असते.

Current Liabilities मध्ये पुढील बाबींचा समावेश होत असतो-

● Account payable :

● Short-term debts or loans :

● Cash dividends :

● Notes payable :

● income tax owed :

● Accrued expenses :

Llcs म्हणजे काय?-llcs meaning in Marathi.

Limited liability company हे एक युनायटेड स्टेट मधील business structure आहे.

जे त्याच्या owners ला debt किंवा Liabilities साठी personal responsibility पासून protect करण्याचे काम करते.

Asset आणि Liabilities मध्ये काय फरक आहे-Difference in Asset and Liabilities in Marathi.

● Asset म्हणजे एक अशी वस्तु किंवा गोष्ट जिच्यामुळे आपल्या खिशामध्ये पैसे येत असतात म्हणजेच पैशांची आवक होत असते.

Liabilities म्हणजे एक अशी वस्तु किंवा गोष्ट जिच्यामुळे आपल्या खिशामधून पैसे जात असतात म्हणजेच पैशांची जावक होत असते.

● Asset मध्ये एखादी संपत्ती,मालमत्ता किंवा धन.ज्यात घर,कार,दागिने जमिन,कंपनी एखादी दिर्घकाळासाठी केलेली अशी गुंतवणुक समाविष्ट असते जिथून आपणास income तसेच profit generate होत असतो.

Liabilities मध्ये पडुन असलेली एखादी अशी संपत्ती मालमत्ता जिथुन आपल्याला काहीच income होत नाही उलट त्यावर भरपुर expenses करावे लागतात.जसे की धन.घर,कार,बाईक,दागिने जमिन,कंपनी,एखादे घेतलेले कर्ज,उधार पैसे इत्यादीचा समावेश होतो.

Prepaid expenses म्हणजे काय?-prepaid expenses definition and meaning in Marathi.

Prepaid expenses हा एक future मधील खर्च असतो जो आपण advance मध्ये देत असतो.

Fictitious Assets म्हणजे काय?-fictitious Asset definition and meaning in marathi.

Fictitious Assets हा एक real Asset नसतो.याला कुठलीही exchange value देखील नसते.याने आपण cash देखील generate करू शकत नसतो.यात one time heavy expenses चा समावेश होत असतो.

1 thought on “Asset आणि Liabilities विषयी माहीती-Assets and Liabilities information in Marathi”

Comments are closed.