HBA1C टेस्ट विषयी माहिती HBA1c test information in Marathi
एच बी ए वनसी ही एक ब्लड टेस्ट आहे जिचा उपयोग आपल्या रक्तामध्ये उपस्थित असलेल्या ग्लायकेटस हिमोग्लोबिन याचे प्रमाण मोजण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.
ही ब्लड टेस्ट एखाद्या रूग्णाच्या शरीरातील शेवटच्या २ ते ३ महिन्यातील साखरेचे प्रमाण चेक करण्यासाठी केली जाते.
ज्या रूग्णांना डायबिटीसची समस्या असते अशा रूग्णांना ही टेस्ट करण्यास डाॅक्टरांकडुन सांगितले जाते.
आपल्या शरीरातील डायबिटीस तसेच साखरेचे प्रमाण चेक करण्यासाठी दोन मुख्य टेस्ट प्रामुख्याने केल्या
जात असतात.
१) फिंगर प्रिक टेस्ट –
२) HBA1C टेस्ट –
१)फिंगर प्रिक टेस्ट –
फींगर प्रिक टेस्ट मध्ये रूग्णाच्या बोटाचे थोडे रक्त घेतले जाते.अणि तपासण्यात येते की रूग्णाच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण किती आहे.
ह्या टेस्ट दवारे हे जाणुन घेतले जाते की मागील २४ तासात रुग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण किती होते.
फिंगर प्रिक टेस्ट मध्ये रूग्णाच्या दोन पद्धतीच्या टेस्ट घेतल्या जात असतात.एक टेस्ट उपाशीपोटी घेतली जाते तसेच एक टेस्ट जेवण झाल्यावर घेण्यात येते.
पण ह्या टेस्टच्या माध्यमातून आपणास फक्त हे कळु शकते की मागील २४ तासांत रूग्णाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण किती होते.
जर मागील दोन ते तीन महिन्यांत आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण किती होते हे जर आपणास जाणुन घ्यायचे असेल तर अशावेळी आपल्याला HBA1C ही टेस्ट करणे आवश्यक असते.
२) HBA1C टेस्ट –
HBA1C टेस्टला ग्लायको सायलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट (glycosylated haemoglobin test)असे देखील म्हटले जाते.
आपल्या शरीरातील ज्या लाल रक्तपेशी(Red blood cells) असतात त्यांचा जीवनकाळ तीन महिने इतका राहत असतो.म्हणजे ह्या लाल रक्तपेशी फक्त तीन महिने इतक्या कालावधी करीता जिवंत राहत असतात.
आपल्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अधिक असल्यास ग्लुकोज हिमोग्लोबिनशी जोडले जाते.अणि त्यातुन ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिनची निर्मिती होते.
HBA1C टेस्ट दरम्यान हे चेक केले जाते की आपले एचबी एवनसी एकुण किती आहे.तसेच आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन ग्लुकोजशी कसे अणि किती बांधले जोडले गेले आहे.
आपल्या शरीरातील ग्लूकोज हे हिमोग्लोबिन तसेच लाल रक्तपेशी यांच्याशी १२० दिवसांच्या कालावधीसाठी जोडले जाते.याच कालावधीत आपण चाचणी करत असतो अणि जाणुन घेत असतो की आपल्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण सध्या किती आहे.
जेव्हा आपण एचबी एवनसी टेस्टची रिझल्ट मध्ये पडताळणी करत असतो तेव्हा आपणास याचे प्रमाण टक्केवारीत आढळुन येते.
समजा एखाद्या व्यक्तीच्या रक्तात HBA1C चे प्रमाण ५.७ च्या खाली दाखवत असेल तर त्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नाॅरमल आहे त्याला कुठल्याही प्रकारचा डायबेटिस वगैरे जडलेला नाहीये असे गृहित धरण्यात येते.
पण समजा टेस्ट रिझल्ट मध्ये एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील HBA1C चे प्रमाण ५.७ ते ६.५ दरम्यान दाखवत असेल तर समजून घ्यायचे की त्या व्यक्तीला डायबिटीसची समस्या सुरू झाली आहे.
अणि HBA1C टेस्ट रिझल्टमध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील HBA1C चे प्रमाण ६.५ तसेच त्यापेक्षा अधिक दाखवत असेल तर समजून घ्यायचे त्या व्यक्तीला डायबिटीस झालेला आहे.तो व्यक्ती डायबिटीसचा शिकार झाला आहे.
साधारणतः नाॅरमल व्यक्तींमध्ये ह्या HBA1C चे प्रमाण रिझल्ट मध्ये सहा टक्केपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
आपल्या शरीरातील HBA1C चे प्रमाण वाढल्यावर काय होते?
आपल्या शरीरातील HBA1C चे प्रमाण वाढल्यावर पुढील समस्या आपणास उद्भवतात.
१)अधिक प्रमाणात पाण्याची तहान लागणे
२) अधिक प्रमाणात भुक लागणे
३) वजन कमी होऊ लागणे
४) वारंवार शौचास जाणे
आपल्या रक्तातील HBA1C चे प्रमाण वाढल्यावर इत्यादी समस्यांना आपणास सामोरे जावे लागते.
HBA1C टेस्ट कधी करावी?
जर आपणास खालील दिलेल्या समस्या उदभवत असतील तर आपण त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा अणि आपली HBA1C टेस्ट करून घ्यायला हवी.
एखाद्या व्यक्तीच्या रक्तात किती ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन आहे हे याच्याने लक्षात येते.
ज्या व्यक्तींना डायबिटीसची समस्या असते अशा व्यक्तींच्या रक्तातील HBA1C चे प्रमाण हे सात पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न डाॅक्टर करीत असतात.
कारण रूग्णाच्या रक्तातील HBA1C चे प्रमाण सात पेक्षा अधिक वाढले तर रूग्णाची डायबिटीसची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.अणि त्याला किडनीचा आजार देखील जडण्याची शक्यता असते.
१)अधिक प्रमाणात पाण्याची तहान लागणे
२) अधिक प्रमाणात भुक लागणे
३) वजन कमी होऊ लागणे
४) वारंवार शौचास जाणे
HBA1C टेस्ट करण्याचे फायदे –
ही टेस्ट केल्याने डाॅक्टरांना त्वरीत लक्षात येते की कोणत्या व्यक्तीने मागील तीन महिन्यात आपले ब्लड शुगर किती कंट्रोल केले आहे.