Bank complaint – कुठल्याही बँकेची आँनलाईन पदधतीने आरबी आयकडे तक्रार कशी करायची? -Online Bank Complaint To Rbi In Marathi

Bank complaint -आरबी आयकडे तक्रार कशी करायची? -Online Bank Complaint To Rbi In Marathi

आता आपणास कुठल्याही बँक,एनबीएफसीच्या वाँलेट तसेच इतर सर्विसेस विषयी कुठलीही समस्या असेल तर याची थेट तक्रार आता आपण आरबी आयकडे करू शकणार आहे.

अणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही तक्रार नोंदवण्यासाठी आपणास कुठेही जाण्या येण्याची धावपळ करण्याची आवश्यकता भासणार नाहीये.आपण घरबसल्या आँनलाईन पदधतीने मोबाइल लँपटाँप इंटरनेटचा वापर करून आरबी आयकडे ही तक्रार आँनलाईन नोंदवु शकतो.

आजच्या लेखात आपण हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत की कुठल्याही बँकेविषयी आरबी आयकडे आँनलाईन घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी आपणास काय करावे लागेल?

कोणत्या बाबतीत आपण आरबीआयकडे बँकेविषयी आँनलाईन तक्रार दाखल शकतो?

आपण कुठल्याही बाबतीत आरबीआय कडे आँनलाईन तक्रार नोंदवु शकतो.जसे की बँकेच्या एन बी एफसीच्या वाँलेट सर्विसविषयी तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,लोन,डिपाँझिट,मँनेजमेंट,स्टाफ अशा इत्यादी बाबी तसेच सर्विस विषयी आरबीआयकडे आपण आँनलाईन पदधतीने तक्रार नोंदवु शकतो.

बँक,एनबीएफसी तसेच वाँलेट विषयी आरबी आयकडे तक्रार करायला आपणास काय करावे लागेल?

कोणत्याही बँक,एनबीएफसी तसेच वाँलेट सर्विस विषयी आरबीआयकडे आपली आँनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी आपल्याला Cms.Rbi.Org.In ह्या वेबसाइट वर जावे लागेल.

सी एम एसचा फुलफाँर्म काय होतो?Cms Full Form In Marathi

सी एम एसचा फुलफाँर्म Complaint Management System असा होत असतो.ज्याचा मराठीत तक्रार व्यवस्थापण प्रणाली असा होतो.

कुठल्याही बँक एनबी एफसी विषयी आरबीआयकडे आँनलाईन तक्रार नोंदवण्याची पुर्ण प्रक्रिया –

Process Of Filing Online Complaint Against Bank Nbfc In Marathi

● सर्वप्रथम आपण आरबी आयच्या Cms.Rbi.Org ह्या आरबीआयकडे आँनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या आँफिशिअल वेबसाइटला व्हिझिट करायचे.

● आरबी आयच्या Cms.Rbi.Org ह्या आँफिशिअल वेबसाइट वर गेल्यावर आपल्यासमोर एकुण चार आँप्शन येतील.

● पहिले आँप्शन आहे File A Complaint -तक्रार दाखल करा तसेच नोंदवा

See also  रिव्हेन्यू म्हणजे काय - Revenue meaning in Marathi

ह्या पहिल्या आँप्शनचा वापर करून आपण आरबी आयकडे आपली कुठलीही तक्रार दाखल करू शकतात.

● दुसरे आँप्शन आहे Track Your Complaint -आपल्या तक्रारीचे स्टेटस स्थिती जाणुन घ्या

ह्या दुसरया आँप्शनदवारे आपण आपल्या नोंदवलेल्या तक्रारीचे स्टेटस स्थिती जाणुन घेऊ शकतो.

● तिसरे आँप्शन आहे File And Appeal -तक्रार दाखल करा,नोंदवा अणि आवाहन तसेच विनंती करा.

ह्या तिसरया आँप्शनचा वापर आपण आरबी आयकडे आपली तक्रार दाखल करण्यासाठी अणि मदतीसाठी आवाहन विनंती करण्यासाठी करू शकतो.

● चौथे आँप्शन आहे Feedback -प्रतिसाद द्या

इथे चौथ्या आँप्शनमध्ये आपण आपला फिडबँक नोंदवु शकतो.

आरबी आयकडे बँक,एनबी एफसी वाँलेट विषयी आँनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे –

● आरबी आयकडे कुठल्याही बँकेविषयी तक्रार नोंदवण्यासाठी आपणास File A Complaint ह्या आँप्शनवर क्लीक करावे लागेल.

● फाईल अ कंप्लेट वर ओके केल्यावर एक नवीन टँब ओपन होईल जिथे आपणास एक कँप्चया कोड दिलेला असेल तो जसाच्या तसा आपणास फिल करायचा आहे.अणि नेक्सट बटणवर ओके करायचे आहे.

● यानंतर Complaint Details नावाचे एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपणास Name Of Complaint मध्ये तक्रार करणारया व्यक्तीचे नाव टाकायचे आहे.अणि खाली तक्रार नोंदवणारया व्यक्तीचा मोबाइल नंबर सुदधा टाकायचा आहे.अणि बाजुला दिलेल्या गेट ओटीपी बटणवर क्लीक करायचे आहे.

● आता तक्रार नोंदवणारया व्यक्तीच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे जसाच्या तसा फिल करून घ्यायचा.

● यानंतर आपल्यासमोर एक फाँर्म ओपन होईल इथे आपणास अनेक कँटँगरी दिलेल्या असतील आपली जी कँटँगरी आहे ती Complaint Category आपण इथुन सिलेक्ट करायची आहे.

● Age मध्ये तक्रार नोंदवणारया व्यक्तीचे वय टाकायचे आहे.

● यानंतर आपले जेंडर सिलेक्ट करायचे तक्रार नोंदवणारा व्यक्ती पुरूष असेल तर मेल सिलेक्ट करायचे महिला असल्यास फिमेल सिलेक्ट करायचे.

● Complaint State Of Residence मध्ये तक्रार नोंदवणारा व्यक्ती कोणत्या राज्यातील जिल्हयातील आहे हे टाकायचे आहे.

● Address मध्ये तक्रार नोंदवणारया व्यक्तीचा पत्ता टाकायचा.खाली पिनकोड मध्ये तक्रार नोंदवणारया व्यक्तीने त्याच्या एरियाचा पिनकोड सुदधा टाकायचा आहे.

● यानंतर Information Related To Regulated Entity Against Which Is Complaint Is Be Filed यात जाऊन ज्या बँकेविरुदध आपणास आरबीआयकडे तक्रार नोंदवायची आहे त्या बँकेचे एनबीएफसी चे नाव दिलेल्या आँप्शनमधुन सिलेक्ट करून घ्यायचे.

See also  EPS 95 पेन्शनधारकाचा निधन झाल्यास पेन्शन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?- Document list to avail pension in case of death of eps95 pensioner

● आपण वर सर्च बार मध्ये बँकेचे नाव टाकुन सुदधा आपल्याला ज्या बँकेविरूदध तक्रार नोंदवायची आहे ती बँकेचे नाव सहज सर्च करू शकतो.

● यानंतर आपली तक्रार क्रेडिट कार्ड संबंधी आहे का असे विचारले जाईल आपली तक्रार क्रेडिट कार्ड संबंधी असेल तर यस करा किंवा नसेल तर नाही वर टिक करून घ्यायचे.

● Bank Branch आँप्शन मध्ये जाऊन आपल्याला ज्या बँकेच्या विशिष्ट शाखेविषयी तक्रार करायची आहे त्या ब्राँचला सिलेक्ट करून घ्यायचे

● सोबत Entity State Entity District मध्ये जाऊन ती बँक कोणत्या राज्यातील आहे कोणत्या जिल्हयातील आहे हे सुदधा टाकायचे आहे.

● आपण ज्याच्याविरूदध आरबीआयकडे तक्रार नोंदवतो आहे ते एनबी एफसी किंवा वाँलेट असेल तर आपण त्याचा अँड्रेस Bank Branch,Entity State अणि Entity District मध्ये टाकायचा आहे.

● आपण जी तक्रार करू इच्छित आहे ही तक्रार अगोदरपासुन कुठल्याही आँथरीटी अंतर्गत चालु आहे का हे यस किंवा नो करून सांगायचे आहे.

● आपण ही तक्रार वकिलामार्फत करत आहात का हे सांगायचे आहे आपले उत्तर हो असेल तर एस करायचे नाहीतर नो वर टिक करायचे.

● आपल्या तक्रारीवर आधीच अँक्शन घेतली गेली आहे का हे सुदधा यस किंवा नो आँप्शन निवडुन येथे सांगायचे आहे.

● आपली तक्रार मँनेजमेंट विरूदध असेल तर एस आँप्शनवर टिक करायचे आपली तक्रार मँनेजमेंट विरूदध नसेल तर नो वर टिक करायचे.

● जर आपली तक्रार रेग्युलेटेड इंटीटी डिस्पयुट मध्ये समाविष्ट असेल तर यस करायचे नाहीतर नो करायचे.

● आपण नोंदवत असलेली तक्रार रेग्युलेटेड इंटीटीच्या स्टाफच्या कडुन नोंदवली जात असेल तर यस वर टिक करायचे.नसेल तर नो वर टिक करायचे.यानंतर खाली दिलेल्या नेक्सट बटणवर क्लीक करायचे.

● रेग्युलेटेड इंटीटी विरूदध आपण इलेक्ट्रानिक तसेच लिखित तक्रार दाखल केली असेल तर यस वर टिक करायचे नाहीतर नो वर टिक करायचे.

● बँकेकडे आपण आधीपासुन तक्रार केलेली आहे पण बँकेने त्यावर कुठलीही अँक्शन घेतलेली नसेल तर यस वर टिक करायचे.

● यानंतर कोणत्या तारखेला आपण आपली पहिली तक्रार नोंदवली होती ती तारीख निवडायची आहे.

● आपण केलेल्या पहिल्या तक्रारची काँपी अपलोड करायची आहे.

● तक्रार केलेल्या बँकेकडुन आपल्याला काही रिप्लाय आला आहे का हे यस किंवा नो करून सांगायचे आहे.

● आपण याआधी बँकेला रिमाईंडर पाठविले असेल तर तस वर टिक करायचे नाहीतर नो वर टिक करायचे.

See also  कँपिटल मार्केट अणि मनी मार्केट मधील फरक - Difference between capital market and money market in Marathi

● खाली Transaction Dispute Date टाकायची.

● आपली तक्रार वाँलेट विरूदध असेल यस वर टिक करायचे नाहीतर नसेल तर नो वर टिक करायचे आहे.

● आपली तक्रार एटीएम क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड विषयी असेल तर त्याचा नंबर टाकायचा आहे.

● जर आपली तक्रार लोन डिपाँझिट विषयी असेल तर त्या लोन तसेच डिपाँझिटचा नंबर टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या Next बटणवर ओके करायचे आहे.

● यानंतर आपणास Complaint Category Details मध्ये कंप्लेट कँटँगरी विषयी इतर माहीती भरावी लागेल.

● Complaint Category मध्ये जाऊन ज्याच्याशी संबंधित आपली तक्रार आहे ती एक कँटँगरी आपण निवडुन घ्यायची.आपल्या कंप्लेंटची सबकँटँगरी पण सिलेक्ट करायची.

● Facts Of Complaint मध्ये आपली तक्रार किमान २ हजार शब्दांत नोंदवायची आहे.

यानंतर खाली दिलेल्या Next Button वर ओके करायचे.

आपल्या तक्रारी संबंधित काही अजुन डाँक्युमेंट आपल्याकडे असतील तर ते देखील आपण फाईल सिलेक्ट करून इथे अपलोड करू शकतो.

जर आपणास तक्रार करण्यासाठी कोणाला अधिकृत परवानगी द्यायची असेल तर Authorization मध्ये यस वर टिक करायचे अणि आपण स्वता तक्रार नोंदवत असाल तर नो वर टिक करायचे.

यानंतर Declaration मध्ये जाहिर करायचे आहे की आपण फाँममध्ये भरलेली सर्व माहीती बरोबर अणि अचुक आहे.

यानंतर Review And Submit वर ओके करायचे आहे.
आपण फाँममध्ये भरलेली सर्व माहीती आपल्याला दिसेल ती सर्व माहीती बरोबर आहे की नही हे एकदा चेक करून घ्यायचे अणि मग खाली दिलेल्या सबमीट बटणवर ओके करायचे.

यानंतर आपली तक्रार आरबी आयकडे यशस्वीपरीत्या सबमीट झाली आहे असे नाव दिसुन येईल.

यात दिलेला आपला तक्रार नंबर आपण लिहुन घेऊ शकतो.

अणि समजा तक्रार करणारया व्यक्तीने फाँममध्ये भरलेली माहीती त्याला पीडीएफ फाँरमँटमध्ये हवी असेल तर खाली दिलेल्या डाउनलोड पीडीएफ आँप्शनवर त्याने क्लिक करायचे आहे.

आपण नोंदवलेल्या तक्रारीचे स्टेटस कसे ट्रँक करायचे?

● यासाठी आपणास आरबी आयच्या Cms.Rbi.Org ह्या आँफिशिअल वेबसाइट वर जायचे आहे अणि Track Your Complaint वर क्लीक करायचे.

● तक्रार करणारया व्यक्तीचा मोबाइल नंबर टाकायचा अणि बाजुला दिलेल्या Get Otp आँप्शनवर क्लिक करायचे आहे.

● यानंतर आपण नोंदवलेल्या तक्रारीची सर्व स्थिती स्टेटस आपल्याला दिसुन जाईल.

आपण एखाद्या बँक एनबी एफसी वा़ँलेट विषयी आरबी आयकडे आँनलाईन तक्रार कधी अणि केव्हा करायला हवी?

ज्या बँक एनबीएफसी वाँलेट विषयी आपल्याला तक्रार आहे आधी आपण त्यांच्याशी संपर्क साधावा अणि त्यांच्याकडे आपली पहिले तक्रार नोंदवावी.ही तक्रार आपण त्यांना ईमेल करून तसेच बाय पोस्ट दवारे सुदधा नोंदवू शकतो.

बँकेकडे एनबीएफसी वाँलेट कडे आपली तक्रार दाखल करून झाल्यानंतर एक दोन महिने आपण वाट पाहावी यानंतरही आपल्या तक्रारीवर कुठलेही लक्ष दिले गेले नाही तर मग आपण आँनलाईन पदधतीने आरबी आयकडे त्या सदर बँक एनबी एफसी वाँलेट विषयी तक्रार नोंदवायला हवी.

1 thought on “Bank complaint – कुठल्याही बँकेची आँनलाईन पदधतीने आरबी आयकडे तक्रार कशी करायची? -Online Bank Complaint To Rbi In Marathi”

  1. तक्रार मि अडोळी गावातील रहिवासी आहेत मि एक सामान्य माणूस आहे मि महात्मा फुले लोन महामंडळ तफे लोन पास झालं आहे पण इंडियन बँक मेनजर ते पास करण्यात टाळाटाळ करत आहे माझी हात जोडून विनंती आहे की ते पास करण्यात यावे व शासन लघु उद्योग किंवा व्यवसायात लोन देत आहे मग बँक मेनजर का लोन पास करत नाही त्याला त्याच्या घरुन नाही देणार जर मला नाही दिलं तर मि बँक विरोध आंदोलन करनार नाहीतर उपोषण बसणार नाहीतर आत्महत्या केरेल यांची जबाबदारी बँक राहीर खुप सतवत आहे बँक वाला

Comments are closed.