डिमांड ड्राफ्ट अणि पे आँडर मधील फरक Difference between demand draft and pay order in Marathi

डिमांड ड्राफ्ट अणि पे आँडर मधील फरक Difference between demand draft and pay order in Marathi

डिमांड ड्राफ्ट अणि पे आँडर मधील साम्य –

● पे आँडर अणि डिडी हे दोघेही आपण समान उददिष्टांच्या पुर्तीसाठी म्हणजेच पेमेंट करण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असतो.

Demand draft -डिमांड ड्राफ्ट

● डिमांड ड्राफ्टला आपण संक्षिप्तमध्ये डीडी असे म्हणत असतो.

● डीडी हे एक प्रिपेड नेगोशिएबल इंस्टट्रुमेंट म्हणुन ओळखले जाते.यात एक व्यक्ती दुसरया व्यक्तीला पे केलेली रक्कम विशिष्ट वेळेत ट्रान्सफर होईल याची हमी देखील घेत असतो.यात पैसे ट्रान्सफर करणारयाची सही देखील असते.

● जेव्हा आपणास आपल्या खात्यातुन इतर कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतात तेव्हा आपण डिडीचा वापर करत असतो.

● डीडी हा आपण कोणत्याही बँकेत तयार करू शकतो.

● डीडी हा आपण मुख्यकरून भारतीय मुद्रेत तयार करत असतो पण समजा आपणास फाँरेन करंसी मध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर आपण यात फाँरेन करंसीनुसार देखील डिडी तयार करू शकतो.

● डिमांड ड्राफ्ट मध्ये ज्या बँकेतुन आपण डिमांड ड्राफ्ट तयार करतो आहे त्या बँकेत आपले खाते असल्याची कुठलीही आवश्यकता आपणास नसते.

● डिडीमध्ये आपल्याला ज्या विशिष्ट व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे जमा करायचे असतात आपण त्याच्या नावाचा डिडी तयार करत असतो.मग हे पैसे त्या विशिष्ट व्यक्तीच्या खात्यावरच ट्रान्सफर केले जात असतात.इतर दुसरया कुठल्याही व्यक्तीच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर होत नसतात.

● डिमांड ड्राफ्ट हा कधीही बाऊन्स होत नसतो.कारण हा याचे पैसे आपण आधीच आगाऊ पदधतीने अँडव्हान्सड मध्ये पे केलेले असतात.

See also  Neo bank विषयी माहीती - NEO bank information in Marathi  

● जेव्हा आपणास आपण राहत असलेल्या शहर जिल्हयाच्या बाहेर असणारया व्यक्तीला पेमेंट करायचे असते तेव्हा आपण विशेषकरून डिडीचा म्हणजेच डिमांड ड्राफ्टचा वापर करत असतो.

● डिमांड ड्राफ्ट हा ज्या बँकेतुन तयार करण्यात आला आहे त्याच बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन कँश करता येत असतो.म्हणजेच ज्या बँकेच्या शाखेतुन डिडी तयार केला गेला आहे त्याच बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन रिसीव्हरला मिळालेल्या डीडीला कँश मध्ये रूपांतरीत करता येत असते.किंवा रिसिव्हरला हा त्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन कँश मध्ये रूपांतरीत करता येत असतो.म्हणजेच दोन पर्याय रिसीव्हरकडे उपलब्ध असतात.

● डिमांड ड्राफ्ट हा बँकेत बँकेतील अधिकारींकडुन तयार करण्यात येत असतो.अणि ह्या वर बँकेचा अधिकारी मँनेजर त्याची सही देखील करत असतो.म्हणुन यात डिफाँल्ट होण्याची संभावना फार कमी असते.

● जेव्हा आपण डीडी इशु करत असतो तेव्हा आपल्या म्हणजेच डिडी इशु करत असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यातुन बँक काही पैशांची कपात करत असते.म्हणुन बँकेत डिडी जमा करताना ही काही ठाराविक रक्कम देखील डिमांड ड्राफ्ट इशु करणारया व्यक्तीला बँकेत भरावी लागत असते.

● डिमांड ड्राफ्ट हा डिडी इशु करणारा व्यक्ती बँकेत रोख रक्कम भरून तयार करू शकतो.पण जेव्हा ह्या डिडीची रक्कम किमान 50 हजार इतकी असते किंवा त्यापेक्षा अधिक असते तेव्हा अशा परिस्थितीत आपणास रक्कम ही चेकच्या स्वरूपात पे करावी लागते.अणि जेव्हा आपण इशु केलेल्या डिडीची रक्कम 50 हजार असते किंवा त्यापेक्षा जास्त असते.तेव्हा ड्राफ्ट बनवायला आपणास आपले पँन कार्ड देखील लागत असते.

पे आँडर -pay order

● पी ओ चे पुर्णरूप पे आँडर असे असते.पे आँडरला बँकर चेक म्हणुन देखील संबोधित केले जाते.

● पे आँडर हे डिमांड ड्राफ्ट सारखे नेगोशिएबल नसते.पण पे आँडर हे डिमांड ड्राफ्ट प्रमाणेच एक प्रिपेड इंस्ट्रुमेंट असते.यात सुदधा पैसे अँडव्हान्स मध्येच पे केले जात असतात.म्हणुन पे आँडर सुदधा डिडी प्रमाणे बाऊन्स होत नही.

See also  शेअर मार्केट सुट्ट्यांची यादी - 2022 Stock market (NSE ) Holiday List 2022

● पे आँडर हे एक असे आर्थिक साधन आहे जे बँक खातेधारकाच्या वतीने बँकेकडुन जारी करण्यात येत असते.

● डिमांड ड्राफ्ट मध्ये आपण शहराबाहेरील जिल्हयाबाहेरील व्यक्तीला देखील पैसे ट्रान्सफर करू शकतो पण पे आँडर मध्ये आपण राहतो आहे त्या एका विशिष्ठ ठाराविक शहरातील कुठल्याही व्यक्तीलाच आपण पैसे ट्रान्सफर करू शकत असतो.

● पे आँडर केल्यानंतर आपणास ते रदद कँन्सल करता येत नसतात.

● डी डी मधील पैसे ज्या बँकेने डिडी इशु केला आहे त्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन कँशमध्ये रूपांतरीत करता येत असतात.पण पे आँडर मधील ट्रान्सफर केलेले पैसे पेमेंट हे ज्या बँकेकडुन जारी करण्यात आले आहे त्याच बँकेत जाऊन आपणास काढता येत असते.