Check- रतन टाटा नवीन वर्ष 2023 निमित्त मोफत रिचार्ज आॅफर खर आहे की खोटे – Ratan tata New year 2023 free recharge offer real or fake in Marathi

रतन टाटा नवीन वर्ष 2023 निमित्त मोफत रिचार्ज आॅफर खर आहे की खोटे – Ratan tata New year 2023 free recharge offer real or fake in Marathi

 

काही दिवसांपूर्वी सोशल मिडिया प्लॅटफाॉर्मवर एक फेक मॅसेज व्हायरल होत होता की रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना फ्री रिचार्ज आॅफर करण्यात येत आहे.

आता सोशल मीडियावर अजुन एक नवीन मॅसेज मोठया प्रमाणात व्हायरल होताना दिसुन येत आहे.

ज्यात असे दिले आहे की नवीन वर्षानिमित्त 2023 मध्ये रतन टाटा यांच्याकडुन सर्व भारतीय युझरला 84 दिवसांसाठी 666 रूपयांचा फ्री रिचार्ज देण्यात येत आहे.

अणि खाली असे देखील दिले आहे की ज्यांच्याकडे जिओ तसेच एअरटेलचा नंबर आहे ते ह्या रिचार्ज आॅफरचा लाभ उठवू शकतात.

आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या हा मॅसेज किती रिअल आहे तसेच फेक आहे तसेच यात किती सत्यता आहे?

रतन टाटा यांच्याकडुन नवीन वर्षानिमित्त मोफत रिचार्ज आॅफर Ratan tata New year free recharge offer scheme in Marathi

रतन टाटा यांच्या वाढदिवसानिमित्त फ्री रिचार्ज आॅफर ह्या फेक मॅसेज नंतर आता सोशल मिडिया वर अजुन एक मॅसेज सोशल मिडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

See also  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना देण्यात आला सुरीनाम देशातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार _Suriname's highest distinction, "Grand Order of the Chain of the Yellow Star

काय आहे हा सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला मॅसेज?

रतन टाटा २०२३ की खुशी मे अपने सभी भारतीय युझर को 84 दिनो के लिए 666 रूपये का फ्री रिचार्ज आॅफर कर रहे है अगर आप के पास जिओ व्हीआय तथा एअरटेल का नंबर है तो आप यह फ्री रिचार्ज कर सकते है

यह आॅफर आप के लिए केवल दो दिन के लिए वॅलिड है

खाली आपल्याला रिचार्ज करण्यासाठी newyear23.in ह्या नावाची एक लिंक देखील देण्यात आली आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या ह्या मॅसेज मागची खरी सत्यता काय आहे?

वर दिलेल्या मॅसेजच्या खाली रिचार्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर जेव्हा आपण क्लीक करतो तेव्हा आपल्यासमोर रतन टाटा यांचा हॅपी न्यू इयर मॅसेज सोबत एक फोटो दिलेला आहे अणि पदमभुषण रतन टाटा असे नाव देखील आपणास दिसुन येईल.

त्याच्या खाली एक लिंक दिली आहे अणि आप रिचार्ज पा सकते है या नही यह इस लिंक पर जा के चेक करे असे दिले आहे.

जेव्हा आपण हा फ्री रिचार्ज प्राप्त करू शकतो किंवा नाही हे जाणुन घेण्यासाठी क्लीक नाऊ ह्या बटणवर लिंकवर क्लिक करतो तेव्हा आपण रिचार्ज प्राप्त करू शकतो की नाही हे चेक केले जाते अणि मग आपल्यासमोर मॅसेज येतो की धन्यवाद चेक कर लिया गया

खाली असा मॅसेज दिलेला आहे-

आप के क्षेत्र के सभी लोग फ्री रिचार्ज पा सकते है कॄपया नीचे अपना मोबाईल नंबर लिखे

मग इंटर युअर मोबाईल नंबर मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकुन शेजारी दिलेल्या रिचार्ज बटणवर क्लीक करावे लागते.

मग आपल्यासमोर स्क्रीनवर असे दिले जाते की checking with your operator अणि checking your real identity म्हणजे इथे आपली आयडेंटीटी रिअल आहे का हे चेक केले जाते.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव आंबेडकर कसे पडले? तसेच आंबेडकरांच्या संपुर्ण वंशावळ अणि तिचा इतिहास काय आहे? - Ambedkar surname History

पण आश्चर्याची बाब अशी आहे की आयडेंटीटी चेक करून झाल्यावर इथे आपण कुठलाही चुकीचा मोबाईल नंबर इंटर केला आहे जो अस्तित्वातच नाहीये तरी देखील आपल्याला तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज प्राप्त झाला आहे असे सांगितले जाते.यावरून आपणास हे कळुन जाते की टाटा फ्री बर्थ डे रिचार्ज आॅफर प्रमाणे हा सुदधा एक फेक मॅसेज आहे जो सोशल मिडिया वर व्हायरल केला जात आहे.

मग ह्या फ्री रिचार्जला अॅक्टीव्हेट करण्यासाठी आपणास सांगितले जाते.अणि आपला फ्री रिचार्ज अॅक्टिंव्हेट करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या व्हाॅटस अँप बटणवर क्लीक करण्यास सांगितले जाते.अणि ह्या व्हाॅटस अँप लिंकला पाच गृपमध्ये तसेच दहा मित्रांसोबत शेअर करण्यास सांगितलें जाते.

ही व्हाटस अप लिंक शेअर करून झाल्यावर व्हेरीफिकेशनची एक लास्ट स्टेप आपणास करायला सांगितले जाते ज्यात आपणास इंस्टाॅल नाऊ बटणवर क्लीक करून विंजो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.

अणि विंजो अॅप इंस्टाॅल केल्यावर वर आपल्या मोबाईल नंबरने यात रजिस्ट्रेशन करुन व्हेरीफाय करायला सांगतात.अणि अॅपमध्ये जाऊन कुठलीही वस्तू आॅनलाईन आॅर्डर करण्यास सांगितले जाते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर रतन टाटा बर्थ डे फेक रिचार्ज प्रमाणे हा सुदधा एक फेक बनावट मेसेज आहे जो व्हाॉटस अप तसेच इतर सोशल मिडिया वर विंजो तसेच इतर मोबाईल अॅप्स युझर्स कडुन डाऊनलोड करून घेण्यासाठी व्हायरल केला जातो आहे.

अशी लिंक आपल्याला कोणीही पाठवल्यास त्या लिंकवर जाऊन रिचार्ज करण्यासाठी आपला मोबाईल नंबर इंटर करू नये तसेच कुठल्याही गृपवर तसेच कोणाला वैयक्तिक रीत्या ही लिंक शेअर देखील करू नये.

कारण अशा लिंकवर नंबर इंटर करून कुठलाही रिचार्ज आपणास प्राप्त होत नाही उलट आपल्या मोबाईल मध्ये असलेला महत्वाचा डेटा,मोबाईल मधील बँक डिटेल हॅक होण्याची यात संभावना आहे.