Market cap किंवा  market capitalization म्हणजे काय ? What is market capitalization in Marathi  

Market cap व market capitalization  माहिती –  What is market capitalization in Marathi

आपण जर आपली  दीर्घकालीन आर्थिक उद्दीष्टे गाठण्यासाठी  एक सक्षम  उत्तम अभ्यासपूर्ण गुंतवणूक योजना तयार करत असाल तर आपल्या करता गुंतवणूक करत असलेल्या कंपनीचे आकार, परतावा संभाव्यता आणि जोखीम यांच्यातील असलेला एकेमकांशी संबंध समजून घेणे खूप महत्त्वपूर्ण असतो .

या माहिती वर आधारित आपण एक  संतुलित स्टॉक पोर्टफोलिओ आपण नक्कीच  तयार करू शकाल

Market cap किंवा  market capitalization म्हणजे काय

मार्केट कॅप किंवा मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीच्या एकूण सर्व समभागांचे (एकूण शेअर्स ) मूल्य.

हे मूल्य काढताना एका स्टॉक ची किमत गुणीले त्या कंपनीचे बाजारात उपलब्ध असलेले शेअर यांचा गुणाकार करून आलेली किमत म्हणजे मार्केट कॅप (market cap)

उदाहरण – समजा –

 1. एका स्टॉकची किंमत = 225 रुपये आहे  
 2. एकूण शेअर बाजारात = 30,0000 आहेत
 3. मार्केट कॅप = 225 x 30,000 = 67,50,0000

म्हणजे या कंपनीची मार्केट कॅप किंवा the market capitalization बाजार भांडवल हे 67,50,0000 इतक आहे.

मार्केट कॅप किंवा the market capitalization च महत्व काय आहे ?

 • बाजार भांडवल ही एक महत्वाची संकल्पना आहे कारण  गुंतवणूकदारांना एका कंपनीच्या तुलनेत दुसर्‍या कंपनीचे बाजार भांडवलच तुलनात्मक अभ्यास करता येतो
 • खुल्या बाजारात मध्ये कंपनी किती उपयुक्त आहे तसेच भविष्यातील वाढीची संभाव्यतेबद्दल माहिती मिळते.
See also  EPF passbook ऑनलाइन डाऊनलोड कसे करावे ? How to download EPF passbook Marathi

लार्जकॅप ,मिडकॅप  आणि स्मॉलकॅप म्हणजे काय –What is LARGE CAP ,MID CAP – SMALL CAP?

शेअर बाजारामधील कंपन्या या मार्केटकॅप वरुन  वर्गीकृत केल्या जातात , जसे की

 • लार्ज कॅप – LARGE-CAP
 • मिड-कॅप – MID-CAP
 • स्मॉल-कॅप – SMALL -CAP

असे  बाजार भांडवल किंवा किंवा मार्केट कॅप च्या आधारे केलले  वर्गीकरण गुंतवणूकदारांना गुंतवणूकीचे योग्य निर्णय घेण्यास मदत करते.

LARGE-CAP STOCKS काय आहे?

 • लार्ज -कॅप कंपन्या हे असे व्यवसाय आहेत ज्या सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांचा भारतीय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण आर्थिक वाटा आहे. LARGE-CAP STOCKS  कंपन्यांकडे  एकूण भांडवल 20,000 कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीच असलं तर त्या लार्ज कॅप म्हणून ओळखल्या जातात .
 • अश्या कंपन्याच  उद्योग विश्वात  वर्चस्व असतं आणि त्यांचा व्यवसाय अगदी अतिशय स्थिर असतो .
 • जागतिक मंदीच्या वेळी किंवा इतर कोणत्याही वाईट ,नकारात्मक घटनेत अश्या लार्ज -कॅप कंपन्या वर जास्त आर्थिक वाईट परिणाम होत नसतात
 • सहसा त्या काही  दशकांपासून कार्यरत असतात आणि लोकांचा विश्वास संपादन केलेला असतो.
 • मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स च्या तुलनेत लार्ज काप कमी अस्थिर तसेच कमी जोखमीचे ही असतात  
 • HDFC किंवा SBI इन्फॉसीस  ही काही LARGE-CAP कंपन्यांची उदाहरणे आपल्या समोर परिचयाची आहेत

मिड-कॅप – MID-CAP कंपन्या

 • अशा कंपन्या आहेत ज्यांची बाजारपेठ 5,000 कोटी पेक्षा जास्त असते परंतु 20,000 कोटी पेक्षा कमी असते .
 • थोड volatility च प्रमाण जास्त असल्याने मोठ्या कंपन्यांमधील गुंतवणूक करण्यापेक्षा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे काही वेळेस धोकादायक ठरू शकते. 
 • परंतु + पॉइंट हा की या  मिड-कॅप कंपन्यांमध्येही पुढे कालांतराने लर्ज-कॅप कंपन्यां मध्ये वाढ होण्याची क्षमता असते  
 • या कंपन्या पुढे जावून लार्ज कॅप होवू शकतात म्हणून अशा मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अधिक गुंतवणूकदार आकर्षित होतात.
 • उदाहरण –  ASHOK LEYLAND BHEL, L AND T FINANCE  LIC hosuing ही मिड-कॅप कंपन्यांची काही उदाहरणे आहेत जी भारताच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्या परिचयाची आहेत
See also  डिपाँझिट म्हणजे काय?-Deposit meaning in Marathi

स्मॉल -कॅप स्टॉक – small cap स्टॉक म्हणजे काय ?

 • स्मॉल-कॅप  वर्गात अश्या कंपन्या असतात ज्यांचे market cap – बाजार भांडवल 5,000 कोटी पेक्षा कमी असते .
 • या कंपन्या आकारात तुलनेने लहान असतात आणि पुढे जावून  त्यांची वाढीची क्षमता असते .
 • अशा कंपन्यांचा मध्ये volatility जास्त असते .
 • आपण जर दीर्घ इतिहास पाहिला तर  स्मॉल-कॅप कंपन्यां गुंतवणूक दारांना  तितकसा परतावा देवू शकत नाहीत ,परंतु मंदी नसेल तर मात्र या काही प्रमाणात उत्तम परतावा देतात .
 • उदाहरण – सोनाटा , वाकरंगी, डीबी कॉर्प, ह्या स्मॉल -कॅप बाजाराच्या कंपन्यांची काही उदाहरणे आहेत जी भारताच्या स्टॉक एक्सचेंज आपल्या दिसून येतात .

मार्केट कॅप आणि  फ्री-फ्लोट मार्केट कॅप काय फरक आहे ? – What’s difference between market cap and float market cap ?

मार्केट कॅप ही कंपनीच्या सर्व समभागांच्या एकूण (एकूण सर्व  शेअर्स च्या मूल्या वर )मूल्यावर आधारित असते .

तर फ्लोट ही सामान्य लोकांकरता किंवा गुंतवणूक दारा करता खुल्या असलेलया किंवा उपलबद्ध असलेल्या शेअर्स च्या मूल्या वर आधारित असते.  

सारांश हा की 

 • मार्केट कॅप मध्ये एकूण सर्व शेअर ची मूल्य असते तर
 • फ्लोट मार्केट कॅप मध्ये जे शेअर त्या कंपनीच्या प्रमोटर्स किंवा  कंपनीचे अधिकारी किंवा सरकार कडे असतात ते वगळून कंपनीच मूल्य (market cap )ठरवलं जाते (कारण हे शेअर लॉक असतात आणि सर्व सामान्य गुंतवणूकदरा करता गुंतवणूक साठी किंवा ट्रेडिंग साठी उपलब्ध नसतात )

जगातील बसर्व प्रमुख निर्देशांकांद्वारे फ्री-फ्लोट पद्धत अवलंबली