विमानाचा रंग हा सफेद का असतो? Why are Airplanes White in Color?

विमानाचा रंग  पांढरा ? Why are Airplanes White in Color?

 

आपण आज अनेक बसेस तसेच ट्रेन रस्त्यावर धावताना बघत असतो ज्यांचे एक सारखे वैशिष्टय आपणास दिसुन येते की सर्व बसेस,ट्रेन,कार,टु व्हिलर ह्या एकाच रंगात उपलब्ध नसुन त्यांचे विविध रंग बाजारात उपलब्ध असतात.

 

पण जगभरातील अधिकतम विमाने ही आपल्याला सफेद रंगाचीच असलेली दिसुन येत असतात.खुप मोजकीच विमाने अशी आहेत जी विविध रंगाची असलेली आपणास दिसुन येत असतात.

 

अशावेळी आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की सर्व बसेस,ट्रेन,ह्या जर विविध रंगात उपलब्ध असतात मग विमान का आपणास विविध रंगात असलेले दिसुन येत नाही.नेहमी अधिकतम विमानाचा रंग हा सफेदच का असतो.

 

ग्राहकांना विमान सेवा देत असलेल्या विमान कंपनी इतर सर्व बाबींवर लक्ष देतात.त्यात टप्याटप्याने कस्टमरच्या आवडीनुसार अपेक्षेनुसार बदल घडवून आणत असतात.आणि आपल्या कस्टमरला बेस्ट सर्विस देण्याचा प्रयत्न करीत असतात.

 

अशा वेळी विमान कंपनींना असे वाटत नाही का की आपण आपल्या कस्टमरला विविध रंगाच्या विमानात हवाई सफर करण्याचा वेगळा अनुभव देऊन त्यांना एक वेगळा ग्राहक अनुभव प्राप्त करून द्यावा.

 

आपल्याला हे माहीतच नाही की बहुतेक विमानांचा रंग हा सहसा पांढराच का असतो तो लाल,निळा,पिवळा,हिरवा इत्यादी रंगाचा का नसतो.हेच कारण आहे की आपल्या मनात अशा विविध शंका  निर्माण होत असतात.

 

म्हणुन आजच्या लेखात आपण विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो यामागची शास्त्रीय कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

बहुतेक विमानांचा रंग हा नेहमी सफेद का असतो?Why are Airplanes White in Color?

 आपल्याला रस्त्यावर रोज विविध प्रकारची वाहने धावताना दिसतात.ज्यात विविध रंगाच्या टु व्हिलर्स,फोर व्हिलर्स,बसेस,आणि रेल्वे देखील आपणास दिसुन येत असतात.

पण ह्याच ठिकाणी जेव्हा आपण आकाशात उडत असलेल्या विमानाकडे बघतो तर ते आपल्याला फक्त एकाच रंगात नेहमी दिसुन येत असते.

See also  इंस्टाग्राम डाऊनच्या समस्येमुळे युझर्स निराश - Instagram down problem in Marathi

अशा वेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होणे ही एक साहजिकच बाब आहे म्हणुन आज आपण आपल्या मनातील ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे थोडक्यात जाणुन घेणार आहे.तसेच यामागची वैज्ञानिक कारणे देखील समजुन घेणार आहोत.

तसे पाहायला गेले तर विमानाचा रंग सफेद असण्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत.ज्यातील एक महत्वाचे कारण हे आहे की

 

1)सुर्याच्या तेज किरणांपासुन बचाव होतो :

विमान हे नेहमी आकाशात उंच भरारी घेत उडत असते.आणि जेव्हा विमान आकाशात उडते तेव्हा त्याच्यावर सुर्याची प्रखर किरणे देखील पडत असतात.

आणि विमानाचा जो सफेद रंग असतो तो विमानाचा सुर्याच्या तेज किरणांपासुन बचाव करत असतो.म्हणजेच सुर्याच्या ९९ टक्के तेज किरणांना तो परावर्तित करत असतो ज्याने विमान गरम पडत नाही आणि विमानात बसलेल्या प्रवाशांना याचा त्रास होत नाही.

पण याच ठिकाणी जर विमानाचा रंग सफेद सोडुन इतर कलरमध्ये असला तर इतर कलर हे सुर्याच्या तेज प्रखर किरणांना परावर्तित करू शकणार नाही.आणि विमान सुर्याच्या तेज किरणांमुळे गरम पडु शकते आणि याचाच त्रास विमानात बसलेल्या प्रवाशांना होऊ शकतो.

 

2) विमानावर क्रँक तसेच क्रँश पडल्यास चटकन लक्षात येते:

विमानाचा रंग सफेद असण्यामागे अजुन देखील खुप कारणे आहेत जसे की समजा विमानावर जर कुठे खरचटले त्यावर क्रँश तसेच क्रँक पडला तर चटकन आपल्या लक्षात येऊन जात असते.कारण विमानाचा तसेच इतर कुठल्याही वाहनाचा रंग सफेद असेल आणि त्यावर थोडेही खरचटले तर ते लगेच आपल्या निर्दशनास येत असते.

 

3) कमी खर्च :

विमानाला जर आपण सफेद सोडुन इतर कुठलाही रंग दिला तर त्यात आपला खुप जास्त खर्च होत असतो.कारण विमानाचा आकार देखील खुप मोठा असल्याने त्याला रंग देखील अधिक प्रमाणात लागत असतो.म्हणजेच आपण जर सफेद सोडुन इतर कोणताही कलर विमानाला दिला तर त्यात आपल्याला एक करोडपर्यत खर्च करावा लागतो.जो खुप अधिक आहे.

See also  वन महोत्सव विषयी माहीती - Van Mahotsav information in Marathi

आणि याचठिकाणी आपण सफेद रंग विमानाला दिला तर आपल्याला फक्त तीन ते चार लाखापर्यत खर्च करावा लागतो.

4) विमानाचे वजन वाढत नाही:

सफेद रंग हा हलका असतो ज्याने विमानाचे वजन वाढत नसते पण याचठिकाणी आपण इतर कुठल्याही रंगाचा वापर केला तर विमानाचे वजन फार अधिक प्रमाणात वाढत असते.

5) सफेद रंग लवकर फिका पडत नाही:

याचसोबत विमानाचा रंग सफेद असल्यास तो लवकर फिका पडत नाही.कारण सफेद रंगाचा गुणधर्म आहे की तो लवकर फिका पडत नाही.पण याचठिकाणी जर विमानाचा रंग सफेद सोडुन इतर कुठल्याही रंगात असेल तर तो लगेच फिका पडत असतो.

6) दृश्यता अधिक चांगली राहते :

विमानाचा रंग जर सफेद असेल त्याची दृश्यता अधिक चांगली राहत असते.सफेद रंगाचे विमान हे आकाशात लगेच दिसून जाते ज्याने कुठल्याही प्रकारचा अपघात होण्याची शक्यता उदभवत नसते.तसेच अपघात झाल्यास सफेद विमान अंधारात देखील लगेच दिसुन जात असते.पण याचठिकाणी जर विमानाचा रंग जर इतर कलरमध्ये असेल तर याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते.कारण विविध रंगातील विमाने आकाशात लवकर दिसुन येत नसतात.

7)विमान कंपनीना प्राप्त होणारा अधिक आर्थिक नफा

रंगीबेरंगी विमानांची किंमत ही सफेद विमानाच्या तुलनेत खुपच कमी असते आणि अशात विमान कंपनीने ते विविध रंग असलेले विमान विकायला काढले तर त्यांना याची चांगली किंमत देखील प्राप्त होत नसते.

 पण याच ठिकाणी सफेद विमान विकायला काढले तर विमान कंपनीला त्याची चांगली किंमत प्राप्त होत असते म्हणुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी देखील विमान कंपनी विमानाचा रंग सफेद ठेवणे अधिक पसंद करतात.

अशी विविध कारणे आहेत ज्यामुळे विमानाचा रंग हा विमान कंपनी नेहमी सफेद ठेवणे अधिक पसंद करतात.