पँसिव्ह इन्कम म्हणजे काय- Passive Income In Marathi

पँसिव्ह इन्कम – उत्पनाच एक उत्तम साधन – Passive Income In Marathi

काम तर आपण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सगळेच जण करत असतो.
पण एक गोष्ट ही आपल्या प्रत्येकाला माहीत आहे की आपल्या शरीराची काम करण्याची एक विशिष्ट वयोमर्यादा असते.

त्यानंतर आपले शरीर तरूणवयात जसे स्फुर्तीने,जोमाने कुठलेही कार्य करत असते तेवढया स्फुर्तीने जोमाने ते काम करू शकत नसते.म्हणुन आपण सर्वानी अँक्टिव्ह इन्कम पेक्षा पँसिव्ह इन्कमवर अधिक भर द्यायला हवा.

कारण जोपर्यत शरीर सुदृढ आहे आपण तरूण आहोत काम करण्याचे आपले वय आहे तो पर्यत आपण नक्कीच अँक्टिव्हली वर्क करून पैसे कमवू शकतो.

पण समजा आपण आजारी पडलो आणि डाँक्टरांनी तब्बल महिनाभर काम बंद ठेवून आराम करायला आपणास सांगितले.तर अशा परिस्थितीत आपले दिवस कसे पार पडणार आपली कमाई कशी होणार ही चिंता आपणास सतावत असते.

आणि त्यातच वयोवृदध काळात जेव्हा आपले शरीर कार्य करण्यासाठी सक्षम राहत नाही.त्यात एवढी उर्जा राहत नाही.तेव्हा तर ही उदरनिर्वाहाची समस्या अधिक सतावत असते.तेव्हा आपल्याला पस्तावा होतो की आपण पँसिव्ह इन्कम चे सोर्स तरूण वयातच आपल्या अंगात काम करण्याची शक्ती असताना का तयार केले नाहीत.

पण आपल्यासोबत देखील असा काही प्रकार घडु नये आणि भविष्यात पुढे जाऊन आपल्याला देखील असा पस्तावा करण्याची वेळ येऊ नये.

म्हणुन मी आज आपल्याला पँसिव्ह इन्कम ह्या संकल्पेविषयी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे.

इन्कम म्हणजे काय?- Income Meaning In Marathi

इन्कम म्हणजे असे एक साधन तसेच माध्यम ज्यादवारे आपण आपल्या उदरनिर्वाहापुरता,आपल्या दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागविण्यापुरता पैसे कमवत असतो.

इन्कमचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?- Types Of Income In Marathi

इन्कमचे एकूण दोन मुख्य प्रकार पडत असतात-

1)अँक्टिव्ह इन्कम :

2) पँसिव्ह इन्कम :

अँक्टिव्ह इन्कम म्हणजे काय?- Active Income Meaning In Marathi

अँक्टिव्ह इन्कम हे इन्कमचे एक असे सोर्स म्हणजे साधन आहे.जिथे आपण अँक्टीव्हली वर्क केले तरच आपल्याला इन्कम येत राहत असते.

अँक्टिव्ह इन्कममध्ये आपण ज्या दिवशी काम करतो त्या दिवशीच आपल्याला पैसे मिळत असतात.

अँक्टिव्ह इन्कममधुन पैसे येत राहण्यासाठी आपणास रोज न चुकता आजारपणात देखील तब्येतीची पर्वा न करता पैसे कमविण्यासाठी काम करावे लागत असते.

  • अँक्टिव्ह इन्कमचा तोटा हा असतो की जितके दिवस आपण अँक्टिव्हली काम करतो तितकेच दिवस आपली कमाई होत असते.ज्या दिवशी काम बंद त्या दिवशी इन्कमही बंद असते.अँक्टिव्ह इन्कम म्हणजे काय?- Active Income Meaning In Marathi
See also  सिम कार्ड साठी सरकारचे नवीन नियम - बल्क मध्ये सिम कार्ड खरेदी करण्यासाठी आता पोलिस व्हेरिफिकेशन होणार Government new rules for sim Card in Marathi

पँसिव्ह इन्कम म्हणजे काय?- Passive Income Meaning In Marathi

मित्रांनो पँसिव्ह इन्कम हे इन्कमचे एक असे सोर्स म्हणजे साधन आहे.जिथे आपण अँक्टीव्हली वर्क करत नसलो तरी आपल्याला पँसिव्हली इन्कम येत राहत असते.

म्हणजेचहा उत्पन्नाचा एक नियमित मार्ग आहे, ज्यात आपण आधी आपले प्रयत्न, वेळ आणि पैसा खर्च करतो नंतर ज्या वेळी पैसे जास्त प्रयत्न न करता ही यायला सुरवात होते तेव्हा टप्या टप्प्याने आपला  सक्रिय सहभाग कमी करत जातो.

पँसिव्ह इन्कमसाठी आपल्याला सुरूवातीचा काही काळ एक दोन वर्षे अँक्टिव्हली वर्क करणे गरजेचे असते.

मग त्यानंतर एकदा सिस्टम तयार झाल्यावर आपण रोज अँक्टिव्हली वर्क केले नाही तरी आपल्याला तिथून इन्कम येत राहते.हा फायदा पँसिव्ह इन्कमचा असतो.

पँसिव्ह इन्कमचे सोर्स कोणकोणते आहेत?- Passive Income Sources, Ideas In Marathi

मित्रांनो पँसिव्ह इन्कमचे आज असे अनेक सोर्स उपलब्ध आहेत.ज्यादवारे आपण पँसिव्हली इन्कम प्राप्त करू शकतो.

पँसिव्ह इन्कमचे काही महत्वाचे सोर्स पुढीलप्रमाणे आहेत –

1)ब्लाँगिंग :

2) युटयुब चँनल :

3) ई बुक :

4) रिअल ईस्टेट :

5) गुंतवणुक :

6) व्यवसाय :

7) कार भाडयाने देणे :

8) आँनलाईन कोर्स तयार करून विकणे :

9) घर भाडयाने देणे :

10) अँफिलिएट मार्केटिंग :

11) मोबाईल अँप तयार करणे :

12) नेटवर्क मार्केटिंग :

13) एल आयसी एजंट :

14) पीअर टु पीअर लेंडिंग :

15) आँनलाईन प्रोडक्टची खरेदी विक्री :

16) आँनलाईन फोटो सेलिंग :

17) डोमेन फ्लिपिंग (खरेदी आणि विक्री) :

18) वेबसाईट फ्लीपिंग (खरेदी आणि विक्री) :

19) ड्राँपशिंपिंग :

20) व्हेंडिंग मशिन :

1)ब्लाँगिंग :

ब्लाँगिंग हे पँसिव्ह इन्कमचे एक उत्तम साधन बनलेले आहे.ब्लाँगिंग हे नोकरी करत असलेले व्यक्ती देखील पँसिव्ह इन्कमसाठी करू शकतात.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ब्लाँगिंगसाठी आपल्याला पुर्ण वेळ देण्याची देखील गरज पडत नाही.दिवसभरात आपल्याला मिळेल त्या वेळेत आपण ब्लाँगसाठी आर्टिकल लिहु शकतो.

आणि जर आपणास फुलटाईम ब्लाँगिंगमध्येच करिअर करायचे असेल तर आपण आपला पुर्णवेळ देखील ब्लाँगिंगला देऊ शकतो.

पण ब्लाँगिंगमधुन इन्कम येणे सुरू होण्यासाठी आपल्याला सुरूवातीचे एक दोन वर्ष खुप मेहनत घ्यावी लागते.मग हळुहळु आपणास इथून इन्कम येणे सुरू होत असते.

2) युटयुब चँनल :

युटयुब सुदधा आज डिजीटल,पँसिव्ह इन्कमचे एक उत्तम साधन बनलेले आहे.युटयुब सुदधा नोकरी करत असलेले व्यक्ती पँसिव्ह इन्कमसाठी सुरू करू शकतात.

आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ब्लाँगिंगप्रमाणेच इथे देखील आपल्याला पुर्ण वेळ देण्याची देखील गरज पडत नाही.दिवसभरात आपल्याला मिळेल त्या एक दोन तासात व्हिडिओ तयार करून आपण युटयुबवर पब्लिश करू शकतो.

आणि जर आपणास फुलटाईम युटयुबमध्येच करिअर करायचे असेल तर आपण आपला पुर्णवेळ देखील युटयुबला देऊ शकतो.

पण युटयुबमधुन इन्कम येणे सुरू होण्यासाठी आपल्याला ब्लाँगिंग प्रमाणेच सुरूवातीचे एक दोन वर्ष खुप मेहनत घ्यावी लागते.

मग हळुहळु आपल्या व्हिडिओजवर व्युव्ह चालु झाले,आपले सबस्क्राईबर वाढु लागले की आपले इथून इन्कम येणे देखील सुरू होत असते.

See also  World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

3) ई बुक :

ईबुक हा सुदधा एक पँसिव्ह इन्कमचा उत्तम मार्ग आहे.

यात आपल्याला फक्त महिना दोन महिना मेहनत घेऊन एखाद्या चांगल्या अशा विषयावर ज्यावर वाचकांना वाचायला आवडेल अशा विषयावर ई बुक लिहुन अँमेझाँन सारख्या आँनलाईन बुक स्टोअरवर पब्लिश करून द्यायचे असते.

आणि मग जेवढे लोक आपले ईबुक खरेदी करतील त्याची निम्मी किंमत आपल्या अकाऊंटवर जमा होत असते.

4) रिअल ईस्टेट :

रिअल ईस्टेट हा सुदधा पँसिव्ह इन्कमचा एक चांगला स्रोत आहे.यात आपण एखाद्या प्राँपर्टी मध्ये जसे की बंगला,जमीन,इत्यादीमध्ये आपले पैसे गुंतवू शकतो.

यात आपल्याला एकाच वेळी मोठा प्राँफिट कमवता येत असतो.

5) गुंतवणुक :

गुंतवणुक हा सुदधा पँसिव्ह इन्कम जनरेट करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

यात आपण म्युच्अल फंड,शेअर मार्केट,एफ डी,आर डी,विविध सरकारी योजना इत्यादीमध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक करून भविष्यात एक चांगला प्राँफिट प्राप्त करू शकतो.

6) व्यवसाय :

पँसिव्ह इन्कमचे अजुन एक साधन म्हणजे व्यवसाय उद्योग.आपण स्वताचा एखादा व्यवसाय उद्योग सुरू करू शकतो.आणि हळुहळु त्यातच एक लँवरेज सिस्टम तयार करू शकतो.

ज्याने आपण अँक्टिव्हली वर्क केले नाही तरी त्या व्यवसाय उद्योगातुन आपल्याला पँसिव्ह इन्कम येत राहील.

7) कार भाडयाने देणे :

आपली कार एखाद्याला भाडयाने चालवायला देऊन सुदधा आपण एक चांगले पँसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो.

याने आपली कार पडुन राहत नाही म्हणजेच ती आपल्यासाठी लायबँलिटी न बनता अँसेट बनत असते.कारण तिच्यादवारे आपल्या खिशात पैसे येत असतात.ते पण कोणतेही अँक्टिव्हली वर्क न करता.

म्हणुन हे देखील पँसिव्ह इन्कमचे एक चांगले साधन तसेच माध्यम आहे.

8) आँनलाईन कोर्स तयार करून विकणे :

मित्रांनो आपल्याला ज्या क्षेत्राचे,विषयाचे उत्तम नाँलेज असेल आणि आपण त्यात पारंगत असेल आपण अशा एखाद्या विषयावर स्वताचा एखादा कोर्स तयार करू शकतो.आणि तो आँनलाईन सेल करू शकतो.

यात जसजसे लोक तो कोर्स खरेदी करतील तसतसे आपल्याला त्याचे पैसे प्राप्त होत असतात.हे सुदधा पँसिव्ह इन्कमचे एक चांगले साधन तसेच माध्यम आहे.

9) घर भाडयाने देणे :

जर समजा आपल्याकडे दोन बंगले आहेत त्यातील एका बंगल्यात आपण स्वता राहतो आहे आणि दुसरा असाच पडुन आहे.

तर आपण तो पडलेला बंगला,रूम,फ्लाँट एखाद्याला राहायला देऊन त्यादवारे पँसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो.

10) अँफिलिएट मार्केटिंग :

अँफिलिएट मार्केटिंग हा सुदधा पँसिव्ह इन्कमचा एक चांगला स्रोत आहे.यात आपल्याला फक्त एखाद्या हाय कमीशन देत असलेल्या कंपनीच्या अँफिलिएट प्रोग्रँमला जाँईन करायचे असते.

आणि त्या कंपनीच्या प्रोडक्टची अँफिलिएट लिंक इतरांसोबत शेअर करावी लागते.

जसजसे लोक त्या लिंकवरून प्रोडक्टची खरेदी करतील तसतसे त्या प्रोडक्टच्या किंमतीनुसार कंपनी आपल्या खात्यात आपले कमिशन जमा करत असते.

11) मोबाईल अँप तयार करणे :

पँसिव्ह इन्कम जनरेट करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे मोबाईल अँप तयार करणे.

See also  ट्रेडिंग अणि इन्वहेस्टटींग मधील फरक- Difference between Trading and investing in Marathi

यात आपल्याला आपली एखादी अँड्राँईड अँप तयार करून प्लेस्टोअरवर पब्लिश करायची असते आणि त्यावर अँडस लावायच्या असतात.

मग जसजशी आपली अँप डाऊनलोड करून लोक त्यावरील अँडसवर क्लीक करतील तसतसे आपल्याला इन्कम येणे सुरू होत असते.

12) नेटवर्क मार्केटिंग :

नेटवर्क मार्केटिंगमध्ये एक साखळी पदधत असते.ज्यात आपल्या अंडर तयार केलेली टीम जसजसे वर्क करते आणि त्यांना प्राँफिट जनरेट होतो त्याचे काही टक्के आपल्याला देखील मिळत असतात.

यात आपल्याला पँसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी फक्त काही वर्षे मेहनत घेऊन टीमची एक साखळी तयार करायची आवश्यकता असते.

13) एल आयसी एजंट :

यात फक्त आपण एकाच वेळेस एखाद्याचा विमा काढत असतो.पण तो व्यक्ती जितक्या वेळेस विम्याची रक्कम भरत असतो तितक्या वेळेस आपणास त्याचे कमीशन मिळत असते.

म्हणुन हा सुदधा पँसिव्ह इन्कमचा एक चांगला पर्याय आहे.जो आपण युझ करू शकतो.

14) पीअर टु पीअर लेंडिंग :

पीअर टू पीअर लेंडिंग म्हणजे इतरांना कर्ज देण्याचे काम करणे.

यात एक खासगी कंपनी तसेच संस्था असते जी गरजू व्यक्तींना लोन देण्याचे काम करत असते.ज्यावर काही ठाराविक व्याजदर देखील आकारले जात असते.

15) आँनलाईन प्रोडक्टची खरेदी विक्री :

आपण एखाद्या डिजीटल प्रोडक्टची एखाद्या आँनलाईन प्लँटफाँर्मदवारे आँनलाईन विक्री करून पँसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो.

यात कस्टमर जसजसे आपले प्रोडक्ट आँनलाईन प्लँटफाँर्मवरून खरेदी करतात तसतसे त्याचे काही टक्के अमाऊंट आपल्या खात्यावर जमा होत असते.

16) आँनलाईन फोटो सेलिंग :

यात आपण आपल्या कँमेरयाने काढलेले चांगले अप्रतिम फोटो एखाद्या आँनलाईन प्लँटफाँर्मवर विकण्यासाठी लिस्टेड करू शकतो.

आणि मग जसजसे लोक आपले फोटो खरेदी करतील त्याचे काही टक्के अमाऊंट आपल्या खात्यावर जमा होत असते.

हे सुदधा पँसिव्ह इन्कमचे एक चांगले साधन तसेच माध्यम आहे.

17) डोमेन फ्लिपिंग (खरेदी आणि विक्री) :

डोमेन फ्लिपिंग हा आँनलाईन पँसिव्ह इन्कम प्राप्त करण्याचा,कमविण्याचा एक चांगला पर्याय आहे.

यात आपल्याला एकाच वेळी निरनिराळया अशा नावाचे डोमेन विकत घ्यायचे असतात ज्यांचा भविष्यात ब्रँड बनू शकतो किंवा त्या नावाची कंपनी देखील स्टार्ट होऊ शकते.

आणि मग जेव्हा ते डोमेन त्या कंपनीला हवे असेल ती कंपनी आपल्याला हवी तेवढी रक्कम त्या डोमेनसाठी द्यायला तयार होत असते.

अशा पदधतीने डोमेन फ्लीपिंग करून आपण चांगले पँसिव्ह इन्कम एकाच वेळेला जनरेट करू शकतो.

18) वेबसाईट फ्लीपिंग (खरेदी आणि विक्री) :

यात आपण वेबसाईट तयार करून त्यावर चांगली ट्रँफिक जनरेट करून ती वेबसाईट इतर कोणालाही चांगल्या किंमतीत विकु शकतो.

आज अशा अनेक वेबसाईट देखील आहेत जिथे आँनलाईन वेबसाईट खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो.हे देखील पँसिव्ह इन्कमचे एक चांगले साधन आहे.

19) ड्राँपशिंपिंग :

हे एक बिझनेस माँडेल आहे.ज्यात आपण कुठलेही प्रोडक्ट तसेच वस्तु खरेदी न करता ते प्रोडक्ट कस्टमर्सला आपला प्राँफिट मार्जिन त्यात अँड करून हाय रेटमध्ये विकत असतो.आणि पँसिव्हली इन्कम जनरेट करत असतो.

20) व्हेंडिंग मशिन :

व्हेंडिंग मशिन हे एक आँटोमँटिक मशिन आहे ज्यात आपण पैसे टाकल्यावर आपल्याला हवी ती खाण्यापिण्याची वस्तु प्राप्त होत असते.

इथे वस्तु देण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला स्वता थांबण्याची आवश्यकता नसते.कस्टमरने पैसे टाकल्या टाकल्या त्याला हवी ती वस्तु त्याला मशिन देत असते.

हे सुदधा पँसिव्ह इन्कमचे एक चांगले साधन आहे.