महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसांत ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची दाट शक्यता Maharashtra Rain Update In Marathi

महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसांत ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची दाट शक्यता Maharashtra Rain Update In Marathi

महाराष्ट्र राज्यावर आलेले अवकाळी पावसाचे संकट अद्याप टळलेले नाहीये.

आजपासुन येत्या तीन किंवा चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याने महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या विभागात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा देखील सोमवारी १३ मार्चपासून दिला आहे.

मुख्यत्वे ह्या अवकाळी पावसाचे संकट मराठवाडा अणि मध्य महाराष्ट्र मध्ये अधिक असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र अणि मराठवाडा ह्या विभागात वीजेचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या विभागाला ह्या पावसामुळे जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने असे सांगितले आहे की विदर्भात देखील १४ मार्च ते १६ मार्च दरम्यान जोरदार पाऊस पडु शकतो.
याचसोबत उत्तर महाराष्ट्र ह्या विभागात गारपीट होईल असा देखील अंदाज हवामान खात्याने कळविला आहे.

मागील काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र राज्यातील अनेक विभागात अवकाळी पाऊस पडला होता ज्यात गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप जास्त प्रमाणात नुकसान झाले होते.

खुप शेतकरयांंचे कांदा तसेच डाळींब,द्राक्ष,हरभरा,गहु या पिकांचे मागील वेळेस झालेल्या गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झाले होते.

नुकत्याच आलेल्या अपडेट मधुन अशी माहिती समोर आली आहे की नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे गहु ज्वारी अणि हरभरा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.

रब्बी हंगामातील पिके भुईसपाट होऊन शेतकरींना चांगलाच मोठा फटका बसला आहे.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार फ्री मध्ये टॅबलेट अणि इंटरनेट कनेक्शन

काल रात्री १३ मार्च २०२३ रोजी नवापुर तळोदा तसेच शहादा तालुक्यातील काही विभागामध्ये गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला आहे.यामुळे येथील काढणीसाठी आलेल्या गहु ज्वारी तसेच बाजरी इत्यादी अशा महत्त्वाच्या पिकांचे भयंकर नुकसान झालेले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ह्या आधीच्या झालेल्या गारपीटीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानातुन शेतकरी वर्ग अजुन पुर्णपणे सावरलेला नसताना अचानक हवामान खात्याकडुन पुन्हा एकदा अवकाळी पाऊस अणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.

म्हणुन हवामान खात्याने अवकाळी पाऊस अणि गारपीट होण्याची शक्यता दर्शविलेल्या विभागातील शेतकरी वर्गाने लवकरात लवकर आपली पिकांची राहीलेली राहीलेली कामे पूर्ण करून घ्यावीत.

अलिकडे सध्या महाराष्ट्र राज्यातील हवामानात दिवसेंदिवस परिवर्तन घडून येताना दिसुन येत आहे.फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाच्या झळया लागल्या तर आता मार्च महिन्या मध्ये अवकाळी पावसाचे सावट राज्यावर आलेले दिसुन येत आहे.

हवामान विभागाने असे देखील सांगितले आहे की दिवसेंदिवस हवामानात होत असलेल्या बदलामुळे दिवस अणि रात्रीच्या तापमानामध्ये आपणास घट पाहायला मिळु शकते.

पण राज्यावर आलेले हे अवकाळी पावसाचे सावट संकट टळल्यानंतर राज्यातील उकाडा अधिक प्रमाणात वाढणार आहे अणि कोकण विभागामध्ये उष्णतेची लाट आलेली पाहायला मिळेल असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे.