Mahajyoti free Tablet scheme in Marathi
जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे.महाज्योती कडुन फ्री टॅबलेट योजना सुरू करण्यात आली आहे.
ह्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एक टॅब दिला जाणार आहे अणि एक दिवसासाठी ६ जीबी इतके इंटरनेट बॅलन्स देखील दिला जाणार आहे.
ह्या फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना जेईई मेन्स,नीट,एम एचटी सीईटीचे कोचिंग क्लासेस देखील फ्री मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.अणि अभ्यासासाठी पुस्तके देखील फ्री मध्ये दिली जाणार आहे.
महाज्योती कडुन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ह्या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास mahajyoti.org.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
वेबसाईट वर गेल्यावर आपणास application for mht cet jee neet 2025 training असे नाव दिसुन येईल.
यात आपण खाली दिलेल्या advertisement ह्या आॅप्शनवर क्लिक करून संपूर्ण जाहीरात देखील वाचू शकतो.
जाहीरातीमध्ये असे दिले आहे की जे एसबीसी/ओबीसी/व्ही जे एनटी कॅटॅगरी मधील विद्यार्थी आहेत त्यांना ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
ह्या फ्री टॅबलेट योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास ३१ मार्च २०२३ च्या आधी अर्ज करायचा आहे.
जर आपण जाहीरातीच्या खाली दिलेल्या तपशील ह्या आॅप्शनवर क्लिक केले तर आपणास ह्या योजनेचा संपूर्ण तपशील वाचायला मिळणार आहे.
तपशिलात सांगितले आहे की आॅनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती कडुन विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिला जातो.अणि प्रत्येक दिवशी सहा जिलबी इतका इंटरनेट डेटा देखील दिला जातो.
Mahajyoti free Tablet scheme – लाभार्थी पात्रता
पुढीलप्रमाणे ठेवण्यात आली आहे-
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- सदर उमेदवार मागासवर्गीय तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास वर्ग गटामधील असावा तसेच तो नाॅन क्रिमिलिअर उत्पन्न गटातील असणे देखील गरजेचे आहे.
- जे विद्यार्थी २०२३ मध्ये दहावीची परीक्षा देत आहे फक्त असे विद्यार्थी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील अणि अशाच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आपले दहावीचे प्रवेशपत्र अणि नववी मधील गुणपत्रिका जोडायची आहे.
- अर्ज करणारा विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असायला हवा.
विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
- नववीची गुणपत्रिका
- दहावीचे प्रवेशपत्र
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- नाॅन क्रिमिलिअर सर्टिफिकेट
योजनेच्या अटी आणि शर्ती –
- सर्व विद्यार्थ्यांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे.
- ईमेल किंवा पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही फक्त आॅनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे.
- जाहीरात रद्द करणे जाहीरातीची मुदतवाढ करणे हे सर्व हक्क महाज्योती कडे राखीव असणार आहे.
- अर्ज करताना काही अडचण आल्यास आपण महाज्योती सोबत दिलेल्या ईमेलवर संपर्क क्रमांक यावर संपर्क साधु शकतो.
- दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावीची गुणपत्रिका अणि विज्ञान शाखेत प्रवेश घेत असल्याचा दाखला बोनाफाईड महाज्योती कडे दाखवावा तसेच जमा करावा लागणार आहे.
फ्री टॅबलेट योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?
- आॅनलाईन फाॅम भरण्यासाठी आपणास तपशिलाच्या आॅप्शन खाली दिलेल्या रेजिस्ट्रेशन लिंक ह्या आॅप्शनवर क्लिक करायचे आहे.
- https://neet.mahajyoti.org.in/2023/mobile_verification.php
- या फाॅममध्ये आपणास सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे अणि खाली दिलेल्या सबमिट बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो इथे भरून घ्यायचा आहे.अणि सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्या समोर एक फाॅम ओपन होईल यात विचारलेली सर्व माहीती आपणास भरायची आहे.
- सर्व प्रथम आपणास कोणत्या कोर्ससाठी अॅप्लाय करायचा आहे जेईई/नीट का एम एचटी सीईटी हे टाकायचे आहे.
- यानंतर अर्जदाराचे नाव टाकायचे आहे यात पहिले आपले नाव मग वडिलांचे नाव मग आडनाव टाकायचे आहे.
- मग वडिलांचे नाव तिथे देखील पहीले वडिलांचे नाव मग त्यांच्या वडिलांचे म्हणजेच आजोबांचे नाव मग वडिलांचे आडनाव टाकायचे आहे.
- यानंतर आपले पालक कोणती नोकरी तसेच व्यवसाय करतात हे द्यायचे आहे.आपली जन्मतारीख टाकायची आहे आपण पुरूष आहे की स्त्री हे टाकायचे आहे.
- यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे.आपले राष्ट्रीयत्व काय आहे हे द्यायचे आहे.आपले डोमासाईल कोणत्या जिल्ह्यातील आहे हे द्यायचे आहे.
- यानंतर आपण यापैकी कुठल्या कॅटॅगरी मधील आहोत ओबीसी व्हीजे एनटीबी एनटीडी एसबीसी हे देखील द्यायचे आहे.
- यानंतर आपली जात काय आहे हे देखील इथे द्यायचे आहे.
- क्रिमिलेअर मध्ये नाॅन क्रिमिलिअर सिलेक्ट करायचे आहे.
- यानंतर आपणास आपला सध्याचा पत्ता अणि कायमस्वरूपी पत्ता द्यायचा आहे.
- सध्याचा पत्ता मध्ये आपला तालुका जिल्हा गावाचे नाव घर नंबर एरिया नंबर पिनकोड इत्यादी टाकायचे आहे.
- जर आपला सध्याचा पत्ता अणि कायमस्वरूपी पत्ता सारखाच असेल तर सेम अॅज प्रेझेंट अॅड्रेस येथे टिक करून घ्यायचे आहे किंवा आपला कायमस्वरूपी पत्ता दुसरा एखादा असेल तर तो देखील आपण इथे टाकु शकतो.
- यानंतर आपणास खाली आपला मोबाईल नंबर आलेला दिसेल त्याच्या खाली आपणास आपला अजुन एक मोबाईल नंबर टाकायचा आहे.अणि खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास पुढच्या स्टेप मध्ये आपली शैक्षणिक माहीती भरायची आहे.
- यात आपणास नववीत आपण कोणत्या शाळेत होतो त्या शाळेचे नाव टाकायचे आहे.ती शाळा कोणत्या गावात अणि शहरात होती हे देखील टाकायचे आहे.अणि नववीत आपल्याला बोर्ड कोणते होते ते द्यायचे आहे.आपण पास कधी झालो ते टाकायचे आहे.अणि नववीला किती टक्के पडले होते हे सुद्धा टाकायचे आहे.
- यानंतर आपल्या नववीतील शाळेचा पुर्ण पत्ता टाकायचा आहे.शाळा कोणत्या गावात शहरात होती हे सुद्धा यात टाकायचे आहे.
- यानंतर सर्व माहीती भरून झाल्यावर खाली दिलेल्या सेव्ह बटणावर ओके करायचे आहे.
- यानंतर आता आपणास आपले कागदपत्रे द्यायचे आहे यात पासपोर्ट साईज फोटो दोनशे केबी पर्यंत जेपीजी जेपीईजी स्वरूपातील आपण देऊ शकतो फोटो अपलोड करण्यासाठी अपलोड बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर खाली आपली सही द्यायची आहे.दोनशे केबी पर्यंत जेपीजी जेपीईजी स्वरूपातील.
- नववीच्या गुणपत्रिकेचा फोटो अपलोड करायचा आहे.यानंतर आपले अॅडमिट कार्ड आधार कार्ड जातीचा दाखला नाॅन क्रिमिलिअर सर्टिफिकेटचा डोमासाईल सर्टिफिकेटचा फोटो देखील अपलोड करायचा आहे.
- यानंतर फाॅम सेव्ह करून खालील दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून सबमिट करायचा आहे.यानंतर स्क्रीनवर एक प्रिंट येईल ती काढुन घ्यायची आहे.
- यात काही दिवसांच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांना फ्री मध्ये टॅबलेट अणि जेईई मेन्स नीट एम एचटी सीईटी कोचिंग क्लासेस प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.
https://mahajyoti.org.in/wp-content/uploads/2023/03/MHT-CET-JEE-NEET-2025.YOJNECHA-TAPSHIL.pdf
माझ्या मोबाईल वर ओटीपी येत नाही आहे?
तुमचा नं. ची व्हॅलेडीटी चेक करा. सिमचालू आहे का बघा इनकमिंग, आऊटगोइंग नसेल तर रिचार्जकरुन बघा