बाॅलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना मातृशोक – Madhuri Dixit Mother Passes away

Madhuri Dixit Mother Passes away

बाॅलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना मातृशोक – Madhuri Dixit Mother Death In Marathi

प्रसिद्ध बाॅलिवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या आईचे निधन झाल्याची वार्ता नुकतीच समोर आली आहे.माधुरी दीक्षित यांच्या आई स्नेहलता दिक्षित यांचे वय ९१ होते.

स्नेहलता दिक्षित यांचे आज १२ मार्च २०२३ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास वयोवृद्ध झाल्याने निधन झाले आहे.

Madhuri Dixit Mother Passes away
Madhuri Dixit Mother Passes away

स्नेहलता दिक्षित यांच्या पार्थिवावर मुंबई येथील वरली येथे वैकुंठ धाम मध्ये आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्नेहलता दिक्षित यांच्या ९० व्या वाढदिवशी काय म्हणाल्या होत्या अभिनेत्री माधुरी दीक्षित –

नुकताच २०२२ मध्ये स्नेहलता दिक्षित यांनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला होता.आपल्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी माधुरी दीक्षित हिने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट वर आईसोबत काढलेला एक फोटो शेअर केला होता.

ज्यात माधुरी म्हणाली होती की एक आई हीच आपल्या मुलीची सर्वात चांगली अणि जवळची मैत्रीण असते.अणि हे खर आहे आई तु माझ्यासाठी जे काही केले आहे जे काही धडे मला दिले आहे ते सर्व माझ्यासाठी तुझ्या कडुन प्राप्त झालेला सगळ्यात आतापर्यंतचा मोठा उपहार आहे.

मी देवाकडे तुझ्या चांगल्या आरोग्यासाठी अणि तुझ्या आनंदासाठी नेहमी प्रार्थना करेन.

Madhuri Dixit Mother Passes away

माधुरी दीक्षित यांच्या यशामध्ये त्यांच्या आईचा खुप मोठा वाटा होता.माधुरी दिक्षित यांच्या अभिनय क्षेत्रातील करीअर मध्ये प्रत्येक पाऊली स्नेहलता यांनी त्यांना साथ दिली होती.

चित्रपटाची शुटिंग करणे चित्रपट क्षेत्रातील मोठमोठ्या पार्टी समारंभ मध्ये जाणे इत्यादी सर्व ठिकाणी स्नेहलता हया माधुरी दीक्षित यांच्या सोबत त्यांची सावली बनून राहील्या.

अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या वडिलांचे देखील २०१३ मध्ये निधन झाले होते.आता आईचे देखील निधन झाल्याने माधुरी दीक्षित यांच्यावर जणु दुखाचा डोंगरच कोसळला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनात तीन लाख रुपयांची वाढ : आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

माधुरी दीक्षित ही तिच्या आई स्नेहलता दिक्षित हिच्या खुप जवळची होती.स्नेहलता दिक्षित हया माधुरी दीक्षित यांच्या मुंबई येथील घरी त्यांच्या समवेत राहत होत्या.माधुरी तिच्या मनातील प्रत्येक लहानसहान गोष्ट देखील शेअर करायची.

स्नेहलता दिक्षित यांना माधुरी दीक्षित वगळता अजुन दोन मुली होत्या ज्यांचे नाव रूपा दिक्षित अणि भारती दिक्षित असे आहे.

स्नेहलता यांच्या दिवंगत पतीचे नाव शंकर दिक्षित असे आहे.

स्नेहलता दिक्षित यांचा जन्म एक अत्यंत साध्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता त्यांचे लग्न देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीशी झाले होते.

स्नेहलता दिक्षित यांनी आपल्या जीवनात सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे सुरूवातीला खुप संघर्ष केला माधुरी दीक्षित यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवेशानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा घडुन आली होती.