फळे व भाजीपाला निर्यात – फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप ( Farm Registration app ) अपेडा मॅंगो नेट आणि अनारनेट


Farm Registration app

Table of Contents

फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप अपेडा

यूरोपियन य इतर देशांना कीडनाशक उर्वरित अंश मुक्तीची व आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी देण्याकरिता फळे व भाजीपाला बागाची नोंदणी प्रमाणपत्राची मागणी दिवसे दिवस वाढत आहे. त्याकरिता प्रथमतः सन २००४-०५ मध्ये द्राक्ष पिकाकरिता ‘ग्रेपनेट’ ही ऑनलाइन कार्यप्रणाली ‘अपेडा’मार्फत विकसीत करण्यात आली. त्याची अंमलबजावणी कृषि विभागामार्फत करण्यात आली सदर कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याकडून लेखी अर्ज घेऊन बागेची तपासणी करून कृषि विभागामार्फत “अपेडा’च्या संकेतस्थळावर ‘ग्रेपनेट’ अंतर्गत नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्यांनादेण्यात येते.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे द्राक्ष निर्यातीकरिता वापर करणे निर्यातदारास बंधनकारक केलेले आहे. सध्या ग्रेपनेट अंतर्गत ३४०००  द्राक्ष बागायतदारांनी निर्यातीकरिता नोंदणी केलेली आहे. ग्रेपनेटचे यशस्वी अंमलबजावणीपुर्वक आयातदार देशाच्या प्लॅट कॉरन्टाईन अटीची पूर्तता केल्यामुळे द्राक्ष निर्यातीत सातत्य राखून वाढ होत आहे.

 सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन सध्या

आंब्याकरिता ‘मँगोनेट’,

डाळिंबाकरिता ‘अनारनेट’

भाजीपाला पिकांकरिता ‘व्हेजनेट’, संत्रा, मोसंबी व

See also  राजद्रोह कायदा म्हणजे काय? Sedition law information in Marathi

लिंबूकरिता ‘सिट्रसनेट’ व

विड्याच्या पानांकरिता “बिटलनेट’ या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते.

फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप चे महत्त्व

निर्यातक्षम बागेची नोंदणी करण्याकरिता सध्या शेतकऱ्याकडून लेखी अर्ज घेऊन कृषि विभागामार्फत नोंदणीची प्रक्रिया करण्यात येते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे व शेतकरी अति पावसामुळे कामात व्यग्र असल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत: ऑनलाइनद्वारे निर्यातक्षम बागाची नोंदणी करणे शक्‍य व्हावे याकरिता अपेडामार्फत ‘फार्म

रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप विकसीत करण्यात आले आहे.

मोबाईल ऍप कोणासाठी उपयुक्‍त आहे?

ज्या शेतकऱ्यावर निर्यातक्षम फळे व भाजीपाला उ त्पादन करून निर्यातदारास पुरवठा करावयाचा अशा शेतकऱ्यासाठी उपयुक्‍त आहे.

 मोबाईल ऍप मध्ये कोणकोणत्या पिकाचा समावेश आहे?

सदर मोबाईल ऍप मध्ये ऑनलाइन अर्ज करण्याकरिता एकूण सहा पिकाचा समावेश आहे. १. द्राक्ष, २. डाळिंब, ३. आंबा, ४.भाजीपाला (१४ पिके), ५. संत्रा, मोसंबी व लिंबू ६. विड्याची पाने.

मोबाईल ऍप चा वापराकरिता कोणत्या आवश्यक बाबी आहेत?

सदर अँप वापर करण्याकरिता शेतकऱ्याकडे अँड्रॉईड बेस मोबाईलअसणे आवश्यक आहे. तसेच इंटरनेटची सुविधा पाहिजे.

फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप ऍप चा वापर कसा करावा?

सदरचा ऍप हा अपेडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.-डाऊनलोड करण्याच्या

सुविधा उपलब्ध आहेत.

मोबाईल -Farm Registration app वर नोंदणी कशी करावी?

सदर मोबाईल अँप डाऊनलोड केल्यानंतर संबंधितांनी आपला आधारकार्ड व मोबाईल नंबरची माहिती भरल्यानंतर प्रत्येकाचा 0? नंबर तयार होतो तो प्रत्येकाने स्वत: लिहून ठेवणे आवश्यक आहे.

फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप  -Farm Registration app कोणासाठी उपयुक्‍त आहे.

अ) शेतकऱ्यासाठी- बागेची नोंदणीकरिता

ब) कृषि विभागाचे अधिकारी- ऑनलाइन प्राप्त अर्जाची छाननी करून

प्रमाणपत्र देणे.

क) कीडनाशक उर्वरित अंश- उर्वरित अंश तपासणीसाठी प्रयोगशाळा

नमुने घेण्याकरिता

मोबाईल ऍप द्वारे अर्ज कसा करावा?

सदर मोबाईल अँप डाऊनलोड केल्यानंतर प्राप्त झालेला 017 नंबर टाकून सदर अँपवर कोणत्या पिकासाठी अर्ज करावयाचा आहे त्याकरिता ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिस्ट्रसनेट व बिटलनेटची निवड करावी लागते. त्याप्रमाणे नोंदणीचा ऑनलाइन अर्ज उपलब्ध होतो.

फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल ऍप कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे?

सदरचा मोबाईल अँप तीन भाषेत उपलब्ध आहे १. इंग्रजी, २. मराठी, ३. हिंदी. आपल्या गरजेनुसार भाषेची निवड करावी.

See also  ईद-उल-फितर सणाच्या शुभेच्छा मराठीत | Eid Al-Fitr Wishes In Marathi

ऑनलाइन अर्ज करताना कोणती माहिती देणे आवश्यक आहे?

निर्यातक्षम बागाची नोंदणी करण्याकरिता प्रपत्र-अ मध्ये विहित करण्यात आलेले अर्ज आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्याच्या नावाने सातबारा आहे त्या शेतकऱ्याचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई- मेळ असेल तर सातबारा क्रमांक सर्व्हे नंबर, पिकाचे नाव, जात, लागवडीचा दिनांक, क्षेत्र, बहार धरल्याचा दिनांक, संभाव्य काढणीची तारीख, ग्लोबल गॅप प्रमाणपत्र असल्यास त्यांचा नंबर, अंदाजे उत्पादन व इतर माहिती द्यावी लागते.

नवीन बागांची ऑनलाइन नोंदणी Farm Registration app वर कशी करावी?

नवीन बागाची नोंदणीकरिता पिकाप्रमाणे नेटची निवड करून आपली व आपल्या बागेची सविस्तर माहिती मरावी व आपली बागज्या जिल्ह्यात येते तो जिल्हा निवडावा त्यानंतर आपल्या  बागेचा सातबारा स्कॅन कॉपी व बागेचा नकाशाची स्कॅन प्रत ऑनलाइन जोडणे आवश्यक आहे. फार्म भरताना अडचणी आल्यास अपेडाच्या

संकेतस्थळावर या सुविधा दिलेल्या आहेत. तेथे तक्रार केल्यास मार्गदर्शन करण्यात येते तसेच संबंधित जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी यांना ‘समन्वय अधिकारी’ म्हणून निवडले आहे. त्यांच्याकडे किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किंवा राज्यस्तरावर कृषि निर्यात कक्ष किंवा अपेडा मुंबई यांचे मार्फतही अडचणीचे निराकरण करण्यात येते.

बागेची नूतनीकरण करण्याकरिता ऑनलाइन कसे करावे?

निर्यातक्षम बागाची नोंदणी करिता सटर ऍप द्रारे माहिती देणे आवश्यक आहे. अर्जासोबत सातबारा व इतर माहिती देण्याची गरज नाही. पूर्वी सादर केलेल्या माहितीत बदल करावयाचा झाल्यास तसे ऑनलाईन माहिती अद्ययावत केल्यानंतर नोदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करून दिले जाते.

Farm Registration app वर ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?

प्रत्येक फळ व भाजीपाला पिकाकरिता नोंदणीचा कालावधी ठरविण्यात आला आहे.

अ) द्राक्ष-ग्रेपनेट (१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर)

ब) डाळिंब – अनारनेट (वर्षमर सुरू आहे)

क) आंबा – मँगोनेट (१ डिसेंबर ते ३१ मार्च)

ड) भाजीपाला – व्हेजनेट (वर्षभर सुरू आहे)

ह) संत्रा मोसंबी सिट्रसनेट (वर्षभर सुरू आहे)

ई) खाण्याची पाने बिटलनेट (वर्षभर सुरू आहे)

निर्यातक्षम बागाची नोंदणी कोणामार्फत केली जाते?

निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकाची नोंदणी कृषि विभागामार्फत करण्यात येते सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना ‘नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्व सहा नेटची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांकरिता राबविण्यात येत आहे. पूर्वी फक्त १४ जिल्ह्यातच राबविण्यात येत होती.

See also  ऊस लागवड पद्धत - भाग -06- Sugarcane cultivation Methods

निर्यातक्षम बागाची नोंदणी करिता कोणामार्फत तपासणी करण्यात वेते?

निर्यातक्षम बागाची तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व कृषि अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्‍त केलेले आहे.

कृषि विभागामार्फत मोबाईल ऍपद्वारे  ऑनलाइन प्राप्त अर्जावर कशाप्रकारे कार्यवाही करण्यात येते?

कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्यातक्षम बागाची नेटद्वारे नोंदणी करण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यास अपेडा मार्फत लॉगिन व पासवर्ड देण्यात आलेला आहे. कृषि विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी त्याच्या मोबाईलवर सदरचे ऍप डवूनलोड करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याचा वापर करून सटर मोबाईल ऍप  द्वारे प्राप्त अर्जावर संबंधित निर्यातक्षम बागांची प्रत्येक पाहणी करून ऑनलाइनद्वारे अर्जावर कार्यवाही केली जाते.

ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या अर्जाची माहिती कशी मिळते?

सदर अँपद्रारे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी त्यांना दिलेला 01 नंबर द्रारे माहिती मिळते त्याच्या अर्जावर कार्यवाही झाली असल्यास संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर बागेची नोंदणी झाल्याचा संदेश व नोंदणी क्रमांक येतो.

निर्यातक्षम बागेस नोंदणी क्रमांक कसा दिला जातो?

निर्यातक्षम बागेकरिता ऑनलाइन संगणक कार्यप्रणालीद्रवारे १२ डिजीटचा कायमचा नोंदणी क्रमांक दिला जातो, त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पीक इत्यादी तपशिलाचा कोड नंबरमध्ये समावेश असतो. तसेच नोंदणी प्रमाणपत्रात बारकोडही दिला जातो.

नोंदणी प्रमाणपत्राचा शेतकऱ्यांना काय उपयोग होतो?

ज्या शेतकऱ्यांनी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकाची नोंदणी केली आहे. त्यांना निर्यातक्षम उत्पादक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या नावाने नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. युरोपियन व इतर देशांना द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला व इतर नोंदणीकृत पिकांकरिता नोंदणी प्राप्त शेतकऱ्याकडून माल खरेदी करून निर्यात करणे आवश्यक केले आहे.

बागेच्या नोंदणीचा तपशील कोठे पाहता येतो?

नोंदणी केलेल्या निर्यातक्षम शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व नोंदणी क्रमांक अपेडाच्या वेबसाइटवर हार्टिनेट अंतर्गत मध्ये गावनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय व राज्यनिहाय तपशील दिलेला आहे. तो सर्वांना पाहता येतो.

उर्वरित अंश तपासणीकरिता काय सुविधा आहेत?

निर्यातक्षम नोंदणीकृत बागेतील मालाचे उर्वरित अंश तपासणी करिता नमुने घेण्याचे अधिकार अपेडा प्राधिकृत उर्वरित अंश प्रयोगशाळा दिलेले आहेत. त्यांनाही सदर ऍप  द्वारे नोंदणीकृत बागेतून ४ बीची शिफारस कृषि विभागामार्फत ऑनलाइन आवश्यक केल्यानंतर घेण्यात येते.

उर्वरित अंशाचा नमुन्याचे अहवाल कसे प्राप्त होते?

उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता नमुना घेतल्यानंतर त्याची प्रपत्र- ५ मध्ये नमूद केलेल्या यादी प्रमाणे तपासणी करून त्याचा शेतकरी /बागनिहाय अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध केला जातो. तो अहवाल शेतकऱ्यांना स्वत: डाऊनलोड करण्याच्या सुविधा अपेडाच्या वेबसाइटवर दिलेल्या आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी त्याच्या बागेचा नोंदणी क्रमांक य बागेचा ४ ब चा क्रमांक टाकल्यानंतर ज्यांना त्यांच्या बागेचा उर्वरित अंश तपासणी अहवाल डाऊनलोड करून घेता येतो.

ऑनलाइन निर्यातक्षम बागांच्या नोंदणीकरिता अडचणी आल्यास कोणाकडे संपर्क साधावा?

निर्यातक्षम बागाची नोंदणी ऑनलाइन करताना अडचणी आल्यास अपेडाच्या संकेत स्थळावर ।18 085६ च्या सुविधा दिलेल्या आहेत. तेथे तक्रार केल्यास निराकरण करण्यात येते, तसेच संबंधित जिल्ह्यातील तालुका कृषि अधिकारी यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमले आहे. त्यांच्याकडे किंवा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किंवा

राज्यस्तरावर कृषि निर्यात कक्ष किंवा अपेडा मुंबई यांचे मार्फतही अडचणीचे निराकरण करण्यात येते.

निर्यातक्षम नोंदणीकृत बागांची माहिती कशी पाहता येते?

ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट व बिटलनेट अंतर्गत नोंदणी झालेल्या तालुकानिहाय जिल्हानिहाय व राज्यनिहाय व पीकनिहाय नोंदणीचा अद्ययावत तपशील  नेट द्वारे उपलढ्ध करून देण्यात आलेला आहे.

आणि सर्वांना पाहता येतो