CTC म्हणजे काय? CTC Information In Marathi

CTC संपूर्ण माहिती CTC Information In Marathi

जे व्यक्ती एखाद्या कंपनीत नोकरी करत असतात त्यांना CTC विषयी चांगले ज्ञान असते.त्यांनी हा शब्द बहुतेकदा ऐकलेला तसेच वाचलेला देखील असतो.

पण ज्या व्यक्तींनी कधीही कोणत्या कंपनीत नोकरी केली नाही किंवा ज्यांचा स्वताचा धंदा,उद्योग व्यवसाय आहे अशा व्यक्तींना सीटीसी विषयी फार अधिक माहीती नसते.कारण त्यांचा कुठल्याही कंपनी वगैरे मध्ये नोकरी करण्याशी कधी संबंधच आलेला नसतो.म्हणुन त्यांना माहीतच नसते की सीटीसी काय असतो?

 

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीतील सर्व शब्दांचे मराठी अर्थ – Health Insurance Glossary Marathi

 

आपल्या कर्मचारींना कोणतीही कंपनी सीटीसी का देत असते?

आजच्या लेखात आपण सीटीसी विषयी पुर्ण सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

CTC चा फुलफाँर्म काय होतो?

CTC चा फुलफाँर्म Cost To company असा होत असतो.ज्याला मराठीत आपण कंपनीकडुन Employees वर केला जात असलेला वार्षिक खर्च असे देखील म्हणु शकतो.

CTC म्हणजे काय?

  • CTC हा कंपनीत काम करत असलेल्या प्रत्येक Employee वर कंपनीकडुन केला जात असणारा एक खर्च असतो. हा एक वार्षिक खर्च असतो जो मासिक वेतन आणि इतर कर्मचारी भत्ते मिळून calculate केला जातो.
  • प्रत्येक कंपनीत काम करत असलेल्या Employees ला कंपनीकडुन काही सीटीसी Provide केले जात असते.हे सीटीसीची रक्कम प्रत्येक कंपनीची एकसारखी नसुन वेगळी देखील असु शकते.
  • Employees ला CTC देताना कुठलीही कंपनी आधी त्याचा आपल्या कामामध्ये असणारा अनुभव बघत असते,त्याची काम करण्याची पदधत कशी आहे तो आपल्या कामात किती Expert आहे याचसोबत सदर Employee कंपनीच्या प्रती किती निष्ठावंत आहे हे देखील कंपनीकडुन आधी बघितले जाते.
  • अशा पदधतीने वरील सर्व Parameters वर विचार करून कंपनी कोणत्या Employee ला किती सीटीसी देण्यात यायला हवा हे शेवटी ठरवत असते.
  • कुठल्याही कंपनीत काम करत असलेल्या Employee ला महिन्याचे जे वेतन प्राप्त होते.ते सर्व वेतन दिले जाण्यासाठी(Total Salary Package) सीटीसी हे टर्म वापरात आणले जाते.
  • सीटीसी मध्ये हे दिलेले असते की कंपनीने संपुर्ण वर्षभरात आपल्या Employees वर किती Money Expense केला आहे.
  • सीटीसी ही कर्मचारीला कंपनीकडुन मिळणारी एक Gross Salary तसेच कंपनीकडुन दिला जाणारा अतिरीक्त खर्च तसेच Money Amount असते.
See also  जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)

सीटीसी मध्ये प्रत्यक्ष लाभ,अप्रत्यक्ष लाभ,बचत योगदान इत्यादीचा समावेश असतो.

प्रत्यक्ष लाभामध्ये हाऊस रेट अलाऊन्स,व्हेईकल अलाऊन्स,इंसेटिव्हज,बोनस,कन्व्हेनन्स अलाऊन्स हे येत असतात.

तर अप्रत्यक्ष लाभामध्ये टँक्स सेव्हींग,व्याजमुक्त कर्ज,आँफिसची स्पेस रेंटवर देणे,फुड कुपन,कंपनी लीझ इत्यादी येत असते.

आणि Saving Contribution मध्ये Gratuity,Employee Provident Fund इत्यादी सुविधा Employee ला कंपनीकडुन मिळत असतात.

थोडक्यात कुठल्याही कंपनीकडुन आपल्या Employees ला महिन्याचे वेतन देण्यासोबत काही अतिरीक्त रक्कम तसेच खर्च आणि इतर सोयी सुविधा देखील दिल्या जात असतात.त्यालाच आपण सीटीसी असे म्हणत असतो.

CTC च्या माध्यमातुन Employees ला प्राप्त होत असलेल्या Facilities कोणकोणत्या असतात?

● सीटीसीच्या माध्यमातुन Employee ला Salary व्यतीरीक्त काही Amout कंपनीकडुन Pay केले जात असते.

● CTC च्या माध्यमातुन कंपनी आपल्या Employees ला Medical सुविधा देत असते

● तसेच त्या Employee ला Life Coverage मिळण्यासाठी Life Insurance ची सुविधा देखील कंपनीकडुन दिली जात असते.

● कंपनीमध्ये येताना Employee ला काही अडचण येऊ नये म्हणुन त्याला कंपनीकडुन Taxy ची सुविधा देखील दिली जात असते.

● याचसोबत वैदयकीय उपचारासाठी विविध फंडस देखील दिले जात असतात.

● Employee ला Loan ची Facility Provide केली जाते.

CTC Amount कसे काढले जाते?

सीटीसी अमाऊंट कँलक्युलेट करणे हे फार काही अवघड नसते.कुठल्याही कंपनीतील Employee ला त्याच्या Salary व्यतीरीक्त ज्या Other Facilities Provide केल्या जातात.त्यावरूनच त्या Employee चा सीटीसी ठरवला जात असतो.