Soulmate – कोण असतो? Soulmate Meaning In Marathi
आपल्या मनाशी घट्ट नाते जुळलेला,, दुःखात साथ देणारा, तुमची आसवं पुसणारा ,अडीअडचणीत सोबत असणारा, संकटात हाथ धरणारा, तुमच्या यशात सर्वात आधी तुमचं कौतुक करणारा, चुकलात तर कानउघाडणी करणारा, भलबुर लक्ष्यात आणून देणारा , तुमच्याशी वादविवादात माघार घेणारा ,तुमच्या अबोल्यातलं बोलणं समजणारा व आयुष्यभर आपल्याला साथ देईल याची शाश्वती असणारी, खंबीरपणे सदैव पाठीमागे असणारी व्यक्ती म्हणजेच तुमचा सोलमेट.
मग कोण असतो सोलमेट आई वडील ,जीवनसाथी , जोडीदार ,मित्र , मैत्रीण की अजून कोणी?
- सोलमेट हा शब्द आपल्या मनात येतो तेव्हा आपल्या समोर एक अशी व्यक्ती येते जिच आपल्या मनाशी आपल्या आत्म्याशी ,हदयाशी एक खोल नात जुळलेल असत.ही एक अशी व्यक्ती असत जिला आपण आपल्या मनातील काही सांगितले नाही तरी देखील तिला आपल्या मनाची सर्व तगमग,घालमेल भावना ,आनंद,दु:ख सर्व काही तिला कळतात .
- आपल्यापैकी खुप जणांना सोलमेट हा शब्द आल्यावर आपली प्रेमिका,आपली लाईफपार्टनर आठवत असते.
- जिच्यासोबत आपण आपले संपुर्ण आयुष्य व्यतित करत असतो जी आपल्या सुख दुखाची सोबती साथीदार असते.तिचेच चित्र आपल्या डोळयासमोर सोलमेटच्या स्वरूपात येत असते. कारण आपल्या नजरेत आपली लाईफ पार्टनर,प्रेयसी हिच आपली खरी सोलमेंट असते.
- पण आपल्यातील बहुतेक जणांना जे असे वाटते ते कितपत सत्य तसेच योग्य आहे हेच आपण आजच्या लेखातुन सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Soul ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो.आणि Mate ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ सोबती,जोडीदार असा होत असतो.आणि जेव्हा आपण हे दोन शब्द एकत्र करतो तेव्हा याचा अर्थ आत्मयाचा जोडीदार,साथी,सोबती असा होत असतो.
- म्हणजेच सोलमेंट ही एक अशी व्यक्ती असते जिचे आपल्याशी आत्म्याचे नाते जुळलेले असते.जिला आपण आपल्या मनातील विचार,भावना काही सांगितले नाही तरी देखील तिला आपल्या मनाची सर्व तगमग,घालमेल अनुभवता येत असते तसेच कळत असते.
- सोलमेंट हा शब्द ऐकल्यावर आपल्याला पहिले आपली प्रेयसी तसेज लाईफपार्टनरचा चेहरा दिसत असतो.कारण आपल्या प्रेयसीसोबत आपले एक हदयाचे,आत्म्याचे अतुट नाते जुळतेते असते.
- त्यामुळे प्रियकरावर काही संकट आले तसेच त्याच्यासोबत काही वाईट घडले तर प्रेयसीला लगेच याची अनुभुती होत असते.कारण दोन जीव एक आत्मा असे त्यांचे एक आत्म्याचे नाते बनलेले तसेच जुळलेले असते.म्हणुन आपली प्रेयसी तसेच प्रियकराला आपण आपला सोलमेट म्हणत असतो.
- ज्या पदधतीने एका प्रियकर आणि प्रेयसीचे एकमेकांशी एक अतुट आत्म्याचे नाते जुळलेले असते.ते दोन वेगळे जीव असुन एक आत्मा असतात
- तसेच आपली लाईफपार्टनर आपली जीवणसंगिनी ही देखील आपली सोलमेंट ठरत असते.कारण आपल्या लाईफ पार्टनरसोबत लग्नानंतर आपले जन्मोजन्मीचे नाते(सात जन्मांच्या गाठी,नाते) जुळलेले असते.
- आपली लाईफ पार्टनर ही आपल्या सुखदुखाची चांगल्या तसेच वाईट दिवसांची सोबती असते.जी आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहत असते.
- आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत आपण एकमेकांची साथ सोडणार नाही एकमेकाची साथ देऊ असे वचन आपण एकमेकांना अग्नीची साक्ष घेऊन देत असतो.
- याचाच अर्थ लग्नानंतर पती आणि पत्नी हे दोन जीव एक आत्मा बनत असतात.म्हणुन आपण आपल्या लाईफपार्टनरला आपला सोलमेंट म्हणत असतो.
आपले सोलमेंट कोणकोण असु शकते? Who can be our soulmate
- पण सोलमेंट ह्या शब्दाचा प्रेयसी तसेच पत्नी फक्त इथपर्यत अर्थ सीमीत होत नाही.आपली सोलमेंट ही फक्त आपली प्रेयसी तसेच आपली पत्नीच असू शकते असे काहीही नसते तर आपले सोलमेंट कोणीही असु शकते.
- ज्यात आपली आई,वडील,बहिण,भाऊ,आत्या,काकु,मावशी,जिवलग मित्र,मैत्रीण,इत्यादी पैकी आपल्या आयुष्यातील कोणीही जवळची व्यक्ती आपले सोलमेंट ठरत असते.
- कारण सोलमेंट ह्या शब्दाचा मुळ अर्थ आपल्या आत्मयाशी जोडली गेलेली व्यक्ती असा होत असतो.
- ज्यात आपली आई देखील आपली सोलमेंट असते.कारण नऊ महिने नऊ दिवस तिने तिच्या गर्भामध्ये आपल्याला वाढवलेले असते.
- आपण तिच्या पोटाचा गोळा असतो म्हणुन आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट तिला न बोलता कळत असते.
- आपल्यावर काही संकट येणार असल्यावर सगळयात आधी याचा संकेत तिला मिळत असतो.कारण आपल्या आईशी आपले आत्म्याचे नाते जुळलेले असते.म्हणुन आपली आई देखील आपली खरी सोलमेंट असु शकते.
- याचसोबत आपला भाऊ,बहिण,हे देखील आपले सोलमेंट असु शकतात.ज्याला,जिला काहीही न सांगता आपल्या मनातले सर्व काही कळत असते.आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट आपला भाऊ तसेच बहिण वाचु शकत असते.आपला मनाची अवस्था समजु शकत असतात.
- याचसोबत आपला जिवलग मित्र तसेच मैत्रीण देखील आपले सोलमेंट असतात.कारण मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक अतुट आणि श्रेष्ठ मानले जाते.
- आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा जिवलग मित्र मैत्रीण असते ज्याला,जिला काही न सांगता आपण प्राँब्लेम मध्ये आहे,दुखी आहे किंवा चिंतेत आहे हे कळुन जात असते.कारण ती व्यक्ती आपल्या आत्मयाशी जोडली गेलेली असते.तिचे आणि आपले आत्म्याचे नाते जुळलेले असते.
- अशा पदधतीने आपल्या आत्मयाशी जोडली गेलेली कुठलीही व्यक्ती आपली सोलमेंट असु शकते.
Soulmate आणि Life Partner या दोघांमध्ये काय फरक असतो?
- जसे आपण आधीच्या परिच्छेदात जाणुन घेतले की आपली लाईफर्टनर,प्रेयसी,आई,वडील,बहिण,भाऊ,
- आत्या,काकु,मावशी, जिवलग मित्र,मैत्रीण,इत्यादी पैकी आपल्या आयुष्यातील कोणीही जवळची व्यक्ती आपले सोलमेंट ठरत असते.
- मग प्रश्न आपल्याला हा पडतो की Soulmate आणि Life Partner या दोघांमध्ये काय फरक असतो.
Soulmate आणि Life Partner या दोघांमध्ये पुढील फरक असतो : Difference between Soulmate and Life Partner
- सोलमेंट ही एक अशी व्यक्ती असते जिचे आपल्याशी आत्म्याचे नाते जुळलेले असते.जी आपली आत्म्याची जोडीदार असते.जिला आपण आपल्या मनातील विचार,भावना काही सांगितले नाही तरी देखील तिला आपल्या मनाची सर्व तगमग,घालमेल अनुभवता येत असते तसेच कळत असते.
- आपली लाईफ पार्टनर ही आपल्या सुखदुखाची चांगल्या तसेच वाईट दिवसांची सोबती असते.जी आयुष्यातील प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहत असते.
- आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यत आपण एकमेकांची साथ सोडणार नाही एकमेकाची साथ देऊ असे वचन आपण एकमेकांना अग्नीची साक्ष घेऊन देत असतो.
- सोलमेट ही प्रेयसी,पत्नी,आई,वडील,बहिण,भाऊ,आत्या,काकु,मावशी,जिवलग मित्र,मैत्रीण यापैकी कुणीही व्यक्ती असु शकते
- पण लाईफ पार्टनर ही एकच व्यक्ती असते जिच्यासोबत आपण आपले पुर्ण आयुष्य व्यतित करत असतो.
- सोलमेंट ही आपल्या आत्म्याशी जोडली गेलेला व्यक्ती असते जी आपल्यासोबत फिजिकली प्रेझेंट असो किंवा नसो तरी देखील ती आपल्यापासुन दुर असुन देखील तिचे आपल्याशी एक हार्ट कनेक्शन असते.ज्यामुळे ती आपले दुख वेदना आपली उपस्थिती इत्यादी सर्व काही फिल करू शकते.
- लाईफ पार्टनर ही आपली आयुष्यभराची जीवणाची जोडीदार असते म्हणुन ती नेहमी आपल्यासोबत फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकारे प्रेझेंट असते.आणि ती देखील आपले दुख,वेदना मनाची तगमग फिल करू शकते.
- सोलमेंट व्यक्ती ही आपल्यापासुन कुठलीही परतफेडीची तसेच आपण देखील तिला प्रेम करावे तिच्यासाठी काही करावे अशी अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने आपल्यावर प्रेम करत असते.
- लाईफपार्टनर ही एक अशी व्यक्ती असते जी आपल्यावर प्रेम करते आपल्याला जीव लावते आपल्याला काय हवे काय नको ते बघते आणि आपण देखील तिच्यावर खुप प्रेम करावे तिला काय हवे काय नको याची नेहमी काळजी घ्यावी ही अपेक्षा बाळगत असते.
- सोलमेंट आणि आपली विचार करण्याची पदधत वगैरे एकदम सारखी असते.
- लाईफपार्टनरची आणि आपली विचार करण्याची पदधत सारखी असुही शकते किंवा नसु देखील शकते.
1 thought on “Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning In Marathi”
Comments are closed.