Crush अर्थ काय? Crush meaning in Marathi

Crush म्हणजे काय? Crush meaning in Marathi

 आपल्या महाविद्यालयीन जीवणात आपल्याला नेहमी आपल्या मित्र मैत्रीणींच्या तरूण युवक युवतींच्या तोंडातुन एक शब्द ऐकायला मिळत असतो तो शब्द आहे क्रश.

आपल्या मित्रांच्या तोंडुन आपण नेहमी असे शब्द ऐकत असतो की ती त्याची क्रश आहे.ती माझी क्रश आहे.

आपले मित्र मैत्रीण देखील आपल्याला थट्टा मस्करीत कधीकधी विचारत असतात तुझ्या क्रशचे नाव काय आहे?तेव्हा आपण हा शब्द नवीनच ऐकत असल्यामुळे खुप गोंधळात पडत असतो.

कारण गर्लफ्रेंड लव्हर हा शब्द आपल्याला माहीत असतो पण क्रश हा शब्द आपल्यापैकी खुप जणांसाठी एकदम नवीन असतो.अशावेळी समोरच्याला काय उत्तर द्यावे हेच आपल्याला कळत नसते.

कारण क्रश म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नसते तर त्याचे उत्तर तरी कुठुन देणार?अशा वेळी आपण सरळ इंटरनेटवर याचा अर्थ सर्च करतो पण तिथे देखील आपल्याला काही समाधानकारक उत्तर प्राप्त होत नाही.

म्हणुन आपल्या ह्याच कुतुहलाची जिज्ञासेची पुर्ती करण्यासाठी आम्ही आपणास क्रश म्हणजे काय?ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?या विषयी संपुर्ण माहीती आजच्या लेखातुन देणार आहोत.

Crush म्हणजे काय? Crushmeaning in Marathi

 आपले एखाद्या व्यक्तीवर खुप मनापासुन प्रेम असते.आपल्याला ती आवडत असते पण आपले त्या व्यक्तीसोबत कुठलेही लव रिलेशनशीप नसते.कारण त्या व्यक्तीजवळ आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करायला घाबरत असतो.अशा व्यक्तीला क्रश म्हटले जात असते.

उदा,

एखाद्या महाविद्यालयात शिकत असलेल्या तरूणाचे  त्याच्याच महाविद्यालयात शिकत असलेल्या एखाद्या तरूण मुलीवर,युवतीवर खुप मनापासुन प्रेम असते.

पण तिच्यासोबत त्याचे कुठलेही प्रेमसंबंध नसतात कारण त्याने भीतीपोटी त्याचे प्रेम तिच्यासमोर प्रत्यक्ष जाऊन कधी व्यक्तच केलेले नसते.

आणि ही गोष्ट त्याच्या आजुबाजुच्या सर्व मित्र मैत्रीणींना माहीत असते तेव्हा गप्पा मारत असताना किंवा अचानक त्या तरूण तरूणीचा विषय निघल्यावर ती तरूणी त्या तरूणाची क्रश आहे असे सर्व आजुबाजुचे मित्र मैत्रीण म्हणत असतात.

क्रश ह्या शब्दाची कुठलीही एक ठाराविक व्याख्या आपणास करता येणार नाही कारण आजकाल प्रौढ व्यक्तींबरोबर शाळेत जाणारी/महाविदयालयात शिकणारी मुले मुली देखील अमुक मुलगी आपल्याला खुप आवडते हे आपल्या मित्र मैत्रीणींना सांगण्यासाठी ह्या शब्दाचा सर्रासपणे वापर करत असतात.

थोडक्यात क्रश म्हणजे आपल्याला आवडत असलेली एखादी विशिष्ट व्यक्ती.जिच्याविषयी आपल्या मनात स्पेशल फिलिंग असतात.प्रेमाच्या भावना दाटुन येत असतात.

Crush आपण कोणाला म्हणु शकतो?

क्रश ही ती व्यक्ती असते जिच्याजवळ आपण आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करायला घाबरत असतो,तिच्यासमोर गेल्यावर नरवस होऊन जातो आपल्याला बोलायला शब्द सुचणे बंद होऊन जाते.

आणि सगळयात महत्वाचे म्हणजे तिच्याशी आपले कुठलेही प्रेमसंबंध नसताना मनोमन तिच्यावर खुप प्रेम करत असतो.

म्हणजेच क्रश हा एकतर्फी प्रेमाचा प्रकार आहे.असे म्हणायला काही हरकत नाही.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर अशी एक व्यक्ती जिच्यासोबत बोलायला,तिला भेटायला तिच्या सहवासात राहायला आपल्याला खुप आवडते,तिला पाहिल्यावर आपले मन एकदम आनंदीत आणि प्रफुल्लित होऊन जात असते.अशा व्यक्तीलाच आपली क्रश असे म्हटले जाते.

भारताची national crush कोणाला म्हटले जाते?

 भारतीय संघाची सलामीवीर स्मृती रंधाना ही भारताची national crush म्हणुन ओळखली जाते.

आणि साऊथ इंडियन अँक्ट्रेस निधी अग्रवाल ही सध्याची नँशनल क्रश म्हणुन ओळखली जाते.टविटर वर नँशनल क्रश म्हणुन ती ट्रेंड देखील करताना दिसुन आली आहे.

Crush आणि love या दोघांमध्ये काय फरक आहे?

 क्रश म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्याला खुप आवडते,जी समोर आल्यावर आपले मन आनंदी होऊन जाते.जिच्या सहवासात राहायला आपणास खुप आवडते.जिचे आपल्याला नेहमी आकर्षण असते.

पण प्रेम ही एक थोडे वेगळे आणि घटट नाते तसेच भावना आहे ज्यात विश्वास,आपुलकी,त्याग समर्पण इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो.

  • क्रश ही आपल्याला आवडणारी व्यक्ती असते म्हणजे यात एखादी व्यक्ती आपणास आवडत असते,तिच्याप्रती आपल्या मनात आकर्षण असते.

तर प्रेम हे आत्म्याचे हदयाचे नाते आहे ज्यात एखादी व्यक्ती आपल्याला समजून घेते जीव लावते.आपल्यासाठी कुठलाही त्याग करत असते.निस्वार्थ भावनेने आपल्यासाठी सर्व काही करत असते.

  • उदा. राधा कृष्णाचे जन्मोजन्मीचे अतुट नाते हे प्रेम म्हणता येईल

आणि आपल्या काँलेजात असलेल्या एखाद्या सुंदर तरूणीविषयी आपल्या मनात आकर्षणाची भावना निर्माण होणे ती आपल्याला आवडणे हे क्रशचे उदाहरण आहे.

Crush ह्या शब्दापासून तयार करण्यात आलेली काही वाक्ये :

 1) ankita is rahul crush.

राहुलला अंकिता खुप आवडते.

2) sammer is neha crush.

नेहाला समीर खुप आवडतो.