Vibes म्हणजे काय? Vibes Meaning In Marathi

Vibes च अर्थ काय? Vibes Meaning In Marathi

आपल्या मित्र मैत्रीणींच्या तसेच आजुबाजुच्या लोकांच्या तोंडातुन,सोशल मिडियावर वाचण्यात येत असलेल्या विविध स्टेटसमध्ये,बाँलिवुडमधले नुकतेच उदयास आलेले एखादे ट्रेंडिंग साँग मध्ये तसेच आपल्या रोजच्या दैनंदिन जीवणात नेहमी एक इंग्रजी भाषेमधील शब्द ऐकावयास मिळत असतो तो म्हणजे वाईब्स.

पण वाईब्स ह्या शब्दाचा नेमका काय अर्थ काय होतो?हा शब्द आपल्या दैनंदिन जीवणात आपण मुख्यकरून कुठे आणि का वापरत असतो?वाईब्स ह्या किती प्रकारच्या असतात?हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते.

आणि जेव्हा आपण इंटरनेटवर हा किवर्ड सर्च करत असतो तेव्हा कुठलेही समाधानकारक उत्तर देखील आपणास याबाबद प्राप्त होत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण वाईब्स म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

जेणेकरून आपल्या मनातील उत्सुकता,जिज्ञासा देखील पुर्ण होईल.आणि आपल्याला इतर कुठेही याचे उत्तर शोधण्याची गरज देखील पडणार नाही.

 

Vibes म्हणजे काय?

वाईब हा एक भावनिक संकेत(Emotional Signal)असतो जो एखाद्या व्यक्तीच्या शारीरीक हालचालीतुन तसेच सामाजिक संवादाद्वारे त्याच्या आजुबाजुच्या व्यक्तींपर्यत पोहचत असतो.

म्हणजे समजा एखादा व्यक्ती नेहमी आनंदी राहत असेल तर त्याच्या आजुबाजुच्या वातावरणावर सकारात्मक प्रभाव पडुन त्याच्या आजुबाजुचे सर्व व्यक्ती देखील नेहमी आनंदी राहत असतात.

आणि त्याचठिकाणी ती व्यक्ती नेहमी दुखी राहत असेल नकारात्मक विचार करत असेल तर त्याच्या आजुबाजुचे वातावरण,आजूबाजुचे व्यक्ती देखील नकारात्मक विचार करू लागतात.

See also  घरातील लाईट बील निम्म्यापेक्षा कमी येण्यासाठी घरात वापरा हे उपकरण  - What is NFC and how does it work?

त्यांच्या आजुबाजुला सर्व नकारात्मक गोष्टी घडु लागतात.कारण वाईब्सचा थेट आपल्या मनस्थितीवर परिणाम होत असतो.

वाईब्सचे एकवचन Vibe असे होते आणि अनेकवचन Vibes असे होत असते.

वाईब्सचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

 

वाईब्स ह्या दोन प्रकारच्या असतात.

1)Positive Vibes -(सकारात्मक भावना,संकेत) :

 2) Negative Vibes -(नकारात्मक भावना,संकेत) :

1)Positive Vibes -(सकारात्मक भावना,संकेत):

 

पाँझिटिव्ह वाईब्स ही एक सकारात्मक भावना तसेच संकेत आहे यात जर आपण चांगला विचार केला तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होत असतात.

आपल्या आयुष्यात चांगल्या घटना तसेच प्रसंग घडु लागतात.आपल्या प्रत्येक कामात Positive Result येत असतो.यालाच Positive Vibes असे म्हटले जाते.

उदा.दोन मित्र एकमेकांना भेटतात त्यात एक मित्र म्हणतो की आयुष्य हे खुप संदर आहे आयुष्यात करण्यासारखे खुप काही आहे.म्हणजेच जीवणाविषयी सकारात्मक विचार तो त्याच्या मित्राजवळ व्यक्त करतो.ज्याचे Vibrations त्या दुसरया मित्राकडे देखील Pass होत असतात.ज्याने करून तो देखील जीवणाविषयी सकारात्मक विचार करू लागतो.

2) Negative Vibes -(नकारात्मक भावना,संकेत):

निगेटिव्ह वाईब्स ही एक नकारात्मक भावना तसेच संकेत आहे.ज्यात आपण जर माझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही.मला कुठेच यश प्राप्त होत नाही.हे जग अत्यंत वाईट आहे.

सतत असे नकारात्मक विचार केले तर आपल्यासोबत देखील वाईट गोष्टी घडु लागतात.आपल्याला कुठल्याही कामात यश प्राप्त होत नसते.आपल्या मनात जीवणात संपुर्ण नकारात्मकता निर्माण होत असते.आणि आपल्या प्रत्येक कामात Negative Result येत असतात.यालाच Negatives Vibes असे म्हटले जाते.

कारण आपण नकारात्मक विचार करून Negative Vibes ला आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो.आणि आपल्या सहवासात असणारया इतर व्यक्तींवर देखील याचा नकारात्मक परिणाम होत असतो.ते देखील Negative Vibes कडे आकर्षिले जात असतात.

उदा.दोन मित्र एकमेकांना भेटतात त्यात एक मित्र म्हणतो की माझे आयुष्य हे खुप दुखद,तकलीफीने भरलेले आणि संघर्षमय आहे आयुष्यात करण्यासारखे काहीच राहिलेले नाहीये.म्हणजेच जीवणाविषयी नकारात्मक विचार तो त्याच्या मित्राजवळ व्यक्त करतो.ज्याचे Vibrations त्या दुसरया मित्राकडे देखील Pass होत असतात.ज्याने करून तो देखील जीवणाविषयी नकारात्मक विचार करू लागतो.

See also  मराठीत ब्लॉग म्हणजे काय ?-what is Blog in Marathi

म्हणजेच वाईब्स ही एक सकारात्मक/नकारात्मक भावना आहे जी एका व्यक्तीकडुन दुसरया व्यक्तीकडे पोहचत असते.

 

म्हणुन आपण नेहमी सकारात्मक विचार करायला हवे जेणेकरून आपल्या आयुष्यात देखील सकारात्मक गोष्टी घडु लागतात.आणि याचाच सकारात्मक परिणाम आपल्या सहवासात असलेल्या इतरांच्या आयुष्यात होत असतो.

 

Vibes ह्या शब्दाचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवणात कुठे आणि केव्हा करत असतो?

 

Vibes ह्या शब्दाचा वापर सकाळच्या वातावरणाची चांगली अनुभुती आल्यावर Good Morning Vibes म्हणुन करत असतो,रात्रीच्या वेळी वातावरणाचे जे संकेत आपल्याला येत असतात त्याला Night Vibes असे म्हणत असतो.

 

अशा पदधतीने वाईब्स हा शब्द आपण कुठल्याही घटना,प्रसंगी सण उत्सवात,आपल्याला आजुबाजुच्या वातावरणाबाबद तसेच एखाद्या व्यक्तीबाबद जी चांगली तसेच वाईट अनुभुती प्रचिती येत असते ती सांगण्यासाठी करत असतो.

 

अशा पदधतीने आपल्या आजुबाजुच्या वातावरणात विविध वाईब्स ह्या आपल्याला जाणवत असतात.

 

Vibes ह्या शब्दाचे मराठीत कोणकोणते अर्थ होत असतात?

 

1)भावनिक संकेत,चिन्ह (Emotional Signal)

 

2) कंपन(Vibrations)

 

3) वागणुक (Behaviour)

 

4) कल्पणा(Imagination)

 

5) संदेश (Message)

 

6) अनुभव (Experience)

 

7) भावना (Feelings)

Vibes ह्या शब्दाचे इतर समानार्थी आणि विरूदधार्थी शब्द कोणकोणते आहेत?

 

समानार्थी शब्द :

 

1)Feel -अनुभवणे,प्रचिती येणे

 

2) Mood -मनाची ओढ तसेच कल

 

विरुदधार्थी शब्द :

 

1)उदासीनता

 

2) खिन्नता

 

 

Vibes ह्या शब्दाचा वापर केलेल्या वाक्यांची काही उदाहरणे :

 

1)I Like This Location.It Had Positive Vibes.

 

मला ती जागा आवडली कारण तिथे मला Positive Vibes मिळत होते.

 

2) I Have Bad Vibes,About This Big Contract.

 

मला ह्या मोठया करारातुन Negative Vibes मिळत आहेत म्हणजेच यातुन मला काहीतरी तोटा होणार असे वाटते आहे.

See also  एफ थ्री मुव्ही विषयी रिव्युव्ह -F3 Movie Review In Marathi

 

3) Sorry,Minal But I Have Bad Vibes About Your Friend.

 

मिनल मला माफ कर पण मला तुझा हा मित्र काही चांगला वाटत नाहीये.त्याच्याविषयी माझ्या मनात Bad Vibes येता आहेत.

 

सोल मेट

 

Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning In Marathi

 

2 thoughts on “Vibes म्हणजे काय? Vibes Meaning In Marathi”

Comments are closed.