घरातील लाईट बील निम्म्यापेक्षा कमी येण्यासाठी घरात वापरा हे उपकरण  – What is NFC and how does it work?

घरातील लाईट बील निम्म्यापेक्षा कमी येण्यासाठी घरात वापरा हे उपकरण  – What is NFC and how does it work?

खुपदा असे होते की आपण आपल्या आळशी स्वभावामुळे घरातील अशी महत्वाची उपकरणे जी विनाकारण चालु ठेवल्यामुळे जास्त लाईट बील येऊ शकते ती चालुच ठेवत असतो.

जसे की घरातील एखादा लाईट,बल्ब,टयुब नळी,फॅन,एसी इत्यादी ही काही अशी उपकरणे आहेत जी विनाकारण चालु ठेवल्यामुळे महिन्याच्या अखेरीस आपणास जास्त लाईटबील येते.

त्यातच आपला सर्वसामान्य नागरिकांना दरमहिन्याला येणारे लाईट बील आपल्या किमान वेतनानुसार परवडणारे देखील ठरत नसते.

याचकरीता आजच्या लेखात आपण एक अशा एका उपकरणा विषयी माहिती जाणून घेणार आहोत जे उपकरण घरात बसवल्यामुळे आपले लाईट बील दरमहा निम्मे कमी होईल.

चला तर मग जाणुन घेऊया हया उपकरणा विषयी अधिक सविस्तरपणे.

व्हाट्सएप बिझनेसचे ‘बूस्ट स्टेटस’ फिअचर काय आहे? कसे वापरावे?

घरातील लाईट बील कमी येण्यासाठी घरात कोणते उपकरण वापरायचे?

घरातील लाईट बील निम्म्यापेक्षा कमी येण्यासाठी घरात वापरा हे उपकरण  - What is NFC and how does it work
What is NFC and how does it work

एकदा उन्हाळ्याला सुरूवात झाली की उकाडा तसेच गरमाईच्या काळात लागत असलेल्या फ्रिज फॅन एसी कुलर हया वस्तुंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

यांचा वापर उन्हाळ्यात आपल्याकडुन इतका अधिक होत असतो की आपले लाईट बील खुपच जास्त प्रमाणात येत असते.जे आपल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडेल असे नसते.

अशा वेळी आपण सर्वसामान्य नोकरदार व्यक्ती एसी फ्रिज कुलर फॅन अशा महागडया वस्तु ज्यांचा अधिक वापर केल्याने लाईटबील जास्त येते यांचा कमीत कमी वापर करू लागतो किंवा वापर करणेच बंद करत असतो जेणेकरून लाईटबील हे कमी येईल.

पण आताचे युग हे स्मार्टफोन्स वापरणाऱ्या स्मार्ट लोकांचे युग आहे अणि आपण आपल्या ह्याच स्मार्ट नेसचा उपयोग करून घरात येणारे लाईट बील कमी करू शकतो ते देखील ही वस्तु वापरायची नाही ती वस्तु वापरायची नाही अशी कुठलीही काकुळती न करता.

खुप वेळा असे होते की घरातील येत असलेले पन्नास टक्के लाईट बील हे घरातील व्यक्तींनी केलेल्या वीजेच्या वापरामुळे नाही तर वीजेच्या बेसुमार अणि निरर्थक अपव्ययामुळे येत असते.

म्हणजे समजा आपण घरातील सर्व मंडळी एका रूममध्ये बसलो आहे अणि घरातील दुसऱ्या रूममध्ये कोणीही बसलेले नाही तरी देखील तिथे विनाकारण फॅन चालु ठेवलेला आहे.

अशा वेळी घरात लाईट बील जास्त येण्याची दाट शक्यता असते.अणि हे सर्व ह्यामुळे होते की आपल्याला एका रूममधुन ऊठुन दुसऱ्या रूममध्ये जाऊन चालु राहीलेला फॅन तसेच लाईट बंद करायचा कंटाळा येत असतो.

ज्यामुळे आपण तो चालु राहीलेला लाईट तसेच फॅन तसाच चालु ठेवतो ज्याचे परिणाम स्वरुप आपणास लाईट बीलामध्ये भरमसाठ वाढ झालेली दिसून येते.

एक गोष्ट आहे जर आपण आपल्या घरातील लाईटबील जास्त येईल अशा उपकरणांचा विनाकारण अपव्यय करणे बंद केले तर आपल्या घरातील लाईटबील निम्म्या पेक्षा कमी येऊ शकते.

आपण आपल्या घरामध्ये लाईट बील निम्म्यापेक्षा कमी यावे म्हणून घरात एन एफसी हे डिव्हाईस बसवु शकतो. हे डिव्हाईस चीप बाजारात आपणास फार स्वस्त दरात म्हणजे फक्त १२ रूपयांत उपलब्ध होते.

यात आपण एकावेळी एकापेक्षा जास्त एन एफसी डिव्हाईसचा उपयोग देखील करू शकतो.

एन एफसी हे एक निअर फिल्ड कम्युनिकेशन डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस दिसायला एकदम ब्लुटूथ सारखे असते. हे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल वर काम करत असते.

ह्या एन एफसी डिव्हाईसचा वापर करून आपण घरातील जेवढेही आपल्या जवळच्या अंतरावरची लाईट बील जास्त आणणारी उपकरणे आहेत त्यांना आपल्या कंट्रोल मध्ये ठेवू शकतो.

म्हणजेच ह्याच्या मदतीने आपण घरातील दुसऱ्या रूममध्ये विनाकारण चालु असलेला फॅन लाईट बल्ब टिव्ही एका जागेवर बसुन चटकन बंद करू शकतो.

याने वीजेचा घरातील लाईट बिलात वाढ होईल अशा उपकरणांचा विनाकारण अपव्यय केल्याने येणारे अतिरीक्त लाईट बील येणे बंद होईल

अणि आपले लाईट बील हे निम्म्यापेक्षा अधिक कमी देखील होईल.