महाराष्ट्र सरकारकडुन दिली जात आहे ८ वी ते १२ पर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल | cycle anudan yojana in Marathi

महाराष्ट्र सरकारकडुन दिली जात आहे ८ वी ते १२ पर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल – Cycle Anudan yojana in Marathi

ज्या मुली आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेत आहे अशा गरीब आणि गरजू मुलींसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत लाभदायी योजना सुरू केली आहे.

ह्या योजनेअंतर्गत ज्या मुलींची शाळा पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असेल अशा मुलींना शाळेत पायी जायची वेळ येऊ नये म्हणजेच त्यांना शाळेत जाण्या येण्यासाठी सायकल घेता यावी म्हणून शासनाकडून सायकल अनुदान प्रदान केले जात आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यात काही ग्रामीण भागात आजही पाहीजे तशी रस्त्यांची व्यवस्थित दुरूस्ती करण्यात आली नाहीये.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील शाळेत शिकत असलेल्या मुलींना शाळेत जाण्या येण्यासाठी कुठली सोय सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेली नाहीये.

याचकरीता महाराष्ट्र शासनाने खास मुलींकरीता ही सायकल अनुदान योजना सुरू केली आहे.ज्यामध्ये ग्रामीण भागात राहत असलेल्या आठवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकल दिली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाने ही मोफत सायकल योजना सुरू करण्यामागे आपले अनेक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे.

ज्यातील आपला पहिला मुख्य हेतु हा मुलींना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागु नये, ग्रामीण भागात राहत असलेल्या मुलींना शिक्षणासाठी दुर मैल अंतरावर शाळेत चालत जाण्याची वेळ येऊ नये.

सरकारच्या ह्या मोफत सायकल अनुदान योजनेमुळे ज्या मुलींची शाळा आपल्या घरापासून दूर मैल अंतरावर आहे अशा मुलींची शाळेत जाताना होत असलेली गैरसोय कायमची दुर होणार आहे.

तसेच मुलींना शाळेत जाण्यासाठी कुठल्याही रिक्षा बस अशा साधनांची आवश्यकता पडणार नाही कारण ह्या योजनेमुळे मुलींना शाळेत जाण्यासाठी स्वताचे हक्काचे दुचाकी वाहन प्राप्त होणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या ह्या मोफत सायकल अनुदान योजनेमुळे ग्रामीण भागातील मुली स्वावलंबी अणि आत्मनिर्भर बनतील.

या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी –

१)योजेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असायला हवा.

२) ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा विद्यार्थी आठवी ते बारावी मध्ये शिकत असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्डची झेरॉक्स पुढील अणि मागील दोघे बाजुची
  • रेशनकार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अर्जदार विद्यार्थ्यांचे बॅकेत खाते असायला हवे अणि बॅक खातयासोबत आधार लिंक असायला हवे.
  • अर्जदार विद्यार्थी आठवी ते बारावी मध्ये शिकत आहे हे सिद्ध करणारे प्रमाणपत्र
  • अर्जदार विद्यार्थ्यांने सायकल खरेदी केली असल्याची पावती देखील दाखवावी लागणार आहे
  • कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाण ५० हजार पेक्षा कमी आहे याचे प्रमाण
  • अर्जदार विद्यार्थी अनुसूचित जाती मधील असणे आवश्यक आहे.
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर

अनुदानाची रक्कम –

सायकल अनुदान योजनेअंतर्गत मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल विकत घेता येण्यासाठी ४ हजार ५०० रूपये इतके अनुदान प्रदान केले जात असते.

योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत –

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने देखील आपला अर्ज सादर करू शकतो.

आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आपणास समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद महाराष्ट्र च्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे.

किंवा जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालय तसेच तालूका पंचायत समिती मध्ये असलेल्या महिला व समाज कल्याण विभागातील अधिकारी वर्गाला भेट द्यायची आहे अणि योजनेबद्दल विचारपुस करायची आहे.आपल्या जिल्ह्यात अशी योजना सुरू आहे का त्यासाठी अर्ज कसा करायचा हे सविस्तरपणे जाणुन घ्यायचे आहे.